Submitted by सांजसंध्या on 1 June, 2011 - 04:10
सध्या मला मित्रमैत्रिणींपेक्षा मार्केटिंगवाल्यांचेच फोन जास्त येतात. इन्स्युरन्सवाले. टेलिमार्केटिंगवाले, एमएलएम वाले, ट्रॅव्हल एजंटस, मोटेल्सवाले, क्रेडीट कार्डवाले, कर्ज घ्या म्हणणारे, बक्षीस लागलय असं सांगणारे असेच लोक यात असतात. त्यांना नंबर कुठून मिळतो हे कोडं आहेच, पण वेळोवेळी येणारे फोन, त्यांचा लोचटपणा, प्रत्येक एक्स्क्युज वर रेडीमेड उत्तर द्यायची हातोटी आणि मुख्य म्हणजे नको असलेला पाठलाग यामुळे बेजार व्हायला होतं. ( सध्या हा ससेमिरा चुकवायची सोय आहे म्हणा.. )
तुम्हाला पण येउन गेलेले असे अनुभव आणि तुम्ही त्यांना कसं ट्रीट केलंत हे इथं शेअर करावं असं वाटतं.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रस्त्याच्याकडेने = रच्याकने =
रस्त्याच्याकडेने = रच्याकने = बायदवे
टप्पर्वेअर वाले लोक पण खुप
टप्पर्वेअर वाले लोक पण खुप छळतात..
मी वर्किन्ग आहे ,, मुलगी लहान ताप आला होता,,,
रडरड कीरकीर करत होती .. ताप उतरत नव्हता लवकर..
आता या टप्पर्वेअर वाल्यांच्या काही विकलि ऑफर होत्या आणि त्या टप्पर्वेअर वाल्या बाईला रत्रिच ऑर्डर द्यायची होती .. ती माझ्या शेजारांच्या घरी आली मला पण बोलावुन घेतल .. मी घाईत अवतारात .. शेजारी मुलीचा रडण्याचा आवाज येतोय .. पण तीच एकच की हि स्किम जाईल..
मी खुप सांगितल बाई बाळ रडत आहे .. ताप आहे पण तिच तेच .. शेवटी मी पळच काढला.. वैताग..
दक्षिणा आणि सायली यांना
दक्षिणा आणि सायली यांना अनुमोदन. एखाद्याला वायदा करून दिवसभर रस्त्यावर ताटकळत ठेवणे चूक आहे.
मार्केटिंगवाल्यांच्या अगोचरपणाला निदान त्यांचे पोट भरण्याचे निमित्त असते. त्यांना असे छळून आपल्याला काय मिळत असते नक्की?
असे कॉल्स थोडे टॅक्टफुली बोलून टाळता येतात. डीएनडी ची सुविधा आहे. नॉट इंटरेस्टेड म्हणून किंवा काहीही न बोलता तुम्ही सरळ फोन कट करू शकता. त्या लोकांचा असा छळ करण्याची (संदर्भ- पहिली पोस्ट) काहीच गरज नाही.
मला नेह्मी एका ब॓न्केच्या(ABN
मला नेह्मी एका ब॓न्केच्या(ABN AMRO) क्रेडीट कार्ड साठी फोन यायचा.मग तोच फोन रोज येवू लागला. सकाळी सन्ध्याकाळी...

कधीपण.
एकदा पलीकडील पोरिचे सर्व ऐकुन घेतले. नंतर म्हणालो सर्व कागपत्रे घ्यायला तु येशिल का?
तरच क्रेडीट कार्ड घेईन. त्या दिवसा पासून त्या ब॓न्केचा(ABN AMRO) कधिच फोन आला नाही.. सुटलो..
दक्षिणा ला
दक्षिणा ला अनुमोदन...>>>>>>+१
खुप normal भाषेत पण ठामपणे नकार दिल्यास ते जास्त खेचत नाहीत. आणि पुन्हा फोनही करत नाही+१
बरोबर ज्ञानेश. मी असले सगळे
बरोबर ज्ञानेश. मी असले सगळे कॉल्स घेतो. डिएनडि एनॅबल्ड केलेले नाही.
असले प्रकार यापुढे होतच राहतील, नव्या युगाची ही गरज आहे. त्याव्दारे कुणाचेतरी पोट भरत असते हे मी जाणतो.
फक्त असले मार्केटींगचे कॉल्स असले की त्यांचे सगळेच म्हणणे न ऐकता मी त्यांना 'मला कसलीही गरज नाहीये. फ्री गिप्ट जरी असले तरी मला ते नको', असे सांगतो.
असे करण्यामुळे मार्केटमध्ये काय चालले आहे ते समजते.
सध्या मला Qnet या कंपनीचे
सध्या मला Qnet या कंपनीचे पित्ते असेच पिडत आहेत. विहान डायरेक्ट सेलिंग प्रा. लि. ही त्यांची भारतातली फ्रँचायसी आहे. कॉफी डे, मॅरिएट सारख्या ठिकाणी भेटायला बोलावतात, श्रीमंतीची, अमाप संपत्तीची स्वप्ने दाखवतात, तुम्ही सध्या किती बापुडवाणे जगता आहात हे ठसवतात आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी तुमच्याकडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाखांची मागणी करतात. माझ्या अगदी जवळच्या नातेवाईक व्यक्तीने मला असे फशी पाडण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या गळाला लागले नाही, पण माझ्या सासूबाई लागल्या. त्यांना स्वतःला व्यवसाय करणे शक्य नाही म्हणुन त्यांनी माझ्या नवर्याच्या नावे पाच लाख भरले. त्याचा पॅन नंबर वगैरे देऊन रजिस्ट्रेशन करवून घेतले. आता आम्ही ते निस्तरतो आहोत. आमच्यासारख्या आणखी लोकांना भुलवून यात आणले तर आम्हाला पैसे मिळू शकतात असे या धंद्याचे स्वरूप आहे. आम्हाला हे करायचे नाही, पण आता ते गेलेले पैसे कसे परत मिळवायचे याच्या चिंतेत आहोत.
Qnet पासून सावध राहा.
आणखी, ते पहिल्या भेटीत
आणखी,
ते पहिल्या भेटीत त्यांच्या प्रॉडक्टसबद्दल, कंपनीबद्दल काहीही माहिती देत नाहीत. नुसता नुसता संपत्तीचा भुलभुलैय्या उभा करतात. त्याबद्दल काही विचारलं तर ते पुढच्या सेशनमध्ये कळेल एवढंच सांगतात.नेटवर या कंपनीबद्दल अमाप माहिती आहे. फसवणुकीच्या तक्रारी आहेत. सावध रहा.
Qnet पासून सावध राहा. >>
Qnet पासून सावध राहा. >> का?
कारण हे दुष्टचक्र आहे.
कारण हे दुष्टचक्र आहे. त्यांची अवाच्यासव्वा किंमतीची प्रॉडक्टस घेऊन आपण त्यांचे मेंबर होतो (त्यांच्या परिभाषेत इंडिपेंडंट रिप्रेझेंटेटिव्ह). मग आपल्याला पैसे मिळवण्यासाठी आणखी मासे गळाला लावावे लागतात.
जपान लाइफ गादीचा किस्सा
जपान लाइफ गादीचा किस्सा घरातलाच. माझे चुलत सा.बु हे मार्केटिंग करत. जरा 'गोड' बोलणारे अस्ल्याने भले भले फशी पडत. ती गादी त्यानी अनेक लोकन्च्या गळ्यात मारली आणि चेन मार्केटिंग मुळे नुसती तोन्ड ओळख असलेल्या/ दुरच्या नातेवाइकान कडेही जाउन पोहोचत. त्याचा या कम्प्नी तर्फे नाशिकला सत्कार झाला होता.साबुच्या गळायात मारलेली गादी आजुनही धुळ खात पड्ली आहे नाशिक्च्या घरी.
चूम्बकगादी एक लाखाची आमच्या
चूम्बकगादी एक लाखाची आमच्या घरी आहे
(माझे लग्न होण्या आधीची असल्याने इतिहास माहिती नाही) पण रोज वापरात आहे.
अॅमवे/जे एल आय्/झर्याचे पाणी कित्येक हजारात पाजून सर्व व्याधी बरे करणारे/क्लब महिंद्र यांचे फोन आल्यावर नम्रपणे नकार द्यावा लागतो. ते 'फ्री गिफ्ट आहे, तुमच्या सगळ्या कुटुंबाला चहा नाश्ता आहे' इ. बरीच गाजरे दाखवतात.कोणत्याही मोठ्या किराणा चेन मध्ये लकी ड्रॉ साठी फॉर्म भरुन दिला की या लोकांना फोन नंबर मिळतात.
सिटी बँक लेडीज स्पेशल क्रेडिट कार्डातून पहिल्याच महिन्यात ते कापून त्यांच्या ड्रॉप बॉक्स मध्ये टाकून सुटका करुन घेतली होती.
क्लब महिंद्र हॉलिडेज चा नीट वापर करुन दर वर्षी सुट्ट्या एंजॉय केलेली माणसंही बघण्यात आहेत.
कुणीतरी पूर्वी एक सुंदर उपाय
कुणीतरी पूर्वी एक सुंदर उपाय सुचवला होता.
आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेले कुठलेही गाणे आपण कुठल्याही कॉन्टॅक्ट साठी कॉलरट्यून म्हणून लावू शकतो.
एक 'पूर्ण शांतता' रेकॉर्ड करायची. म्हणजे शांत खोलीत रेकॉर्डिंग सुरू करायचं. आणि काहीही रेकॉर्ड न करता थोड्या वेळानं बंद करायचं. त्या फाईल चा नंबर लक्षात ठेवायचा.
नको असलेला कॉल आला की त्या नंबरला unwanted म्हणून सेव करायचे. ती 'शांत' फाईल कॉलर ट्यून म्हणून त्या कॉन्टॅक्ट्ला जोडायची. काम झाले. परत त्या व्यक्तीचा फोन आल्याचे कळणारच नाही.
मी या लोकांसाठी वेगळी
मी या लोकांसाठी वेगळी कॉलरट्युन ठेवली होती . त्यामुळे कळायच , की धडपडत फोन घ्यायची गरज नाही .
फोन लांब असला तरी इग्नोरास्त्र मारता यायचं.
कोणत्याही मोठ्या किराणा चेन
कोणत्याही मोठ्या किराणा चेन मध्ये लकी ड्रॉ साठी फॉर्म भरुन दिला की या लोकांना फोन नंबर मिळतात. <<<< आपला खरा नंबर द्यायचाच नाही. मी नेहमी असा फोर्म भरावा लागला तर नंबर मधले २/. आकडे चुकीचे टाकते.
मी नेहमी असा फोर्म भरावा
मी नेहमी असा फोर्म भरावा लागला तर नंबर मधले २/. आकडे चुकीचे टाकते.
<<
अरे बापरे!
मग तुम्हाला लागलेलं बक्षिस दुसर्याच कुणाला मिळत असणार नक्कीच.
शांततेची कल्पना आवडली.
शांततेची कल्पना आवडली. मस्तंच आहे. नको असलेल्या कॉल्स साठी एक गाणं वापरता येईल.
नही नही, अभी नही
थोडा करो इंतजार
शांततेची कल्पना आवडली.
शांततेची कल्पना आवडली. मस्तंच आहे. नको असलेल्या कॉल्स साठी एक गाणं वापरता येईल.
नही नही, अभी नही
थोडा करो इंतजार
मग तुम्हाला लागलेलं बक्षिस
मग तुम्हाला लागलेलं बक्षिस दुसर्याच कुणाला मिळत असणार नक्कीच. < <<<<. हो, आणि ते बक्षिस. घ्यायला जाताना त्यांना चेकबुक पण घेऊन जाव लागत असेल !
हे बक्षिस वगैरे सगळ खोट असत !
हे बक्षिस वगैरे सगळ खोट असत
हे बक्षिस वगैरे सगळ खोट असत !
<<
नाही काई. मला एकदा ३ बॉलपेनचा सेट मिळाला होता सेलो कंपनीचा. ब्लू, रेड व ग्रीन कलरचा. तो माझ्या स्वतःच्या नंबरलाच लागला होता.
चुकीचा नंबर देऊन दुसर्याच कुणाला गेला असतात.
तसे नाही धनश्री, त्यांचे
तसे नाही धनश्री, त्यांचे 2तासाचे प्रेझेन्टेशन घेऊन स्नॅक्स आणि चहा पिऊन, आम्हाला तुमची स्कीम नको, आमचे बक्षीस द्या आम्ही निघतो, असे ठणकावून सांगणे बहुतेकांना जमत नाही म्हणून लोक त्या प्रेझेन्टेशन ला जाताच नाहीत
जर दिमां सारखा खमका असेल तर बक्षीस घेऊनच बाहेर पडतो;)
आठवत नाही, हा उपाय मी अगोदर
आठवत नाही, हा उपाय मी अगोदर कुठे शेअर केला होता, पण मी तो अजून देखिल वापरतो.
.
........... नको असलेला कॉल आला कि तो कट न करता फोन पॉकेटमधे ठेऊन रिलॅक्स होऊन जायचे. समोरचा हॅलो हॅलो करत कंटाळून स्वःताच फोन कट करेल
.
रच्याकने, आजकाल मला डेबीट/क्रेडीट कार्ड वर बक्षीस लागल्याचे/ ते रिन्यु करण्याबद्दल फेक कॉल्स येतात. मुख्य म्हणजे त्यानां माझ्या कार्डचा नंबर देखिल माहीत आहे. मी अनेकदा ऑनलाईन शॉपिगं करण्यासाठी /बील पेमेंट करण्यासाठी कार्डचा वापर करतो. या बद्दल तक्रार कुठे करता येईल?
चहा आणि स्नॅक्स साठी २ तास
चहा आणि स्नॅक्स साठी २ तास घालवायचे ???
@ दक्षिणा, सायली -
@ दक्षिणा, सायली - मार्केटिंग करणाऱ्यांचे त्यावर 'पोट' अवलंबून असते, हे मान्य. पण म्हणून त्यांनी दुसऱ्याचे 'कान' का खावेत??? गेल्या कित्येक दिवसांपासून मला दिल्लीतल्या कुठल्यातरी Expert Ayurveda नामक फालतू कंपनीकडून Weight Loss treatment चे मेसेजस येत आहेत. (आता २८ व्या वर्षी १६३ सेमी उंची असताना ६२ किलो वजन जास्त आहे का? आणि हे वजन कमी करून मी काय हडकुळा होऊ का?) माझा मोबाईल नंबर DND (Do Not Disturb) मध्ये नोंदणीकृत असूनही हे मेसेजेस येत आहेत. त्यांना नम्रपणे मेसेज पाठवू नका, म्हणून सांगितले तरी ऐकत नाही. मेसेज पाठवू नका, अशा आशयाचे एक पत्रही Registered AD ने पाठवले (जे त्यांना मिळालेही). तरीही मेसेज काही बंद होत नाहीत. तेव्हा यांना आता खरोखर 'धडा' शिकवण्याची गरज आहेच. (संदर्भ: पहिली पोस्ट) मी देखील आता त्यांच्याशी 'गोड' बोलून त्यांचे product मागवेन म्हणतो, पण product हातात आल्यावर पैसे देणारच नाही, बसा बोंबलत! (त्यांच्या एका product ची किंमत ८००० रु आहे म्हणे!)
Pages