राईटहेवन : कॉपीराईट कायद्याचा पाठपुरावा आणि अमेरिकन उद्योजकता

Submitted by अजय on 22 May, 2011 - 23:32

आंतरजाल आणि प्रताधिकार कायदा यांतले परस्पर संबंध यात भरपूर अस्पष्ट गोष्टी आहेत. पण दिवसेंदिवस या गोष्टी स्पष्ट होत आहेत. आज अमेरिकेत यावर भरपूर खटले चालू आहेत आणि काही खटल्यांचे निकाल या स्पष्टीकरणाला मदत करत आहेत. "Fair use" हे तत्व म्हणजे नक्की काय आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत जाते हे ही या खटल्यांमधे तावूनसुलाखून निघते आहे. या खटल्यांमधून भरपूर पैशांची उलाढाल चालू आहे.

गेल्या वर्षी एक कंपनी निघाली. तिचं नाव राईटहेवन एलएलसी. ही कंपनी काय करते तर जे मोठे लोकप्रिय ब्लॉग्/वेबसाईट यावर लक्ष ठेवते. त्यांना जर दिसले की त्यावर कुठल्यातरी मासिकातले/वृत्तपत्रातले पूर्वप्रकाशित लेखन कदाचित प्रताधिकार कायद्याचा भंग करते आहे. तर ते त्या मूळ प्रकाशकाकडून त्या लेखनाचे प्रताधिकार विकत घेतात. प्रताधिकार कायद्याअन्वये त्याची रितसर नोंदणी करतात. ब्लॉग्/वेबसाईट यांना कुठलिही सूचना न देता त्यावर खटला भरतात. आणि खटला मिटवण्यासाठी पैसे मागतात. आतापर्यंत गेल्या एका वर्षात राईटहेवनने २७५ खटले भरले आहेत आणि त्यातून खटले मिटवून "$ ४८६,५००" इतके पैसे(डॉलर्स) मिळवले आहेत.

या कंपनीचे यश खालील गोष्टींवर अवलंबून आहे.
१) प्रताधिकार मूळ मालकाकडून कमीतकमी किंमतीत मिळाले पाहिजेत.
२) ज्या ब्लॉग्/वेबसाईट वर खटला भरणार त्यांच्याकडे राईटहेवनला द्यायला पैसे पाहिजेत.
३) तो ब्लॉग/वेबसाईट पैसे भरून खटला मिटवायला तयार पाहिजे.
४) सूचना न देता खटला भरणे हे त्या त्या केसमधे कायद्यात बसले पाहिजे.

त्यातल्या ३) आणि ४) या मुद्यांवर राईटहेवनला जोरात विरोध होतो आहे. कारण जर सूचना देणे बंधनकारक असले आणि ती दिल्यावर ब्लॉग/वेबसाईट ने ते लेखन काढून टाकले तर मूळात राईटहेवनला खटल्याचे कारणच उरत नाही आणी त्यांचे पैसे/कष्ट वाया जातील. आणि जितके जास्त लोक राईटहेवनबरोबर मिटवून न टाकता पूर्ण खटला भांडायची तयारी करतील तितके राईटहेवनचे पैसे/वेळ खटल्यात अडकून पडणार.
यात प्रताधिकार कायद्याच्या सीमा (अमेरिकन प्रताधिकार कायद्याच्या सीमा) पडताळल्या जात आहेत.

नुकताच एक अतिशय खळबळजनक निकाल न्यायालयाने दिला. सेंटर फॉर इंटरकल्चरल ऑर्गनाईझींग (CIO) या संस्थेने लास व्हेगस रीव्ह्यू जर्नल या नियतकालिकामधला लेख तशाच्या तसा (पूर्ण ३३ परिच्छेद) प्रकाशित केला. राईटहेवनने त्यांच्यावर खटला भरला. या संस्थेने राईटहेवनबरोबर खटला मिटवण्यास नकार दिला. आणि राईटहेवन ही केस हरले. या अगोदरही ज्यात लेखाचा फक्त काहीच भाग पुनःप्रकाशित केला गेला होता असे खटले राईटहेवन हरले आहेत. ही केस संपली नाहि. आणि त्याचे दूरगामी परिणाम पाहता सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही केस जाणार असे कायदे तज्ञांचे मत आहे.

यावर मायबोलीकरांनी काहि निष्कर्ष काढायच्या अगोदर काही गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितो.

१) हा खटला अमेरिकन प्रताधिकार कायद्याच्या अखत्यारीतला आहे.
२) खटल्यावर नक्किच अपील होणार आणि सर्वोच्च न्यायालयाने (किंवा वरच्या न्यायालयाने) उत्तर दिल्याशिवाय याचे परिणाम नक्की कळणार नाही.
३) प्रतिवादी (CIO) ही संस्था विना नफा तत्वावर चालणारी आहे हे या खटल्यात महत्वाचे आहे याकडे न्यायमूर्तीनी मुद्दाम लक्ष वेधले आहे.
४) मूळ लेख हा साहित्यिक्/प्रतिभाशाली (Literary/Creative) नसून माहितीपूर्ण ( Informative) होता.

संदर्भ
१) राईटहेवन एलएलसी.
२) राईटहेवनचे खटले
३) Republishing Entire Newspaper Story is Fair Use--Righthaven v. CIO
४)Judge grants summary judgment in favor of Righthaven defendant
५) Righthaven Victims

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ब्लॉग्/वेबसाईट यांना कुठलिही सूचना न देता त्यावर खटला भरतात. आणि खटला मिटवण्यासाठी पैसे मागतात. >> हे कितपत योग्य आहे? एक प्रकारची दंडेलशाहीच की.

मध्यंतरी आणखी एक अभिनव प्रयोग ऐकला मी. भारतात अशी एक कंपनी आहे जी अनेक टीव्ही चॅनेलवर त्या त्या प्रायोजीक कंपन्यांच्या जाहीराती दाखवतात की नाही, कुठल्या वेळेला दाखवतात व किती वेळ दाखवतात याचा हिशोब करतात व तो कंपनीला देतात. तुम्ही जाहीरातीकरता चॅनेलला कोट्यावधी रुपय मोजता पण ती जाहीरात खरच चॅनेलवाले दाखवतात की नाही हे तपासायला नको?

उद्योजकतेचा अजुन एक मासला:

http://www.amazon.com/VOEVENT/dp/6131441871/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=13061...

या लोकांनी विकीपेडीया वरील मटेरीअल उचलुन त्याची पुस्तके बनवली आहेत - शेकडो विषयांवरील शेकडो पुस्तके. पुस्तकांची किम्मत? ५० डॉलर! एक जर कोणी घेतले, तरी पैसा वसुल! 'Look inside' अर्थातच यांनी उपलब्ध करुन दिलेले नाही.

VOEvent वरील पुस्तकावरुन आम्हाला यांच्याबद्दल काही महिन्यांपुर्वी कळले कारण या विषयावर आमचे एक पुस्तक आहे:
http://www.cacr.caltech.edu/hotwired2/book.html आणि ते फुकटात वेबवर (PDF) उपलब्ध आहे! आणि हे लोक मात्र यावर पैसे मिळवु पाहतात Happy

धन्यवाद अजय.
अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा एक खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे. 'हॅंगोव्हर - २' या चित्रपटातील एका व्यक्तीरेखेच्या चेहर्‍यावर एक विशिष्ट गोंदण (टॅटू) दाखवले गेले आहे. हे गोंदण माइक टायसनच्या चेहर्‍यावरील गोंदणासारखेच आहे. टायसनच्या चेहर्‍यावरील गोंदण इतके प्रसिद्ध आहे की ते 'टायसन टॅटू' याच नावाने ओळखले जाते. टायसनच्या चेहर्‍यावर गोंदवणार्‍या कलाकाराने आता चित्रपटनिर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्याचे म्हणणे, तेच गोंदण त्याची परवानगी न घेता चित्रपटात दाखवल्यामुळे त्याच्या स्वामित्वहक्काचे व प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन झाले आहे. दुसर्‍याच्या शरीरावर गोंदलेल्या कलाकृतीवर कलाकाराचा हक्क किती व कसा हा प्राथमिक प्रश्न. पण या अनुशंगाने 'स्वामित्वहक्क व प्रताधिकार यांच्या व्याप्ती नक्की किती व कशी?' हा मूलभूत प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालाद्वारे या कायद्याच्या रूपात महत्त्वाचे बदल घडतील (बदल न घडणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे) असा तज्ज्ञांचा होरा आहे.
या खटल्यात खुद्द टायसन वादी नाही आणि त्याला प्रतिवादीसुद्धा करण्यात आलेले नाही. कलाकाराने त्याला काळजीपूर्वक बाजूला ठेवले आहे.

पायरसी, बौद्धिक मालमत्ता, फ्री कल्चर यासारख्या विषयांचा, कायद्याचा वापर करून मोठ्या प्रसारमाध्यम कंपन्या संस्कृती व सर्जनशीलतेवर कशा प्रकारे परिणाम करू शकतात यांचा वेध घेणारे पुस्तक, त्याची पीडीएफ लिंक :

HOW BIG MEDIA USES TECHNOLOGY AND THE LAW TO LOCK DOWN CULTURE
AND CONTROL CREATIVITY - LAWRENCE LESSIG

http://www.free-culture.cc/freeculture.pdf

१. उदाहरणार्थ होम्स आता प्रताधिकार मुक्त झालाय, तर त्याचा अनुवादही प्रताधिकार मुक्त होतील का?
२. जाहीराती प्रताधिकार मुक्त असतात का? की जाहिरातींचा (शिकवण्यासाठी किंवा इतरही काही कमर्शिअल कामासाठी) वापरत करण्यापुर्वी लेखी परवानगी घेणे आवश्यक असते.
३. टिव्हीवरील बातम्या व चर्चाही {मालिका सोडुन} प्रताधिकारात येतात का?