श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

Submitted by जागोमोहनप्यारे on 16 June, 2011 - 07:00

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला याबाबत फारसे कुठे स्पष्टपणे वाचायला मिळत नाही. इंग्रज, पोर्तुगीज आणि भारतीय अशा तीन्ही इतिहासकारानी वेगळीवेगळी कारणे दिली आहेत.

१. विषमज्वर- टायफाइड

२. आतड्याचा अ‍ॅन्थ्रॅक्स.. यात आतड्याला इन्फेक्शन होऊन रक्त्युक्त उलटी जुलाब होतात.

३. महाराजांवर त्यांच्याच एका पत्नीने विषप्रयोग केला.

महाराजांचा मृत्यु नेमका कसा झाला?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुडबुडा.. बरोब्बर! Happy

अभिजीत२५, मलाही हे वाचून अशीच शंका आली.. पण महाराजांच्या अंताबद्दल नाही तर संभाजी नि राजारामच्या वर्णनाबद्दल.. राजाराम ह्यांचा बखरकार हेच लिहील की त्यांचा राजा कसा ग्रेट आहे. पण महाराज आपल्या दोन मुलांमध्ये नोकरांसमोर "हे सगळे अवगुण ह्याचे नि दुसरा मात्र गुणाचा" असे सांगतील काय? त्यापेक्षा ह्या दोघांना संभाळून रहावे.. किंवा अमूक करावे ज्याने राज्य वाढेल असे नाही का सांगणार? त्यात ही बखर संभाजी राजे जीवीत असताना लिहली आहे काय?

दोन जयंत्या....दोन राज्याभिषेक...>>>>>> मी जयंत्या बद्दल नाही बोलणार पण राज्यभिषेका बद्दल बोलावेच लागेल. पहिला राज्यभिषेक गागाभट्टानी केला. मधल्या ५०० वर्षाच्या काळात हिंदू राजाचा असा राज्यभिषेक झाल्याचं माझ्या वाचनात नाही. महाराजांच्या राज्यभिषेकाला ब्राह्मण समाजानी विरोध केला होता. वेदिक धर्माप्रमाणे राजा हा देवाचा अंश असतो अन शिवाजीला देवाचा अंश मानन्यास तेंव्हाचा सनातन वर्ग तयार नसतो. कारण त्यांच्या मता प्रमाणे शिवाजी हा शूद्र होता त्यामूळे त्यांचं राज्यभिषेक होऊच शकत नव्हत. पण गागाभट्टानी ते करुन दाखवलं. या राज्यभेषेकाच्या वेळी महाराजांची मुंज्य करण्यात येते. गागाभट्टानी या राज्यभिषेकासाठी गागाभट्टी नावाचं विधीपुस्तक लिहून तयार केलं. हे गागाभट्टी नावाचं पुस्तक आजही उपल्ब्ध आहे. त्या पुस्तकातील विधीचे सर्व मंत्र बघितल्यास असे लक्षात येते की मुंज वैदिक पद्धतीने करण्यात आली पण मुख्य राज्यभिषेक मात्र पौराणिक मंत्रानी करण्यात आला. म्हणजे महारा़जांची फसवणूक झाली.
या दरम्यान तीन मुख्य व दुखद घटना घडतात.

१) सेनापती प्रतापराव पवार हे बहेलोल खानशी लढाईत हारतात व त्यांना कापून काढण्यात येते.
२) महाराजांच्या बायकोचा आजारानी मृत्यू होतो.
३) राज्यभिषेकाच्या १२ व्या दिवशी जीजाबाई वारतात.

वरील तीन घटनांचा धागा धरून राज्यभिषेकात दोष असल्याचं सांगण्यात येते व त्यावर उपाय म्हणून दुसरा राज्यभिषेक करण्यात आला अशी एक विचारधारा आहे.
पण दुसरा मतप्रवाह असा आहे की गागाभट्टानी फसविल्यामूळे हिंदू धर्माचा विरोध म्हणून महाराजानी शाक्त धर्मा प्रमाणे राज्यभिषेक करवून घेतला.

शाक्त पंथामधे जातीधर्म नाहीत. त्या पंथाप्रमाणे राज्यभिषेक करताना महाराजानी एका अस्पृश्य स्त्रीशी विवाह केला(तीचं पुढे काय झालं माहित नाही). शाक्त राज्यभिषेकाची आजून एक बाजू अशी आहे की शिवाजीनी जरी वेदिक(पौराणीक) राज्यभिषेक केला तरी त्याला या जमिनीचा अधिपती बनता येत नव्हतं. या जमिनीचे मूळ मालक अस्पृश्य होते व त्यांच्या कन्येशी विवाह केल्याशिवाय त्याना ईथलं अधिपतीपद मिळत नव्हतं असा शाक्तांचा नियम होता. या जमिनीचा अधिपती बनण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शाक्त राज्यभिषेक करुन एक अस्पृश्य स्त्रीशी लग्न करणे. त्यामूळे महाराज शाक्त राज्यभिषेक करतात. म्हणजेच शाक्त राज्यभिशेक करण्याचं खालील पैकी कुठलंतरी एक कारण आहे.

१) तीन मृत्यूमुळे विधीतील चूका दुरुस्त करणे.
२) वेदीक पद्धतीने राज्यभिषेक ना झाल्याच्या रागाने शाक्तराज्यभिषेक करणे.
३) जमिनीचा अधिपती होण्यासाठी.

जमिनीचे मूळ मालक अस्पृश्य होतं व त्यांच्या कन्येशी विवाह केल्याशिवाय त्याना ईथलं अधिपती पद मिळत नव्हतं.

कुठली जमीन?

त्या पंथाप्रमाणे राज्यभिषेक करताना महाराजानी एका अस्पृश्य स्त्रीशी विवाह केला(तीचं पुढे काय झालं माहित नाही). शाक्त राज्यभिषेकाची आजून एक बाजू अशी आहे की शिवाजीनी जरी वेदिक(पौराणीक) राज्यभिषेक केला तरी त्याला या जमिनीचा अधिपती बनता येत नव्हतं.

>>> काही पटात नाहीये... नुसते विधाने किंवा मते देण्या ऐवजी संदर्भ देता आले तर बरे होईल.. मी खूप आधी म्हणालो आहे की या ठिकाणी संदर्भ देऊनच मते मांडा..

मी खूप आधी म्हणालो आहे की या ठिकाणी संदर्भ देऊनच मते मांडा..>> भटक्या शाक्त राज्यभिषेक वाचा. अन गागाभट्टी पण वाचा.

दुसरा राज्याभिषेक केला पण तंत्राभिषेक होता. त्यात विवाह होता असे माझ्याही कुठेही वाचनात आले नाही. शिवाजीला फक्त ८ बायका होत्या. आता ही नववी कोण?

मुंज वैदिक पद्धतीने करण्यात आली पण मुख्य राज्यभिषेक मात्र पौराणिक मंत्रानी करण्यात आला. म्हणजे महारा़जांची फसवणूक झाली. >> काहीही. अहो तो ग्रंथ उपलब्ध आहे. हजार वर्षात राज्याभिषेक प्रथम झाला. त्याला आधी सनातनी लोकांचा विरोध असला तरी राजांनी ते राजपुत वंशाचे आहेत असे सिद्ध केल्यावर तो मावळला हे आपण नाही लिहिले? शिवाय गागभट्टांनी काही दोन दिवसात हे कार्य आटोपले नाही. वैदिक धर्मात मंत्रांचे पुरश्चरणच असते. इतर काही नसतं.

कोण कशाची ढाल करून केंव्हा वापरेल ते काही सांगता येत नाही. म्हणूनच संभाजी ब्रिगेडचे फावते.

मृत्यू बाफवर राज्याभिषेक कसा काय आला?

"...मृत्यू बाफवर राज्याभिषेक कसा काय आला?..."

~ त्याचा उल्लेख याच धाग्यावरील माझ्या प्रतिसादामुळे आला आहे, केदार. जे नाव घेताच प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीची आदराने मान झुकते त्या नावाचा स्थानिक राजकारणासाठी सध्या कोणत्या पातळीवर उपयोग करून घेतला जात आहे त्याची प्रचिती आजकाल पश्चिम महाराष्ट्रात प्राधान्याने येत असल्याचे आढळत आहे. दोन जयंत्यांचा घोळ तर संपूर्ण राज्यात पसरला आहेच आणि राजांच्या नावाने सर्वांनी एकत्र यावे हे राहिले हा हेतू बाजूलाच राहिला, तर पक्षीय पातळीवर 'आम्हीच कसे खरे राजांना मानणारे..' याचीच खिचातानी शाळाकॉलेजला जाणारी आताची पिढी पाहत आहे.

जयंती ज्वर कमी पडला की काय म्हणून गेल्या दोन वर्षापासून कोल्हापूर-सांगली-सातारा या तीन ठिकाणी (अन्यत्रही असेल, पण त्याचा विदा नाही) मोठ्या प्रमाणावर 'दोन वेगवेगळा तारखांना महाराजांचा राज्याभिषेक धामधुमीत साजरा करण्याची साथ आली आहे. उद्देश्य ? महाराजांविषयी आदर ? की स्थानिक राजकारणात आपले प्रस्थ मिरवणुकीद्वारे कसे प्रस्थापित होईल याची चाचपणी?

वर श्री.बकासुर यानी राज्याभिषेक संदर्भात काही अभ्यासपूर्ण दाखले दिले आहेत, त्यावर चर्चा होईल; होऊ शकते. पण त्याचबरोबर यातील किती या राजकारणी नारळांना माहीत्त असेल? काय मिळवित आहेत हे लोक या महापुरुषाच्या दोन जयंत्या आणि दोन राज्याभिषेक तिथींचे भांडवल करून? एकेकाळी एकच जयंती सार्‍या शहरभर नव्हे तर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणावर साजरी व्हायची आणि सर्व थरावरील लोक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन त्या प्रतिमेपुढे नतमस्तक होत असत. आज पहिल्या तारखेला मानणारी व्यक्ती दुसर्‍या तारखेला निघणार्‍या मिरवणूकीकडे बघतही नाही, आणि व्हाईल व्हर्सा....प्रणाम करणे दूरच.

शाक्त पंथामधे जातीधर्म नाहीत.>>>>शाक्त राज्यभिषेकाची आजून एक बाजू अशी आहे की शिवाजीनी जरी वेदिक(पौराणीक) राज्यभिषेक केला तरी त्याला या जमिनीचा अधिपती बनता येत नव्हतं. या जमिनीचे मूळ मालक अस्पृश्य होते व त्यांच्या कन्येशी विवाह केल्याशिवाय त्याना ईथलं अधिपतीपद मिळत नव्हतं असा शाक्तांचा नियम होता.>>> चागला विनोद आहे.

@बकासुर...
महारांजांचा राज्याभिषेक हा त्यांचा प्रंचंड मोठा मानसिक छळ होता. कोट्यावधी रुपयांची खंडणी घेवून आणि अनेक मानहाणीकारक विधी करुन हा राज्याभिषेक केला होता. वस्तुस्थिती कळल्यानंतर महाराजांनी परत दुसरा राज्याभिषेक केला.
@डॉ.....
छत्रपती शिवाजी महाराजांचा मॄत्यू हा विषप्रयोगानेच झाला होता परंतू त्यांच्या बायकोने हा विषप्रयोग केला नव्हता.

प्रतिक देसाई यांच्याशी सहमत आहे. तुम्ही खूप साध्या आणि सभ्य शब्दात भावना मांडल्यात. तेहतीस कोटी देवांचं नाव घेतल्यावरही जी उर्जा मिळत नाही ती एकच नाव घेतल्यावर मिळते आणि ते म्हणजे छ. शिवाजी महाराज यांचं. दुर्दैवाने सुरूवातीपासून त्यांच्या चरित्राचा स्वार्थासाठी व्यक्ती आणि संघटनांकडून वापर झाला. कळत नकळत त्यांच्या चरित्राबाबत वाद निर्माण झाले. कुजबूज मोहिमा राबवल्या गेल्या. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत होतं आणि राहणार आहे कारण ते कुणी देव नाहीत. आपल्याच सारखा हाडामांसाचा मनुष्य मुघलांशी टक्कर घेऊन बंड करतो आणि छोटं का होईना पण स्वतंत्र साम्राज्य प्रस्थापित करतो ही गोष्ट महत्वाची आहे. एकदा सुरूवात केल्यावर, पाया घातल्यावर त्यावर कळस चढवता येतो. मराठी राज्याचा पाया महाराजांनी घातला. वीररक्ताला प्रेरणा महाराजांनी दिली. औरंगजेबाने दिल्लीचं तख्त सोडून दख्खनेत मराठी राज्याच्या मागे आपल्ञ शक्ती खर्च केली यातच सगळं सार आलं. याच प्रेरणेतून, पायाभूत कामगिरीतून पुढे मराठी राज्याचा विस्तार झाला. मुघलांची सत्ता खिळखिळी करण्याचं कामच छत्रपतीं आणि त्यांच्या शिलेदारांनी केलं.

गुलामीची मानसिकता बदलण्याचं काम महाराजांनी केलं. आपल्याच सारखा, दैवी शक्ती नसलेला माणूस हे करू शकतो तर आपण का नाही हा विचार महाराजांच्या चरित्रातून मिळतो. देवादिकांच्या कहाण्यातून हा विचार कधीच मनाला शिवत नाही. हे शिवचरित्राचं महात्म्य होय. ते अधिक चांगल्या प्रकारे लो़कापर्यंत पोहोचवता आलं असतं तर बरं झालं असतं.

महाराजांनी अफजलखानाची बांधलेली कबर असो, सैन्यात भरती केलेले मुसलमान असो हे महाराजांचं उदारमतवादी धोरण दर्शवतात. शत्रुत्व मृत्यूसोबत नष्ट होतं याची शिकवण देतात. या गोष्टींचं विकृतीकरण करणा-यांकडून आपण काही शिकायची गरज नाही. विकृत नजरेला आणि मेंदूला सगळं विकृत दिसतं. चांगलं तेव्हढं घ्यायची आज कधी नव्हे तो पाळी आलेली आहे. महाराज गुडघी रोगाने त्रस्त होते कि अन्य आजाराने याच्यावर आपल्या श्रद्धास्थानांबाबत अतिरेकी प्रतिक्रिया देणा-यांनी बोलू नये. कुठल्या का आजाराने असेनात ते हाडामांसाचे मनुष्य होते या मर्यादाच त्यांचे आजारपण सिद्ध करते.

इति लेखनसीमा

साकेत.. आपण जे विधान केले आहेत त्याबद्दल जरा साधने द्याल का?

कोट्यावधी रुपयांची खंडणी घेवून आणि अनेक मानहाणीकारक विधी करुन हा राज्याभिषेक केला होता. >>>> राजांकडून खंडणी आणि त्यांची मानहानी... हे हास्यास्पद आहे. विशेष करून त्यावेळी जी राजकीय परिस्थिती दख्खनेमध्ये होती त्यावरून तरी हा राज्याभिषेक राजांनी एका सम्राटा सारखाच केला हे स्पष्ट होते.

औरंगजेबाच्या ८८ वर्षे जगण्याचं रहस्य काय?

कसलं डोंबलाचं रहस्य! शिवाजी महाराज फक्त ५२ वर्षेच जगले हेच तर औरंग्याच्या दीर्घायुष्याचं रहस्य! >>>
पुरेपुर अनुमोदनं... Happy हे फक्त हसण्यावारी..

त्या पंथाप्रमाणे राज्यभिषेक करताना महाराजानी एका अस्पृश्य स्त्रीशी विवाह केला(तीचं पुढे काय झालं माहित नाही). शाक्त राज्यभिषेकाची आजून एक बाजू अशी आहे की शिवाजीनी जरी वेदिक(पौराणीक) राज्यभिषेक केला तरी त्याला या जमिनीचा अधिपती बनता येत नव्हतं.

>>> मलाही काही पटात नाहीये...

छत्रपती शिवाजी महाराजांचा मॄत्यू हा विषप्रयोगानेच झाला होता परंतू त्यांच्या बायकोने हा विषप्रयोग केला नव्हता.

साकेत, याचे डिटेल्स कशात/ कुठल्या पुस्तकात आहेत?

साकेत | 12 July, 2011 - 22:52
जागोमोहनप्यारे | 23 September, 2011 - 21:30

जामोप्या साहेब,
डोन्ट टेल मी कि जुलै, औगस्ट अन सप्टेम्बर ३ महिने या माणसाची पोस्ट तुम्ही वाचलीच नाहीत.

एका इन्ग्रजि पत्रात महराजाना विशप्रयोग झाल्याचा उल्लेख आहे.पन त्यासाठि सक्वार बाइ चे नाव घेतले जात नसुन सोयराबाइ चे घेतले जात होते.
दुसर्या राज्या भिशेका बद्दल. पाहिला समारम्भ झाल्यानन्तर रायडावर विज कोसलुन पागा बेचिराख झालि.त्यामुळे निश्चल्पुरि(?) च्या सागण्यावरुन (अप्शकुन्)झाल्यामुळे दुसरा राज्य भिशेक केला.

अपशकुनाची इतकीच घटना नव्हती... जिजाऊंचा मृत्यु आणि कुणीतरी एका मोठ्या सरदाराचा मृयुत्युही झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अभिशेक केला.

तो ब्लॉग वाचला ! ह्म्म्म्म बरोबर आहे ब्राह्मण फार मोठे कसाईच आहेत पहिल्यापासुन आणि बाकी हे असले जावई शोध लावणारे आणि त्यांच्या पुढच्या मागच्या सर्व पिढ्या धुतल्या तांदळासारख्या आहेत. Angry
अजुन भारी भारी शोध लावा म्हणाव, वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर, एकनाथ हे लोक अजुनही आहेत का ? की त्यांनापण हद्दपार केले ? ज्ञानेश्वरी (छे हे कसले नाव, ते गीतेचे जे काही भाषांतर आहे ते), भारूडे, इ. रचना त्यांनी केल्याच नसतील ना ? Angry
अजुन बरेच काही लिहावेसे वाटत आहे पण येथे असे काही लिहिणे उचित ठरणार नाही म्हणुन संयम ठेवत आहे.

निष्कर्ष काढणे अशक्य आहे.
महाराजांचा मृत्यू होण्याआधी देखील त्यांचं मृत्युच्या अफवा उठल्या होत्या विशेषत: इंग्लिश आणि पोर्तुगीज वर्तुळात.
तसेच त्याच्या मृत्युचे कारण सुद्धा तत्कालीन नोंदीमध्ये वेगवेगळे दिले गेले आहे. महाराजांच्या मृत्यूची अधिकृत बातमी मिळून सुद्धा अनेकांचा त्यावर विश्वास बसला नव्हता.

सध्या शिवाजि चि चलति आहे म्हणुन अवचटा नि पण आपलि पिपाणि वाजवलेलि दिसतेय.

>> अवचटांचा सन्दर्भ कुठे आहे?

डो. अनिल अवचटानी दोन तीनवर्षापुर्वी शिवरायांवर एक मोठा लेख लिहिला होता.

बहुतेक हाच तो लेख. कोणत्या तरॅ अंकात आला होता.

http://www.uniquefeatures.in/anubhav/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B...

Pages