फेसबुक आणि खोटा चेहरा... कदाचित तुमचाही!

Submitted by मोहना on 7 June, 2011 - 21:01

"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग, वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास." ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्‍या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.

रहस्यकथा आणि नाट्यलेखन करणार्‍या सुझन स्वत:ला प्रथितयश मानत नाहीत. त्यांचं नाव सर्वांनी ऐकलं असेल असंही त्यांना वाटत नाही. आणि तरीही परदेशातल्या कुणालातरी त्यांच्या नावे फेसबुक खातं तयार करता आलं ही वस्तूस्थिती आहे. सुझनमात्र फेसबुकमध्ये योग्य ठीकाणी खुणा करुन खाजगीपणा जपल्याच्या समाधानात होत्या. कुणीतरी त्यांच्या नावाचं खातं आधीच तयार केलं आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. नग्न देहावरती सुझनचा चेहरा वापरण्याचा किळसवाणेपणा आणि त्या सोबत येणार्‍या असंख्य गोष्टी... यावरुनच हे आंतरजाल जग किती धोकादायक आहे हे लक्षात येतं, तरीही आपण मात्र आपल्याबाबतीत हे होणार नाही असं समजून आपले, आपल्या कुटुंबाचे फोटो वेगवेगळ्या संकेतस्थळांवर/खात्यांवर प्रदर्शित करतो. आपल्या मित्रमैत्रीणींनी, नातेवाईकांनी ते पहावेत या इच्छेने. केव्हा केव्हा खाजगीपणा जपण्याची सर्व खबरदारी घेऊन तर कधीतरी कोण जाणार आहे उगाचच माझ्या वाट्याला असं वाटून तेवढीही तसदी घेतली जात नाही.

सुझनना तर फेसबुकचं काडीमात्रही आकर्षण नव्हतं. त्यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनच्या दरम्यान जनसंपर्क अधिकारी वायली यांनी चाहत्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी फेसबुक उत्तम आहे ह्याची कल्पना दिली तेव्हा प्रथम त्यांची तयारीच नव्हती. वेळ फुकट घालवायचं एक ठिकाण असंच त्यांचं फेसबुकबद्दल मत होतं पण आधुनिकतेला बाजूला सारताना साहित्य जगतात एकटं पडण्याच्या भितीने त्यांनी फेसबुकवर जायचं मान्यं केलं.

सुरुवातीचा आठवडा जुन्या परिचिताशी संपर्क साधण्यात कसा गेला ते कळलंही नाही. आणि अचानक एक दिवस वायलीचं ई मेल आलं, विषय अधोरेखित होता - फेसबुक. सुझनना वाटलं आधुनिक जगात प्रवेश झाल्याबद्दल स्वागत करणारं पत्र असेल. पण तसं नव्हतं. ते पत्र होतं त्यांच्या दुसर्‍या खात्याबद्दल. लिहलं होतं.
"गुगल केल्यावर तुमचं जे खातं येतं ते पाहून बेचैन व्हायला झालं. तुम्हाला हे कळवणंही त्रासाचं वाटलं तरी तुमच्या कानावर जावं म्हणून कळवित आहे."
ते खातं पाहून सुझनना धक्काच बसला. स्वत:च्या चेहर्‍यावरचे अश्लिल, संभोगासाठी उद्युक्त करणारे भाव पाहून शरमेने मेल्याहून मेल्यासारखं झालं. काही काळ सुन्नावस्थेत गेला. हा चेहरा त्यांचा कधीतरी वर्तमानपत्रात आलेला, कुठल्यातरी संकेत स्थळावर असलेला होता. सुझनना काय करावं या प्रश्नाने घेरुन टाकलं. मुळात संगणक प्रकाराशी फार सख्यं नाही. आणि आता हे काय वाढून ठेवलं होतं? कुणाशी संपर्क साधला की ते फोटो, खातंच नाहीसं होईल? समोर ’फेसबुक फॉर डमीज’ पडलेलं. त्यातले दूरध्वनीक्रमांक त्यांनी तातडीने फिरवले, पण उपयोग झाला नाही. त्यांना एकदम नेहमीच्या रस्त्यावर येता जात फेसबुकचं पाहिलेलं कार्यालय आठवलं. दूरध्वनिकार्यालयात फोन करुन त्या कार्यालयाचा काही माहिती मिळते का ते पहाण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. हे खातं त्यांनी फेसबुकवर यायच्या आधीचं होतं. याचाच अर्थ कुणी त्यांचं नाव ’गुगल’ केलं की हे असे फोटो, प्रतिक्रिया प्रथम पहायला मिळणार. सगळय़ा असफल प्रयत्नांनंतर एकच करता येण्यासारखं होतं. फसव्या फेसबुक खात्यावर जायचं, तिथे तुम्ही असल्याचं खात्री करणारं जे चित्र असतं त्यावर टिचकी मारुन आपल्या खर्‍या फेसबुकचा दुवा द्यायचा. सुझननी त्यांच्या मित्रमैत्रीणींना, नातेवाईकांना सार्‍यांनाच ही विनंती केली.

"रोज सकाळी उठल्याउठल्या धडधडत्या अंतकरणाने मी संगणक उघडे. फेसबुकच्या संचालकांकडून काही प्रतिसाद नव्हताच आणि माझं नकली खातं नष्ट होण्याची लक्षणं नव्हती. पोलिसांशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडे तक्रार काय नोंदवणार? नुकसान काय झालं म्हणून सांगणार? माझं हे रुप पाहून लोकांनी पुस्तक विकत घेणं बंद केलं म्हणायचं? याला पुरावा कुठून आणायचा? पोलिस काही करु शकले नाहीत. फेसबुक प्रशासनालाही अगणित ईमेल केली. प्रत्येकवेळी तोच पुस्तकी प्रतिसाद. तुमची तक्रार पोचली. हो पण पुढे काय?" अतिशय विषण्ण अवस्थेतला हा त्यांचा प्रश्न.

पुढे काय? सुझनची झोप उडाली. संभाषणात लक्ष लागेना. लेखन तर बंदच पडलं. मुलं कशी वाढत होती, काय खात पित होती याचं भान नष्ट झालं. त्याचं निराशेने ग्रासलेले मन उभारी घेईना. सगळ्याचा कडेलोट मैत्रीणीबरोबर फिरायला बाहेर पडल्यावर झाला.
"तुझं नाव गुगल केलं मी आज" मैत्रीणीच्या बोलण्याने सुझनचा चेहरा कसानुसा झाला.
"तुला क्षणभरही वाटलं......" पुढचं बोलणं मैत्रीणीकडून यावं, तिने ती शक्यताही नाकारावी असं वाटत असतानाच मैत्रीणीने नुसतेच खांदे उडवले, शरमलेल्या चेहर्‍याने ती म्हणाली,
"तूच असशील असं नाही वाटलं पण....."
२० वर्ष ओळखत होत्या त्या दोघी एकमेकींना, पण तरीही मैत्रीणीच्या मनाला ही शंका चाटून जावी यात सुझनना फार मोठा पराभव वाटला. एक चांगली व्यक्ती, लेखिका म्हणून लोकांनी ओळखावं यासाठी वेचलेले क्षण धुळीला मिळाले. रॅगिंगमुळे मुलं आत्महत्येपर्यंत का पोचतात हे कळलं तेव्हा असं त्यांना वाटतं. अस्वस्थ मनस्थितीत सुझननी याबाबत पाऊल उचलायचं निश्चित केलं. त्यांनी आपल्या वकिल पुतण्याला याबाबत लक्ष घालावं म्हणून विनंती केली. एका आठवड्यात फेसबुककडून काही कळलं नाही तर काय करायचं ते बेनने, त्यांच्या पुतण्याने निश्चित केलं पण त्याआधी सुझनना त्यांनी जे सांगितलं ते सुझनच्या कल्पनेपलिकडचं होतं. स्वत:च्या फसव्या खात्यावरिल शव्द न शब्द वाचायचा, तिथे असणार्‍या सर्वांचे चेहरे / फोटो नीट पहायचे आणि कुणा परिचिताचं हे काम नाही ना याची खात्री करायची.
"हे वाचण्याचं काम म्हणजे कुणीतरी बर्फाच्या लादीवर फेकून दिल्यासारखं होतं. गुदरमवून टाकणारी भितीची एक थंडगार लाट शरिरातून गेल्यासारखं. तिथे काय नव्हतं माझ्याबद्दल. संभोग वर्णनं, अश्लिल चित्र आणि माझ्या नावाने लिहलेले प्रतिसाद..., किळसवाणे, शरीर सुखासाठी आमंत्रित करणारे, त्याबद्दल सल्ला विचारणारे. यातल्या काही मित्र, मैत्रीणींची संख्या हजारांवर होती. याचाच अर्थ माझे हे फोटो खूप लोकांनी पाहिले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती." एकेक शब्द उच्चारतानाही त्यांचे कान, गाल शरमेने लाल होतात.

न समजणारं संगीत, भाषा, दूरदर्शनवरील कार्यक्रम असं करत हा प्रकार कोणत्या देशातून चालू असावा एवढा शोध लागला, नंतर शहर आणि शेवटी शाळा. मान्यवर शाळा. पण सुझन त्या शाळेचं नाव सांगत नाहीत. शाळेच्या संकेतस्थळावर त्या मुलांचे चेहरे पाहिले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, बदला घ्यावासा वाटायला लागला, त्या मुलांचे गळे दाबावेत ही भावना दृढ झाली. पण काही क्षणच. भान आलं तेव्हा त्यांना आपण असा विचार करु शकतो, ही पातळी गाठू शकतो याचीच शरम वाटली. विषण्ण मनस्थितीत त्यांनी चर्चच्या पाद्रींचा सल्ला घेतला. क्षमेचा सल्ला न देता त्यांना त्रास देणार्‍या मुलांना धडा शिकवावा असा सल्ला होता तो. त्यांच्या पुढे दोन पर्याय होते. त्या मुलांना असा काही धडा शिकवायचा की ती आयुष्यातून उठतील. त्यांच्या देशाचे कायदे खूपच कडक होते आणि या गुन्ह्यासाठी तुरुंगवास हा एकच पर्याय होता. अमेरिकेत पैशाचं नुकसान भरुन काढण्यासाठी त्या मुलांवर त्या खटला करु शकल्या असत्या पण ते खर्चिक होतच आणि पुरावा? या मुलांनी त्यांच्या अंतरात्म्याचा एक तुकडा तोडला, आत्मविश्वास धुळीला मिळवला याकरता अजूनतरी खटला नाही दाखल करता येत. सुझनपुढे खटला हा एक पर्याय होता नाहीतर पूर्णत: दुसरा मार्ग. शेवटी तोच त्यांनी स्विकारला. त्यांनी त्या मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ई मेल पाठवलं, विस्ताराने लिहलं. खूप विस्ताराने आणि त्यात फेसबुक खातं बंद व्हावं ही मागणी केली.

दुसर्‍याच दिवशी मुख्याध्यापकांचं पत्र आलं. त्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्याबद्दल सुझनचे आभार मानले होते आणि फेसबुकचं खातं बंद होईल याची खात्री. आणि तसं ते झालं. पण त्यांच्या ’मीच का?’ या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता आलं नाही. त्या मुलांनाही. मुख्याध्यापकांनीही मुलांना हाच प्रश्न वारंवार विचारल्याचं सुझनना लिहलं होतं. अनुत्तरित प्रश्न. त्या मुलांच्या दृष्टीने सुझन म्हणजे एक खेळणं होतं, मुखवटा! नाव, चेहरा याच्याशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं. चेंडू हवेत उडवला, काही काळ त्याच्याशी खेळलं आणि त्यांचा त्यातला रस संपला. त्या म्हणतात,
"आणि हेच फार भितीदायक वाटतं मला. इंटरनेटमुळे इतक्या सहसहजी माणसाचं खेळणं बनून जातं. बदनामीही अशी होवू शकते की माणूस आयुष्यातून उठेल."

अगदी खरं, आज हे सुझनच्याबाबतीत झालं. कदाचित तेच उद्या आपल्या बाबतीत होवू शकतं, आपल्या मुलांच्या बाबतीत. सुझन म्हणतात,
"तुमचं नाव, चेहरा... आणि त्याचं हे असं होतं. खरच असं झालं की ही लहानसहान बाब उरत नाही हे मी अनुभवाने सांगते. आणि त्यामुळेच मी मुख्याध्यापकांना एक विनंती केली. अशी विनंती की त्याचे परिणाम, शेवट मला कधीच कळणार नाहीत."

काय केलं त्यांनी? मुलांना शिक्षा देण्याची मुख्याध्यापकांना विनंती केली पण अगदी वेगळ्या तर्‍हेची. त्यांच्या या कृतीमुळे सुझनवर काय परिणाम झाले हे त्या मुलांनाच नाही तर पालकांनाही कळावं ही अट घातली त्यांनी. आपल्या हुशार, मान्यवर शाळेत जाणार्‍या मुलांचं कर्तुत्व आणि त्याचे सुझनवर झालेले परिणाम दोन्ही त्यांना कळावेत याकरता ते खातं मुलांच्या सोबत बसूनच पालकांनी पहावं ही अट घातली.

खरच शिकली ती मुलं धडा? झाला बदल त्यांच्या वृत्तीत? पाहिलं ते अश्लिल वर्णनांनी, चित्रांनी भरलेलं खातं त्यांच्या पालकांनी? सुझनना त्याची कल्प्नना नाही. त्या म्हणतात.
"माझं चारित्र्यहनन केलं त्यांनी. फार कठीण होतं ते परत मिळवणं. पण मिळवलं मी झगडून. हतबलता, हात पाय गळणे याचा खरा अर्थ कळला मला. सुडाने पेटून उठणं म्हणजे काय हे कळलं तसंच क्षमा करण्यातून काय समाधान मिळतं हेही कळलं. आणि हेच कारण आहे त्या मुलांची नावं न सांगण्याचं किंवा त्यांच्या देशाचं नाव न घेण्याचं. त्यांच्या हातून कळत नकळत झालेल्या चुकीमुळे त्याचं भवितव्यच नष्ट व्हावं असं नाही मला वाटत. त्यांची नावं सांगितली तर झोप उडेल माझी. क्षमेला काही अर्थ उरणार नाही. आता मी शांत चित्ताने झोपू शकते, आणि लिहते. लिहती राहू शकते."

गुलमोहर: 

छान केलंत हे लिहून. आंतरजालावरचे धोके यावर मीही लिहीणार आहेच. भयानक आहे हे सगळं.

जबरदस्त, विचार करायला लावणारा लेख.
आणि एवढे सगळे धोके पत्करुन फेसबुकावर बहुतांश लोक 'आज हे जेवलो आणि ४ शिंका आल्या' असल्या गोष्टींची चर्चा करतात, अवघड आहे.

ह्म्म, विचार करावा असाच लेख.

हो खरंय, बर्‍याच लोकांना आपण दिवसात काय काय केलं किंवा दिवस कसा गेला हे लोकांबरोबर शेअर करायची सवय आहे. माझ्या नवर्‍याची एक मैत्रिण आहे. तिला स्वतःचेच नाही तर इतर लोकांचे व अनेक फंक्शन्सचेही फोटो टाकायची फार सवय आहे. Angry

दोन आठवड्यांपुर्वीच तिची मुलाखत NPR (National public radio) वर द स्टोरी मधे ऐकली. धक्काच बसला होता, पण सगळ्यात आश्चर्य वाटले ते तिच्या "I love facebook" ह्या वाक्याचे. असा अनुभव येऊन सुध्दा तिला तसे कां वाटते, हे जर कळलं तर social networking sites चा वाढत्या प्रभावाबद्दल/वापराबद्दलची कारणं समजू शकतील.

नुस्ता विचार करायला नव्हे तर टेन्शन देणारा लेख.
एवढे सगळे धोके पत्करुन फेसबुकावर बहुतांश लोक 'आज हे जेवलो आणि ४ शिंका आल्या' असल्या गोष्टींची चर्चा करतात, अवघड आहे>> अनुमोदन.
आपल्या मुलांचे , घरातल्यांचे फोटो, फोन नंबर, इमेल पत्ते, एकमेकांशी असलेली नाती ( मॅरिड टू, इन रिलेशनशिप विथ) यासगळ्या गोष्टी जगाला दाखवत असतात.

तुम्ही कुणी वाचली नसेल तर अजुन एक माहिती. आजकाल बर्‍याच कॅमेर्या/ मोबाईल कॅमेर्‍या मधे जिपिस सुविधा असते. त्यामुळे काढलेला फोटो नक्की कुठे काढला हे नकाशात दिसु शकते. हे फोटो फेबु. फ्लिकर, पिकासो अशा ठिकाणि अपलोड करुन तुमचा पत्ताही जगजाहीर करुन आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण करु शकता.

मला आलेला एक अनुभाव:
काही वर्षापुर्वी माझा आणि लेकीचा फोटो ऑर्कुट वर होता. आमच्या भारतवारीत एका डोमेस्टीक फ्लाईटमधे (२ तास) एक माणुस आमच्या बाजुच्या सिटवर बसला होता आणि एक बाई आयल सोडुन दुसर्‍या सीटवर होती. या लोकांनी आमचे दोघींचे बोलणे ऐकले असावे.
काहि दिवसांनी ऑर्कुट बघितल्यावर या दोघांचे इन्विटेशन होते. "आपण फ्लाईट मधे भेटलो होतो" Uhoh
त्यांनी कसे आणि काय शोधले तेच जाणे. पण ते बघितल्यावर मला प्रचंड टेन्शन, भिती असे वाटले होते. फोटो अर्थातच काढुन टाकला.

हम्म्म. सॅड अँड स्केरी.
फेसबुकवर असे पॉर्नोग्राफिक मटेरीयल टाकले तर Facebook अ‍ॅक्शन घेत नाहीत का.

फेसबुकचे तोटे, नविन पिढीवर / टिनएजर्सवर त्याचे होणारे परिणाम यावर बराच उहापोह झालेला आहे, होत आहे. काही महिन्यांपूर्वी न्यू जर्सीमधे एका विद्यार्थ्यानं केलेली आत्महत्या आठवत असेल. त्या विद्यार्याच्या रूममेटसनं त्याचे खासगी व्हिडीओज ट्विटर वर टाकले होते. या रूममेट मधे एक भारतीय वंशाचा मुलगाही होता. सोशल नेटवर्कींग, सायबर बुलींग आणि त्याचे दुष्परीणाम याबद्दल बरेच लोक नेटानं प्रयत्न करत आहेत. लहान मुलं, टीनएजर्स, आणि महाविद्यालयीन मुलं यांना अशा परीणामांची जाणिव करून द्यायला हवी. आमच्या ऑफीसमधल्या मॅगझिनसाठी मी लिहीलेलं एक आर्टीकल:

Cyber Bullying

For my “Expository Writing” class in college, I wrote a summary essay on Michael Bugeja’s article “Facing the Facebook” (The Chronicles, January 2006) as my class project. Since then this subject has had a significant impact on my thoughts. Coincidentally, during that time, I also read the news about a NJ student who committed suicide because his roommate posted an inappropriate video of that student on Twitter. That student, Tyler Clementi, was just 18 years old. This is not the age to commit suicide. This is the age to see dreams, make plans for a bright future, study hard to get good grades, work hard, and have fun in the life with friends and family. There should be a lot of hope and desire to live every moment of their life to the fullest. Tyler committed suicide because his roommate – whom he trusted – made a mistake. And it seemed that the impact on him was so severe that he was unable to cope with it and he probably felt that committing suicide was the only way to escape the social consequences he would face. Since then, through my research I have learnt that this phenomenon is called cyber bullying. So what exactly is cyber bulling? Why does it lead its victims to feel that such an extreme step is the only solution and what can one do to mitigate this?

I had watched the explosive growth of online social networking since its infancy, and was both amazed and slightly scared by it – amazed by the unending positive and powerful uses that were being discovered for it, but also scared about how this power was in many ways uncontrolled and could easily abused. For this reason, the news about Tyler’s suicide really made me uncomfortable and concerned. I have a daughter who will be going to middle school pretty soon. She will one day to go to the college. Learning the art of social networking is critical for her development. I want her to have a positive experience of school and college. I want to make her strong and capable of handling different situations. At the same time I want her to be a good human being, to be considerate and sensitive to others. As a mother, I keep thinking how I can teach her to be a responsible person, and to be aware of the consequences of irresponsible online social networking. I am sure there are many mothers who have these concerns. I wish to find a way – if not the answers – to address these concerns.

The more I researched the issue of cyber bullying, the more I realized that this issue is getting extremely serious. The wide and instantaneous reach of electronic media and the anonymity it offers makes for a very powerful and dangerous tool. Entrusting such a powerful tool into the hands of a generation that is inexperienced and naive about the serious consequences is at times leading to disastrous results. Rob Lucenti has claimed in the article, Ethics and Social Media, “Among other findings, the survey revealed that many teens do not consider how others—particularly those who could influence their lives—might react to their postings.” Having the right controls in place will probably help. But even more important and urgent than that is the responsibility that parents and the society in general has to guide and train them for responsible use of online social networking. As I learn how to guide my daughter along the treacherous social networking path, I hope to make more and more parents and teachers aware of the concerns and responsibilities associated with this rapidly growing phenomenon.

Before a full understanding of cyber bullying can be achieved, one needs to understand what traditional bullying means. In their book Cyber Bulling, authors Robin Kowalski, Susan Limber and Patricia Agatston have described bullying as an “aggressive behavior that is intentional and that involves an imbalance of power or strength”. The imbalance of power can be due to differences in the physical strength, social status, age, gender, racial or ethnic factors. Bullying is usually a repetitive behavior. According to the authors, “traditional forms of bullying include direct behaviors such as hitting, kicking, taunting, malicious teasing or name calling, but they also involve indirect behavior, such as rumor-spreading, social exclusion or shunning, and manipulation of friendships” .The number of children that are victims of bullying is very large and hence shocking. In their article Bullying and Harassment in the United States, Sharon Schoen and Alexis Schoen point out that according to one studies estimate, “every day, 160,000 school children stay home to avoid the attacks and intimidations of their peers”. The authors further note, “According to studies of the American Academy of Child and Adolescent Psychiatry, 50 percent of children have been the victims of a bullying incident, and 10 percent of children are regularly victimized”. Though it is more common in children, bullying can happen at any age. The bully is usually dominant and assertive while the one who is bullied usually has a weaker and sensitive personality and is unwilling to stand up to the bully or fight back. The consequences of bullying are severe, can last for a very long time, even into adulthood, and can severely impact the person psychologically.

So what is cyber bullying? It is a new form of bullying, where a person uses the power of electronic media to bully someone. Authors Robin Kowalski, Susan Limber and Patricia Agatston say, “Defining the parameters of cyber bullying has proven somewhat difficult, in part because the methods used to cyber bully are varied”. The authors notes that types of such media include, but are not limited to, email, online public forums, bulletin boards, blogs, text messages, chat rooms, blogs, websites and online social networking sites. According to the authors, there are different types and methods of cyber bulling like flaming, impersonation, outing and trickery (sharing personal, embarrassing information with others), cyber stalking, and happy slapping. Unlike traditional bullies, cyber bullies can hide their real identity while using electronic media. For this reason, there is not much information available about the children or people who are cyber bullies. Logically however, they may have the same motives as traditional bullies. Also, bullies can attack people online while sitting within the safety of their home. Media Awareness Network has noted in the article Cyber bullying: Understanding and Preventing Online Harassment and Bullying, “The Internet can be a perfect tool for harassing others because it offers bullies access to their victims 24/7, even when the victim is at home”. It also notes that, “The power of the Internet also means that hateful messages can be widely distributed to millions of people”.

The use of online social networking is now apparently spreading into the wrong hands. Why is this happening? Normally people will think twice before giving anyone personal information about themselves to anyone in person. But when it comes to their online behavior, they are extremely careless or have a false sense of security and leave personal information about themselves in easily accessible areas. According to a report that was aired on CBS evening news, sexual predators, gang members, political candidates and non profit organizations are now using the power of online social networks to target groups of people based on their personal interests and characteristics. They tap into the wealth of personal information left on such sites to identify who will be more easily influenced by their message and who will most likely support their cause. According to the article Bullies use Social Networking websites to terrorize other teens written by Steven Swinford, “The boom in social networking sites has been accompanied by the spread of “cyber bulling”, a trend that some experts believe is fast getting out of hand.” It’s easy to see that this makes it very easy for such powerful groups to manipulate unsuspecting people into acting in a particular manner to further their cause. And the viral power of such media makes the consequences extremely damaging to those affected.

As a result of such influences, online social networking not only has the power to change society, but it appears to be doing so without raising too many alarms or flags. This change is happing incredibly fast. It is changing the ways of communication. As Amanda Gefter says in her article The difference between “Real” and online is no longer clear-cut, “While older adults go online to find information, the younger crowd go online to live. The boundaries between offline and online are blurring.” People no longer feel the need of ‘in person’ communication or socialization. I observed a scene a few months ago, that at the time seemed funny. When attending an engagement ceremony in Houston with my family, my daughter met a cousin. Though it was the first time they ever met, they seemed to be playing well together and did not appear to be bored by the long ceremony. But when I observed them closely, I realized that each had a Nintendo (a hand held gaming device), had connected to each other, and were playing against each other through the devices. So though they were sitting together and were playing “with each other”, they were actually engrossed in staring at their own handheld’s screen and were completely ignoring each other.

Imagine this in a bigger scenario with adults who prefer to interact using on-line media rather than an in-person one-on-one interaction. I have some friends who will communicate with me only via text messages. We text so much back and forth that at some point I get tired and just call them directly at the same number they were texting me from. And they don’t answer! I believe this is because using this medium provides them with a sense of security in three ways. First, they have a choice of whether or not to respond. Second, they have a choice of whether to respond immediately or to delay. Finally, they can hide their emotions, level of interest, and even their sincerity in this manner. It is hard to do this in direct one-on-one conversations, even on the phone. This is the direction where society and the norms and preferences regarding social interaction seems to be headed today. And this really troubles me. It reflects a sense of insecurity and an inability to handle uncomfortable or downright devastating situations and interactions. And by continuing down this path will probably make matters worse as direct interpersonal skills will start rusting or will remain undeveloped. This could make this a dangerous cycle which we will be unable to break.

Tyler’s suicide was not the first case where the power of online social media was put to negative use with a sad consequence. And it may not be the last. It is true that there is some murmur about the negative power wielded by online social networking sites such as Facebook. But Facebook has, in a manner that may seem daring and defiant, stuck to its guns and successfully warded off any external or regulatory controls on its policies and practices. And this has not had driven off or reduced the number of users, not just for Facebook, but for all online social media in general. In fact, these numbers are still increasing, which means that more and more people will be exposed to such risks. And since they will be unable to develop the skills to deal with these risks, more people may be forced to take extreme steps. How many more Tylers will it take before everyone sits up and takes notice of the seriousness of the situation? How many more will go through the anguish of losing a loved one due to the ignorant or inconsiderate use of such power by a naïve person? What can everyone involved do to prevent this?

I realize that there are no easy solutions. But the potential negative consequences due to misuse of the power of online social networking are too painful for the society to just turn a blind eye to. One has to understand that with the omnipresent viral capabilities of such media, the chances of these negative consequences only happening to someone else, and not to them, are probably very slim. The degrees of separation between them and the next victim could grow smaller. To prevent this, everyone has to be a spread the message and educate the society on how they can keep themselves and their loved ones safe. I will play my own little part in making this happen. And I will continue to educate and implore everyone I meet to do the same. Hopefully I can make a difference.

स्केअरी खरंच ..

पण आपण काय जेवलो, कुठे गेलो, घरातल्याबद्दलच्या गप्पा इकडेही वाहत्या बीबी वर किंवा काही वेळा सेव्ह होणार्‍या बीबीज् वर असतात .. मला तर त्यानेही टेंशन येतं कधी कधी ..

सशल,
कल्लोळाला पन्ना आणि रूनीबरोबर याच्या गप्पा झाल्या. हेच हायलाईट झालं की वाहत्या बाफवर आपण विश्वासाने (आणि कधी कधी वाहता बाफ म्हणूनही) पोस्टी टाकतो पण कोण कोण त्या पोस्टी वाचतं याचा खोलात जाउन विचार करतो का?

अंजली खरंच!

मला समर्थन नाही करायचं पण असंही वाटतं की ह्या सूझन लेखक असल्यामुळे तसं प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं (इंटरनेटवर इतरत्र फोटो उपलब्ध असणे, नाव वगैरे) .. प्रसिद्धीच्या झोतात नसलेली माणसं त्यामानाने कमी रिस्क-प्रोन असावीत ..

मला कधीही फेसबूक आवडले नव्हते. आपला लेख वाचूनतर त्या बद्दला अजूनच घृणा उत्पन्न झाली. चांगला लेख. हे सोशल नेटवर्कींग नाही. हा फक्त टाईमपास आहे व मंदार म्हणतात तसे व्यसन आहे.

हे थोडंसं 'यंत्रे शाप की वरदान' प्रकारात होतंय का?
मोहनाचा लेख योग्यच आहे, डोळ्यात अंजन प्रकारचा आहेच आणि खबरदारी घेणे किंवा विचार करणे हे गरजेचे आहेच पण म्हणून कुठलीही सोय (सोशल नेटवर्किंग मग ते फेबु/ ऑर्कुट असो की माबो-मिपा असो) मुळातूनच बेक्कार आहे असं नाही म्हणू शकत ना आपण?

सशल, प्रचंड प्रसिद्धी असलेल्यांपेक्षा किंचित प्रसिद्ध असलेल्यांना धोका जास्त असावा असं मला वाटतं यामधे. एकतर प्रचंड प्रसिद्धी असलेल्यांचा स्वतःचा पेड पी आर असतो या गोष्टींचा समाचार घ्यायला आणि प्रचंड प्रसिद्ध व्यक्तींच्याबाबतीतल्या अश्या गोष्टी खोडसाळपणे केलेल्या असतात हे सगळेच समजून असतात. पण छोट्या प्रमाणात (गावापुरते/ जिल्ह्यापुरते किंवा तत्सम) प्रसिद्ध व्यक्तींची माहिती मिळू शकते नेटवर फोटोसहित आणि तसं जगभर कोणी ओळखत नसतं त्यामुळे अशी विचित्र ओळख पसरवणं सोपं असावं.

लेखाद्वारे महत्वाची महिती दिली आहे, सोशल नेटवर्किंग करताना सतर्क राहणे गरजेचे आहे हे अधोरेखित झालं आहे. धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

पण म्हणून कुठलीही सोय (सोशल नेटवर्किंग मग ते फेबु/ ऑर्कुट असो की माबो-मिपा असो) मुळातूनच बेक्कार आहे असं नाही म्हणू शकत ना आपण? >>>

नीधप यांच्या वरील मताशी पूर्णपणे सहमत.

फ़ेसबुकवर टाइमपास हा भागच अधिकांशाने असतो हे मान्य असून देखील, असं म्हणावसं वाटतं की,
एखाद्या गोष्टीचा चांगला/वाईट वापर करणे हे वापरणार्‍याच्या वृत्तीवर अवलंबून असते.
त्यामुळे गैरवापर केला म्हणून ती गोष्ट वाईटच आहे असं शिक्कामोर्तब करणं ठीक नाही.

फ़ेसबुकवर उघडपणे ओळख देणे, आपली वैयक्तिक माहिती नको तितक्या प्रमाणात प्रसिद्ध करणे इ. गोष्टी अधिक प्रमाणात आढळतात. त्याचा गैरवापर केला गेला म्हणून गैरवापर करणार्‍याला दोष देणं योग्य ठरेल, फ़ेसबुकला नाही.

मायबोलीसारख्या इतक्या चांगल्या साइटवर अती प्रमाणात ओळख लपवणे, विचित्र टोपणनांवे धारण करणे, डु-आयडी निर्माण करून बेधडक विधाने करणे हे प्रकार खूपच आढळतात.
म्हणून मायबोलीला दोष दिला गेला तर कितपत योग्य ठरेल ??

अता प्रगत भारत हवा तर काही तर हे सगळं आलंच की......थोडी रिस्क तर घ्याविच लागेल न..?
राहीली आपल्या ओरीजिनल प्रोफाईल ची गोष्ट...तर ज्याला द्यायची असेल त्याने द्यावि नाही द्यायचीय तर नका देउ...अगदी चालता चालताही मणसाचा जिव जातो....जे व्हायचं आहे ते होणारंच....म्हणुन काय चालणं थांबवावं....पण हो....अगदी १००% खाजगी माहीती अशा साईटवर पुरवण्याचा 'खुळचट' पणा करु नये...'अति तेथे माती' हे ही लक्षात असावे...कारण सर्वांनांच आपली माहीती असावे असा सुज्ञ प्रोफाईल धारकाचा हेतु नसतो.....काही खास लोकांनाच असावि असा असतो...त्यांच्याशी वेगळा संपर्क साधुन माहीती पुरवावी.

पण या प्रगतिचा पुरेपुर फायदा घ्यावा..!
शेवटच्या क्षणी असं नको व्हायला....अरेरे इतका जगलो इतका शिकलो पण, 'फेसबुक' 'ऑर्कुट', 'ट्विटर' म्हणजे नेमकं काय हे इच्छा असुनही पाहीलंच नाय...

(ईच्छा नसेल तर ठिकच आहे.., यचा अर्थ आपण या सोशलसाईटवर आपला प्रोफाईल यशस्विपणे हाताळण्याच्या कुवतिचे नाहीत...म्हणुन विचार सोडुन द्यावा...)

आपल्या 'टाईमपासा'मुळे एखाद्याला कशातून जायला लागते, हे त्या मुलांना कळले का तरी?
आंतरजालावर वावरताना योग्य ती खबरदारी घेणे हेच योग्य.

सावली फोटोंच्याबाबतीत जिपिस सुविधेबद्दल माहीत नव्हते, धन्यवाद.

फेसबुक बाबत मी तरी अजून गोंधळातच आहे. तिथे नेमके काय चालते, त्याचा अजून नीट उलगडाच होत नाही. मायबोली जिंदाबाद !!

http://www.kgun9.com/story/14665941/geotagging-a-cyber-stalkers-dream

Combine information in a geotag with another Facebook feature and Russell Blaylock, a computer forensics investigator at TPD, says you have a jackpot for criminals. "If you post something on there and make an indication of your location. Facebook for example has a check-in status and it logs you in and puts a geotagging with Google maps. From there, anyone could know where you are at any given moment and if they know you live in a certain location your house could be easily burglarized or at least checked out."

So, how do you avoid putting your personal information out there for others to see? Well, don't put it out there. If you do, just turn off the GPS function on your smart phone.

माझ्या कॉलजमधल्या मुलीने फेसबुकवर खाते उघडले आहे. संगणक क्षेत्रात अनेक वर्षे असल्यामुळे अशा माध्यमांचे धोके व फसवणूकीचे मार्ग मला माहित आहेत. तिला खालील सावधगिरी बाळगायला सांगितली आहे.

१) स्वतःचा खरा फोटो फेसबुकवर टाकायचा नाही.
२) स्वत:ची फक्त जन्मतारीख फेसबुकवर टाकायची. जन्मवर्ष टाकायचे नाही.
३) स्वतःचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, इ. व्यक्तिगत गोष्टी फेसबुकवर शेअर करायच्या नाहीत.
४) तिला अनेक अनोळखी मुलांच्या फ्रेंड रिक्वेस्ट येतात. मुलीच्या नावाने एखादे खाते दिसले की ती अनोळखी असली तरी लगेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याचा आचरटपणा अनेक मुले करतात. मुलीचे नाव घेऊन एखाद्या बाप्याने सुध्दा खाते उघडले असेल किंवा पर्सनल माहिती घेऊन फसवणूकीच्या हेतूने काही जण कॉन्टॅक्ट वाढवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी मुलाची किंवा मुलीची सुध्दा फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करायची नाही.
५) अधूनमधून मी तिच्या फ्रेन्ड्सची यादी बघतो. तसेच तिला कोणी फालतू मेसेज पाठवत आहे का हे देखील चेक करतो. प्रायव्हसी सेटिंग ऑन नसल्यामुळे वॉलवरील मेसेज कोणीही पाहू शकतात.
६) सोशल साईट्सच्या माध्यमातून कशी फसवणूक होते ह्याबद्दल तिला बर्‍याचवेळा समजावून सांगितले आहे. तसेच वृत्तपत्रात येणार्‍या फसवणुकीच्या बातम्या तिला वाचायला लावून फसवणूकीबद्दल जागरूक करतो.

खरेतर इथे सुझन यांनी यापैकी कोणतीच मर्यादा ओलांडली नव्हती असे दिसते (किंबहुना त्या फेसबुकापासून अजूनपर्यंत दूरच होत्या). त्यांचे जे काही फोटो वगैरे वापरले गेले ते मिडियात प्रसिद्ध झालेले होते.

एक चांगला लेख आहे हा.
काही शंका मनात येतात

भारतासारख्या ठिकाणीही आता सायबर गुन्ह्यांबद्दल जागृती झालेली आहे. गुन्हे शोधले जातात, लोक तक्रारी दाखल करतात मग अमेरिकेसारख्या देशातल्या स्त्रीने इतकं गलितगात्र व्हावं हे खटकतय. तिला खाजद्\गी हॅकरच्या मदतीने कुणी हा चावटपणा केलाय हे शोधून काढणं सहज शक्य होतं. अमेरिकेत इतकं ज्ञान तर असेलच प्रत्येकाला..
अर्थात ही शंका आहे माझी.

विचार करायला भाग पाडणारा लेख... Sad
एखाद्या गोष्टीचे जितके फायदे असतात, तितकेच तोटे सुद्धा असतात. ऑर्कुट्/फेसबुक मुळे आपण लांबच्या मित्र-मैत्रिणिंच्या सतत सहवासात राहू शकतो, नविन घडामोडींवर चर्चा करू शकतो.. पण प्रत्येकाने आपल्या सुरक्षिततेसाठी तितकंच सतर्क राहणं गरजेचं आहे.
टिनएजर्स मध्ये फेसबूक्/ऑर्कुट हे एक निव्वळ फॅड आहे. माझ्या लंचग्रुप मधल्या मुलिचा १३ वा वाढदिवस होता, त्या दिवशी तिने बर्थडे गिफ्ट म्हणून फेसबूकवर अकाऊंट उघडण्याची परवानगी मागितली. बाकी काही नको हे ही ठासून सांगितलं. म्हणजे हे सोशल नेटवर्किंग किती पॉप्युलर आणि स्टेट्स सिंबॉल म्हणून फेमस आहे ते कळेलच. माझी एक मैत्रिण सुद्धा मला परवा ६ वर्षांनी भेटली.. 'हे काय तुला फेबु अर पण शोधलं, सापडली नाहीस...' हे तिचं पहिलं वाक्यं होतं.. मी तिथे नाही हे सांगितल्यावर तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहता मला चक्क आपण फार मागासलेलो असल्याची भावना आली.. Sad
असो, पण मी माझ्य मतावर ठाम आहे याचं समाधान वाटतंय. ऑर्कुटवर माझं ही अकाऊंट होतं. तेव्हा फॅड म्हणून फोटो अपलोड करणे, नविन मित्रमैत्रिणी बनवणे हा छंद निर्माण झाला. हळूहळू काही प्रकरणं पेपरात वाचल्यावर झोप उडाली आणि एके दिवशी ते अकाऊंट डिलिट केलं... २ वर्षांनंतर पुन्हा मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर पुन्हा उघडले.. पण त्यात स्ट्रिक्टली फक्त ज्यांना ओळखतो.. भेटलो आहे.. अशांनाच ओळख दिली.. फेसबूकवर तर मी कधीच जाणार नाही..

दक्षिणा, अगं ऑर्कुटचंच भावंड आहे फेसबुक. ऑर्कुट चांगलंय आणि फेसबुक मात्र बदनाम असं काहीच नाहीये. हम्म, फेसबुकमुळे ऑर्कुट मागे पडलंय मात्र.

दक्षिणा, अगं ऑर्कुटचंच भावंड आहे फेसबुक. ऑर्कुट चांगलंय आणि फेसबुक मात्र बदनाम असं काहीच नाहीये. हम्म, फेसबुकमुळे ऑर्कुट मागे पडलंय मात्र.>>> अगदी अगदी आडो!

ओर्कूटवर प्रायव्हसी जास्त होती, तिथे सुरुवातीला आमंत्रणाशिवाय खातं उघडताही यायचं नाही आणि मर्यादित आमंत्रणे पाठवण्याची अटही होती. तसेच आपले मित्र-मैत्रिणी आपल्यालाच शोधावे लागायचे. शिवाय ज्याचा त्याचा स्क्रॅप ज्याला त्यालाच दिसतो तिथे. याउलट फेसबुकवर अकाउंट उघडल्या उघडल्या आपले मेल मधले कॉन्टॅक्ट्स शोधून आपोआपच अ‍ॅड होतात आणि प्रायव्हसी सेटिंग स्वतःच बदलावे लागते, अन्यथा फारच ओपन अ‍ॅक्सेस असतो. शिवाय त्यांचे काय काय अ‍ॅप्लिकेशन्स आहेत, जे फारच धोकादायक आहेत, तुमची प्रायव्हसी जपण्याच्या दृष्टीने. पण लोकांना त्याचे व्यसन लागलेय....फेसबुकच्या पटकन पॉप्युलर होण्यामागे ही अशी बरीच कारणं आहेत.

मोहना, तुमचा लेख सुन्न करुन गेला! Sad शत्रूवरही अशी वेळ न येवो! आणि ज्या व्यक्तीचा फेसबुकशी संबंधही नाही, अशा व्यक्तीवर ही वेळ आली, हेच फार भयंकर आहे! Sad

मंदार जोशीच्या 'व्यसन' लेखाखालची एक प्रतिक्रिया आठवली. आपण नेट च्या जगात संवेदनक्षमता आणि अपराधाची सलही गमावत चाललोय हळूहळू, हेच खरं Sad

सगळी बातमी वाचा, बोल्ड केलेला भाग लक्ष देऊन वाचा......

Private bank pokes into his FB account, he does not like it!
IT pro alleges private bank is hassling him over loan he hasn’t availed, after getting his personal info from Facebook, based on matching surname with real defaulter

Tanaji Khot

Posted On Monday, March 28, 2011 at 05:25:08 AM

When information technology entrepreneur Dharmanath Fatarpekar opened his account on social networking site Facebook, like millions of others have, little did he expect that he would be at the receiving end of the recovery agents of a prominent private bank. Especially when he hasn’t taken any loan from them.

The reason: his surname matches that of a distant relative. Fatarpekar claims the bank accessed his contact details via his Facebook profile, as the defaulter has added him as a friend on Facebook.

Since March 21, he has been getting calls from bank executives, demanding leads to the actual defaulter. Fed up, the 35-year-old Sinhagad Road resident approached police on Wednesday.

At Haveli police station, Fatarpekar was in for another jolt. Instead of taking cognisance of his complaint, the constable on duty asked him to give the defaulter’s number to the bank if he had it
with him.

“I have been at the recieving end. I have not taken any loan from the bank. I have no relation with them at all. Their defaulter — a distant relative from our native village of Fatarpe in Goa and a resident of Mumbai — added me to his friend list on Facebook.

Mahendra Kolhe

Dharmanath Fatarpekar

As he is my distant relative, I accepted his friend request. Since Monday, my life has become a nightmare as the bank called me every half hour, threatening me and asking for the defaulter’s details, failing which I would have to pay the outstanding loan amount of Rs 2 lakh with interest,” Fatarpekar told Pune Mirror.

He added: “Last Monday, a girl introduced herself as Vidya, an LIC agent, and asked me for the contact number of Prakash Fatarpekar. I refused to part with the information.

The girl continued her efforts. She indirectly threatened me by saying she is knows everything about my family. She even told me my two-year-old son’s name.”

Fartapekar says it was shocking to find out that they even know about his family. “I was a bit concerned as I couldn’t fathom the caller’s intention. I have spent three sleepless nights due to this stress. Finally, I decided to approach the police.

Policemen from Abhiruchi police chowky called on the number (9028235172) from which I have been recieving calls. The caller told him that I am a relative of Prakash Fatarpekar, who is loan defaulter. If I hand over Prakash’s mobile number, they will stop calling me,” he said.

The Haveli police called on the above number and warned the caller that if she continued to harass Fatarpekar, a case will be registered against her. The calls stopped after that.

Fatarpekar and his wife decided to locate Prakash Fatarpekar. First, they searched his name on Facebook, which threw up five results. One of them was on his friends list.

“When I checked my Facebook acount and cross-checked the bank caller’s information, I was surprised that the caller was referring to information from my Facebook profile. I have recently posted my two-year-old son Harsh’s name. She referred to that.”

Fatarpekar and his wife made more than 25 calls to Prakash Fatarpekar. He also inquired with the caller when she called him up again about which Fatarpekar she is referring to. After getting some information about him, he finally managed to contact Prakash.

“When I called him up, he refused to recognise me. When I told him about the trouble I am facing because of him, he told me he will call the bank from a PCO. But he didn’t and as a result the bank continued to call me. So I decided to hand over his number to the bank. I have decided to delete all information from my profile,” said Fatarpekar.

Modus Operandi

In most of the cases, the defaulters, frequently get relocated from one city to another due to work transfers and during such movement they often fail to update their whereabouts to the concerned bank. Recovery agencies understand this and thus employ female agents who would track their profiles and befriend them on Facebook.

These agents then lure them for a date. Once these defaulters arrive at the place, the male recovery agents, who are already there, nab them.

स्वतःच्या घरातल्या सदस्यांची माहिती फेसबुकावर टाकल्याने झालेला मनस्ताप. ते ही ह्या माणसाची काहीही चूक नसताना.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मी अनेक चांगल्या लेखांच्या लिंका, काही गंभीर विषय वगैरे च्या लिंका फेसबुकावर देत असतो. नेहमी त्यांना एक-दोन प्रतिसाद असतात. मात्र मी एके दिवशी "सर्दीने हैराण" असं टाकल्यावर एका दिवसात सत्तावीस प्रतिसाद Uhoh ह्याला काय म्हणावं. त्यात एका काकांनी तर चक्क फोन नंबर दिला स्वत:चा!!!!

मात्र मी एके दिवशी "सर्दीने हैराण" असं टाकल्यावर एका दिवसात सत्तावीस प्रतिसाद>>>>नशीब, तुमच्या या स्टेटसला लोकांनी 'लाईक' नाही केलं. Proud तिकडे कोणत्याही गोष्टीला लाईक करायचं फॅडच आहे.

Pages