मासे २७) वडा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 May, 2011 - 03:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा.

नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात.

बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - '
हिंग, हळद, मसाला,
आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण
चिंचेचा कोळ
मिठ,
ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या
तेल.

तळण्यासाठी
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल

क्रमवार पाककृती: 

कालवणः
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण.

तळण्यासाठी :
तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा.

तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी.
अधिक टिपा: 

वाटण हे ऑप्शनल आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा मासा बघितल्याचे फारसे आठवत नाही मात्र तळलेल्या तुकड्या बघून बादलीभर लाळ गळली. Happy
आमच्याकडेही खोबर्‍याचे वाटण लागतेच मात्र मला स्वतःला नसले तरी चालते.

चवदार पाककृती आणि मनोरंजक प्रतिक्रिया... अजुन काय व्हया गाव वाल्यान्नू.
असे वेगवेगले मासे मॉप मिलतत.. खाउक कसे लागतत कुनास ठाउक?

मी गावी गेलो असताना खडक-पालव नावाचा मासा खाल्ला होता. अतिशय चवदार... तो कसा दिसतो, कसा बनवतात याची रेसीपी टाका ना...?

काही मासे पोटात घर करुन जातात... Happy

माशांचे इतके छान फोटो आणी पाकृ बघून शाकाहारी लोकही मासे खायला लागतील आणी मग जागूच्या घरावर माशांचा निषेध मोर्चा येइल.

मस्त फोटो अन रेसिपी . तुमच्या ओळखीत कोणी झूलॉजी चे प्रोफेसर नाहीत का ? त्यांना विचारुन या सार्‍यांची सायंटिफिक नावे टाकता आली तर आमच्यासारखा विजनवासातल्यांची थोडी तरी सोय होईल .

अन मसाल्याची कृती टाकायचं मनावर घ्या ना प्लीज .

वाह अजून एक प्रकार आला, कधीच नाही पाहिला हा मासा!

जागुतै, तो लाल खवल्यांवाला मासा कोणता? टाक की त्याची पण रेसिपि! हा मिळतो इथे!
red.jpg

सत्यजीत खडक पालव कसा दिसतो हे गावी विचारुन सांगाल का ? किंवा परत गेलात की फोटोच आणा म्हणजे जर इथे त्याचे नाव वेगळे असेल तर मला ओळखता येईल.

मेधा आता मला प्रोफेसरांचा शोध घ्यावा लागेल. मसाला मी पुढच्या आठवड्यात करतेय. म्हणुन ह्यावेळी नक्की फोटोसकट रेसिपी टाकेन.

आशु ह्या माश्याचा मला शोध घ्यावा लागेल.

आशुने टाकलेला मासा बहुधा "तांबोशी" असावा. हा मासा खोल समुद्रात मिळतो. खूप चविष्ट असतो म्हणतात.

'वडा-पाव' म्हटल्यावर आता वेगळंच चित्र डोळ्यासमोर येईल.:-)

आशु या माशाला तांबोशी असा शब्द वडीलांकडून ऐकला होता. पण आमच्या घरी नाही कधी आणला तो.
पुर्वी बाजारात तोंडासमोर एक लांब तलवार असल्यासारखा छोटा मासा (स्वॉर्ड फिश सारखा ) बघितला होता. आमचे शेजारी त्याला "चिमण्या" म्हणायचे.

अखी अस काही नाही ग. ही सगळी तुमचीच, मायबोलीची कृपा आहे. तुम्ही उत्साह वाढवता माझा आणि मग मी माश्यांच्या शोधात जाते.

मानु तुम्ही पकडलेला तांब मासा आहे. माझ्या रेसिपीज वर बघ थांब मी इथे तांबची लिंकच देते.

काय केलं म्हणजे काय? तोंडावरचा आनंद पाहुन कळतेयच मासा पोटात गेला असणार ते.

पण हे असे आपले आपण मासे पकडायला खुप मजा येते. यावेळी मी गावी जाळे घेऊन गेलेले नदीवर. अर्थात आमच्याकडे बोटभर लांबीचेच मासे मिळतात. त्यामुळे वरचा फूटभर लांबीचा जाडजुड मासा मिळाल्यावर झालेला आनंद मी समजु शकते Happy

आज घरात एकटा आहे, अन जागुतैने माश्याचे असे प्रचि टाकले...:-(

काय करावे बरे... कोण बोलवेल मासे खायला आज....

रच्याकने मासेखाऊ गटग कधी करायचा ते सांगा....

ताजा ताजा जिवंत मासा स्वत: पकडण्याचि मजाच काहि ओर , घरी नेऊन मस्त तळुन फड्शा पाड्ला, ईतका चविश्ट मासा आजपयत खाल्ला नव्ह्ता
जागु , पण लिंक दिसत नाहिए

गौरी Happy
आंबा मला वाटत शाकाहाराला ह्या माश्यांची नावे दिली असतील Lol

जागु हे मासे दोन प्रकारचे असतात का ग? मागच्या आठवड्यात सप्रेम भेट म्हणुन आलेले हे मासे माझ्या कडे , पण मला ते चवीला तेवढेसे नाहि आवड्ले ग

थंड खर सांगायच तर पापलेट हलव्यचा आकार असला तरी ह्याची चव त्यांच्या जातीची नसते.

पुण्यात विचार पण नाही करता येणार या वाडा चा, बाकी पुण्यात फक्त वाडेच... रास्तेवाडा, इ. इ.
@जागू खोबरे वाटण मध्ये तुम्ही लाल मिरच्या भिजवून मिक्स करता का वाटतेवेळी?

Pages