पिवळाई !

Submitted by Yo.Rocks on 23 May, 2011 - 14:01

उन्हाळा म्हटले की मला पहिले आठवते ते बहरलेला बहावा ! पिवळ्या फुलांचे झुंबर लक्ष वेधून घेतातच.. मुंबईत हे झाड क्वचितच एखाद-दुसरे कुठे तरी आढळते.. पण हाच बहावा मी सावंतवाडीला मोती तलावाजवळील जगन्नाथ भोसले उद्यानात पाहिला.. त्या उद्यानात शिरलो नि बस्स कसला खुष झालो.. कारणच तसे होते.. या आवडत्या बहाव्याची तब्बल सहा- सात झाडे होती.. नि पुर्णतः बहरली होती.. उद्यानात पिवळाई पसरली होती.. झाडांवरती पिवळे झुंबर नि खाली गळून पडलेल्या फुलांची रांगोळी... पहिल्यांदाच इतका बहावा एकदम बघितला.. नि मग काय क्लिकींग सुरु केले.. पण प्रत्यक्षात जे काही दिसत होते ते अप्रतिम.. फोटोंनी समाधान होत नव्हते.. खरे तर मला टिपताच येत नव्हते.. Happy पण तिथले काही प्रचि दाखवण्याचा मोह आवरत नाही..

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि ९

प्रचि १०

गुलमोहर: 

सहि योग्या,

आमच्या बिल्डिंगच्या गेटवर याच झाड आहे, पण याच नाव मला माहित नव्ह्तं. याचे झुपके घरात आणुन लावायचा भारि मोह होतो, पण ते खुप उंच असतात

मला माहित नाही पण कदाचित असे वाटत मद्रासी लोकांचा सण असतो ना त्याचं नवीन वर्ष त्यावेळी ते याच झाडाची पूजा करतात का रे. मला माहित नाही तरी पण माहिती करून घेण्यासाठी vicharato आहे.

मस्तच. बहुतेक हि फुले मी मुलुंड - ऐरोली ब्रिज च्या बाजुला पाहीलि आहेत. रांगेत भरपुर झाडे आहेत.

मला माहित नाही पण कदाचित असे वाटत मद्रासी लोकांचा सण असतो ना त्याचं नवीन वर्ष त्यावेळी ते याच झाडाची पूजा करतात का रे>>>>महेशजी, एकदम बरोबर. त्यांच्या "विशु" या सणाच्यावेळी यांच्या फुलांचा वापर होतो.

फारच सुंदर फोटो. मुंबईत अनेक ठिकाणी आहेत ही झाडे.
आता एरवी (तथाकथित) रुक्ष मुंबईमध्ये संकासुर, गुलमोहर, पिवळा गुलमोहर, (पेल्टोफोरम) बहावा, पळस पांगारे स्पथोडीया फुलू लागले असतील. कान्हेरीचे दऱ्या पर्वत लाल पिवळ्या रंगाने भरून गेले असतील. जणू काही पिवळी उपरणी आणि भगवी वस्त्रे नेसलेले बुद्ध भिक्षूंचे तांडे 'संघम शरणं गच्छामि ' का घोष करत निघाले आहेत.
अरेरे! वसंत सुरू होऊन संपत चाललाय... बाहेर पडता येत नाहीय.. यह बहार गुजरती जाये, जालीम करोना ना जाये....

Pages