Submitted by सांजसंध्या on 1 June, 2011 - 04:10
सध्या मला मित्रमैत्रिणींपेक्षा मार्केटिंगवाल्यांचेच फोन जास्त येतात. इन्स्युरन्सवाले. टेलिमार्केटिंगवाले, एमएलएम वाले, ट्रॅव्हल एजंटस, मोटेल्सवाले, क्रेडीट कार्डवाले, कर्ज घ्या म्हणणारे, बक्षीस लागलय असं सांगणारे असेच लोक यात असतात. त्यांना नंबर कुठून मिळतो हे कोडं आहेच, पण वेळोवेळी येणारे फोन, त्यांचा लोचटपणा, प्रत्येक एक्स्क्युज वर रेडीमेड उत्तर द्यायची हातोटी आणि मुख्य म्हणजे नको असलेला पाठलाग यामुळे बेजार व्हायला होतं. ( सध्या हा ससेमिरा चुकवायची सोय आहे म्हणा.. )
तुम्हाला पण येउन गेलेले असे अनुभव आणि तुम्ही त्यांना कसं ट्रीट केलंत हे इथं शेअर करावं असं वाटतं.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा अनुमोदन. त्यांचे ते
दक्षिणा अनुमोदन. त्यांचे ते कामच असते आणि अशा उद्धट उत्तरांच्या त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. पण "टॉर्चर" झाल्यावर आपणही हात टेकतोच ना ? माझे नाव तूमच्या डेटाबेसमधून काढून टाका किंवा त्या पुढे नॉट इंटरेस्टेड असा रिमार्क लिहा, असे सांगूनही परत परत फोन आले तर काय करायचे ? शिवाय मला गरज असेल तर मी त्यांचा नंबर शोधून त्यांना फोन करेनच की. हे अनेकांनी अनुभवले असेल, कि तक्रार करायची असेल, चौकशी करायची असेल तर एवढी तत्परता ते दाखवत नाहीत.
दिनेश, अॅग्री.. जेव्हा माझा
दिनेश, अॅग्री..

जेव्हा माझा तोल जातोय असं वाटतं तेव्हा मी बिझी आहे नंतर फोन करा असं सांगते...
असो, मॉल मध्ये वगैरे गेल्यावर.. कंट्री क्लब इ. सारखे रिसॉर्टवाले जाळं पसरवून बसलेले असतात. छोट्या कार्डावर. नाव, सेल नं, इनकम (ते का? :अओ:) कोणजाणे, शिवाय मॅरिड अनमॅरिड... असे मुद्दे आपण भरून द्यायचे असतात. मागच्या शनिवारी मी हे सर्व मुद्दे व्यवस्थित लिहून दिले. कारण मला माहीत होतं, त्यांचा मला फोन येणार नाही ते... सिंगल लोकांना ते सोडून देतात आणि फक्त कपल्स ना जाळ्यात पकडतात...
मोबाईल फोन नं हि पर्सनल
मोबाईल फोन नं हि पर्सनल इन्फो. आहे.
जर हे लोक आपले मोबाईल नंबर मिळवतात आणि कोणत्याही वेळि कॉल करत बसतात तर त्याविषयी तक्रार करण्यासाठी काही उपाय नाही का?
ग्राहक संघटनेला तक्रार करुन कोणी बघितली आहे का?
शिवाय कुठल्या हॉल मधे मी माझी पर्सनल माहिती भरुन दिली, ती त्यांनी दुकांनांबरोबर शेअर करायचा अधिकार त्यांना कोणी दिला? कोणत्याही व्यक्तीची वैयक्तीक माहीती ( नाव, गाव, वय, पत्ता, फोने, मोबाईल, इमेल इ., परिवाराचे डिटेल्स) त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय दुसर्याला देणे हा गुन्हा होत नाही का?
या माहितीच्या आधारावर बरेच स्कॅम्स , आयडेंटिटि थेफ्ट शक्य होऊ शकते. आणि प्रत्येक वेळी तेवढ झालं नाही तरी लोकांच्या वेळेत आणि शांततेत भंग नक्कीच होतो.
बहुतेक कोणी तक्रार करत नाही म्हणुन हे चालतय का?
"शिवाय कुठल्या हॉल मधे मी
"शिवाय कुठल्या हॉल मधे मी माझी पर्सनल माहिती भरुन दिली, ती त्यांनी दुकांनांबरोबर शेअर करायचा अधिकार त्यांना कोणी दिला?"...
~ नेमका हाच प्रश्न मलाही पडल्याने दुसर्या एका कामासाठी त्याच हॉलमध्ये जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी तिथल्या सेक्रेटरीला मी याबाबत विचारले असता, त्याने अगदी सहजगत्या उत्तर दिले, "अहो, चांगल्या कारणासाठीच नंबर दिला ना ? नाहीतरी लग्नघरवाले कुठेनाकुठे तरी कपडे खरेदी करणार असतातच. ज्या दुकानदाराचा फोन आला ती माणसे विश्वासाची आहेत. नक्की खरेदी करा तिथे !"
काय बोलणार यावर आम्ही तरी ? आता उद्या कॅटरिंगवाले, स्टेज डेकोरेशन, लाईटवाले, रांगोळी घालणारे तसेच फोटोग्राफरचेही फोन आले तरी घेतले पाहिजेत, असाच याचा अर्थ.
डू नॉट डायल वर नंबर
डू नॉट डायल वर नंबर नोंदवल्यानंतर ४५ दिवसांनी टेलिमार्केटिंगचा कॉल आल्यास तूम्ही रीतसर तक्रार करु शकता.
किंबहूना असला फोन आल्यास माझा नंबर डीएनडी मध्ये लिस्टेड असूनही फोन केल्याबद्दल तुमची कंप्लेट करायची आहे, डिटेल्स द्या असे सांगितल्यास परत फोन येत नाहीत.
http://164.100.9.238/ndncregistry/index.jsp
http://164.100.9.238/ndncregistry/search.misc
समजा असा फोन आला तर मी तो फोन
समजा असा फोन आला तर मी तो फोन तसाच चालु ठेवते बाजुला आणि माझे काम करत रहाते...फोन वर न बोलता. ठणठण करत बसतो तो माणुस...पाच मिनीटानंतर तो फोन परत कानाला लावते..तोवर तो माणुस नसतो..मग फोन बंद करते...फार काही नाहि घडले तरी त्याला वेटींगवर ठेवल्याचा आनंद मिळवता येतो.
मार्केटिंगवाल्यांना चुकवायचे
मार्केटिंगवाल्यांना चुकवायचे फंडे मस्त आहेत सर्वांचे.
मामी ,पण ते थँक्यु म्हणण्यात खूप उत्साह दाखवते आणि एकदम जोरात बोलते
उकाका. हे पण मस्तच
'मी इथे कामाला येते, साहेब नाहीत घरात. मग करा फोन' प्रज्ञा
अशक्य आहे
दक्षिणा... खरय हे पण. त्यांचंही पोट असतं. गरजुंना खरच मदत करावी. पण एकदा सांगून हे लोक पिच्छा सोडत नाही. वेळ काळ काहीच पहात नाहीत किंवा बनावट स्किम्स गळ्यात मारायला बघतात तेव्हा राग येतो
इतरांचे फंडे पण सहीच आहेत..
.
कोल्हापुरात असताना एका
कोल्हापुरात असताना एका रिसॉर्टवाल्याने खूप छळलं होतं. त्याला नंबर, पत्ता कुठून मिळाला तेच कळत नाही. मी कुठला फॉर्म भरला होता ते ही माहीत नाही. पण दोन जणांसाठी ३ दिवस ३ रात्रीचा स्टे फ्री होता. म्हणून त्याला एंटरटेन केलं
तर घरी आला. आणि चेकच फाडा म्हणून गळी पडू लागला. इतकी बोअर स्कीम होती. आपण आधी लाखभर रूपये भरायचे मग हे आपल्याला लाईफ टाईम मेंबरशिप देऊन आपल्यावर उपकार केल्याच्या थाटात आपल्या पैशातून बांधलेल्या रिसॉर्टमधे चार दिवस (ऑफ सीझन) दोन जणांसाठी फ्री स्टे देणार. जेवणाचे पैसे वेगळे. त्याचे दर असे कि त्या पैशात चांगल्या हॉटेलातला स्युट मिळेल. आणि सीझनला रूम हवी असेल तर वेगळे पैसे भरा किंवा गोल्ड मेंबरशिप घ्या..
नको म्हटलं तरी ऐकत नव्हता. प्रत्येक कारण खोडून काढत होता ( ट्रेनिंग!). पैसे नाहीत म्हटलं तर आमच्याकडे लोनची पण स्कीम आहे... ! त्याला विनंती केली आता खूप उशीर झालाय, बाबा झोपलेत त्यांना बरं नसतं, आता जा म्हटलं तर म्हणे माझ्याकडे हेल्थ प्रॉडक्टस पण आहेत.. काय होतंय त्यांना ?
शेवटी त्याला अक्षरशः हाकलून द्यावं लागलं. काय करणार अशा वेळी .
माझ्याकडे हेल्थ प्रॉडक्टस पण
माझ्याकडे हेल्थ प्रॉडक्टस पण आहेत.. काय होतंय त्यांना ?
कहर!!!
>>>>.
अॅमवे वालेही जाम बोर करतात , इथे कुणि असेल तर आधिच क्षमा!
उगाच संबंध खराब!
असं करताना ते नातेसंबंध ही बघत नाहीत. ओळखीच्या अशाच १ बाईनी खूप पिच्छा पुरवला होता. घरी ये, चहाला असं सांगताना हळुच अगं प्रॉडक्ट प्रेसेन्टेशन आहे असं सांगायच. ते प्रॉडक्ट होतं एखाद लाखाच्या घरात, परत अशी अनेक प्रेसे. अटेंड करून झाली होती जवळच्या परीसरातल्या मंडळिंकडे! तर शरते शेवटी तिने तिच्या नवर्याकडुन माझ्या नवर्याला फोन करवला
माझ्याकडे हेल्थ प्रॉडक्टस पण
माझ्याकडे हेल्थ प्रॉडक्टस पण आहेत.. काय होतंय त्यांना ?
जपान लाईफ किंवा इंडियन नोनी
जपान लाईफ किंवा इंडियन नोनी बद्दल पण सांगा कुणीतरी
जपान लाईफ किंवा इंडियन नोनी
जपान लाईफ किंवा इंडियन नोनी बद्दल पण सांगा कुणीतरी
"जपान लाईफ" बाबत आत्ताच ऐकले, पण इथे कोल्हापुरात दोनतीन वर्षापूर्वी 'जपानी गादी' ने अक्षरशः धुमाकूळ घातला होता...लाख काय दोन लाख काय अडीच काय...कशाला आणि कुणालाच धरबंध राहिला नव्हता. शेवटी यात फसवणुकीचा संशय आल्यावर पोलिसांनीच त्या गादी आणि वाल्यावर टाच आणली.
त्या कपनीचंच नाव जपान लाईफ
त्या कपनीचंच नाव जपान लाईफ होतं..
जापानी गादी वाल्या
जापानी गादी वाल्या शेजार्याने असच खुप छळल्....शेवटी त्यालाच विचारले....काय रे तु गादी रात्री वापरतो तर दिवसा मला देत जा ..... परत मला तोंड दाखवल नाहि..........
तु गादी रात्री वापरतो तर
तु गादी रात्री वापरतो तर दिवसा मला देत जा
इन्श्युरन्स एजंटचा किस्सा
इन्श्युरन्स एजंटचा किस्सा वाचला..
हसायला आलं खरं. पण बिचा-याला आशेला लावून त्याचा एक दिवस वाया गेला. हातावर पोट असेल ना त्याचं ? एक गि-हाइक मिळण्यासाठी कितीजणांच्या हातापाया पडाव्या लागत असतील त्याला ? बरं तो जे प्रोडक्ट देतोय ते असंही नाही कि टाकाऊ आहे.
आणि नको असेल तर इग्नोर करायचं होतं. हा पुणेरी प्रकार कोल्हापुरात कशासाठी ?
मला असाच एका मुलीचा फोन आला
मला असाच एका मुलीचा फोन आला कि तुमचा मोबाईल नं. ची निवड झालेली आहे तर तुम्ही तुमचे बक्षीस घेउन जा. पण येताना बायकोला घेउन या. मी तीला म्हणालो कि माझे लग्न झालेले नाहि आपण माझ्यासोबत याल का?
लगेच फोन बंद.
.
.
एकदा तर म्हणे संसदेत असताना
एकदा तर म्हणे संसदेत असताना प्रणव मुखर्जी यांना होमलोन पाहिजे का असा फोन आला होता.
मला मधे P. N. Gadgil मधुन
मला मधे P. N. Gadgil मधुन सुवर्ण भिशि लावण्या साठि फोन आला होता. त्याना काय कमि आहे कोनास ठाउक.
मी तीला म्हणालो कि माझे लग्न
मी तीला म्हणालो कि माझे लग्न झालेले नाहि आपण माझ्यासोबत याल का? <<<
काय करायचे असा कोणाचा फोन आला
काय करायचे असा कोणाचा फोन आला की घ्यायचा आणि समजा आयसिआयसिआयचा इन्शुरन्सवाला असेल तर त्याला म्हणायचे अरे या पेक्षा चांगली स्कीम टाटाची माझ्याकडे आहे आणि मी एजंट आहे त्यांचा.
जर रिसॉर्टवाला असेल तर म्हणायचे अरे भाउ मीच डायमंड रिसॉर्टचा टाइमशेअर विकते तुम्हीच या प्रेझेंटेशन पहायला.
जपान लाईफ हा एक मोट्ठा घोळ
जपान लाईफ हा एक मोट्ठा घोळ होता / आहे. चुकुनही ह्या मध्ये फसु नका. येथे प्रत्येक फसलेला दुसर्याल्या फसवायला पाहतो.
मी त्यांचे प्रेझेंटेशन नाशिक ला अटेंड केले आहे. एक लाख भरा आणि चार मेंबर बनवा मग तुम्हांला काही % मिळतील... नेटवर्क मार्केटिंग.
लोकांनी लोन काढून ह्यात पैसे गुंतविले आणि नंतर पश्चातापाची पाळी आली.
इंडियन नोनी पण असलंच काहीतरी
इंडियन नोनी पण असलंच काहीतरी होतं / आहे ना ?
इथे अमेरिकेत ते Amway चि लोक
इथे अमेरिकेत ते Amway चि लोक भयंकर छळ करतात. कुठेहि भेटले कि तुझी पर्स छान आहे, घड्याळ छान आहे करुन बोअर करायला लागतात.
अनुमोदन अॅमवे साठी. मी
अनुमोदन अॅमवे साठी. मी पटेलमधी भेंडी घेत होते, तिथे "भेंडी किती फ्रेश आहे नै" म्हणून एका बाबाने माझ्या गप्पा मारायला सुरुवात केली. तो इंटरर्नॅशनल हॉटेलचा शेफ होता न्यू यॉर्कात. अंधेरीला होता पूर्वी भारतात असताना. मला "क्रिस्पी भिंडी" ची रेसिपी दिली आणि गायबला. मग थोड्या वेळाने बायकोला घेऊन आला, ओळख करून दिली आणि माझा नं. घेतला. मग कळलं की तो अॅमवे चा होता!
रच्याकने, भेंडी मात्र छान लागली त्या रेस्पीने!
ते दहाडचे प्रतिनिधी पण
ते दहाडचे प्रतिनिधी पण दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मागे लागतात का ?
दक्षिणा ला अनुमोदन... मी
दक्षिणा ला अनुमोदन...
मी स्वतः एका pvt sector bank मधे ६ वर्ष होते. नेहमी operations मधेच होते. sales ला कधीच नव्हते. पण sales च्या त्या मुलांना मी पाहिलयं. रोजचं नोकरी जाण्याचं tension आणि pressure असतं त्यांच्यावर. रोजी रोटी आहे त्यांची . लोकं एवढी वाट्टेल ते बोलतात, चेष्टा करतात त्यांना काय मान अपमान नसेल का?? तरीही करावचं लागतं त्यांना. कित्येकदा त्यांची संपुर्ण family त्यांच्यावर अवलंबुन असते.
खुप normal भाषेत पण ठामपणे नकार दिल्यास ते जास्त खेचत नाहीत. आणि पुन्हा फोनही करत नाहीत.
मी भारतात उतरल्याबरोबर सिम
मी भारतात उतरल्याबरोबर सिम कार्ड बदलले कि हे फोन सुरु होतात. मी काहीही न बोलता फोन खिशात ठेवून देतो.

दिनेशदा,
मी तुम्हाला कधी आवर्जुन कॉल केल्यावर किमान असं करु नका ...!
सुशांत,
लई भारी !
नीलु,

तुमच्या मैत्रीणीचा लिहिलेला अनुभव/प्रतिसाद खुप आवडला, वेगळा वाटला.
माझ देखील ठरलेलं उत्तर असतं, कि बाबारे काही सांगुच नकोस, माझ्याकडे भरायला पैसाच नसेल तर काही उपयोग नाही.हा उपाय खरंच जालीम आहे.
(....पैसा नसण्याचे असे काही फायदे देखील आहेतच)
यांचे पोट टेलेमार्केटिंग वर
यांचे पोट टेलेमार्केटिंग वर अवलंबून आहे हे ठीक आहे, पण बडबड सुरू करण्यापूर्वी मा़झी ऐकण्याची इच्छा आहे का? मला वेळ आहे का? हे तर विचारवं?
सध्या मला गॅलेक्सी फोन घेतल्याने अॅन्ड्रॉईड मार्केट हा भन्नाट प्रकार गावलाय. एक अप्लिकेशन आहे. (फुकट) त्यात आपण आपली खासगी रिजेक्ट लिस्ट बनवू शकतो. अगदी मार्केटिंग वाल्या एसेमेस साठी सुद्धा!!
बाय द वे, रच्याकने म्हणजे काय?
Pages