पुस्तके

Submitted by मुग्धानंद on 25 April, 2011 - 04:16

२३ एप्रिल, जागतिक ग्रंथ दिन, महाकवि शेक्सपियर यांचा जन्मदिवस आणि मृत्युदिन. त्यानिमित्ताने माझी आई, प्रा. मोहीनी पिटके, ( महाकवि शेक्सपियर यांची निस्सिम भक्त) M.A.(English), B.Ed. निवृत्त प्राध्यापिका, हिने केलेली एक कविता,
!!पुस्तके!!
पुस्तके,
कपाटात, अकारविल्हे पडुन असतात,
हॉलचा गेटअप सांभाळतात,
मालकाच्या रसिकतेची साक्ष पटवितात,
पाणिनी, शेक्सपियर, बोरकर, महानोर, नेमाडे, शिव खेरा,
चेतन भगत, रसगंधा, किंवा,
आपला अलिकडचा संदिप, दासु, नलेश, आणि अरुण
सगळे सुखाने नांदत असतात.
पण कधी कधी
पुस्तकांनाही
कंटाळा येतो
निरुद्देश पडुन राहण्याचा,
ती हाक मारतात,
मला, तुम्हाला,
a clear call & a wild call
पण आपल्याला वेळ कुठे आहे?
सत्ता, स्पर्धा, भोगवाद आणि अमानुषतेच्या जंगलात,
भरकटलेली,
आपण तथाकथित माणसं,
ऐकु येतात कधी?
बालकविंची गाणी?
ऐकु येतात?
रानातल्या कविता
ऐकु येते कधी?
Life is a tale,
told by a idiot,
full of sound and fury
signifying nothing
मनाची दारे थोडी किलकिली करा
आतला अंधार उजळू द्या जरा
स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश
झिरपु दे मनामनाच्या कोपर्‍यात
कोवळ्या उन्हाचे कवडसे
नाचुदेत मनभर
ज्या गावाला नाही जायचे
तेथलाही प्रवास होउदे साजरा
कुरणांची लय बनुन!
ऐकुया त्यांची साज,
आत्म्याच्या अंधारात,
तळहाती धरलेली
एक तप्त प्राणज्योत होवुन!
-प्रा. मोहीनी पिटके.

गुलमोहर: