रशियन सॅलड

Submitted by मंजूडी on 11 July, 2008 - 05:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या काकडी बारीक चोचवलेली
३/४ वाटी कोबी बारिक चिरलेला
१/२ वाटी भोपळी मिरची बिया काढून पातळ, उभी चिरलेली पण छोटे तुकडे
१/२ वाटी गोड आणि लालभडक डाळींबाचे दाणे
२ वाट्या घट्ट दही
मीठ, साखर, मिरपूड चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

चोचवलेली काकडी गाळणीवर टाकून ठेवा म्हणजे काकडीतलं पाणि पूर्णपणे निथळून जाईल. तसंच दही पण साधारण १५ मिनीटे गाळणीवर ठेवा किंवा फडक्यात बांधून ठेवा. दह्यात पाणि अजिबात राहता कामा नये. मग काकडी, कोबी, भोपळी मिरची आणि डाळींबाचे दाणे एकत्र करा. दही मिसळायच्या अगोदर मीठ, साखर आणि मिरपूड घाला. मग हलक्या हाताने त्यात दही मिसळा. एका छान बाऊलमध्ये (बोल म्हणायचं Happy ) काढून घेऊन उरलेले डाळींबाचे थोडे दाणे वरून पसरवा. मग फ्रिजमध्ये छान चिल्ड करायला ठेवा.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्याला 'रशियन सॅलड' हे नाव माझ्या भावाने ठेवलंय, का ते माहीत नाही. Happy लाल, पांढरा आणि हिरव्या रंगामुळे खुप सुरेख दिसतं हे सॅलड. थोडीशी गोडसर चव असल्यामुळे मसालेदार पदार्थांबरोबर खायला एकदम परफेक्ट साईड डिश आहे. थंड सर्व्ह केल्यामुळे त्याची लज्जत अजून वाढते. काही रॉयल मेनू कॉम्बिनेशन असेल तर मी दह्याऐवजी चक्का घालते ह्या सॅलडमध्ये, मस्त आंबट गोड चव येते.

माहितीचा स्रोत: 
काहीतरी नविन आणि वेगळं करण्याची हौस
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच रेसिपीत दह्याएवजी मेयोनीज ( egg चालत असेल तर!) घातले तरी चान लगते. फक्त ते आय्त्या वेळी घालायचे. आणी गाजराचे लाम्ब पातळ slices पण छान दिस्तात.
फुलरानी

आणि अननसाचे पिसेस पण!
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

मी सफरचंदही घालते. मंजू, आता मेयॉनिझ नसलं तर अडणार नाही तू सांगितल्याप्रमाणे दही घालेन पाणी निथळून..

उकडून बटाटा पण झकास लागतो ह्यात, मी कधीकधी थोडा मधपण घालते, हवं तर मटारचे दाणे घालू शकतो

वाफवलेला(पाकात) अननस, सफरचंदाचे बारीक तुकडे पण घालतात आणि मस्टर्ड sauce पण घालतात.

सही. करून बघते आता. हॉटेल्स मधे पिझा रेस्तोजमधे खाल्लेलं आवडतं म्हणून घरी ट्राय केलं पण मेयो ला अंड्याचा वास येतो एक वेगळाच. जास्त होते की काय काय माहित.

रशियन सॅलड अजून १ प्रकार
१ बटाटा(चौकोनी फोडी करुन मायक्रो मधे ३-४ मि वाफवून घेणे)
थोडी फरसबी बारीक चिरून मायक्रो मधे १-२ मि वाफवून घेणे
१ केशरी गाजर (चौकोनी फोडी करुन मायक्रो मधे ३-४ मि वाफवून घेणे)
१ सफरचंद(चौकोनी फोडी करुन घेणे)
थोडे फ्रोझन मटार दाणे
थोडा कोबी अगदी बारीक उभा चिरून गार पाण्यात घालून ठेवणे
१ भोपळी मिरची छोट्या चौकोनी फोडी करुन घेणे
वाफवलेला(पाकात) अननस आवडीनुसार
ड्रेसिंग
२ मोठे चमचे मेयॉनिझ(विथ किंवा विदाउट अंडे)
१ मोठा चमचा दही (गाळणीवर ठेवा किंवा फडक्यात बांधून ठेवा. दह्यात पाणी राहू देऊ नये)
१ छोटा चमचा मस्टर्ड sauce
१ मोठा चमचा मध्(नसल्यास अंन्दाजाने साखर)अननसाचा पाक घातला तरी छान लागते
मीठ आणि मीरपूड(अंन्दाजाने)
ड्रेसिंग चे सगळे साहित्य एकत्र करा.त्या मधे सगळ्या भाज्या घालून (कोबी नीट निथळून पाणी राहू देऊ नये)फ्रिजमध्ये गार करायला ठेवा.
बिर्याणी,ड्राय पास्ता वगैरे बरोबर चांगले लागते.
मेयॉनिझ ला अंड्याचा जो वास येतो तो कशातही पाणी रहिले की येतो.
म्हणून पाणी राहू देउ नये किन्वा फक्त ड्रेसिंग गार करुन भाज्या आयत्या वेळी मिसळाव्यात

२ वाट्या काकडी बारीक चोचवलेली>> चोचवलेली काकडी म्हणजे बारीक चिरलेली का?

चोचवणे म्हणजे चिरणे नाही, पण बारीक चिरल्यास साधारण तसाच इफेक्ट येतो.
चोचवणे म्हणजे विळीवर काकडी उभी धरून (थोडेसे दोन्ही बाजूने सुरीने कापून) गोलाकार फिरवून मधे मधेथोडी आडवी धरुन कापणे. त्यामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. धारदार सुरीने किंवा फुड्प्रोसेसर मधे देखील चांगली बारीक होते (फक्त प्रोसेसर मधे जास्त फिरवू नये नाहीतर पेस्टच होइल)