आ़ई वडिलांची काळजी

Submitted by सुपरमॉम on 8 July, 2008 - 09:52

मी मायबोलीची नियमित वाचक आहे हे आता बहुतेकांना माहीत आहेच.
गेले दोन तीन दिवस मी मायबोलीवर येत नाहीय. मला मोठाच प्रश्न पडलाय. भयंकर अस्वस्थ आहे मी. माझ्यासारखा प्रश्न असणारे अनेक लोक असतील इथे असं समजून लिहितेय. प्लीज मला काहीतरी मार्ग सुचवा.

माझे वडील दोन वर्षांपूर्वी गेले. तेव्हापासून आई तिकडे एकटीच आहे. तिच्यासाठी दिवसभराची बाई ठेवली आहे. पण मधून मधून ती आजारी पडली की शेजार्‍यांची मदत लागतेच. तशी तिची तब्येत बरी आहे. वय वर्षं पंच्याहत्तर असलं तरी तशी खुटखुटीत आहे. पण गेले काही दिवस कुठे पित्त झालं, कुठे सर्दीताप आला असं सारखं सुरू आहे. त्यामुळे शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्यावर नाही म्हटलं तरी थोडंफ़ार पडतंच. त्यातच मधे उलट्या, पित्त असं जास्त होऊन तिला दवाखान्यात दाखल करावं लागलं. दोन तीन दिवसांमधे डिस्चार्ज मिळणार आहे. या काळात नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यावर डबा पोचवणं, इतर कामं हे आलं. तेव्हा आता तिला इकडे का घेऊन जात नाही असं त्यांना वाटतंय. काही जण बोलून दाखवत नसले तरी त्यांना स्वतचे व्याप सांभाळून करायचा खूप त्रास होतोय हे मलाही कळतंय.

यावर काय मार्ग काढावा हे मला सुचेनासं झालंय. आम्ही सगळ्या मुली परदेशात असलो तरी अजून ग्रीनकार्ड झालेले नाहीत. याआधी ती दोनदा इथे परदेशात येऊन गेलीय. पण आमचे अजून ग्रीनकार्ड नसल्याने तिला नेहमीकरता आणणे शक्यच नाहीय. इच्छा असूनही ते करता येत नाहीय. वृद्धाश्रमाचा विचारही शक्य नाहीय कारण ती मनाने आधीच एकटं रहावं लागतं यामुळे खचलेली आहे. अशात तिला वृद्धाश्रमात ठेवलं तर ती आणखीच डिप्रेशन मधे जाईल. काय करावं ते कळतच नाहीय.

मला प्लीज मार्ग सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमॉ,

मी स्वत: येथे Wisconsin मध्ये आहे. अर्थात मला दोन बहिणी आहेत पण आईला केंव्हाही माझ्याकडे रहायला जास्त आवडते. मला स्वतःला हे कधी कधी frustating वाटते. इथे फक्त चार महिनेच मिळतात. परत माझी आईचे वय ९० वर्षे आहे. पण बहुतेक दरवर्षी आम्ही तिला येथे घेऊन येतो. अगदी चार महिन्यासाठी (I94 जरी सहा महिन्याचा असला तरी थंडीमुळे शक्य होत नाही)का होईना पण तिला तेव्हढा तरी आनंद आपण देण्याचा प्रयत्न करतो, ह्यातच समाधान मानावे लागते. पण तिचे ते ४-६ महिनेतरी आनंदात जातात. शक्य असल्यास कमीत कमी mim May to mid Nov असे सहा महिने त्यांना घेऊन या. तुमची आई ईथे येऊन काय करणार ह्यापेक्षा तिला तुमच्याबरोबर रहायला मिळणार हे काही कमी नाही.
|
ह्याबद्दल एकदा मी बहिणीशी आणि आईशी बोललो होतो. आईच्या मते ते गावातुन शहरात आले. अर्थात तिने वेळ पडली तेंव्हा सासु-सासर्‍याची सेवाही केली. पण तिच्या दृष्टीने हे सर्व परिस्थितीनुसार आहे आणि हे अटळ आहे. This is change and it is invitable. Some might not think it but for her it is progression. परत तिचे हेही सांगणे आहे की तुम्हीसुध्दा तुमच्या मुलांच्या प्रगतीच्या आड येता कामा नये. अर्थात हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे कारण ती आई आहे.

अनघा,एकदम पर्फेक्ट सल्ला, अभिनंदन्,फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे,नाटक.

सुमा, तुला हा एकदम फुकट सल्ला किंवा अतीशहाणपणाचा सल्ला वाटेल पण real experience आहे म्हणून सांगते. कृपया त्यातून वाईट किंवा विचीत्र अर्थ घेवुन नये.

हे आश्रम्,सोयी सर्व करून माहीत नाही किती स्वस्थ आपण बसु शकतो किंवा थकलेले आई वडील आनंदी राहू शकतात. आपण आता एक ओझे राहीलो आहोत ही नुसती भावना सुद्धा त्यांना जाणवली तर आई वडील नुसते मनाने खचतात. पण न जाणवू देता खंगतात. हे असे नुकतेच एका भारातात रहणार्‍या जवळच्या नातेवाईकाचे पाहीले. बरेचसे आजार हे मानसीक आजारपणामुळे असतात ह्या वयात.
जर शक्य असल्यास सहा महीने तुमच्याकडे वा जर दुसरी बहीण US च्या बाहेर असेल तर तिच्याकडे असे जर ठेवले तर पहा.

(माझे आई वडील इथे रहातात. जमेल तसे आम्ही तीन भांवडे आळीपाळीने त्यांच्याकडेच जावून रहातो. त्यात फायदा हाच की त्याना प्रवास करावा लागत नाही. त्यांची रोजचे रहाण्याची खोली,झोपण्याची खोली सेम तेव्हा त्याना काही तयारी करावी लागत नाही. सुदैवाने ते तसे बरे आहेत पण जेव्हा जेव्हा म्हणून आम्ही रहातो तेव्हा आईचा चेहरा खुलला असतो. (हा माझा अनुभव आहे, आणि माझे सुदैव की ते इथे आहेत पण अर्थ हाच की त्याना थकलेल्या दिवसात सहवास हवा असतो असे मला कळले recently जरा ज्यास्त कळून चुकले. हल्लीच पप्पा खूप सीरीयस होते नी सुट्टी मिळत न्हवती.मी स्वता आजारी होते त्या आधी म्हणून माझ्या सुट्ट्या, बाकी काही कामे म्हणून सुट्ट्या असे करून माझा बॉस अगदी टोकावर आला होता जेव्हा मी इतके सीरीयस कारण सांगून सुद्धा. I cant gurantee you about your job, we migth make your replacement as a permanent. अश्या त्याच्या धमक्या. सुट्टी मिळत नसताना सुद्धा नोकरी सुटली तर सुटली , तु काही कर असे boss ला सांगून पप्पाना भेटले. मी येइपर्यन्त सारखे बहीणीला विचारत कधी येणार मी वगैरे?, बहीण चूकून बोलून गेली की तीला बहुतेक सुटी मिळत नाहीये. मी गेल्यावर ते खूप खुष होते नी हेच सारखे विचारत होते तुला काही problem नाही होणार ना आता नोकरीवर? तु तर रजा मिळत नाही म्हणत होतीस? उगाच माझ्यामुळे तुझे career वर नको परीणाम. तेव्हा तु तुझे नुकसान करून येवु नकोस. काय बोलला नाही ना boss तुला? मी काय आज आहे नी उद्या नाही. I felt so miserable after listening to this line. anyways;Honestly,I was afraid about my job but all I told myself in the flight money can be earned anytime. I want to be with my dad). ज्यांचे आईवडील इथे नाही आहेत त्यांना खरेच खूप emotional stress मधून जावे लागत असेल नक्की पण शेवटी काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागतो.

lastly it will sound very harsh, if you cant do it then dont expect others would do it. मग ते नातेवाईक असो वा कोणी असो. आपण करू का हॉस्पीटलचे हेलपाटे कोणा दुसर्‍यासाठी जेव्हा आपालीच कामे संपत नाही. आपले काम आहे ते आपल्यालाच करावे लागते असा मला अनुभव आहे.

नात्याने दीलेल्या सर्व लिंक आताच वाचल्या. खूपच खूप तीढा आहे हा. डोक भिरभिरायला लागले विचार करून . .... छे.

सुपरमॉम,
मी परांजपे स्किम्सच्या हडपसर [पुणे] च्या 'अथश्री' मधे एक फ्लट घेतला आहे. सध्या माझं वास्तव्य मुम्बईत असलं तरी मी वरचेवर पुण्याला जातो. तिथे काही वृद्ध व्यक्ति एकट्याने रहातात. त्यांच्यासाठी बर्‍याच सुविधा - मेस, गिम, स्विमिंग पूल, २४ तासाची रुग्ण-वाहीका वगैरे -पुरवल्या आहेत. स्टाफहि तत्पर आणि सौजन्यशील आहे. जवळच नोबल हॉस्पिटल आहे. त्यांच्याशी 'अथश्री' चा परस्पर-सामंजस्य करार झाला आहे. घरकाम आणि मेडिकल अटेंडन्ट यासाठी सुद्धा खात्रीची माणसे मिळवून देण्याची सोय आहे. मात्र मुख्य शहरापासून अंतर बरेच आहे. ह्या अथश्री मधले सगळे फ्लट केंव्हाच विकले गेले असले तरी 'सेकंड सेल'चे फ्लट मिळू शकतात. तुम्हाला ईंटरेस्ट असला तर कळवा, मी सहजासहजी चौकशी करू शकेन.
माझ्या माहितीतला एक चांगला वृद्धाश्रम बारामतीला [पुण्यापासून अंतर १०० कि.मि.] आहे. एका सेवा-निवृत्त डॉक्टर पति -पत्नींनी दिलेल्या देणगीमधून तो उभा राहिला आहे.तिथल्या सोयी-सुविधा चान्गल्या असल्याचे ऐकून आहे. माझे मूळ गाव बारामती. अजून माझे जाणे-येणे असतेच. वृद्धाश्रमाची चालक मंडळी मला परिचित आहेत. हवे तर मी पुन्हा गावी गेल्यावर स्वतः जाऊन वृद्धाश्रम पाहून येईन. मला तुमची ई-मेल आयडी कळवलीत तर आपण एकमेकांच्या थेट संपर्कात राहू शकू. माझी ई-मेल आयडी मायबोलीच्या प्रोफाईल वर आहे.
-बापू करन्दिकर.

आज इतक्या उशीरा हा सुमाँचा प्रश्न वाचनात आला.

आपली सख्खी भावंडं आई-वडीलांची काळजी घ्यायला आसपास असली तर एकवेळ ठीक असतं. पण इतर नातेवाईकांवर त्यांची जबाबदारी टाकू शकत नाही. ह्ल्ल्ली तशी जबाबदारी घ्यायलाही कोणी तयार नसता म्हणा.

योग तुम्ही म्हणता ते अगदी तंतोतंत पटलं. आई-वडीलांनी त्यांची कर्तव्यं अगदी चोखपणे पार पाडलेली असतात आणि आपण मात्र आपली वेळ येते तेव्हा कमी पडतो.

मंगला गोडबोले यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत ह्या विषयावर एक लेख लिहिला होता. आपणच नाही तर आपल्या आई-वडीलांनी तो आवर्जून वाचला पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे.
त्या लेखाची लिंक येथे देत आहे
http://www.loksatta.com/daily/20090103/ch03.htm
मुलांच्या प्रगतीच्या आड आपण येऊ नये ह्या उद्देशाने पालक आपल्या दैनंदिन अडचणी मुलांना सांगत नाहीत. पण परदेशात राहून आपण अशी काय मोठी प्रगती करतो की आई-वडीलांच्या अडचणी कडेसुद्धा आपण दुर्लक्ष करावे.
अनेकदा तर असे आढळते की मुलांच्या प्रगतीच्या आड यायला नको म्हणून आई-वडील काही बोलत नाहीत आणि आई-वडीलांना काळजी वाटू नये म्हणून मुलं इथल्या अडचणी त्यांना सांगत नाहीत.
माणसांचा जो समूह एकमेकाच्या अडचणी समजून घेतो आणि त्या सोडवण्यास मदत करतो त्यालाच कुटूंब म्हणतात ना?

>>अनेकदा तर असे आढळते की मुलांच्या प्रगतीच्या आड यायला नको म्हणून आई-वडील काही बोलत नाहीत आणि आई-वडीलांना काळजी वाटू नये म्हणून मुलं इथल्या अडचणी त्यांना सांगत नाह>>>

अनुमोदन Happy मी बर्‍याच ठिकाणी अशी उदाहरणे पाहिली आहेत

माझी एक खुप जवळची मैत्रीण २ दिवसांनंतर पुण्याला तिच्या गावी परत जात आहे, कायमची..
२ मुलांना घेऊन ती तिथे सासर आणि माहेर च्या जवळ राहाणार आहे आणि नवरा १-२ वर्षात इथली सर्व व्यवस्था लावुन परत जाईल.
मी तिला विचारले की का एकटी परत जातीये ती, सर्व एकदमच का नाही जाणार १-२ वर्षानी?
तर ती म्हणाली, 'आई-वडिल, सासु-सासरे आता वयस्कर होत चालले आहेत. माझे २ भाऊ आणि वहिन्या त्यांची जबाबदारी घेणार नाहीत (तिला बहीण नाही), तसेच दीर-नणंदा पण सासु-सासर्‍यांची जबाबदारी घेणार नाहीत हे सत्य पण मला माहीत आहे. म्हणुन कोणाला काही सांगण्यापेक्षा, अपेक्षा करण्यापेक्षा आम्हीच परत जात आहोत'.

असेच एक उदाहरण म्हणुन सांगितले.

बापरे.... अशी समजुतदार माणसं असतात?

नमस्कार,

नुकतेच माझे काका आजारी पडले आणि हॉस्पिटलात ठेवावे लागले. (वय वर्षे ८५). त्याना मुले नाहीत आणि करणारेही कोणी नाही. त्यामुळे माझे वडील (वय वर्षे ७२) त्याना मदतीसाठी राहिले आहेत. माझ्या काकाना चालवत नाही/उभे राहवत नाही. मी त्याना पुर्ण वेळ मदत ठेवण्याबद्दल सुचवले होते पण काही कारणास्तव ते ती ठेवायला तयार नाहीत. (आर्थिक कारण नक्कीच नाही कारण ते आर्थिक रित्या सुस्थितीत आहेत). माझे वडील मुंबईला राहतात आणि काका पुण्यात. त्याना बरे नाहीसे झाले की ते माझ्या वडीलाना बोलवतात. (माझे वडीलही heart patient आहेत) त्याना पुण्याला जायला किमान ५ तास लागतात.

यावेळी हॉस्पिटल मधे जागरण झाल्याने माझ्या वडीलानाही गरगरणे वगैरे झाले. (तेही एकटे आहेत. माझी आई १९९९ साली गेली). या सगळ्याचा आम्हाला फार मनस्ताप झाला/होत आहे.
आता मला माझ्या वडीलांची ओढाताण सहन होत नसल्याने मी स्वतः काकांसाठी पुर्ण वेळ मदत शोधत आहे. अशी २४ X ७ मदत उपलब्ध आहे का पुण्यात?
असल्यास मला कळवाल का?(विपुत टाकलेत तरी चालेल).

धन्यवाद.
(आम्ही पुढच्या वर्षी भारतात्/पुण्यात कायमचे परत जाणार आहोत).

मनस्मी,

पुण्यात सेवा नर्सेस ब्युरो आहे. सदाशिव पेठेत. उद्या नंबर शोधून देतो. तिथे निश्चितच अशी मदत मिळू शकेल.

शिवाय आत्ता गूगल केल्यावर हे खालील पत्ते मिळाले.

Name: Janseva Nursing Bureau
Address: M-38/1620, Abhinandan Society, Mhb Colony, Airport Road, Yerwada, Pune-411006
Phone: (91-0)-9850957646

Name: Harsha Nurses Bureau
Address: 250 A/2, Shiroli Gali, Shivaji Nagar, Pune-411005
Phone: (91-20)-25533873

Name: A-1 Nurses Bureau
Address: A-1 Nurses Building, Kasarwadi, Opp Bhaji Mandai, Pune-411034
Phone: (91-0)-9822033712

Name: Catherin Nurses Bureau
Address: Shop No 5,1St Floor, Paradise Plaza, Synagauge Street, Camp, Pune-411001
Phone: (91-20)-26122709

Name: Rekha Nurses Seva Bureau
Address: 41, Ghorpade Peth, Behind Police Chowky, Pune-411042
Phone: (91-20)-24460363

मात्र आमचा सेवा नर्सेस ब्युरोचा अतिशय चांगला अनुभव आहे.

सेवा नर्सेस ब्युरो : 020- 24470127

चिनुक्स

अनेक धन्यवाद. बघतो संपर्क करुन.

सुमॉ,
माझे विचार तुम्हाला कितपत पटतील या बद्द्ल मी शाशंक आहे. पण प्रयत्न करतो.

अ. आईला या वयात शारिरीक मदती बरोबरच "आपल्या " लेकीची /लेकाची /सुनेची/ नातवंडची गरज आहे.

ब. तुम्हाला आईच्या सुखाची तर गरज आहेच, शिवाय भरपूर पैशाची सुध्दा गरज ( किंवा हाव ) आहे.

१. तुमचा भारतात असा कोणी नातेवाईक आहे कां, कि ज्याला आर्थिक मदतीची गरज आहे आणी ज्याने प्रामाणिक पणा जोपासला आहे? तसे असल्यास त्या व्यक्तीची आर्थिक जबाबदारी तुम्ही सांभाळा अन आईची जबाबदारी त्यचावर सोपवा.
२. एक तासभर डोळे मिटून शांतपणे बसून राहा. स्वतःशी एकाग्र होउन थोडावेळ प्राणायाम करा. त्या नंतर बिवेक जाग्रुत करून स्वतःला प्रश्न विचारा ...............
" माझ आयुष्यातील अंतीम ध्येय काय आहे ? "
मना कडून प्रामाणिक उत्तर घ्या. आपण स्वतःशी खोटं बोलत नाही याची खात्री करून घ्या.
येणा-या उत्तराला " कां?" आणी "कशासाठी ?" असा प्रश्न विचारा.
उत्तर घ्या आणी पुन्हा " कां?" आणी "कशासाठी ?" असा प्रश्न रिपीट करीत राहा.
केंव्हातरी तुम्हाला उत्तर मिळेल .... " सुख आणी समाधाना साठी ! "

या ठिकाणी तुमचा अर्धा प्रश्न सुटलेला असेल.
उरला तो पर्यायाची निवड.

अ . संपूर्णपणे भारतीय संस्कुतीचा स्वीकार करून भारतात येणे व भारतात "अन्न, वस्त्र , निवारा " या मुलभूत गरजा भागविण्याच्या उद्देशाने नोकरी अगर व्यवसाय करणे. बाकी सर्व विचार वर्ज.

ब. संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरचा स्वीकार करून आईला पूर्णपणे विसरून जाणे. माफ करा, सत्य कडू असते.

मिक्स कल्चर ईज द ओन्ली प्रोबलेम .

---- चूक्-भूल , देणे-घेणे.

सुपरमॉम,

आजी माझ्याकडे हैद्राबाद्ला राहतील का? खालील प्लस पॉइन्ट्स आहेत.
१) आम्ही पुणेरी मराठी पद्धतीने राहतो. घरी मराठी बोलणारी मोलकरीण आहे.
२) मी माझ्या आइवडिलांचे म्हातारपण केले आहे. मला अनुभव आहे.
५) छोटी मोठी आजारपणे मी निभावून नेउ शकते.
६) इथून स्काइप वर / वेबकॅम ने तूआइला रोज बघू शकशील / बोलू शकशील.
८) एक स्पेअर बेडरुम आहे.
९) आमचे कुत्रे त्रास देणारे नाहीत. दूर राहतात.
१० ) आमचे देशस्थ कोकणस्थ कॉमबो आहे.
जरूर विचार कर. घरी आल्यावर कोणीतरी मोठे असावे बोलायला असे वाट्ते. बाकी माझा काहीही अंतस्थ हेतू नाही.

तुम्हाला आईच्या सुखाची तर गरज आहेच, शिवाय भरपूर पैशाची सुध्दा गरज ( किंवा हाव ) आहे.>>>

यशवंत, हा निष्कर्ष तुम्ही कशावरून काढलात? तुम्ही सुमॉला किती ओळखता?
माझी आणि तिची आई एकच असल्याने, तसेच लहानपणापासून तिच्याबरोबरच वाढल्याने मी सुमॉला नक्कीच चांगली ओळखते. आईचा हा प्रश्न आत्ता कठीण झालाय, गेली अनेक वर्षे आम्ही बहिणी आणि (त्यात सुमॉ पुष्कळ जास्तच) आईवडिलांचे करतच आलो आहोत. आमचे वडिल ५ वर्षांपूर्वी वारले आणि त्याआधी ते बरेच आजारी होते, तेव्हाही सुमॉच्या मिस्टरांनी भारतात नोकरी पत्करली होती. मी स्वतः देखील मुलांना घेऊन काही काळ भारतात होते. माझ्या लहान बहिणीकडे आई काही वर्षे होती, व नंतर सुमॉकडे ती एक वर्षे अमेरिकेत होती. पैशाकडे न बघता सुमॉने सासर माहेरच्या सगळ्या लोकांचे किती केलेय हे मला माहित आहे. असो, तो ह्या बाफचा विषय नाही आणि आणि हा प्रश्न आहे हे प्रामाणिकपणे मान्य केलेलेच आहे. त्याला पैशाचे प्रेम आहे, आईवडिलांचे नाही इ. रुप येउ नये हीच इच्छा.

आणि मला वाटते की हा प्रश्न परदेशात असणार्‍या सगळ्यांचा आहे, त्यामुळे इथे अशा प्रसंगी काय करावे/काय मदत मिळू शकेल ही चर्चा अपेक्षित आहे. वाटते तितकी इथलं सगळं सोडून परत जाणे ही गोष्ट सोपी नाही. कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला आणि प्राणायाम करून स्वतःला अनेक प्रश्न विचारले तरी तरी अनेक अडचणी समोर दिसतात. भारतात जाणे हे फक्त आमच्यापुरते सिमीत नसून त्यात अनेक वर्षांपासून इथेच असलेला नवरा, बर्‍यापैकी मोठी झालेली मुले, इथल्या कमिटमेंटस पण येतात. त्यांना सोडून दिर्घ काळासाठी भारतात जाणे हे त्यांच्यावरही अन्याय केल्यासारखेच आहे.

<<<<<अ . संपूर्णपणे भारतीय संस्कुतीचा स्वीकार करून भारतात येणे व भारतात "अन्न, वस्त्र , निवारा " या मुलभूत गरजा भागविण्याच्या उद्देशाने नोकरी अगर व्यवसाय करणे. बाकी सर्व विचार वर्ज.

ब. संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरचा स्वीकार करून आईला पूर्णपणे विसरून जाणे. माफ करा, सत्य कडू असते.>>>

तुमचे पर्याय हास्यास्पद आहेत, जसे की हे टोक नाहीतर ते टोक.

मामी, तुमच्या पर्यायाबद्दल धन्यवाद. तुमचा मोठेपणा परत एकदा दिसला. तुमच्यासारख्या आनंदी आणि आशावादी व्यक्तीला भेटून आईला नक्कीच फार बरे वाटेल, पण सध्यातरी तिला तिची जागा बदलायची नाही. बाकी सुमॉ लिहिलच तिला काय वाटते ते.

भाग्यश्री, अगं माझी पण उपजीवीकेची जागा हीच असल्याने पुण्याला शिफ्ट व्हायचे तर मला परत नवी घडी बसवावी लागेल. ते या वयात अवघड आहे. व मुलगी १८ वर्शाची होइ परेन्त मला तिच्या आयुशयात अजुन काही बदल शक्यतो नको आहेत. मी लग्न करून इथे येणयाआधी पासुन ही फॅमिली इथेच स्थाइक आहे. मे समजु शकते, आइबाबांना इथे आणले तेन्वा त्याना अतिशय दुख झाले होते पुणे सोड्ण्याचे. व म्हातारपणी त्याना असे करावे लागते म्हणून मला पण नाइलाज होता. वयस्कर माणसे अगदी अप्रूट होतात अशाने.
काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. सुमॉ अतिशय सेन्सिटिव मुलगी आहे हे तिच्या लेखनातून लगेच कळते.
आइला विसरून जा वगैरे सल्ले बेकार आहेत.

यशवंत,
भाग्यश्री ने म्हटल्याप्रमाणे हा प्रश्न फक्त त्यांच्यापुरता मर्यदीत नसुन आमच्यासारख्या अनेकांचा आहे.
मधुरीमा च्या ठिकाणी उद्या मी ही असु शकते ही कल्पना पण खुप क्लेशदायक आहे! त्यात तुमचा प्रतिसाद म्हणजे कहरच आहे!
माफ करा पण ईथे पुस्तकी सल्ले अपेक्षित नाहीत.

संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरचा स्वीकार करून आईला पूर्णपणे विसरून जाणे. माफ करा, सत्य कडू असते.
>>ही अमेरीकेबद्दलची अजून एक चुकीची माहिती.

संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरचा स्वीकार करून आईला पूर्णपणे विसरून जाणे. माफ करा, सत्य कडू असते.
>>ही अमेरीकेबद्दलची अजून एक चुकीची माहिती.

अलबेली,
अनुमोदन. चुकिची माहिती का असूयेपायी टाकलेली मताची पिंक? माझे बरेच नातेवाईक असच काही बाही बोलायचे. Until, their children moved to USA. आता काय बिशाद कुचके टोमणे मारतील.

आता मलाच विचारतात..लेकाला सिटीझनशिप मिळाल्यावर आमच्या ग्रीन कार्डाचा अर्ज किती महिन्यात मंजूर होईल? तशी व्हिआरेस प्लॅन करू....लेक गेल्या वर्षी मास्टर्स करता अमेरिकेत आला!

नृपो वाल्यांकडे काही पर्याय नाहीत का? ती संस्था खूप मदत करते अस ऐकलय!

संपूर्णपणे वेस्टर्न कल्चरचा स्वीकार करून आईला पूर्णपणे विसरून जाणे.
--- वेस्टर्न कल्चर मधे आईला विसतात हा समज चुकीचा आहे. आपली संपुर्ण पोस्ट अतिशय अविचारी वाटली. अशी परिस्थिती कुणावरही बेतू शकते...

पैशाची हाव हे पण चूक आहे.
प्रत्येकाच्या गरजा प्रमाणे व आर्थिक कमिट्मेंट्स प्रमाणे पैसा लागतो व तो कमवावाच लागतो. इथे बाबांची
स्कॉलर्शीप असलेले किती आहेत. उलट अमेरिकेत मुलान्च्या कॉलेज शिक्षणासाठी/ बेबी सिटिन्ग साठी वगैरे
इथल्या पेक्षा जास्त पैशाची सोय करावी लागते. सरकारी सेफ्टी नेट फारसे नाही. अतिशय जास्त नियोजन करावे लागते. भारतिय राहाणीमान तुलनेने स्वस्त आहे.

अथश्रीचे फ्लॅट्स केवढ्याला असतात? ५० लाखाच्या वर की खाली? जरा माहिती द्याना.

मधुरिमा,
मला वाटत अशावेळी जवळपास राहणारया मित्रांच्या ओळखीतुन कुणी जातीनं,विश्वासाने,प्रेमाने,आपलेपणाने सांभाळ करु शकणारे जोडपे बघुन त्यांना जबाबदारी द्यायला हरकत नाही, आपल्या अवतीभवती असे अनेक लोक नक्कीच आहेत,ज्यांच्याकडे वेळही आहे,त्यांना आवडही आहे, थोडा विश्वास ठेवायला हवाच,शेवटी पैसा देउन सगळच तर मिळत नाही ...

नमस्कार,

मनस्मि यांच्यासारखाच माझ्याकडेही प्रॉब्लेम आहे. माझा काका (वडिलांचा लहान भाऊ) गेले कित्येक वर्ष गावीच असतो. जरी सख्खा काका असला तरी काहीसे विक्षिप्त आणि हेकेखोर स्वभावामुळे त्याचे आणि आमचे कधीच सलोख्याचे संबंध नव्हते. तो त्याचा नोकरी करुन गावी रहात होता. त्याच्या अश्या स्वभावामुळे लग्नही झालेले नाही. सध्या त्याचे वय साधारण ६५ वगैरे आहे आणि आता त्याला दोन्ही डोळ्यांनी कमी दिसत असल्यामुळे त्याला नेहमीची स्वतःची कामं करायलाही कठीण झालय. त्यात करुन गावी तो ज्यांच्याकडे रहात होता. त्यांनीही त्याला बघण्यास नकार दिलाय. आता तो आमच्याकडे यायला तयार आहे पण माझे आई बाबा ही सध्या म्हातारे असल्याने त्याला ईथे सांभाळणार कोण असा प्रश्न आहे. शिवाय जागेचाही प्रश्न आहेच. शेवटी आम्ही त्याला कुठल्या तरी वृद्धाश्रमात ठेवायचे ठरवतोय त्यानुसार चौकशीही केली पण सगळीकडे मासिक शुल्क ७००० ते अगदी १०-१२ पर्यंत आहे शिवाय त्यांचे डिपॉझिटही जास्त आहेत जे आम्हाला परवडण्यासारखे नाहीय. ज्यांचे शुल्क कमी आहे ते स्वतः ची कामे स्वतः करु शकणार्या वृद्धांनाच प्रवेश देतात. तर कमी खर्चात सांभाळणार्या (साधारण महिना ३ ते ५ हजारा पर्यंत) मुंबई जवळपासच्या संस्था कुणाला माहीत आहेत का? पुणे असले तरी चालेल. कर्मयोग या साईटवर अश्या काही संस्था सापडलेल्या त्यापैकी एकाचाही फोन नं. लागत नाही.

अनन्या, त्या संस्थांची नावे गुगलून बघा, कदाचित त्यांचे फोन नं बदलले असतील तर ते कळतील. जस्ट डायल सारख्या साईटवर त्यांचे लेटेस्ट नंबर्स कळतील.
ह्या नंबर्सवरही काही माहिती मिळू शकेल कदाचित :

डिग्निटी हेल्पलाईन : 022 - 61381100

हेल्प एज इंडिया : 26370740, 26370754

Contact Person
Mr. Prakash N. Borgaonkar
Territory Head - Maharashtra, Goa & Gujarat

HelpAge India
34A/44, Guruchhaya
Manish Nagar, P. O. Azad Nagar
Andheri (W)
Mumbai - 400053
Tel : 022-26370754 / 40
Mobile: 09821224513
Email: mumbai@helpageindia.org

ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी हेल्पलाईन : 23898078, 23898079

मला वरदाने एका संस्थेची लिंक दिली होती ती खाली देत आहे.
http://www.mayacare.com/Inner/Contactus.html
मी अजून वापरलेली नाही त्यांची सेवा पण कोणी वापरली असल्यास इथे जरूर लिहा.

अरुंधती, माधव, शूम्पी धन्यवाद. मी ईथे फोन करुन पहाते.
अरुंधतीजी गुगलून पाहिले सगळ्या साईटवर तेच फोन नं आहेत. आता जस्ट डायल मध्ये प्रयत्न करुन पहाते.

Pages