डाळ वांगे

Submitted by दीपांजली on 11 July, 2008 - 01:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वांगी , डाळ , मसाला , धने जीरे पूड, कांदा, आले , हळद , लाल मिर्ची , लाल तिखट , लसूण, हिंग

क्रमवार पाककृती: 

डाळ वांगं विदर्भात माझ्या सासरी अजुन वेगळ्या पध्दतीने करताना पहिलय .
कुकर मधे वांगी आणि डाळ एकत्र तेलावर परतून घेतात .
त्यात मसाला , धने जीरे पूड आणि परतलेला कांदा पण घालतात .
मग त्यात पाणी , किसलेले आले आणि हळद घालून कुकर मधे दोन ते तीन शिट्ट्यां पर्यंत शिजवतात आणि नंतर वरून लाल मिर्ची , थोडे नुसते लाल तिखट , लसूण आणि हिंगाची फ़ोडणी देउन serve करतात .
यात वांगी जरा जास्त मऊ होतात पण दाल आणि वांगी एकत्र शिजवल्याने स्वाद छान येतो .
त्यांचा काळ्या मसल्या सारखा वाटणारा मसाला पण बर्‍या पैकी strong असतो , यात इतर मसाल्यां बरोबर star anis, बडी इलायची वगैरेही असते .

छान लागते ही पण डाळ वांग्याची recipe.

वाढणी/प्रमाण: 
माहित नाही
अधिक टिपा: 

मसाला करताना तेलावर नुसता परतत नाहीत तर deep fry करून घेतात सगळे आणि मग mixer मधून काढतात .

माहितीचा स्रोत: 
सासरची पद्धत
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डीजे यात नक्की कुठली डाळ वापरायची, तूरडाळ का? तसेच वांगी आणि डाळ यांचे प्रमाण काय घ्यायचे?

याचाच एक अजून प्रकार पण करता येतो...

उरलेली वांग्याची भाजी खपवायला मस्त उपाय.
१ वाटी जर वांग्याची भाजी असेल (भरलेल्या वांग्याची वा साधीही चालेल) तर साधारणपणे १ वाटीच शिजलेली तु.डा घ्यावी.
नेहेमीप्रमाणे कांदा, हवा असेल तर लसूण, काळा मसाला,तिखट, तिखट घालून आमटी करावी; वांगी मॅश करावीत फोडणीत. ही पिठल्यापेक्षा पातळ पण नेहेमीच्या आमटीपेक्षा दाट असते. यात हवा असेल तर चिंच + गूळही घालता येईल...

आज वरच्या पध्दतीने करताय... वांगी दिसताहेत घरात!

मला भयंकर आवडतं डाळ वांग. पण आम्ही अशी नाही करत ही आमटी/भाजी.

तूर डाळ वेगळी शिजवून घ्यायची, त्याची आमसूल गुळाची आमटी करतो तशी आमटी करुन त्यात वांग्यांच्या चौकोनी फोडी सोडायच्या. फोडी शिजल्या की गॅस बंद. मस्त लागते एकदम.

तूर डाळ वेगळी शिजवून घ्यायची, त्याची आमसूल गुळाची आमटी करतो तशी आमटी करुन त्यात वांग्यांच्या चौकोनी फोडी सोडायच्या. फोडी शिजल्या की गॅस बंद. मस्त लागते एकदम.>>>> मी पण अशीच करते. आता ह्या प्रकारे पण करुन बघेन.