बंद घरावर चाकूची नजर.....!! प्रकाश १११

Submitted by प्रकाश१११ on 26 August, 2010 - 07:44

बंद घरावर चाकूची नजर.....!!

घर बंद असते
कुणाची तरी पाळत असते
तो भंगारवाला असतो
तो रद्दीवाला असतो
तो अंडीवाला असतो

रात्री चार-पाच तरण्याबांड
गुंडाची टोळी येते
एका क्षणात खिडकी तोडली जाते
आरामात प्रवेश करतात ते गुंड
सफाईदारपणे कपाटे फोडली जातात
आरामात कॅश गोळा करतात
सोन्याचे दागिने अलगद उचलली जातात
मग ते मजेने दारू पितात
मस्त सिगारेट ओढतात
हाताला मोठे घबाड लागलेले असते
पहाटच्या साखरझोपेत सगळी घरे असतात
आपापल्या स्वप्नात सगळी चूर असतात
शेजारच्या घरातल्यांना देखील ऐकु येत नाही
इतके ते शांत असतात
कुत्रा देखील डोळे बंद करून पेंगत असतो
समोरच्या बिल्डींगमधला वाचमन देखील मस्त घोरत असतो

चार-पाच गुंडाची टोळी मस्त चाय करून पितात
काही खायचे असेल तर खौऊन घेतात
ब्यागेत माल भरून
आरामात दार उघडतात
छानपेंकी निघून जातात
ते राजे असतात
पोलीस त्यांच्या खिशात असतात

सकाळी-सकाळी कोणीतरी दचकतो
घर फोडल्याचे गल्लीभर करतो
लोक जमतात
हळहळतात
कोणीतरी गावी गेलेल्या मालकाला फोन करतो
कोणीतरी पोलिसात कळवतात
गल्लीतली माणसे एकोप्याची असतात
पण आपले घर सुरक्षित राहिल्याच्या
आनंदात अलगद असतात

पोलीस येतात
पंचनामा करतात
थोड्यावेळात शुकशुकाट होतो
सगळे शांत शांत नि शांत होते

एक-दोन दिवस जातात
परत भंगारवाला येतो
रद्दीवाला येतो
तिरप्या नजरेने बघत ओरडत जातो
नि सगळे गप्प असतात
सगळे शांत असतात
सगळे जीव मुठीत घेऊन जगत असतात
साठ -वर्षाच्या स्वातंत्र्याने...??
काय दिले ते बघत बसतात....!!

गुलमोहर: 

!

विशेष सुचना: मला कविता कळत नाहीत, मी कधी कविता वाचायच्या भानगडीत पडत नाही. ह्या कवितेचे शीर्षक पाहून वाचायला घेतली. मला तर आवडली बाबा. सोपी, क्लिष्ट नसलेली, थिम असलेली, डिटेल्स व्यवस्थित मांडले गेलेली, शेवटी एक प्रश्न टाकणारी!!! (आता माझे हे कॉमेंट्स वाचून तुम्हाला कळेलच मला कविता किती कळतात ते ;))

??????