आ़ई वडिलांची काळजी

Submitted by सुपरमॉम on 8 July, 2008 - 09:52

मी मायबोलीची नियमित वाचक आहे हे आता बहुतेकांना माहीत आहेच.
गेले दोन तीन दिवस मी मायबोलीवर येत नाहीय. मला मोठाच प्रश्न पडलाय. भयंकर अस्वस्थ आहे मी. माझ्यासारखा प्रश्न असणारे अनेक लोक असतील इथे असं समजून लिहितेय. प्लीज मला काहीतरी मार्ग सुचवा.

माझे वडील दोन वर्षांपूर्वी गेले. तेव्हापासून आई तिकडे एकटीच आहे. तिच्यासाठी दिवसभराची बाई ठेवली आहे. पण मधून मधून ती आजारी पडली की शेजार्‍यांची मदत लागतेच. तशी तिची तब्येत बरी आहे. वय वर्षं पंच्याहत्तर असलं तरी तशी खुटखुटीत आहे. पण गेले काही दिवस कुठे पित्त झालं, कुठे सर्दीताप आला असं सारखं सुरू आहे. त्यामुळे शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्यावर नाही म्हटलं तरी थोडंफ़ार पडतंच. त्यातच मधे उलट्या, पित्त असं जास्त होऊन तिला दवाखान्यात दाखल करावं लागलं. दोन तीन दिवसांमधे डिस्चार्ज मिळणार आहे. या काळात नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यावर डबा पोचवणं, इतर कामं हे आलं. तेव्हा आता तिला इकडे का घेऊन जात नाही असं त्यांना वाटतंय. काही जण बोलून दाखवत नसले तरी त्यांना स्वतचे व्याप सांभाळून करायचा खूप त्रास होतोय हे मलाही कळतंय.

यावर काय मार्ग काढावा हे मला सुचेनासं झालंय. आम्ही सगळ्या मुली परदेशात असलो तरी अजून ग्रीनकार्ड झालेले नाहीत. याआधी ती दोनदा इथे परदेशात येऊन गेलीय. पण आमचे अजून ग्रीनकार्ड नसल्याने तिला नेहमीकरता आणणे शक्यच नाहीय. इच्छा असूनही ते करता येत नाहीय. वृद्धाश्रमाचा विचारही शक्य नाहीय कारण ती मनाने आधीच एकटं रहावं लागतं यामुळे खचलेली आहे. अशात तिला वृद्धाश्रमात ठेवलं तर ती आणखीच डिप्रेशन मधे जाईल. काय करावं ते कळतच नाहीय.

मला प्लीज मार्ग सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमॉ, NRI's च्या पालकांची काळजी घेणार्‍या काही संस्था आहेत महाराष्ट्रात. त्यांची मदत घेता येईल. मी स्वतः अनुभव घेतलेला नाही पण ऐकून आहे. सहसा मुलं परदेशात असलेले पालक सारख्याच मनःस्थिती आणि परिस्थितीतून जात असल्यामुळे त्यांच्या अश्या communities तयार होतायत ही चांगली बाब आहे. इथे सगळेच एकमेकांच्या वेळेला मदत करत असल्यामुळे आणि आपण त्याचं (मोल होणं शक्य नसलं तरी) शुल्क भरत असल्यामुळे आपल्यालाही obligation वाटत नाही.

या काही लिंक्स सापडल्या बघ नेटवर :
http://www.guardian-pune.com/default.html
http://www.nripo.org/

आता यांचं काम फक्त पुण्यातच चालतं की कसं त्याची चौकशी करावी लागेल.

त्यांना प्रवास झेपणार असेल तर सहा महिने तर नक्कीच तुमच्याकडे राहु शकतील. किंवा जी बहिण त्यातल्या त्यात भारता जवळच्या देशात (जसे यु के) असेल तिथे त्या जाउ शकतात. परत जाण्याच्या वेळी तुम्ही त्यांच्या बरोबर जाउन १५ दिवस राहुन येउ शकता. म्हणजे कमीत कमी सहा साडे सहा महिन्यांचा प्रश्न सुटेल. तसेच एका बाई ऐवजी सकाळी एक आणि दुपारनंतर एक असे ठेउ शकता. म्हणजे एक आली नाही तर दुसरी असेल. किंवा एखादी चाळीशीतली तब्येतीने बरी अशी बाई (नात्यातली किन्वा ओळखितली) कायम येउन राहु शकेल का असे बघा.

सुमॉ, कुणी नातेवाईक त्यांच्याबरोबरीने राहू देउ शकत असेल तर उत्तम.
ओळखीच्या दवाखाना अगर हॉस्पिटलशी संबंधीत हेल्थ कार्ड घेवून ठेवावे. इमर्जन्सी फोनची लिस्ट देखभाल करणार्‍या बाईकडे देवून ठेवावी. गरज पडल्यास ambulance बोलविता येईल एवढी तजवीज असावी.
त्यांना येणे जमत नसेल तर कुणीतरी तिकडे जाणे, जात राहणे बरे. फोनवरून विचारपुस चालु ठेवावी. वाढविता आली तर उत्तमच. आणि फार काळजी करू नकोस.

सुमॉ, अथश्री नावाच्या संस्थेबद्दल पण काही चांगल्या गोष्टी ऐकून आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही. खालील लिंक पाहा.

http://www.financialexpress.com/news/Housing-A-Retirement-Plan/108126/

पुण्यात कुणालातरी प्रत्यक्ष पाहून यायला सांग. खूप छान काळजी घेतात असे ऐकले आहे.

अथश्री ही परांजपे स्कीम्सची योजना आहे. आणि खूप चांगलं ऐकलं आहे त्याबद्दल. चांदनी चौक आणि बाणेरला आहे.
सुमॉ, आनंदवनात काही वृद्ध राहतात. हा वृद्धाश्रम नाही. प्रत्येकासाठी इथे सगळ्या सोयींनी युक्त अशी स्वतंत्र घरं आहेत. अनेक प्रसिद्ध राजकीय नेते व लेखकांचे आप्त तिथे आहेत. वृद्धाश्रमापेक्षा हा पर्याय अनेकांना आवडतो.

सगळ्यांना धन्स.
स्वाती, यातल्या संस्थांबद्दल मला माहीत आहे ग. nripo ची मेंबरशिप घेऊनही दिली आहे मी तिला. पण ते सगळेच म्हातारे असल्याने त्यांची अशा वेळी मदत कशी expect करायची?

बाई तर ठेवलेलीच आहे दिवसभराची. आता रात्रीची पण अरेंज केलीय. पण नातेवाईकांचं म्हणणं की त्यानं प्रश्न सुटायचा नाही. बाई ठेवली तरी आम्हाला त्या आजारी पडल्या की करावंच लागतं. लक्ष द्यावंच लागतं.

चिनू, कोणी नातेवाईक जवळ राहणारे असते तर हा प्रश्न आलाच नसता ग.

chioonx , आनंदवनाची अजून थोडी माहिती देणार का?

discourage करण्याचा हेतू नाही पण पालकांना इथे आणण्याबाबत एक महत्वाचा प्रश्न म्हणजे insurance .. ते कसं काय manage करणार? तशी ह्यावर चर्चा झालीये बहुतेक आधी, pre-existing conditions cover करणार्‍या insurance वर .. पण एकूणच इथे healthcare जरा महागच आहे .. बर्‍याच cases ऐकायला मिळतात त्याबाबतीत पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या ..

नातेवाईकच हवेत असे काही नाही. जर कुणी ओळखीची चांगली फ़ॅमिली paying guest ठेवायला तयार असेलेत तर चांगलेच.

पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे घरपोच आरोग्यसेवा असा उपक्रम चालू झाला आहे. या सेवेबद्दल प्रत्यक्ष अनुभव नाही. त्यांच्यातर्फे डॉ. कडून दररोज तपासणे, नर्सिंग वगैरे सेवा घरी पुरवल्या जातात. त्यांचा दूरध्वनी ४०१५१०८७ असा आहे. आम्ही पण ही सेवा वापरावी का याचा विचार करतो आहोत.

या घरपोच सेवेचा नसला तरी दिनानाथचा रुग्णालय म्हणून आम्हाला खूप चांगला अनुभव आहे. विशेषतः तिथले काका ,मावशी, नर्स खूप सेवाभावी वृत्तीचे आहेत. तिथे दाखल केले तर डॉ. देखरेखेखाली डायटेशीयनने मान्यता दिलेले जेवण मिळते आणि ते चांगले असते (कधी कधी चवीची मारामार असते कारण खास आजार्‍यासाठी बनवलेले अन्न असते, पण एका द्रुष्टिने ते चांगलेच). माझ्या आईस गेल्या ३-४ वर्षात ११-१२ वेळा तिथे दाखल करावे लागले पण चांगला अनुभव आहे. त्यामुळे घरून डबा पोहोचवणे वगैरे कामे करावी लागली नाहीत.

ग्रीन कार्ड असो वा नसो पालकांना दीर्घकाळासाठी किंवा कायमचे अमेरिकेत आणणे तितके सोपे नाही. ७० नंतर आधीचे आजार चालणारा विमा मिळत नाही (म्हणजे मला तरी सापडला नाही). तुमच्या नोकरीच्या विम्यात अवलंबीत व्यक्ती म्हणून ७० नंतरच्या आईवडीलांचे नाव घालता येते का ते माहिती नाही.

Hi, I am a new member & CLINICAL PSYCHOLOGIST By profession. CASP is doing many activities in pune for elderly people. Abt living I hv heard abt ATHASHREE & its good.

तुमच्या नोकरीच्या विम्यात अवलंबीत व्यक्ती म्हणून ७० नंतरच्या आईवडीलांचे नाव घालता येते का ते माहिती नाही.>> मी मागे ह्याबद्दल माहिती काढली होती तेंव्हा असे कळले होते कि घालता येते फक्त वाढिव premium at full rate तुम्हाला भारावा लागतो. Company match करत नाही. माझ्या सध्याच्या company मधे नवरा बायकॉ मुले सोडून इतर कोणी add करण्यासाठी supplementary option आहे.

जर तुम्ही पैसे भरायला तयार असाल तर Insurance Company ला अडचण नसावी पण अर्थातच ते Pre-existing Conditions cover करतील असे मला वाटत नाही. अशा प्रकारांसाठी वेगळे package घ्यावे लागते ऐकले आहे.

७० नंतर आधीचे आजार चालणारा विमा मिळत नाही >>> visitor visa वर येणार्‍या लोकांसाठी ICICI कडे आहे काही प्लॅन. त्यांच्या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल.

असामी, मला वाटतं इथले employers जो विमा देतात त्यातही १२ महिने pre-existing conditions cover होत नाहीत. म्हणजे effective date पासून बारा महिने.
नंतर होतात.

employers जो विमा देतात त्यातही १२ महिने pre-existing conditions cover होत नाहीत >> म्हणजे additional लोकांना म्हणतेयस का ?

सुमॉ, सहारा केअर बद्दल ऐकले होते मी मागे. अशाच प्रकारच्या सर्व्हिसेस असतात त्यांच्या.
as per their website,
Sahara Care House is an exclusive NRI service and concierge service portal designed to help NRIs extend a helping hand to their family members and loved ones in India. Rather than simply sending money at home, NRIs and PIOs can assist their family members in emergency or routine life by selecting from our variety of products and services categorized under Healthcare, Personalised, Utility and Shopping Services.
Under these four verticals Non-resident Indian (NRIs) may request for bill payments, property management, legal and taxation services, school or college admission information service, travel and leisure, visit by Relationship Ambassador and other specialized concierge services.Guests may also take care of their loved one's health by gifting them Individual or Preventive Healthcare Package.

ही साईट बघ.
http://www.saharacarehouse.com/index.aspx?reffer=admin

मात्र या सेवेचा प्रत्यक्ष अनुभव किंवा तो घेतलेले इतर कुणी माहित नाही मला.

लिहायला कुठुन सुरवात करु सुचत नाही आहे, आत्ताच भरतात आईशी बोलण झाल आणी पाया खालची जमीन सरकली, रडावस वाटतय, मनात खुप राग उफाळतोय आणी मी काहीच करु शकत नाही ह्याची भयंकर खंत बोचतेय. आईने नोकरी करुन मला शिकवल, वाढवल. माझ्या अमेरिकेच्या टिकिटाचे पैसे भरले. गेले ३३ वर्ष आई काम करतेय. स्व:ता साठी तिने काहीच केल नाही, माझ्या जे काही जमवल; माझ्या साठी, माझ्या भविष्या साठी.

आजही आई भाड्याच्या घरात रहाते, गेल्या ७ वर्षात काय वा गेल्या ३३ वर्षात मी आई साठी काहीच करु शकलो नाही. आता माझी परीस्थीती थोडी चांगली आहे तेव्हा आईसाठी, तिने भारतात घेतलेल्या जागेवर घर बांधाव अशी इच्छा आहे. आज आईला फोन करुन जागे विषयी विचारल तेव्हा मला जे समजल त्याने माझ डोक गरगरतय.

दोन-अडिच वर्षांपुर्वी माझ्या मोठ्या काकाने, माझ्या आईकडुन जमिनिची कागद-पत्र (Originals) घेतली , आजपर्यंत ती परत केलेली नाही.
त्यांच्या कोणत्या तरी कामासाठी त्यांनी आईकडुन कागद पत्रे घेतली , आता आई कागद-पत्र परत मागतेय तेव्हा "कागड पत्र कोर्टात आहेत" अस काका सांगतो. मला काय करु सुचत नाही आहे.

काका च्या कोणत्या कामा साठी त्याने माझ्या आई कडुन तिच्या नावावर असलेल्या जमिनिची कागद पत्रे घेतली? त्या कागद पत्रांचा त्याला काय उपयोग? कोर्टात आपली Original कागद-पत्र ठेवावि लागतात का? मला काही कळत नाही आहे, माझ्या आईची जमीन माझ्या काकाने हडपली असेल काय? ह्या आधी आईकडुन "हजारो" रुपये काकाने घेतलेत ते अजुन परत केलेले नाहीत.

मी काय करु? मला कृपया मदत करा.

अ. शहा

सर्वप्रथम एक चांगला वकील गाठा. तुमची काकाशी बोलण्याची कंफर्ट लेव्हल माहिती नाही. पण जमल्यास बोलून बघा. काही वेळा नातेवाईक तुमच्या गप्प बसण्याचा फायदा घेतात. (अगदीच कोणी वाली नाही ह्या व्यक्तीला असं समजून.) परिस्थिती (सांपत्तिक असं गृहीत धरून) चांगली आहे म्हणता तेव्हा उत्तम वकिलावर पैसा खर्च करू शकाल असं वाटतंय. आईला पुन्हा एक दमडीही काकाला देऊ नये ह्याबद्दल आवर्जून सांगा.

अश्या वेळेस खुप त्रास होण स्वाभाविक आहे, पण शांतपणे विचार करा आणि लगेचच एखादा वकील शोधा, आईला सांगा कि कुठेही सही करु नकोस, अशी कागदपत्र कोर्टात ठेवावी लागत नाहीत बहुतेक तुमचा काका हे खोट सांगत असावा.लगेच वकील शोधा.

आई आणखि काहि दिवस आपण काकाला विचारु मग काय ते करु म्हणते. आईच आधि पासुन असच आहे काका घरात मोठे (वयाने) म्हणुन त्यांच्या धाकात, शब्दात रहायच अस तिच म्हणण. काका तिला फसवतो हे तिला हि वाईट वाटत पण तिथे काकाचा परिवार हि एकच सोबत तिला आहे म्हणुन ति काहि बोलत नाहि. आईला इथे बोलवायच तर अजुन माझ ग्रीन कार्ड नाहि आणी माझे बाबा इथे यायला नको म्हणतात. बाबांचा पास पोर्ट, विसा होण क।ठिण आहे आईला विसा मिळेल पण इथे ति काय करेल? मला हि काकाला काहि बोलता येत नाहि, वेळ प्रसंग आला तर तेच आइला मदत करतिल ह्या विचाराने. आईने स्वःताच्या नोकरि-कष्टावर सार केल, अजुनहि नोकरि करते, घराला बाबांचा आर्थिक आधार तसा काहिच नाहि. आइचि खुप काळजि वाट्ते, आणि मि काहि करु शकत नाहि हे मनाला खुप बोचत.

नात्याभाऊ,

चान्गली लिंक दिलीत.. आजकाल ही परिस्थिती अगदी प्रातिनिधीक आहे, तरिही प्रत्त्येकाच्या बाबतीत पर्याय वेगवेगळे असू शकतील. मला लेखातील एक वाक्य आवडले:

"निर्णय ज्याचा त्याचा आहे. पण हे मात्र निश्‍चित, की जो मार्ग स्वीकारला तो आनंदाने स्वीकारा आणि संध्याकाळ हसरी करा."

मला वाटत "priorities and importance" परिस्थीतीनुसार बदलता यायला हवेत.. आपल्या आयुष्याची सोन्याची वर्षे आपल्या पालकान्नी (विशेषता स्त्रीने) मुलान्च्या वाढ सन्गोपनासाठी दिलेली असतात. स्वताच्या करीयर, चैन, आनन्दाला मोड घालून मुलान्साठी पालक करतात हे विसरता कामा नये. आयुष्याच्या उतार वयात, आपल्या माणासासाठी आपण दिलेल प्रेम, आपुलकी, सेवा..याची जागा कुठली संस्था, शेजारी पाजारी, नोकर, घेवू शकत नाहीत. खरच आपण इतके स्वार्थी होतो का की "when its our time to due diligence, we start looking at the world from our perspective"?

सकाळ मधिल "stats" मला तरी अस्वस्थ करतात..

"आता इथले सगळे (नोकरी, शिक्शण, व्यवसाय, मुल, बाळ, इत्यादी..) सोडून परत कसे जायचे"?.. असा एक प्रश्ण नेहेमी कानावर पडतो. मग इथे आम्ही आलो तेव्हा काय थेट आकाशातून टपकलो होतो का..?. बर्याच गोष्टि तेव्हाही सोडून आलोच होतो.. अनेक गोष्टींशी इथे adjustment केलीच होती ना..?... मला वाटत आपण आपला दृष्टीकोन "सोयीस्कररीत्या" बदलत असतो. आणि मग अशावेळी कारणांचा डोंगर आपणच समोर उभा करतो.

मला तरी वर सुमोच्या पोस्ट मधे कळतय पण वळत नाही असा सूर दिसतोय... तरिही मनातील ही तळमळ इथे बोलून दाखवली याच कौतूक प्रचंड आहे. मला वाटत, सुमो तुम्ही पहिले पाऊल उचलले आहे.. आता फक्त मार्ग चालायचा आहे. आणि तो मार्ग कठीण, धाडसी, प्रसंगी मन खच्ची करणाराही असू शकेल याची मला पूरेपूर कल्पना आहे पण त्यातून तुम्हाला मिळणारे समाधान, आनंद, क्रुत-कृत्त्यता, हे कईक पटीने अधिक असेल, मोलाचे असेल.

असो. आपला आनंद, समाधान कशात आहे हे शेवटी ज्याचे त्याने ठरवायचे... मि फक्त स्वानुभव व इतर अनेकान्च्या पाहिलेल्या अन ऐकलेल्या अनुभवावरून इतकेच म्हणेन, परिस्थीतीचे गुलाम होवू नये.. विशेषता आपल्या आई वडीलान्च्या आनन्दासाठी घेतलेले श्रम हे चिरकालीन आनंद देतात.

चू.भू.दे.घे.

सुमॉ,
...आपल्या जन्मदात्री साठी की जीने आपले तरुणपण मुलांसाठी
खर्च केले..त्याची परतफेड म्हणून मुलांनी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी मुलांनी जवळ असणे अतिशय गरजेचे आहे..त्यांना पैसा किंवा भौतीक सुखापे़क्षा प्रेमाची गरज असते..
आपण तीच्या साठी भारतात येऊ शकत नाही का?
हे जरा अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही... जरी यात नुकसान
झाले सर्वांचे तरी आई साठी तो त्याग नगण्य आहे..
सुभाष

असॅ,
मी तरी वरील योगशी सहमत्.तुमच्या कळ्कळीबद्दल फार कौतुक जरुर वाटते.
परंतु सर्वसाधारण माणुस अशी प्रतिक्रिया किंवा मनाची अवस्था व्यक्त करतो ते
त्रयस्थ व्यक्तींसाठी,रक्तांच्या संबधामध्ये दोन पाऊल पुढे टाकावी लागतात्,क्रुतीची.
आईवडिलांसाठी केलेला त्याग अतुल्य, त्याची तुलना सध्याच्या परिस्थितीशी किंवा
गेलेल्या संधिंशी कधीच होणार नाही.दुसरे म्हणजे जमिनीच्या कागदपत्रांबद्दल्,सुरुवातीला कितिहि अप्रिय असले तरी मला तरी वाटते काकांबरोबर
चर्चा करुन सहज सोडता येईल हा प्रश्न्.माझा वैयक्तिक वकिलांचा अनुभव ( अगदी
ग्रामीण ते कार्पोरेट लेव्ह् ल पर्यन्त) हेच सांगतो कि सर्वसामान्य मानसाने ती पायरी
न चढ्लेली बरी.आमचीही अशी जमीनीची कागदपत्रे वडिलांकरवी एका वकीलाच्या
हाती गेली होती व टेक्टफुली बाहेर काढावी लागली. आणि शेवटि घर बांधुन देता
म्हणताय्,अतीशय गौरवाची गोष्ट्.परन्तु वर बिबि वर वाचुन कळ्लेच असेल कि उतारवयात (स्वतःची अशी )काळजी घेणार्‍यां माणसांची जास्त जरुरी असते.रिमोट
कंत्ट्रोल द्वारे कींवा नातेवईकांकडुन वा शेजार्‍यापाजार्‍यांकडुन नाही होत काळजी
घेणं अशावेळी.

मी पण योगशी सहमत. जसं आपण इथून तिथे गेलो तसंच तिथून इथे परत येता यायला हवं. असं हतबल होता काम नये. अर्थात ते तितकं सोपं नाही. तरीही असं वाटलं खरं.

~~~~~~~~~
~~~~~~~~~

परत जाणं हा एकच उपाय आहे का ? परदेशातून परत गेलेली किती मंडळी आई वडिलांच्या गावीच परत गेली आहेत? जे कोणी चेन्नै ,हैदराबाद, बंगलोर अशा ठिकाणी गेलेत त्या सगळ्यांचे आई वडिल आपलं घर दार, शेती वाडी, मित्र , नातेवाईक यांचा गोतावळा सोडून मुलाकडे अथवा मुलीकडे म्हणुन अशा शहरात जाऊन रहातात का? जे नाही रहात त्यांचं काय? आई वडील परभणी, नांदेड, जुन्नर, अकोला, अलिबाग, धुळे अशा ठिकाणी अन मुलं चेन्नै किंवा हैदराबाद किंवा दिल्ली इथे असं चित्र तर सर्रास दिसतं. त्यांचं काय? अशा पालकांची काळजी घेणारं कोण? हा प्रश्न परदेशस्थ भारतीयांचाच नाही , तर नोकरी धंद्यानिमित्त वाडवडिलांपासून दूर रहाणार्‍या सर्वांचाच आहे.

नोकरी धंद्यानिमित्त वाडवडिलांपासून दूर रहाणार्‍या सर्वांचाच<< शोनू, तेव्हडंच नाही तर आता एकाच शहरात, गावात राहुनही आईवडलांची तोंडं न बघणारे महाभाग देखील भेटलेत.
तेव्हा 'आई-वडलांची काळजी' हा विषय फक्त भौगोलिक अंतरावर अवलंबून नाही, तर भावनिक अंतरावर देखिल आहे.
(असो तो ह्या बाफचा विषय नाही!)

शोनु, आपल्याच देशात आपले आईवडील लांब असणं आणि आईवडील दुसर्‍या देशात असणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना होणार नाही. जर तू दिल्लीला असशील आणि आईवडील अगदी कर्नाटकात असले तरी ते आजारी असतील तर तू तिकडे तातडीने जाऊ शकतेस. शिवाय तूला आईवडीलांना कर्नाटकातून दिल्लीला कधीही नेता येऊ शकतं कितीही दिवसांसाठी. त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही.

एका शहरात राहून आईवडीलांचे तोंड ज्यांना पहायचे नसेल त्यांना आईवडीलांची काळजीच नाही त्यामुळे विषय तिथेच संपला.

पण काळजी ज्यांना असेल, त्यांना हेही कळत असतं की नुसता पैसा पुरवून आणि फोनवर बोलून आईवडीलांची काळजी उतारवयात घेता येत नाही. त्यावेळी त्यांना भावनिक आधाराइतकीच प्रत्यक्ष शारीरीक आधाराची गरज पडते.

AS,
तुमचा प्रश्न अवघड आहे, पण सोडवण्यासारखा
नाही असं अजिबात नाही. फ़क्त टेंशन मुळे तुम्हाला
सुचत नाहीये.
मला वाटतं तुम्ही भारतात आल्यावर तुमच्या
काकांशी संपर्क साधा, त्यांच्याशी
सहजपणेच पण छान गप्पा मारा, त्यांच्या
तब्येतीची चौकशी करा.त्यांच्याशी एक rapo तयार
करा.वातावरण हल्कं राहील अस बघा,जेणेकरुन
त्यांचा मनावरचं tention कमी होईल. (लक्शात
ठेवा,अस काही कराअर्या माणसाच्या मनावर जास्त
दडपा असतं. त्यामुळेच तो ताठपणे वागतो, मला
काही फ़रक पडत नाही असं दाखवतो.)
काकांन त्यांच्या family ला जेवायला
बोलवा--त्यांच्या बरोबर छान वेळ घालवा आणि
सजपणे पण आत्मविश्वासाने त्याना कागदपत्र
हवी होती अस सांगा. ते काय म्हणतील ही नंतरची
गोष्ट आहे. पण तुमच्या बद्दल त्यांच्या मनात एक
प्रकारच positive feeling मात्र नाक्कीच
असेल--तुमच्या आत्तपर्यंतच्या वागण्यामुळे.
पुढच काय बोलयच हे तुम्हाला अपोआपच कळेल.
मत्र एक लक्षात ठेव, आपल्यला त्यांच्याशी
दुटप्पीपणाने वागायच नाहीये. केवळ कामापुरत
चांगल बोलायच नाटक करायच आणि नंतर
मात्र अपमानास्पद वागणुक द्यायची अस आपल्याला
करायच नाहीये्ए सगळं सहजपणेच करायच
आहेक आणी तो तुमचा हक्क आहे. तुम्ही कोणाकडुन
उपकार घेत नाही आहात आणि चांगल वागुन
कोणावर उपकारही करत नाही आहात.
ते काय वागतील तो त्यांचा प्रश्न आहे.
All the bests
अनघा

गार्डियन चे काम माझा भाउ बघतो. जर त्याच्याशी बोलायचे असेल तर मला मेल करा. साईट वरूनही फोन आणी इ-मेल मिळू शकेल.
:-आनंद

Pages