रंगीत पेन्सिल्स वापरुन काढलेली चित्रे

Submitted by वर्षा on 3 May, 2011 - 10:52

यावेळेस प्रथमच रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढायचा प्रयत्न केला. दोन्ही चित्रे दुसर्‍या चित्रावरुन बघून काढली आहेत.
Bird.JPGDesign.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्यवाद मानसी, चंचल, शांकली, प्रज्ञा, वैद्यबुवा, चातक, सिंडरेला, निवांत पाटील, रुनी, शैलजा, वर्षू, रैना, भाऊ नमसकर, ऋयाम, शामली, मिनोती, दिनेशदा, राखी, डॅफोडील्स, तोषवी, स्वाती, अंजली, सुनिधी, सायो, श्री, सशल, वत्सला, सावली, लाजो.

@वर्षू,
>>>रेंब्रान्टच्या पेन्सिली मस्त येतात.. थोड्याश्या पाण्यात भिजवल्या कि वॉटर कलर इफेक्ट येतो सुप्पर्ब
- सही. माहित नव्हतं. वापरुन बघायला पाहिजेत
@मिनोती,
हो गं बर्‍याच दिवसांनी हातात पेन्सिल धरली Happy

बायदवे, माझ्या मते हा खंड्या नाहीये. हा दुसराच कुठलातरी पक्षी आहे. खंड्या निळा आणि डार्क चॉकलेटी/केशरी असतो ना? आणि लाल चोच?

सुंदर!! Happy

निळा पक्षी अफाट सुंदर आहे! लहानपणी रंगीत चित्रांनी भारलेलं आपलं जग आजही तितकंच मोहवून टाकतं. दुसरं चित्रंही छान आहे.

वर्षा, सुंदर चित्रांखातर हार्दिक अभिनंदन!

खंड्या सुरेख! स्पष्ट-अस्पष्ट यांतले अंतर पुसून टाकणार्‍या रूपरेषा, आकृतीच्या सर्व पैलूंबाबतचे उत्तम आकलन आणि ते सर्व पैलू कागदावर हुबेहूब उमटवणारी नेमकी हस्तकला, यांचे मनोहारी मिश्रण. त्याच्या डोळ्यातले खरेखुरे वाटणारे भाव. सर्वच चित्ताकर्षक. आवडले.

फुलपाखराच्या चित्रातल्या सर्वच रूपरेषा नेमक्या, ठळक आणि एकाच फटक्यात कलात्मक वळणे घेत उमटवलेल्या असल्याने, संगणक-निर्मितीच वाटाव्यात एवढ्या नेमक्या. रंगसंगती आणि रंगच्छटा आकर्षक. चित्र साधेच असले तरीही मनोरंजक आहे. छान. आवडले.

तुम्ही कधी व्यक्तीचित्रे काढली आहेत का? तीही सुरेख जमतील असे वाटते.
त्यांकरता मनःपूर्वक शुभेच्छा!

आशू२९, लिंबूटींबू, अरुंधती, कांदापोहे, वर्षा, दक्षिणा, आशूडी, सचिन्_साची, रोहित, अश्विनी, नरेंद्र गोळे, मी आर्या, अमित, म्हम्हईकर, सनि, मोनाली, हिरकू, अल्पना, रुणुझुणु आणि बी विजयकुमार, सर्वांना अनेक धन्यवाद!

(आरम्भशूर अशा) मी काल (दुसर्‍यान्दा) रन्गित पेन्सिली आणल्यात, ड्रॉईन्गपेपरही आणलेत! बघू त्यान्चे नशिब किती उजळते ते Proud

Pages