पृथ्वीचे लग्न ( चित्रांसह)

Submitted by अवल on 22 April, 2011 - 08:09

1_5_0.jpg
जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
लग्नाची ही खबर-बात

2_3_0.jpg
मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी

3_4_0.jpg
वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची

5_0_0.jpg
घुमु लागली वार्‍याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री

6_2_0.jpg
थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
गावोगाव पोचू लागल्या
तव लग्नाच्या अक्षत-राशी

7_1_0.jpg
मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष
पुजते गौरीहर ती त्यास

8_0_0.jpg
उमलूनी, येई पहाट
साकळले धुके दाट
विप्र उभे धरूनी ताठ
दोघांमधला अंतरपाट

9_0_0.jpg
पूर्व दिशेला नभी अवतरे
सप्तरंगी इंद्रधनु ते
जणू सुगंधी सुमनांची
शोभे मुंडावळी कपाळी

10_0.jpg
हिरवी हिरवी हिरवळ त्यावर
रंगबिरंगी नाजूक सुमने
धरती ल्याली नवे रूप
छे, हा तर शालू हिरवा तव

11_0.jpg
गाऊ लागले मधूर स्वरात
सारे खग-गण एक सूरात
एका मागूनी एक गाई
मंगलाष्टके सुरू झाली

12_0.jpg
झर्-झर झर्-झर झरू लागले
डोंगरातुनी खळ्ळाळ झरे
निशीगंधाच्या शुभ्र तुर्‍यांचे
शोभती हार वधू-वरांचे

13_0.jpg
उभे मध्ये मेघांचे तोरण
हळूच बघे वर रवी एक क्षण
झाले सारे केशरी अंगण
संपन्न होई पाणिग्रहण !

गुलमोहर: 

अवल, काय मस्त लिहिलय ग. अप्रतिम. खरच आणखी लिही. नक्कीच आवडेल.
जिप्सी, कोणा-कोणाला मोदक वाटतोयस? (लाडू वाट आता :फिदी:)

मस्तय Happy

अवल... खुप सही गं Happy

कविता सुंदरच आहे आणि त्यात प्रचि आल्याने अजुनच खुलली आहे.... Happy खुप आवडली Happy

कवितेच्या या प्रकाराला 'चित्रकविता' म्हणावे का?

लाजो, हा हे छान आहे नाव Happy आम्ही फ्लिकरवर अशाप्रकारचे २-३ प्रयोग केले होते , प्रसिद्ध गीत/कविता घेऊन आपापल्या फोटोंमध्ये किंवा अनेकांचे फोटो एकत्रित करून अशी चित्रगीते तयार केली होती. उदा, माझिया प्रियेचे झोपडे Happy
विभाग्रज , अहो, पृथ्वीचे लग्न सूर्याशी Happy
रच्याकने, कुसुमाग्रजांची ही मूळ कल्पना "पृथ्वीचे प्रेमगीत" मधली Happy
धन्स मित्रमैत्रिणींनो Happy

Pages