Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नमस्कार... मला माझ्या मुलाला
नमस्कार...
मला माझ्या मुलाला बिटामृत द्यायचे आहे.
दिनेशदांनी दिलेल्या बिटामृत पेयाबद्दल विचारायचे आहे..
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59978.html?1188392227
१. दोन तीन दिवस गाजर आणि बीटचे तुकडे ठेवल्यावर आणि परत परत पाणी घातल्यावर पाण्याला वास तर नाही ना येणार..?
२. दोन तीन दिवसांनी पाणी गाळून घेतले तर फ्रिजमध्ये ठेवणे जरूरी आहे का ?
३. गाळून घेतलेले पाणी बाहेर चांगले राहिल का ? राहिल्यास किती दिवस ?
लवकर काही सुचवाल का ?
मला पुडिंग ची कृती कोणी
मला पुडिंग ची कृती कोणी सांगेल का ? अंड न घालता हवी आहे. . . किंवा एखादे उत्तम रेस्टॉरंट जिथे पुडिंग मिळते
कुठले पुडिंग? ब्रेड की राईस
कुठले पुडिंग? ब्रेड की राईस पुडिंग(खीर खरे तर)?
काल मी २ किलो पपई आणली..
काल मी २ किलो पपई आणली.. खुप्च सपक निघाली .. कुणीच खात नाही.. काय करता यीइल ?
>> पपईचा ज्युस, मिल्कशेक दोन्ही भारी लागतं..
मेथीची नेहमीपेक्षा वेगळी भाजी
मेथीची नेहमीपेक्षा वेगळी भाजी सुचवा.पनीर,मटार पण आहेत.
>> आहे का संपली मेथी?
मी खालच्या सगळ्या प्रकारे करते - जे तुझ्या साठी नवीन असेल ते ट्राय करू शकतेसः
१. परतून - भरपूर लसूण घालून - दोन प्रकार कांदा घालून न घालता - दाण्याचं कूट - हिरव्या मिर्च्या
२. वरच्या प्रकारात मुगाची डाळ घालून..
३. लसूण- हिरवी मिर्ची - पिठ (बेसन) पेरून
४. डाळ मेथी - ह्यालाही थोडसं पीठ लावायचं हे हिरवी मिर्ची घालूनही येतं किंवा कांदा-लसूण मसाला घालून
५ आलू मेथी
६ मलई मेथी मटर - हे मसाल्याशिवायही करता येतं - पण रसोई मॅजिकचा मसाला मिळतो - मलई मटर परतून घेऊन त्यात तो मसाला पाकिटावरच्या डायरेक्शन्स प्रमाणे घालायचा - मस्त होते भाजी ...
रसोई मॅजिकचा आधीचा मसाला जास्त चांगला होता - हल्लीचा जरा गोडसर वाटतो..
त्यांचे इतर मसाले पण मस्त आहेत - पनीर बटर मसाला, कोफ्ता करी मसाला वगैरे..
बिटामृत ला थोडी आंबूस चव
बिटामृत ला थोडी आंबूस चव येते. त्यात थोडी मोहरीची पूड घातली तर ते खराब होत नाही. पण आपल्याकडच्या हवेत ते फ्रीजमधे ठेवावे लागेल.
चार पाच तास बाहेर ठेवून मग ते फ्रीजमधे ठेवायचे. खरे तर दोन दिवसांपेक्षा जास्त ठेवण्यापेक्षा, ताजे केलेले चांगले. अगदी लहान मुलाना द्यायच्या आधी बीट, व गाजरे स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक आहे.
यातली खनिजे पोटात गेल्यावर काहि जणाना त्रास होऊ शकतो, म्हणुन आधी थोडे पिऊन, त्रास झाला नाही तरच मात्रा वाढवायची. या पेयापेक्षा सूप हा त्या मानाने (उकळला गेल्याने ) कमी धोकादायक आहे.
तीळाच्या वड्यांची हमखास कृती
तीळाच्या वड्यांची हमखास कृती कोणीतरी लिहा बरं....
मी काल एक हप्ता करून पाहिला. गूळ वितळल्यावर लगेचच तीळ्-दाण्याचं कूट घातलं. पण वडी थापल्यावर ते मिश्रण चकचकीत दिसायला लागलं. चिक्कीसारखी वडी झालीये, पण तोंडात टाकल्यावर ती मऊ लागतेय. मला त्या खुटखुटीत वड्या करायच्या आहेत.
धन्यवाद दिनेशदा.. तसे मी
धन्यवाद दिनेशदा..
तसे मी त्याला सूप मधून गाजर बीट देते ( उकडून ). पण जर मी त्याला गाजर बिट न उकडता, मिक्सरमधून बारीक करून त्याचा रस गाळून घेतल्यावर त्यात दूघ टाकले तर दोन वर्षाच्या मुलाला पचायला जड जाईल का ?
शामलीची तिळगुळाच्या वड्यांची
शामलीची तिळगुळाच्या वड्यांची कृती छान आहे. मी गेली तीन वर्ष तशाच करते वड्या. मस्त मऊ होतात.
कुणीतरी द्या बर शामलीच्या वड्याम्ची लिंक
माझ्याकडे सॉफ्ट टोफु आणला
माझ्याकडे सॉफ्ट टोफु आणला आहे. त्याच काय काय करता येईल?
टोफुचे उपयोग - १. थोडा थोडा
टोफुचे उपयोग -
१. थोडा थोडा मिक्सरमधून काढुन चपातीच्या पिठात घालता येईल.
२. क्युब्स करुन तंदूर पेस्ट लावुन मेरीनेट करुन मग बेक करता येतील.
३. मँगो मूस करता येईल.
४. लेट्युस रॅप्स करता येतील
५. शॅलो फ्राय करुन पालक/साग मधे घालता येईल - पनीर ऐवजी.
टोफू मटर कटलेट मस्त होतात. तो
टोफू मटर कटलेट मस्त होतात. तो टोफू मिक्सीत फिरवून त्यातच वाफवलेले मटर, एक ब्रेड स्लाईस, चवीचे मसाले टाकून होतात.
पराठे पण छान.
नाहीतर सरळ सूप मध्ये पण छान लागतात. अलगद हाताळायचे. मिसो पेस्ट आणून, वकामी,शिताकि मशरूम आणून छान लागतो थंडीत सूप. (कसली अॅलर्जी नसेल मशरूम्स व वकामीची तरच)
आणि हो, हल्लीच मी चमचम टाईपची मिठाई केली सिल्कन टोफूची. मस्त लागते.
मी नेहमी सॉफ्ट टोफुच आणते.
मी नेहमी सॉफ्ट टोफुच आणते. शॅलोफ्राय करुन मुलांना आवडतं, नुडल्ससाठी पण वापरते.
मनःस्विनी रेसिपी टाक ना चमचम
मनःस्विनी रेसिपी टाक ना चमचम ची
फुपा, अग चमचम नाही ,पण चमचम
फुपा,
अग चमचम नाही ,पण चमचम सारखी मिठाई. सेम पद्धत चमचमची पण टोफू टाकून.टाकते मी.
किती धन्यवाद देऊ मिनोती आणि
किती धन्यवाद देऊ मिनोती आणि मनःस्वीनी तुम्हा दोघींना.. पहील्यांदाच आणला होता त्यामुळे माहीती न्हवते काय काय प्रकार करता येतील ते... करतेच आत्ता एक एक प्रकार !
करतेच आत्ता एक एक प्रकार
करतेच आत्ता एक एक प्रकार !>>
कोणाला धमकी आहे ही
जे रोज माझ्या हातच खातात
जे रोज माझ्या हातच खातात त्यांना खरच ही धमकी वाटु शकते.. नवरा.. मुलगी... त्यांना आधी सांगणार नाही हा टोफु आहे म्हणुन.. तसच शेपु खाऊ घातला आहे.. आता आवडायला लागला आहे.. तसेच टोफु प्रकार करुन खाऊ घालते.
झी, काहि सांगायची गरज नसते
झी, काहि सांगायची गरज नसते गं.
मी दूधीचा सूप करून घालते क्रीम ऑफ ब्रोकोली सांगून. फ्लोरेट्स का दिसत नाहीत ह्या प्रश्णाला ,बारीक वाटलेत असे सांगितलेय.पौष्टिक असूनही किती ती नाटकं असतात.
पराठे करताना बारीक कांदा,कोथिंबीर व थोडासा आमचूर,गोडामसाला घाल्,अजिबात वास येत नाही.(ही रेसीपी इथे लिहिलेली नाहीये).
तसे मी त्याला सूप मधून गाजर
तसे मी त्याला सूप मधून गाजर बीट देते ( उकडून ). पण जर मी त्याला गाजर बिट न उकडता, मिक्सरमधून बारीक करून त्याचा रस गाळून घेतल्यावर त्यात दूघ टाकले तर दोन वर्षाच्या मुलाला पचायला जड जाईल का ?>>
चवीला खास लागणार नाही. दुसरे म्हण्जे रस गाळून घेतला की त्यातील फायबर पूर्ण जाते ते बाळाला मिळणार नाही.दूध+ ज्युनीअर हॉर्लिक्ष अलग व बीट-गाजर उकडून सूप बरे पडेल. त्यात मटारही घालता येतात.
गाजर कच्चे खाण्यापेक्षा
गाजर कच्चे खाण्यापेक्षा शिजवून खाल्ले तर जास्त चांगले. त्यातली जीवनस्त्वे शिजल्यावरही टिकतात. (कच्च्या रसाने त्रास होऊ शकतो ) ग्लेज्ड कॅरट्स हि एक छान कृति आहे. गाजराचे तूकडे करुन त्यात मीठ, साखर, मिरपूड व तूप घालून आधी झाकण ठेवून शिजवायचे. मग झाकण काढून पाणी आटवायचे. (सविस्तर कृति आहे इथे ) हा प्रकार दिसतोहि छान आणि लागतोही छान. यावर कणीक वा पावाचा चूरा घालून वेगळा प्रकार करता येईल.
टोफु इकडे मिळत नाही ना... ते
टोफु इकडे मिळत नाही ना... ते सोयाबिनपासुन करतात ना?? घरी करता येईल काय?? शक्य असेल तर सांगा..उगिचच कठीण असेल तर त्या भानगडीत पडु नका, कारण मग मी स्वतःच करणार नाही कठीण असेल तर...
टोफू भारतात मिळतो. फूड बाजार
टोफू भारतात मिळतो. फूड बाजार का काय ते सिटी सेंटरमध्येच वाटते.
टोफू मिळतो कोणत्याही
टोफू मिळतो कोणत्याही सूपरमार्केटमध्ये भारतात 'फ्रोझन सेक्शन'मध्ये. मी पनीरला पर्याय म्हणून वापरते टोफू (पनीर भुर्जीच्या कृतीत पनीरऐवजी टोफू) मस्त लागतो, फार काही फरक कळत नाही, शिवाय पनीरपेक्षा बरे
मन्जूडे, तीळगूळाच्या कडक वड्यांसाठी गूळ विरघळला की एकतारी पाक होईस्तोवर थांब, गुळाचा एक वासही येतो शिजल्याचा, तसंच रंगही बदलतो. ते झालं कीच तीळकूट टाकायचे, गॅस बंद करायचा आणि भराभर हलवून एकजीव करायचे. पोळपाटावर लाटलंस, की सुंदर चकाकी येते, लाटताना मिश्रण मोडत नाही, खूप पातळ लाटू शकतो आणि वडी जवळजवळ लगेच पडते. संपूर्ण गार झाली की टणक वडी होणारच ही खात्री!
पाक कच्चा झाला, तर मऊ वडी होते.
गुळाचा पाक झाला की नाही हे
गुळाचा पाक झाला की नाही हे बघायची एक चाचणी असते. एक थेंब पाक थंड पाण्यात टाकायचा. तो लगेच कडक (खुतखुटीत) झाला की पाक झालाय असे समजायचे. साधारण पाक करताना फेस आला की मगच थेंब पाण्यात टाकायचा. असा पाक तयार झाला की मग त्यात तीळ-शेंगदाणाकुट मिक्स करुन टाकायचे.
(या पाकाची प्रॅक्टीस करायची असेल तर चिरमुर्याचे किंवा राजगिर्याचे लाडू करायचे. स्वानुभव! १२ वीच्या सुट्टीमधे मधे असताना लहान भावाला चिक्कार चिरमुर्याचे लाडू खायला घातलेत
)
मला मऊ वडीच करायची होती कवळी
मला मऊ वडीच करायची होती कवळी लावणा-यांसाठी.. पण ती चामट झालीये
अर्र, मऊ करायची होती होय!
अर्र, मऊ करायची होती होय! उगाच आम्ही टीप्स दिल्या, काय मिनोती!

मऊ वडी करायची असेल, तर १) शक्यतो साखरेची करावी
२) गूळ गरम केला की चामट होतोच. गूळाचीच करायची असेल, तर एक वाटी गूळाला दोन चमचे पाणी घालावं. गूळ विरघळला की लगेच तीळकूट घालावं.
बायांनो- गुळपोळी फॉर् डमीज
बायांनो-
गुळपोळी फॉर् डमीज साठी टिपा द्या पाहू. आजन्म ऋणी राहीन.
टिपा हव्यात रेसीपी नकोय ना?
टिपा हव्यात रेसीपी नकोय ना?
होय होय. टिपा. सचित्र कृती/
होय होय. टिपा. सचित्र कृती/ विडीओ देणार असशील तरी सोने पे सुहागा.
Pages