वडा हा मासा ओळखायला एकदम सोप्पा. जास्त करुन हा मासा खाडीच्या भागात मिळतो. पापलेट्-हलव्याचा आकार लाभलेला पण अंगावर काळे ठिपके असलेला मासा म्हणजे वडा.
नेहमीप्रमाणेच वड्याच्या तुकड्या करुन घ्या. कालवण आणि फ्राय दोन्ही करायचे असल्यास डोके, शेपुट हा भाग कालवणासाठी घ्यावा व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात.
बाकीचे नेहमीचेच साहित्य म्हणजे कालवणासाठी - '
हिंग, हळद, मसाला,
आले, लसुण, मिरची कोथिंबीर, ओल खोबर वाटण
चिंचेचा कोळ
मिठ,
ठेचलेल्या ५-६ लसुण पाकळ्या
तेल.
तळण्यासाठी
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
कालवणः
भांड्यात तेल मस्त तापवा. त्यात सुर्रकन लसणाची घमघमीत फोडणी द्या. त्यावर पटापट हिंग, हळद मसाला टाका. लगेच वाटण, चिंचेचा कोळ व तुकड्या टाका, गरजेपुरते पाणी घाला, मिठ टाका. ५ ते ७ मिनिटे उकळवुन गॅस बंद करा झाले कालवण.
तळण्यासाठी :
तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन थोडा वेळ मुरवा.
तवा गरम करुन तेल सोडून त्यावर तुकड्या मस्त खरपुस शॅलो फ्राय करा. वास येतोय का ?
वाटण हे ऑप्शनल आहे.
जबरी दिसतय हे एकदम !!!
जबरी दिसतय हे एकदम !!!
हा मासा बघितल्याचे फारसे आठवत
हा मासा बघितल्याचे फारसे आठवत नाही मात्र तळलेल्या तुकड्या बघून बादलीभर लाळ गळली.
आमच्याकडेही खोबर्याचे वाटण लागतेच मात्र मला स्वतःला नसले तरी चालते.
साधना तो लुपा मासा नाही ग
साधना तो लुपा मासा नाही ग कुपा.
चवदार पाककृती आणि मनोरंजक
चवदार पाककृती आणि मनोरंजक प्रतिक्रिया... अजुन काय व्हया गाव वाल्यान्नू.
असे वेगवेगले मासे मॉप मिलतत.. खाउक कसे लागतत कुनास ठाउक?
मी गावी गेलो असताना खडक-पालव नावाचा मासा खाल्ला होता. अतिशय चवदार... तो कसा दिसतो, कसा बनवतात याची रेसीपी टाका ना...?
काही मासे पोटात घर करुन जातात...
माशांचे इतके छान फोटो आणी
माशांचे इतके छान फोटो आणी पाकृ बघून शाकाहारी लोकही मासे खायला लागतील आणी मग जागूच्या घरावर माशांचा निषेध मोर्चा येइल.
मस्त फोटो अन रेसिपी . तुमच्या
मस्त फोटो अन रेसिपी . तुमच्या ओळखीत कोणी झूलॉजी चे प्रोफेसर नाहीत का ? त्यांना विचारुन या सार्यांची सायंटिफिक नावे टाकता आली तर आमच्यासारखा विजनवासातल्यांची थोडी तरी सोय होईल .
अन मसाल्याची कृती टाकायचं मनावर घ्या ना प्लीज .
वाह अजून एक प्रकार आला, कधीच
वाह अजून एक प्रकार आला, कधीच नाही पाहिला हा मासा!
जागुतै, तो लाल खवल्यांवाला मासा कोणता? टाक की त्याची पण रेसिपि! हा मिळतो इथे!
सत्यजीत खडक पालव कसा दिसतो हे
सत्यजीत खडक पालव कसा दिसतो हे गावी विचारुन सांगाल का ? किंवा परत गेलात की फोटोच आणा म्हणजे जर इथे त्याचे नाव वेगळे असेल तर मला ओळखता येईल.
मेधा आता मला प्रोफेसरांचा शोध घ्यावा लागेल. मसाला मी पुढच्या आठवड्यात करतेय. म्हणुन ह्यावेळी नक्की फोटोसकट रेसिपी टाकेन.
आशु ह्या माश्याचा मला शोध घ्यावा लागेल.
आशुने टाकलेला मासा बहुधा
आशुने टाकलेला मासा बहुधा "तांबोशी" असावा. हा मासा खोल समुद्रात मिळतो. खूप चविष्ट असतो म्हणतात.
'वडा-पाव' म्हटल्यावर आता वेगळंच चित्र डोळ्यासमोर येईल.:-)
आशु या माशाला तांबोशी असा
आशु या माशाला तांबोशी असा शब्द वडीलांकडून ऐकला होता. पण आमच्या घरी नाही कधी आणला तो.
पुर्वी बाजारात तोंडासमोर एक लांब तलवार असल्यासारखा छोटा मासा (स्वॉर्ड फिश सारखा ) बघितला होता. आमचे शेजारी त्याला "चिमण्या" म्हणायचे.
जागु हा एक नविन मासा आम्हि
जागु हा एक नविन मासा आम्हि हरिरेश्व र च्या समुद्रात पकड्लेला नांव माहित नाहि
alt="Image0188.jpg" />
(No subject)
प्रत्यक्ष मासा पकड्ल्याचा
प्रत्यक्ष मासा पकड्ल्याचा आनंद माझा नवरा आणि त्याच्या मित्राच्या चेहर्यावर ओसंडुन वाहात होता
तोंडासमोर एक लांब तलवार
तोंडासमोर एक लांब तलवार असल्यासारखा छोटा मासा >>> आम्ही त्याला 'टोळी' म्हणतो.
जागु तोंडाला पाणी सुटलं. आता
जागु तोंडाला पाणी सुटलं.
आता ह्या रविवारी पण परत मासे खावे लागतील.
जागु कसली हुशार आहेस ग तु!
जागु कसली हुशार आहेस ग तु! किती माहिती आहे तुला, ग्रेट!!
अखी अस काही नाही ग. ही सगळी
अखी अस काही नाही ग. ही सगळी तुमचीच, मायबोलीची कृपा आहे. तुम्ही उत्साह वाढवता माझा आणि मग मी माश्यांच्या शोधात जाते.
मानु तुम्ही पकडलेला तांब मासा आहे. माझ्या रेसिपीज वर बघ थांब मी इथे तांबची लिंकच देते.
मला वाटते समुद्रातला मासा
मला वाटते समुद्रातला मासा (बिच्चारा ) आणि वरचा आशुच्या फोटोतला मासा एकच आहे.
मानु ही घे तांबची लिक. पुढे
मानु ही घे तांबची लिक. पुढे काय केलस त्या माश्याच ?
काय केलं म्हणजे काय?
काय केलं म्हणजे काय? तोंडावरचा आनंद पाहुन कळतेयच मासा पोटात गेला असणार ते.
पण हे असे आपले आपण मासे पकडायला खुप मजा येते. यावेळी मी गावी जाळे घेऊन गेलेले नदीवर. अर्थात आमच्याकडे बोटभर लांबीचेच मासे मिळतात. त्यामुळे वरचा फूटभर लांबीचा जाडजुड मासा मिळाल्यावर झालेला आनंद मी समजु शकते
आज घरात एकटा आहे, अन जागुतैने
आज घरात एकटा आहे, अन जागुतैने माश्याचे असे प्रचि टाकले...:-(
काय करावे बरे... कोण बोलवेल मासे खायला आज....
रच्याकने मासेखाऊ गटग कधी करायचा ते सांगा....
ताजा ताजा जिवंत मासा स्वत:
ताजा ताजा जिवंत मासा स्वत: पकडण्याचि मजाच काहि ओर , घरी नेऊन मस्त तळुन फड्शा पाड्ला, ईतका चविश्ट मासा आजपयत खाल्ला नव्ह्ता
जागु , पण लिंक दिसत नाहिए
तांब इथे
तांब इथे http://www.maayboli.com/node/16087 आहे
धन्स साधना लिंक दिल्याबद्दल.
धन्स साधना लिंक दिल्याबद्दल.
माझी सासु ह्या माशाला चांद
माझी सासु ह्या माशाला चांद मासा म्हणते ..
वडा, हलवा.... तुम्ही माशांना
वडा, हलवा.... तुम्ही माशांना शाकाहारी नावे का देता हो?
गौरी आंबा मला वाटत
गौरी
आंबा मला वाटत शाकाहाराला ह्या माश्यांची नावे दिली असतील
जागु हे मासे दोन प्रकारचे
जागु हे मासे दोन प्रकारचे असतात का ग? मागच्या आठवड्यात सप्रेम भेट म्हणुन आलेले हे मासे माझ्या कडे , पण मला ते चवीला तेवढेसे नाहि आवड्ले ग
थंड खर सांगायच तर पापलेट
थंड खर सांगायच तर पापलेट हलव्यचा आकार असला तरी ह्याची चव त्यांच्या जातीची नसते.
पुण्यात विचार पण नाही करता
पुण्यात विचार पण नाही करता येणार या वाडा चा, बाकी पुण्यात फक्त वाडेच... रास्तेवाडा, इ. इ.
@जागू खोबरे वाटण मध्ये तुम्ही लाल मिरच्या भिजवून मिक्स करता का वाटतेवेळी?
Pages