१०/१२ वी नंतर काय?

Submitted by चित्रा on 18 June, 2011 - 12:57

मंडळी,

१०/१२ वी नंतर च्या वेगवेगळ्या वाटांच्या चर्चेसाठी हा बीबी.

इथे अशा वाटा, त्यांचे उपयोग वगैरे ची चर्चा अपेक्षीत आहे.

आपल्या आजूबाजूला किंवा नात्यात बरीच हुशार मुले असतात. पण परिस्थितीमुळे त्यांना फार उच्च शिक्षण घेता येत नाही. ते short course करून लवकरात लवकर घरच्यांना हातभार लावायचा विचार करतात. असे काही courses इथे discuss केले तर अशा मुलांना काही मार्गदर्शन करता येईल असे वाटले म्हणून हा बीबी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक माहीती हवी होती. नवीन धागा काढण्यापेक्षा याच धाग्यावर प्रश्न विचारलेला चालेल का ? (वर दिलेली लिंक बारावीनंतर अशी आहे जी मला उपयोगाची वाटत नाही ).

माझ्या पुतणीला एक माहीती हवी आहे. दहावीनंतर पहिली भाषा इंग्रजी असेल तर सिंगापूरमधे ११ वी ला प्रवेश घेण्यासाठी एक स्कॉलरशिप देण्यात येते. या स्कॉलरशिपबद्दल कुणी माहीती देऊ शकेल का ? तसंच स्कॉलरशिप मिळतेय म्हणून सिंगापूरला शिक्षण घेणं हे योग्य ठरेल का ? तिथल्या शिक्षणाचा दर्जा कसा आहे ?

शैलजा,

तुझा बाफ पाहिला. पण हा बाफ थोडा वेगळा आहे.

मला इथे १-२ वर्षात पूर्ण होणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती अपेक्षित आहे. ज्यामुळे एखादी चांगली नोकरी मिळू शकेल.

आमच्या भाजीवालीच्या मुलाला आत्ता १० वीला ७५% मार्क मिळालेत. पण आणखी ७-८ वर्ष शिकवण्याची त्यांची परिस्थिती नाहीये आणि लेकाने चटकन हातभार लावावा अशी त्यांची इच्छा आहे (खरंतर त्यांना दुसरा पर्यायही नाहीये ).

किंवा अशीही माहिती मिळाली तरी चालेल जसे एखादी स्कॉलरशिप किंवा काही फीस मध्ये सवलत वगैरे ...

डॉ. श्रीकांत जिचकार यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री करियर मार्गदर्शन योजनेअंतर्गत १०-१२वी नंतरच्या पर्यायांची माहिती देणारी एक पुस्तिका तयार केली होती. ती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येथे उपलब्ध आहे.

दहावीनंतर सायन्स-बायफोकल आणि नुसते सायन्स यांमध्ये तसेच कॉमर्स-बायफोकल आणि नुसते कॉमर्स यांच्यात काय फरक असतो?

>>> दहावीनंतर सायन्स-बायफोकल आणि नुसते सायन्स यांमध्ये तसेच कॉमर्स-बायफोकल आणि नुसते कॉमर्स यांच्यात काय फरक असतो?

कॉमर्सची माहिती नाही. सायन्ससाठी ११ वी व १२ वी ला एकूण ६०० गुणांची परीक्षा असते. त्यामध्ये किमान ५ व कमाल ६ विषय घेता येतात. त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व इंग्लिश हे १०० गुणांचे सक्तीचे विषय असतात. गणित किंवा जीवशास्त्र यापैकी किमान १ विषय घ्यावाच लागतो किंवा दोन्ही घेता येतात. दोन्ही घेतले तरी ६ वा विषय पर्यायी विषयातून घ्यावा लागतो (पर्यायामध्ये भूगोल, संस्कृत, जर्मन इ. पर्याय असतात). फक्त १ च घेतला तरी २ पर्यायी विषय घ्यावे लागतात. बायफोकलवाल्यांना एकच विषय २०० गुणांचा घेता येतो (इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, स्कूटर व मोटारसायकल सर्व्हिसिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अशा ४-५ वेगवेगळ्या पर्यायातून कोणतातरी एक विषय २०० गुणांचा असतो, म्हणजे २ पेपर असतात) व उरलेल्या ४०० गुणांसाठी वर दिलेले ४ विषय घ्यावे लागतात (ते विषय म्हणजे इंग्लिश, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित). ''जीवशास्त्र + बायफोकल" घ्यायला परवानगी नाही. "जीवशास्त्र + गणित" किंवा "गणित + बायफोकल" चालते.

नुसत्या सायन्ससाठी खालील विषय असतात (सर्व ६ विषय १०० गुणांचे)
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, पर्यायी विषय १, पर्यायी विषय २
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, जीवशास्त्र, पर्यायी विषय
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, जीवशास्त्र, पर्यायी विषय १, पर्यायी विषय २

बायफोकल सायन्ससाठी खालील विषय असतात (४ विषय १०० गुणांचे + बायफोकल विषय २०० गुणांचा)
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, बायफोकलचा विषय (एकूण १०० गुणांचे २ पेपर)

मास्तुरे, मुद्देसूद माहितीबद्दल मनापासून धन्यवाद.

बायफोकल (हे व्होकॅशनल पेक्षा वेगळे आहे का?) घेतल्याने पुढे बारावीनंतर पदवी प्रवेशात काही बंधनं येतात का?
बायफोकलचा मार्ग पदविका घेऊन पुढे जाण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतो का?

विज्ञान शाखेत बारावीनंतर तुम्ही सांगितलेल्या वरच्या पाच पर्यायांपैकी नुसत्या सायन्स मधला
[- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, जीवशास्त्र, पर्यायी विषय]
हा पर्याय बारावीनंतर जास्त पर्याय उपलब्ध करून देतो का? (वैद्यकीय, अभियांत्रिकी, बीएस्सी, इ.)

'कॉमर्स बायफोकल'बद्दल कोणाला माहिती असेल तर कृपया द्या.

१० वी नंतर नोकरीचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे ३ वर्षाचा पदविका अभ्यासक्रम, नंतर पदवीला जायचा पर्याय असतो आणि नोकरीचाही.
ITI चा पर्यायही चांगला आहे आणि त्याला आता चांगली मागणी आहे.

गजानन,

प्रथम एका चुकीची दुरूस्ती करतो. बायफोकल घेतले तर गणित घ्यावेच लागते व त्यामुळे जीवशास्त्र सोडावेच लागते. 'जीवशास्त्र + बायफोकल' असे घेता येत नाही. 'गणित + बायफोकल' किंवा 'गणित + जीवशास्त्र' घ्यायला परवानगी आहे. त्यामुळे ११ वी शास्त्रशाखेसाठी खालील विषय घेता येतात.

नुसत्या सायन्ससाठी खालील विषय असतात (सर्व ६ विषय १०० गुणांचे)
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, पर्यायी विषय १, पर्यायी विषय २
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, जीवशास्त्र, पर्यायी विषय १
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, जीवशास्त्र, पर्यायी विषय १, पर्यायी विषय २

बायफोकल सायन्ससाठी खालील विषय असतात (४ विषय १०० गुणांचे + बायफोकल विषय २०० गुणांचा)
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, बायफोकलचा विषय (एकूण १०० गुणांचे २ पेपर)

चुकीची दुरूस्ती आधीच्या प्रतिसादात सुद्धा केली आहे.

>>> बायफोकल (हे व्होकॅशनल पेक्षा वेगळे आहे का?)

हो

>>> घेतल्याने पुढे बारावीनंतर पदवी प्रवेशात काही बंधनं येतात का?

नाही

>>> बायफोकलचा मार्ग पदविका घेऊन पुढे जाण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतो का?

बायफोकलचा विषय ईलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणकशास्त्र असेल आणि पदविका याच शाखेत करायची असेल तर नक्कीच खूप फायदा होईल.

>>> विज्ञान शाखेत बारावीनंतर तुम्ही सांगितलेल्या वरच्या पाच पर्यायांपैकी नुसत्या सायन्स मधला
[- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्लिश, गणित, जीवशास्त्र, पर्यायी विषय]
हा पर्याय बारावीनंतर जास्त पर्याय उपलब्ध करून देतो का? (वैद्यकीय, अभियांत्रिकी, बीएस्सी, इ.)

वैद्यकीय, जैवअभियांत्रिकी (बायोटेक) इ. शाखांसाठी १२ वी पर्यंत जीवशास्त्र असणे सक्तीचे आहे. अभियांत्रिकीसाठी गणित असणे सक्तीचे आहे. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र सर्व शाखांसाठी सक्तीचे आहे. त्यामुळे जीवशास्त्र व गणित असे दोन्ही विषय १२ वी ला असले तर १२ वी नंतर जास्त पर्याय उपलब्ध असतात.

मास्तुरे, मनःपूर्वक धन्यवाद.

'कॉमर्स बायफोकल'बद्दल कोणाला माहिती असेल तर कृपया द्या.

बायफोकल आणि वोकेशनल एकच.

बायालॉजी ठेऊनही क्रॉप सायन्स असे बायफोकल/ वोकेशनल घेता येते.

इंग्रजी, फिजिक्स, केम, बायो, आणि( मॅथ, भाषा) यांच्याऐवजी २०० मार्कांचं क्रॉप सायन्स.

मॅथ गटात बाय फोकलला इलेक्ट्रॉनिक्स किंवा कंप्युटर घेता येते

जीवशास्त्र + बायफोकल असा पर्याय आहे.. पुण्यात फार कमी ठिकाणी.. माझ्या वेळेस फक्त आपटे प्रशालेतच तो उपलब्ध होता...

कॉमर्सला पण बायफोकल आहे... बँक व्यवसाय, कार्यालय व्यवस्थापन, विपणन आणि विक्रयकला, लघुउद्योग आणि स्यवंरोजगार.... महा स्टेट बोर्डाच्या टाईमटेबल वरती हे पेपर दिलेले आहेत... त्याचे पर्याय कोणते आहेत ते कॉलेज मध्ये शिकणार्‍याच कोणाला तरी विचारावे लागेल..

>>> जीवशास्त्र + बायफोकल असा पर्याय आहे.. पुण्यात फार कमी ठिकाणी.. माझ्या वेळेस फक्त आपटे प्रशालेतच तो उपलब्ध होता...

११ वीच्या अर्जासोबत हे माहितीपुस्तक मिळते त्यात असा पर्याय दिसला नाही. कदाचित नजरचुकीने तो दिसला नसावा. बायफोकलचे जे विषय आहेत (इलेक्ट्रॉनिक्स, संगणक शास्त्र, माहिती तंत्र्यज्ञान, स्कूटर व मोटरसायकल देखभाल, सिव्हिल इंजिनिअरिंग इ. ) या सर्व विषयांना गणित लागतेच. या व्यतिरिक्त बायफोकलचा कोणता पर्याय आहे याची कल्पना नाही.

नवीन बदल झालेले असू शकतात मास्तुरे... मी लिहिलंय ते १९९६ साली होतं... आणि तेव्हा.. मेडिकलला जाणारे आपटे मध्ये अ‍ॅडमिशनसाठी झगडायचे... कारण तसे केले की गणित सोडता येते...

>>> नवीन बदल झालेले असू शकतात मास्तुरे... मी लिहिलंय ते १९९६ साली होतं...

माझी माहिती २०१० ची आहे. त्यावेळच्या प्रवेशाचे माहितीपुस्तक आहे माझ्याकडे. Happy

कदाचित जीवशास्र + बायफोकल असं असेलही. मला ते नजरचुकीने दिसलं नसावं. पण असा पर्याय घेतलेलं कोणी माझ्या माहितीत नाही.

आता सायन्स+बायफोकल व कॉमर्स+बायफोकल असे पर्याय आहेत. कलाशाखेला बायफोकल नाही.

तसेच ९-१०वीला सामान्य गणित घेतलेल्यांना बायफोकलचा पर्याय घेता येणार नाही.

जागो, हल्ली गणित (बीजगणित + भूमिती) या विषयाचे दोन पर्याय असतात. सामान्य गणित आणि विशेष गणित. मला वाटते नववीत आल्यावर ही निवड करायला लागते. विशेष गणित थोडे अवघड असते.

हायला, हे काय नवीनच.. आजच ऐकले. आताच बालभारतीवर पुस्तके पहात होतो. पण त्यात नववी दहावीचे पुस्तक नाही. आठवी पर्यंत तरी एकच गणित आहे.

ज्यांना गणित जड जाते त्यांना अंकगणित निवडता येते. हे ९वीत करावे लागते.

पण शाळेमध्ये यासाठी वेगळे मास्तर ठेवावे लागतात त्यामुळे शाळा अंकगणित निवडलेत तर मुलांची वाट लागेल वगैरे सांगुन पालकांना घाबरवते आणि बीजगणित + भुमिती मुलांच्या गळ्यात मारते. अंकगणित एक विषय आणि अजुन एक साधासा ऐच्छिक विषय (जसे जनरल नॉलेज) असे निवडता येते.

गणितात नापास होणा-यांची एकुण संख्या लक्षात घेतली तर जास्तीत जास्त शाळांनी पालकांना ह्या विषयाची माहिती देऊन बिचा-या मुलांची गणिताच्या त्रासापासुन सुटका करायला पाहिजे. पण शाळांनी आपली सोय पाहिलीय. मुलांची सोय कोण बघणार???

अर्रर्र... ९ वी नंतर गणिताची पार वाटच की म्हणजे... शाळेच्या दृष्टीने बघितलं तर वेगळे शिक्षक असायची काय गरज... आहेत ते गणिताचे शिक्षक शिकवू शकतील की तो विषय.. वेगवेगळे वर्ग मात्र करावे लागतील.. सामान्य गणिताचा एक आणि विशेष गणिताचा एक..

असे कसे चालेल? बहुतेक वर्गात एकच विषय सुरु असतो.. म्हणजे या वर्गात विशेष गणित असेल तर त्याही वर्गात त्याच वेळी सामान्य गणित असणार.. मग त्याना दुसरे मास्तर नको का? तेच मास्तर कसे शिकवू शकतील ? प्रत्येक तुकडीला वेगळे मास्तर लागणार.

सामान्य गणिताची वेगळी तुकडी. १०० गुणांचं हिंदी/५० हिंदी ५० संस्कृत /१०० संस्कृत अशा तुकड्या. शाळा मग कोणत्या तुकडीत किती मुलांना प्रवेश द्यायचा ते ठरवतात. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात. एका मुलीला आठवीत १०० गुणांचे संस्कृत घ्यायचे तर मे महिन्यात परीक्षा घेतली , वर घरी कोणी संस्कृत शिकवणारे असतील तरच घे १०० गुणांचे संस्कृत असे सांगितले.

आमच्या वेळी बरे होते. आम्हाला फक्त चित्रकला की अर्थशास्त्र एवढाच पर्याय होता. दोन्हीचे वर्ग एकाच वेळी चालत. चित्रकलेचे विद्यार्थी तेवढा वेळ दुसर्‍या वर्गात जाऊन शिकत.

१०वी तल्या मुलांसाठी Aptitude test and career counselling साठी एखादी चांगली साइट किंवा कोणी विश्र्वासार्ह व्यक्ती सुचवू शकेल का कोणी बंगलोर मधे( पूणे मुंबई पण चालेल)?
पुढे काय करायचय याबद्दल काहिच ठरवता येत नाहीये. मुलगी हुषार स्मार्ट आहे. Biology चांगलं आहे पण मेडिकल फिल्डमधे जायचं नाही. इंजिनिअरींग करायचय पण गणिताची भिती वाटते. गणित समजते पण आकडेमोड, सोडवणे कठीण जाते.

तसेच भारतातील आणि भारताबाहेरील युनिव्हर्सिटीज् ची माहिती आणि प्रवेश प्रक्रिये बद्दल मार्गदर्शन माहिती असेल तर प्लीज सांगा. धन्यवाद.

Iph thane
https://m.facebook.com/iphorg/

इथे अशा टेस्ट केल्या जातात
आणि त्यानंतर कौन्सिलिंग पण केले जाते.

फक्त अशा टेस्ट्स मध्ये संगीत, कला अशा विषयातील मार्ग किंवा आवड फारशी लक्षात येत नाही.

थँक्यू वावे , प्रबोधिनीच्या साइटवर ऑनलाइन टेस्ट सापडली नाहि . फोन करून बघते.
थँक्यू सावली. बघते फेसबूक पेज.

Pages