Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्याकडे
आमच्याकडे शेवग्याच्या शेंगा टाकुन पिठ्ले करतात. छान लागत. मागे कधीतरी, एका कालनिण्रय च्या जुन्या अंकात त्याचे सांडगे वाचल्याचं आठवतं आहे. रेसीपी नक्की माहीती नाही.
त्या
त्या सांडग्यासाठी शेंगा उकडून त्याचा गर काढतात. त्यात भिजवून वाटलेली मटकी व इतर मसाले घालतात.
शेंगांचे लोणचे घालता येते.
शेंगांची
शेंगांची मसाला भरून भाजी होते, शेवेची भाजी असते तशी भाजी पण होते. दोन्ही खाल्ल्यात आणि छान लागतात.
शेंगांची
शेंगांची कांदा आणि ओल खोबर टाकुन भाजी करतात. खुप छान लागते. तांदळाच्या भाकरीबरोबर खायची. मस्तच....
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....
कढीत
कढीत टाकतात. शेवग्याच्या शेंगांची कढी.
donhi dhansak chya recepies
donhi dhansak chya recepies sathi dhanyawad, hya weekend la try karun nakki kalavte...
वेगवेगळ्य
वेगवेगळ्या चटण्यांच्या कृती कुठे सापडतील?
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------
माझ्या
माझ्या ब्लॉगवर चटण्या आहेत थोडया -> चटणी
आणि मायबोली वरची लिंक
चकली
मराठी पाककृती - http://chakali.blogspot.com
कधी अशी
कधी अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं ... पण माझ्याकडे खूप आंबे उरलेत. मावा बनवून ठेवण्याचा विचार आहे. आंब्याचा मावा कसा करतात? शक्यतो साखर न घालता करायचा आहे, आणि आजच वेळ आहे करायला. (मला इथल्या जुन्या पाककृती कशा शोधायच्या ते कळत नाहीये.)
- गौरी
>>(मला
>>(मला इथल्या जुन्या पाककृती कशा शोधायच्या ते कळत नाहीये.)
म्हणजे तुला जुन्या हितगुजवरच्या कृती हव्यात का? तसं असेल तर हे बघः
बाकी, मला मात्र जुन्या हितगुजवर फाँट प्रॉब्लेम येतो
धन्यवाद
धन्यवाद सायुरी. तिथे Mango पल्प की कृती सापडली ... पण मावा दिसला नाही ... आणि पल्पमध्ये भरपूर साखर लागते असं दिसतंय.
माव्याची कृती कोणी सांगू शकेल का?
- गौरी
गौरी- कुठे
गौरी- कुठे राहतेस तू?
भरपुर उन्हाच्या ठिकाणी असशील तर आंब्याची पोळी करु शकतेस.
मावा- शोधून पाहते आणि दिसली कृती तर लिंक टाकते.
रैना,
रैना, सध्या पुण्यात आहे मी ... पण इथे आता पाऊस सुरू होण्याची लक्षणं आहेत आणि रोज वाळवणं जमणार नाहीये ... त्यामुले आंबा पोळी रद्द केली मी.
- गौरी
जर नो
जर नो फ्रोस्ट फ्रीज असेल तर एखाद्या पसरट भांड्यात आंब्याचा रस काढून त्यात किलोला अर्धा च.चमचा या प्रमाणात सायट्रिक अॅसिड ( लिंबूफुल ) घालून तो फ्रीजमधेच ठेवायचा. हळूहळू घट्ट होत जातो. त्यात पाणी पडणार नाही याची मात्र काळजी घ्यायची.
हे तर एकदम
हे तर एकदम सोप्पं काम झालं ... धन्यवाद दिनेशदा!
किती दिवस टिकतो असा रस / मावा? सद्ध्या इथे गुरुवारी दिवसभर वीज जाते आहे ... खराब होईल का तो अश्या हवेत लगेच?
- गौरी
मनुस्विनी
मनुस्विनीने सविस्तर लिहीलेली फलाफलची कृती टाकली होती. पण सापडत नाही आहे.
नवीन मायबोलीतल्या कृती विषयवार शोधायला काय मार्ग आहे का?
चार चमचे
चार चमचे साखराम्बा घ्यावा, त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक ग्लास पानी घालावे... छान सरबत होते..... पायनापलच्या बारीक फोडी टाकल्यास आणि उत्तम.....
इकडे आहे
इकडे आहे फलाफल कृती
http://www.maayboli.com/node/338
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/83805.html?1153383344
चकली
मराठी पाककृती - http://chakali.blogspot.com
नमस्कार
नमस्कार adtvtk,
'फलाफल' हा शब्द या पानावरील सर्वात खाली असलेल्या शोध सुविधेत टाकून शोध घेणे, हाच विषयवार कृती शोधण्याचा सोपा मार्ग आहे. मनुस्विनी यांची कृती शोधायची असल्यास त्यांच्या सदस्य खात्यावर जाऊन त्यांच्या पाऊलखुणांमधे ती मिळते का हे बघता येईल. तरीही ती कृती न सापडल्यास त्यांनी ती अप्रकाशित केली असण्याची अथवा पूर्णतः काढून टाकली असण्याची शक्यता आहे.
- मदत समिती
मला
मला सोळासोमवार उद्यपनासठी चुर्मा लाडु कराय्चे आहेत...सव्वा ५ किलोचे गुळ तुपचा अन्दाज काय लगेल? ओव्हन वापरुन गकर कसे भाजता येतील? रेसिपी कुठे आहे?
धन्यवाद
चकली, मदत
चकली, मदत समिती उत्तर दिल्याबद्द्ल खूप धन्यवाद.
मी तसेच शोधले होते. मनुस्विनीच्या सदस्य खात्यावर पण जाउन बघितले. बाकीच्या फलाफल लिन्क सापडल्या होत्या पण तिने जरा विस्तृत लिहीले होते.
मनुस्विनी बर्याच कृती काढल्यास का?
)
(का पण...का.....का....का ?
मनुस्विनी
मनुस्विनी माझ्या वि.पु मध्ये वाचले. धन्यवाद. पण तुझी वि.पु आणि संपर्क दोन्ही बंद आहेस. प्रतिसाद देता येत नाही आहे. म्हणून ईथे प्रतिसाद. आधी तुलाच मेल पाठवायला बघत होते.
मी मायबोलीकर असल्यापसून तुझ्या पाककृती आवर्जून वाचते / करते :-). त्यामूळे मला नक्कीच कळव.
ड्राय
ड्राय काजुचा रस्सा कसा करतात ?
हो, मी पण
हो, मी पण आठवड्यापासुन मनुस्विनीच्या वि.पू मध्ये लिहायचा प्रयत्न करते आहे. पान सापडत नाही असेच लिहुन येते.
मृण्मयी, कच्च्या टोमॅटोची गाकर भरुन भाजीच्या कृतीची वाट बघत आहोत आम्ही.
इथे असलेली
इथे असलेली मलई बर्फी कुठे गेली?
मलई
मलई बर्फी:
http://www.maayboli.com/node/6425?page=1#new
मी सध्या
मी सध्या भारतात आहे. त्यामुळे लगेच उत्तर देता आले नाही. जर आम्ब्याचा रस पुर्ण आटला तर अगदी वर्षभर फ्रीजबाहेरहि टिकेल. कोकणात आंबा पोळी अशीच तर टिकवतात, पण पाण्याचा अंश राहता कामा नये.
सहि
मला स्वतःला गोड पदार्थ कमीच गोड आवडतात. चुरमालाडू साठी पाक वगैरे करायची गरज नसते. तुपाच्या ओलसरपणात लाडू वळता येतात. समजा मिश्रण कोरडे वाटलेच तर थोडे गरम दूध शिंपडून लाडू वळता येतील. सव्वा पाच किलो कणकेसाठी दोन ते तीन किलो तूप व तेवढाच गूळ वा साखर लागेल. मुठिया करुन तळल्या तर फार तूप पितात, त्यापेक्षा ओव्हनमधे वा थेट तव्यावर भाजून केल्या तर तूप कमी लागते. दालबाटीच्या कृतिप्रमाणेच भाजायच्या. या बाट्या ब्लेंडरमधुन काढल्या तर छान रवाळ होतात.
सहि!
सहि! जुन्या हितगुजवर नलिनीने लिहलेली बेसनाच्या पुर्या करुन करायच्या 'चुर्मा लाडु' चि (स्टेप बाय स्टेप फोटोसहित)रेसिपि आहे.
कावा चहा
कावा चहा कसा करायचा ? काश्मिरहुन कावा चहा आणला, पण कसा करायचा माहीत नाही.
मी कैरिचा
मी कैरिचा छुन्दा केला आहे. पण त्यात साखर कमि आहे. मिठ पण न वाढवता तो टिकवण्यासाठि काय करायचे?
Pages