आ़ई वडिलांची काळजी

Submitted by सुपरमॉम on 8 July, 2008 - 09:52

मी मायबोलीची नियमित वाचक आहे हे आता बहुतेकांना माहीत आहेच.
गेले दोन तीन दिवस मी मायबोलीवर येत नाहीय. मला मोठाच प्रश्न पडलाय. भयंकर अस्वस्थ आहे मी. माझ्यासारखा प्रश्न असणारे अनेक लोक असतील इथे असं समजून लिहितेय. प्लीज मला काहीतरी मार्ग सुचवा.

माझे वडील दोन वर्षांपूर्वी गेले. तेव्हापासून आई तिकडे एकटीच आहे. तिच्यासाठी दिवसभराची बाई ठेवली आहे. पण मधून मधून ती आजारी पडली की शेजार्‍यांची मदत लागतेच. तशी तिची तब्येत बरी आहे. वय वर्षं पंच्याहत्तर असलं तरी तशी खुटखुटीत आहे. पण गेले काही दिवस कुठे पित्त झालं, कुठे सर्दीताप आला असं सारखं सुरू आहे. त्यामुळे शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्यावर नाही म्हटलं तरी थोडंफ़ार पडतंच. त्यातच मधे उलट्या, पित्त असं जास्त होऊन तिला दवाखान्यात दाखल करावं लागलं. दोन तीन दिवसांमधे डिस्चार्ज मिळणार आहे. या काळात नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यावर डबा पोचवणं, इतर कामं हे आलं. तेव्हा आता तिला इकडे का घेऊन जात नाही असं त्यांना वाटतंय. काही जण बोलून दाखवत नसले तरी त्यांना स्वतचे व्याप सांभाळून करायचा खूप त्रास होतोय हे मलाही कळतंय.

यावर काय मार्ग काढावा हे मला सुचेनासं झालंय. आम्ही सगळ्या मुली परदेशात असलो तरी अजून ग्रीनकार्ड झालेले नाहीत. याआधी ती दोनदा इथे परदेशात येऊन गेलीय. पण आमचे अजून ग्रीनकार्ड नसल्याने तिला नेहमीकरता आणणे शक्यच नाहीय. इच्छा असूनही ते करता येत नाहीय. वृद्धाश्रमाचा विचारही शक्य नाहीय कारण ती मनाने आधीच एकटं रहावं लागतं यामुळे खचलेली आहे. अशात तिला वृद्धाश्रमात ठेवलं तर ती आणखीच डिप्रेशन मधे जाईल. काय करावं ते कळतच नाहीय.

मला प्लीज मार्ग सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण तीच्या साठी भारतात येऊ शकत नाही का? आज काळ चे बदलते आयुष्य ; करिअर सगळ्या गोष्टी बदलत आहेत. मात्र आपण हे कशासाठी करतोय याचा विचार मनात ठाम असावा. जर याचा बिंदू केवळ आपल्या कुतुबाला सुख-समाधानाने जगता यावे असा असेल ; तर आपण भारतात यावे. आई ची काही काळ - तब्बेत सुधारेपर्यंत काळजी घ्यावी. अर्थात याचा बिंदू वेगळा असेल आणि आपण आणखी काही वेगळ्या गोष्टींमुळे अडकून असाल ; तर तेथूनच आई च्या काळजी साठी सोय शक्य तेतकी करणे ! आणि अर्थातच आपण धीराने , न खचत या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे.

Pages