मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" आओ बच्चों तुम्हें दिखायें झांकी हिंदुस्तानकी,
इस मिट्टीसे तिलक रोयें ( आं ?) धरती है बलिदानकी"

मी ( इयत्ता पहिली) : बापरे टिळक का रडले असतील?

दहावीला असताना एक दिवस अचानक बल्ब पेटला.

लहानपणी एका फेमस गाण्याचं पोरांनी केलेलं रुपांतर:

१. ओये ओये कांदापोहे बच्चा रोयेआ
त्या बच्च्याला कांदापोहे मिळाले नाहित म्हणून रडतोय, का मिळाले आणि आवडले नाहीत म्हणून रडतोय का तिखट लागले म्हणून रडतोय हे त्यांनाच ठाऊक.

२. पापसे धरती फटी, सीता अंदर गयी
लव कुश रोये, राम बोला ओये ओये

आओ बच्चों तुम्हें दिखायें झांकी हिंदुस्तानकी,
इस मिट्टीसे तिलक रोयें ( आं ?) धरती है बलिदानकी

>>>
याचे एक विडम्बन पुरुष वर्गात पिढ्यान पिढ्या लोकप्रिय आहे आणि ते फक्त पुरुषांसाठीच आहे Proud

ता. क. गरजूंनी मेलमधून सम्पर्क साधावा Proud

तेरे बिन पानी पानी हायला (?)...
तेरे बिन मै भी होउंगा मैला (?).... हे असं कहितरी गाणं सगळिकडे ऐकू येतं हल्ली...

काल एका हौशी तमिळ ऑर्केस्ट्राला जायचा योग आला. ऑर्केस्ट्रा तमीळ असला तरी काही हिंदी गाणी पण सादर झाली. ती गाणी ऐकून कानांचं जे काय झालं ते झालंच पण एका खास 'नॉर्थ इंडियावरून' आणलेल्या गायकाची गाणी हा या बीबीसाठी हिट्ट विषय ठरेल असा होता. शिवाय त्यात मधेमधे गाण्याचे शब्द विसरल्याने नुस्तंच लालाला करणं वगैरे वेंधळेपणा होताच.

कालची काही मौक्तिके:

है आज नये अरमानसे आझाद मेरे दिल की नगरी
बरसोंसे फिझा का मौसम था विरा बडी दुनिया थी मेरी.

========================

तुम जो मिल गये हो तो ये लगता है वहा मिल गया है (हे मधल्याच कुठल्यातरी कडव्यात असं गायलं गेलं)

=========================

रफ्तारफ्ता देखो आंख मेरी बडी है (इथे राकु स्टाईलने आधी डोळे नंतर माईकने हातवारे करत)
आंख जिससे बडी है वो पास मेरे खडी है

========================

दर्दे दिल दर्दे जिगर घरमे जगाया आपने

भयाण Proud

माझा एक मित्र परदेस मधल गाण आस म्हणायचा

दो दिल मील रहे है मगर चुपके चुपके
सबको हो रही है मगर चुपके चुपके

(हे ऐकून कुमार शानूने पार्श्वगायन सोडल म्हणे Proud )

तेरे होठोंको सीने से आज
चिपकाले सैंया फेवीकोल से

>> मी आणि घरातले सगळेच आत्तापर्यंत हेच म्हणत होतो.. अरेरेरे...

अशी ही बनवाबनवी ह्या धाग्यावरुन माझ अज्ञान आठ्वल......
लहान असताना हे गाण अस म्हणाय्चे

विजळी वंसत फुलताना... प्रेमात रंग यावे... >>>>> Rofl

नंतर ट्युब पेटली Happy

तेरे होठोंको सीने से आज
चिपकाले सैंया फेवीकोल से

>> मी आणि घरातले सगळेच आत्तापर्यंत हेच म्हणत होतो.. अरेरेरे...
<<< तरी बरं लोकांना सपष्ट समजावं म्हणून करीना आणि करीनेतर नाचणारे प्राणी हातामधे करीनाचा फोटो घेऊन नाचतात. Happy

शाळेतली प्रार्थना मला कित्येक वर्षे कळाली नव्हती.

या कुंदेन तू तुषार हार दवला.. निशेष जाड्या पहा (मी वर्गातल्या जाड्या मुलाकडे बघायचो
:):-):

बगळ्यांची मान... Happy

"कशी नाचे टणाटण मस्त मयुरी"...
हे गाणं आमच्या घरी काम करणारा इकडे तिकडे नाचत काम करताना म्हणायचा... आम्ही पण (काम नाही नुस्तं नाचत)
(नाट्यगीत - 'कशी नाचे छमाछम मस्त मयुरी') नाट्यगीत चांगलं आहे पण माझ्या कानावर ओरखडे आहेत.

अजून एक... <काहीतरी काहीतरी> थंडी जुलाबी... रातीची झोप मज येईना.
ते <काहीतरी काहीतरी > म्हणजे मला आत्ता शब्दं आठवत नाहीयेत... कुठल्याही लावणीतलं कायतही. असो.... तर धोबी यायचा कपड्यांचा गठ्ठा घेऊन हे म्हणत. तोंडात पान (त्याच्या तोंडात)... मला तरी ते ठामपणे जुलाबीच ऐकू आलय.

दाद, तुम्हाला बॉडी फंक्षन्सबद्दल काही ऑबसेशन आहे का? शेंबडाची कविता, मग हे जुलाबी. जरा वाचायला अवघड वाट्ते.

लहानपणी रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर ' फीचर फिल्म.....थोडीही देर में' अशी पाटी लागली की आमची रवानगी मागल्या अंगणात खेळायला होत असे. त्यामुळे बरेच दिवस मला एक शंका होती की, सगळ्या हिंदी सिनेमांचे 'थोडी ही देर मे' असे एकच नाव कसे असू शकते......

Pages