गाव तस प्रत्येकालाच आवडत कारण गाव हे गाव असत.
त्या मातीची ओढ कायम मनाला लागलेली असते.लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो की खुप धम्माल करायचो.रानात भटकयाचो,रानमेवा चाखायचो,रानपाखरांशी गप्पा मारायचो,विहिरीत मनोसक्त डुंबायचो.पण आता गावाला जाण सारख होत नाही.मग कामाच्या रहाटगाड्यातुन वेळ मिळाला की पाऊले आपसुकच तेथे खेचुन घेऊन जातात.असच मागच्या महिनाअखेरला एका मित्राच्या लग्नानिमित्त गावाला जाणे झाले.त्या दोन दिवसात लहाणपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.रानशिवारात मनोसोक्त हुंदडलो.
आमच्या गावच्या शिवाराचे निसर्गसौंदर्य कॅमेराच्या नजरेतुन मांडण्याचा हा एक प्रयत्न.....
बाभळीचे फुल आणि काटे...

रानात गेल्यावर यांच्या किलबिलाटाने एकदम प्रसन्न वाटत.

वेगवेगल्या रंगाचे ,आकारचे हे पक्षी आपल्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकतात.

परड... (गोठा)

कालवड ... पंधरा दिवसापुर्वी या परड्यात जन्माला आलेली ही कालवड कशी टेचात उभी आहे ना...

नवीन पालवी फुटलेल हे बोरीच झाड....

हिरवेगार उसाचे शेत.....

थोडीशी बागायती शेती...

ताजी ताजी वांगी...

टोमॅटो...

भुईमुग ...

नेहमी हसणारी ही फुल.....
फुल पाहुन मनात आनंदाचा झेंडु फुटला नाही तर नवलच..


हे एक अनोख फुल... (पांगारा)

फुलांचा खरा आस्वाद घेणारा हा बहाद्दर...
भुंगा

आंब्याचे झाड....
याच्या गर्द सावलीत छान झोप लागते.

आंबा

आंब्याच्या झाडावरील मधाच पोळ...

पिकायला घातलेले आंबे...

पिकलेले आंबे....
चला जरा रानमेवा चाखुया....
करवंद
जांभळ....
खाऊन अन फिरुन दमलात .. चला तर मग पोहुन येऊया..
आमच्या गावाला नदी नाही .पण विहीरी भरपुर.. काही शेतीसाठी वापरतात तर काही पाणी पिण्यासाठी...
खर म्हणजे पोहोण्यासारखा दुसरा व्यायाम नाही.
चला विहिरीत डुंबुया..
दगडात बांधलेल्या या विहिरीतील पाणी गारगार लागत.
आणि हा सुर मारला..
आणि हा मुटका.. थोड माग उभ रहा नाहीतर अंगावर पाणी उडेल ...
उडल ना..
आहा आता कस मस्त वाटतय....
विहीरीत तर यथासांग डुबलो.पण तेव्हढ्यावर भागल नाही म्हणून वळवाचा पाऊससुध्धा भेटायला आला.
कडकड करत ढगांनी आवाज केला.
टपोर्या थेंबानी धरणीमातेला येऊन मिळाला.काळ्या मातीचा गंध दरवळला.
शिवाराला आनंद जाहला.
सरींनी पत्र्याचा टाशा केला अन समदा रस्ता भिजवुन गेला.
पण बैलगाडीच्या चाकाप्रमाणे आपल्याला प्रवाही रहाव लागत ना.. दोन दिवस अनुभवलेली ही गाव-शिवाराची शिदोरी किती दिवस टिकेल माहीत नाही.
पुन्हा भेटुया....
रोहित ..एक मावळा













मस्त एक्दम.. गावची सफर घडवुन
मस्त एक्दम.. गावची सफर घडवुन आणलीस..
मस्तच रे... गायींचा आणि
मस्तच रे...
गायींचा आणि कालवडीचा झकासच !
सुर आणि मुटका मारतानाचे फ़ोटो जबरा आलेत
मस्तच.
मस्तच.
बाभूळ, कालवड, पांगारा आणि
बाभूळ, कालवड, पांगारा आणि शेवटचा बैलगाडीचा फोटो खूप आवडले.
यो रॉक्स सारखिच तुझ्या गावाचि
यो रॉक्स सारखिच तुझ्या गावाचि सफरहि भन्नाट आवडलि. फोटो व वर्णन मस्त.
मस्त फोटो. धन्यवाद तुमच्या
मस्त फोटो. धन्यवाद तुमच्या गावाची सहल घडवल्याबद्दल. पण ते आंबे, करवंद, जांभळं, फोटोत दाखवण्यापेक्षा इकडे पाठवलीत तर मला फार आनंद होईल.
मस्त.... सगळ्या आठवणी जाग्या
मस्त....
सगळ्या आठवणी जाग्या झाल्या......खुप धन्यवाद.....ए पण गाव कोणत तुझ....कारण माझ गावही असच आहे..
सावरी
धन्यवाद लोक्स... समद्यांचे
धन्यवाद लोक्स... समद्यांचे आभार..
ए पण गाव कोणत तुझ.... >> माझ गाव : जांब , तालुका- कोरेगाव , जिल्हा -सातारा.
झक्कास रे मावळ्या, मला त्या
झक्कास रे मावळ्या, मला त्या शेताचे फोटो आवाडले मला.
छान फोटो, पण गावाच नाव नाहि
छान फोटो, पण गावाच नाव नाहि सान्गितल?
फोटॉची clarity जबर्दस्त आहे!!
फोटॉची clarity जबर्दस्त आहे!!
जबरदस्तच......
जबरदस्तच......
धन्यवाद
धन्यवाद समीर,जान्हवी८५,नची,मीरा.श्री ... लय आभारी आहे
लई ग्वाड , मित्रा... एकदम
लई ग्वाड , मित्रा... एकदम चाबुक च
धन्यवाद प्र-साद
धन्यवाद प्र-साद
मस्त फोटो....हे असं काही
मस्त फोटो....हे असं काही पाहिलं की आपल्याला गाव नाही ह्याचं परत वाईट वाटायला लागतं.
तुम्हाला पुन्हापुन्हा गावी जायला आणि फोटो काढायला मिळोत 
आयला लय भारी....
आयला लय भारी....
Pages