जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
लग्नाची ही खबर-बात
मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी
वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची
घुमु लागली वार्याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री
थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
गावोगाव पोचू लागल्या
तव लग्नाच्या अक्षत-राशी
मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष
पुजते गौरीहर ती त्यास
उमलूनी, येई पहाट
साकळले धुके दाट
विप्र उभे धरूनी ताठ
दोघांमधला अंतरपाट
पूर्व दिशेला नभी अवतरे
सप्तरंगी इंद्रधनु ते
जणू सुगंधी सुमनांची
शोभे मुंडावळी कपाळी
हिरवी हिरवी हिरवळ त्यावर
रंगबिरंगी नाजूक सुमने
धरती ल्याली नवे रूप
छे, हा तर शालू हिरवा तव
गाऊ लागले मधूर स्वरात
सारे खग-गण एक सूरात
एका मागूनी एक गाई
मंगलाष्टके सुरू झाली
झर्-झर झर्-झर झरू लागले
डोंगरातुनी खळ्ळाळ झरे
निशीगंधाच्या शुभ्र तुर्यांचे
शोभती हार वधू-वरांचे
उभे मध्ये मेघांचे तोरण
हळूच बघे वर रवी एक क्षण
झाले सारे केशरी अंगण
संपन्न होई पाणिग्रहण !
आ हा!
आ हा!
वा! अप्रतिम! पण ही कविता
वा! अप्रतिम! पण ही कविता कैच्याकै मधे का?
धन्स, राजेश्वर, आदित्य.
धन्स, राजेश्वर, आदित्य.
मस्त! आणखी एक कडवे हवे
मस्त!
आणखी एक कडवे हवे
सुरेख आणखी एक कडवे
सुरेख

आणखी एक कडवे हवे>>>>चातकाला मोदक
मस्त !
मस्त !
पृथ्वीचे प्रेम ही कविता
पृथ्वीचे प्रेम ही कविता प्रसिध्दच आहे. हा त्याच्या पुढचा भाग. जरा कविता अजुन वाढवा. नवरी कशी दिसते, कशी लाजते, मंगलाष्टक कोण म्हणतो इ.
झकास........
झकास........
आरू चट मंगनी पट शादीमधली शादी
आरू
चट मंगनी पट शादीमधली शादी वाटतेय ही..
जरा सुरज बडजात्या कडे जाऊन क्लास घेऊन ये..
कविता मस्त आहे. आवडली..
मला आवडली छोटीशी कविता
मला आवडली छोटीशी कविता
ए, भारीय गं ही कविता... चातक
ए, भारीय गं ही कविता...
चातक म्हणतोय तसं अजुन वाढवता येइल!
सही ! मस्त वर्णन.
सही ! मस्त वर्णन.
मस्त कविता! (नाखुपदि)
मस्त कविता! (नाखुपदि)
छान कल्पना आहे "घुमु लागली
छान कल्पना आहे
"घुमु लागली .....
..... उधळण झाली अक्षतांची"
हे जास्त आवडलं
मस्त कविता, वारा सुटली, सुटली
मस्त कविता,
वारा सुटली, सुटली पाने >> च्या जागी " वारा सुटला, सुटली पाने" असायला हवं का?
आरडी धन्स ! दुरुस्त केले
आरडी धन्स ! दुरुस्त केले
सर्वांना धन्यवाद ! चातक एक
सर्वांना धन्यवाद !

चातक एक कडवं अॅडलयः) जमेल तसं वाढवेन...
नितीनचंद्र, हे जरा जास्तीच हं
दक्षिणा, भेटेन, भेटेन ( संदीपच्या - चेपेन, चेपेन... च्याधर्तीवर)
मस्त आहे! थोडी थोडी
मस्त आहे!
थोडी थोडी फुलराणीसारखी!
विस्ताराने खुलेल असे मलाही वाटते.
रामकुमार
मस्त...
मस्त...
किती छान ग.
किती छान ग.
आज खुप दिवसांनी ही पुन्हा
आज खुप दिवसांनी ही पुन्हा हाती आली. अन मग तुम्ही सुचवल्या तशा काही ओळी झरल्या
आरे वा!
आरे वा!
खुपच छान, अतिशय सुंदर उपमा
खुपच छान, अतिशय सुंदर उपमा दिल्या आहेत......

मस्त वाटल....
छान आवडली
छान आवडली
व्वा!
व्वा!:)
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
मस्त कल्पना, मस्त काव्य...
मस्त कल्पना, मस्त काव्य...
हं आवडली !
हं आवडली !
मस्त कल्पना गं!! अगदी बाहेरील
मस्त कल्पना गं!! अगदी बाहेरील निसर्गाच्या ऋतुबदलाप्रमाणेच कवितेत बदल घडवुन आणलेस!
मस्तच अगदी बाहेरील
मस्तच
अगदी बाहेरील निसर्गाच्या ऋतुबदलाप्रमाणेच कवितेत बदल घडवुन आणलेस! >>>>आर्येला मोदक
Pages