हे आभाळ आता म्हातारे झालेय ../

Submitted by प्रकाश१११ on 5 September, 2010 - 21:58

हे आभाळ आता म्हातारे झालेय
म्हातारे झाल्यामुळे कसे भेन्डाळून गेलेय
पूर्वी कसे निळे निळे तारुण्य होते
आपल्याच मस्तीत कसे पाखरू होऊनी गात होते

श्रावणात कसा लहान होऊन हसायचा
अधून-मधून रूसायचा नि चिंब चिंब भिजायचा
ढगाआडून सूर्य दिसताच
अगदी सगळे विसरून थुई थुई नाचायचा

कशी चिंब व्हायची धरणी चिंब त्याच्या सरींनी
मग तिचे जवळ पुसायचा सुंदर शुभ्र ढगांनी
शुभ्र पाखरांची एक रेघ सहज तो ओढायचा
हिरव्या हिरव्या शेतावरती शुभ्र होऊनी झुलायाचा

नदीचा काठ तेह्वा हिरवा हिरवा कंच होता
काठाशी ओठंगून तो स्वतालाही बघत होता
कधी कधी फूल होऊन फांदीवर फुलायचा
नि फुलपाखरासारखा वेलांटी घेत मस्त मस्त झुलायचां

श्रावणात किती मस्तीत मस्त असायचा
सप्तरंगाच्या झुल्यावर अगदी झकास झुलायचा
कुठे हरवली आता ह्या आभाळाची मस्ती ?
कशी आली त्याला एवढी मोठी सुस्ती ..??

खरेच सांगतो आता आभाळबाबा म्हातारा झाला
आता त्याला खरेच कळत नाही श्रावण कधी आला
आता नको तेह्वा तो धरणीस भिजवतो
वेड लागल्यासारखा नको तेवढे प्रेम करत

आता ह्यावेळी तर तो हिवाळ्यात बरसला
आमचा आभाळबाबा खरेच म्हातारा झाला
आता सांगा मित्रांन्नो ह्याचे करावयाचे काय.?
आता सगळे सोसायचे का..? होत त्याची माय ......?
__

गुलमोहर: 

हे आभाळ आता म्हातारे झालेय
म्हातारे झाल्यामुळे कसे भेन्डाळून गेलेय
पूर्वी कसे निळे निळे तारुण्य होते
आपल्याच मस्तीत कसे पाखरू होऊनी गात होते

श्रावणात कसा लहान होऊन हसायचा
अधून-मधून रूसायचा नि चिंब चिंब भिजायचा
ढगाआडून सूर्य दिसताच
अगदी सगळे विसरून थुई थुई नाचायचा

कशी चिंब व्हायची धरणी चिंब त्याच्या सरींनी
मग तिचे जवळ पुसायचा सुंदर शुभ्र ढगांनी
शुभ्र पाखरांची एक रेघ सहज तो ओढायचा
हिरव्या हिरव्या शेतावरती शुभ्र होऊनी झुलायाचा

नदीचा काठ तेह्वा हिरवा हिरवा कंच होता
काठाशी ओठंगून तो स्वतालाही बघत होता
कधी कधी फूल होऊन फांदीवर फुलायचा
नि फुलपाखरासारखा वेलांटी घेत मस्त मस्त झुलायचां

श्रावणात किती मस्तीत मस्त असायचा
सप्तरंगाच्या झुल्यावर अगदी झकास झुलायचा
कुठे हरवली आता ह्या आभाळाची मस्ती ?
कशी आली त्याला एवढी मोठी सुस्ती ..??

खरेच सांगतो आता आभाळबाबा म्हातारा झाला
आता त्याला खरेच कळत नाही श्रावण कधी आला
आता नको तेह्वा तो धरणीस भिजवतो
वेड लागल्यासारखा नको तेवढे प्रेम करत

आता ह्यावेळी तर तो हिवाळ्यात बरसला
आमचा आभाळबाबा खरेच म्हातारा झाला
आता सांगा मित्रांन्नो ह्याचे करावयाचे काय.?
आता सगळे सोसायचे का..? होत त्याची माय ......?
__

आभाळ का म्हातारे झाले?
निसर्ग दर वर्षी आपली मोहक रूप तसेच घेऊन येतो अन् आपण हरखून जातो.
कविता सुंदर आहे यात प्रश्नच नाही पण असं का झालं??

रेब्युजी -
आभाळ कसे म्हातारे होणार?
मान्य आहे.आपल्याला कल्पना असेल मागच्या वर्षी तो खरेच हिवाळ्यात बरसला
मग एकजण सहज म्हणाला .हे आभाळ कधीपण बरसते .
आता हे आभाळ म्हातारे झालेय त्यावरून ही कल्पना सुचली. ...!!
रेब्युजी तुमचे आभाळ तर निळे निळेच आहे आणि ते तसेच राहो.
.माझेपण मी निळे ठेवण्याचा प्रयत्न करतोय.
प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.11

तुझी प्रत्येक कविता सहज आणि सुंदर आहे.
तशीच ही सुद्धा...

आता सांगा मित्रांन्नो ह्याचे करावयाचे काय.?
आता सगळे सोसायचे का..? होत त्याची माय ......?

हा शेवटचा ...त्याला काय म्हणतात.... हां....पंच.. आवडला.