पिवळाई !

Submitted by Yo.Rocks on 23 May, 2011 - 14:01

उन्हाळा म्हटले की मला पहिले आठवते ते बहरलेला बहावा ! पिवळ्या फुलांचे झुंबर लक्ष वेधून घेतातच.. मुंबईत हे झाड क्वचितच एखाद-दुसरे कुठे तरी आढळते.. पण हाच बहावा मी सावंतवाडीला मोती तलावाजवळील जगन्नाथ भोसले उद्यानात पाहिला.. त्या उद्यानात शिरलो नि बस्स कसला खुष झालो.. कारणच तसे होते.. या आवडत्या बहाव्याची तब्बल सहा- सात झाडे होती.. नि पुर्णतः बहरली होती.. उद्यानात पिवळाई पसरली होती.. झाडांवरती पिवळे झुंबर नि खाली गळून पडलेल्या फुलांची रांगोळी... पहिल्यांदाच इतका बहावा एकदम बघितला.. नि मग काय क्लिकींग सुरु केले.. पण प्रत्यक्षात जे काही दिसत होते ते अप्रतिम.. फोटोंनी समाधान होत नव्हते.. खरे तर मला टिपताच येत नव्हते.. Happy पण तिथले काही प्रचि दाखवण्याचा मोह आवरत नाही..

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि ९

प्रचि १०

गुलमोहर: 

वाह ! काय बेफाम सुंदर फोटो आहेत. एरवी मला अज्जिबात न आवडणारा उन्हाळा मोगर्‍याचा सुवास, कोकिळेचा आवा़ज आणि बहाव्याचे दर्शन या तीन गोष्टींसाठी खुप आवडतो. गुलमोहरापेक्षाही मला बहावा जास्त आवडतो.

मस्त Happy

पिवळ्या फुलांचे घोस, उमलती ते अहाहा!
पहावा बहावा!!

"अमलताश" म्हणती हिंदीत, तोची वृक्ष हा
पहावा बहावा!!

शेंग बंगालीत "बंदरलाठी" ज्याची, तोच हा
पहावा बहावा!!

"कॅशिया" जयाला आंग्ल म्हणती, तोच हा
पहावा बहावा!!

नित्यनूतन, लेवून यौवन बहरतो रानात हा
पहावा बहावा!!

आरास सजवी खास यो, माबोवरी, ती पहा
पहावा बहावा!!

हाय्...काय दिसतायेत फुलांचे घोस!! अफाट आहेत फोटो! Happy

बहावा माझा आवडता! द्यायचं म्हटलं की किती भरभरुन देतो हा वृक्ष!
आमच्या बसच्या रुटवर एक झाड दिसतं रोज मला. अगदी गुडघ्याएवढच आहे. पण चारही बाजुला असे झुंबर लटकलेले दिसतात. Happy

मस्त फोटो..

फोटो क्र. ८ तर एकदम लाजवाब..

नी मुंबईत भरपुर आहेत झाडे बहाव्याची. इथे नव्या मुंबईतही रस्तोरस्ती बहरलाय...

सगळ्यांना एकसाथ धन्यवाद Happy
केपी, हिम्सकूल... बहावा कितीवेळा पाहिला तरी कमीच तेव्हा झब्बूंचे स्वागतच आहे Happy
मणिकर्णिका.. मला माहितच नव्हतं.. थँक्स या माहितीबद्दल.. आता तिथे जायला हवे.. Happy

अ प्र ती म! पुण्यात आणि आमच्या नगरात सध्या अस्साच फुललाय हा बहावा! हो मणि ..."अमलताश"!

Pages