मुलांचे प्रश्न आणि त्यांचे कुतुहल

Submitted by डॅफोडिल्स on 15 April, 2011 - 08:17

मुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

पिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत ?
मी : ते अंगावर शेला घेतात म्हणून. Happy

पिल्लू : मग आई बाप्पा चप्पल का नाही घालत ?
मी : बाप्पा सिंहासनावर बसलेले असतात ना म्हणून.
पिल्लू : अगं मग आपण नाही का मंदिराबाहेर ओळीत चप्पल काढुन ठेवतो तशी बाप्पांनी पण चप्पल बाहेर काढून बसायचं ना ...... Lol

बॉईज च्या पोटात का बेबी नसतं ? फक्त गल्स का बेबी आणतात ?
मी:- कारण बेबी ग्रो होण्यासाठी गल्सच्या पोटात एक बॅग असते. तशी बॉइज ना नसते. Uhoh
मग कांगारूला असते तशीच ना मग ती आपल्याला का दिसत नाही... Sad
देवारे......

आता काय बोलणार ?

एकदा मला विचारलं .. सगळ्या आज्यांना आजोबा आहेत मग माँ आज्जीचे आजोबा कुठेयत ?
मी सांगितलं ते देवाघरी गेले आहेत.
कुठे असतं देवाघर ?
उंच आकाशात...

काही महिने होउन गेले. मध्ये दोन तिन दा आम्ही प्लेन ने कुठे कुठे जाउन आलो होतो.

तर हा पठ्ठ्या मला एकदा म्हणतो तु खोटं सांगतेस.. देवाघर नसतच...मी बघितलं आकाशात मला कुठेच देवाघर दिसलं नाही. Uhoh वय वर्षे तिन होतं फक्त.

आई मन म्हणजे काय ग ?

स्पोर्ट्स कोण बनवतं ?

जगात माणसं का असतात ?

असे एक ना अनेक प्रश्न ...

तुमच्याकडेही असतिल ना असे खूपसे प्रश्न ? काय अन कशी उत्तरे द्यायची....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी भाची, वय वर्ष पावणेचार, अजून प्रश्न नाही जास्त विचारत(किंवा मला माहिती नसतील Happy ), पण काहीतरी भन्नाट बोलून ताईची/ इतरांची विकेटच काढते.
किस्सा १.
तिला भूतनाथ सिनेमा अख्खा पाठ आहे. एकदा तिच्या एका आत्त्याबरोबर ती गप्पा मारताना सिनेमाची गोष्ट आत्त्याला सांगत होती. त्यात अमिताभ लहान मुलाला वाचवायला हात लांब करतो आणि त्या मुलाला विहिरीतून वर काढतो असा काहीतरी सीन आहे. (मी सिनेमा नाही बघितलेला.)
आत्त्या: तुला येतो का गं हात लांब करता?
भाची: हो!! येतो की!
आत्त्या: मग दाखव की करून..
भाची: अगं पन तू आधी विहिलीत तल पल! (विहिरीत तर पड!)

किस्सा २.
एकदा घर आवरताना ताई एक काम कसं करावं याचा विचार करत होती. जिजूंशी बोलत होती.
भाची: आई गं, असं एखादं काम जेव्हा येत नसेल ना, तेव्हा शांत बसायचं, गालावल हात ठेवायचा आनि विचाल कलायचा. मग येतं ते काम. (ती बरंचसं स्पष्ट बोलते, मधे मधे बोबडकांदा होतो पण)
तिचे आजोबा (हसून हसून त्यांची वाट लागलेली): हे कुठून शाळेतून शिकून आलीस की काय!!
भाची: नाही आबा! हे माझं माझंच आहे!

किस्सा ३.
माझ्या दुसर्‍या सख्ख्या बहिणीला बाळ होणार हे समजल्यावर..
भाची: मी मावशीच्या बालाला खोटं खोटं ललायचं कसं हे शिकवलान आहे. Lol
आणि जेव्हा ताईला मुलगा झाला तेव्हा पाचव्या दिवशी पुजेच्या अगोदरचा सीन...माझा भाचा माझ्या आईच्या मांडीवर आहे, आणि या बाईसाहेब त्याला पुस्तकातल्या गोष्टी सांगतायत, रंग कोणते ते दाखवतायत...खूप खात्री की पिलूला हे सगळं समजतंय!

खोटं खोटं ललायचं >> Biggrin कित्त्त्ती गोड गं प्रज्ञा Happy
नाही आबा! हे माझं माझंच आहे!>> काय भारी !!!

हा संवाद जो साधला जातोय तो मला खूप महत्वाचा वाटतोय. (आठवून सांगा, जे आज ३५ च्या पुढच्या वयाचे आहेत, त्यांनी. की त्या काळात आईला, बाबांना असे प्रश्न आपण विचारत होतो का ?)

माहीत नाही तर माहित नाही, असे सांगावे. आपण शोधून काढू असे सांगावे. खरेच शोधावे ते.
तूला असे का विचारावेसे वाटले ? तूला काय वाटते ? ते पण विचारावे.

कधी कधी त्यांचे विचार आपल्याला अवाक करतात. मी आजच संध्याकाळी एका छोट्याला घेऊन केक आणायला गेलो होतो. त्यांच्या अंगणातले जांभळाचे मोठे झाड नूकतेच तोडलेय.
कुणी तोडले रे असे मी त्याला विचारल्यावर, त्याची जी टकळी सुरु झाली...
कुणी तोडले ते माहीत नाही. पण मी बी शोधून तिथे लावणार आहे. रोज पाणी घालीन. ते झाड मग इतके मोठे होईल कि कुणीच तोडू शकणार नाही.. (यापैकी मी काहीच त्याला शिकवलेले नाही.)

प्रित, असे प्रश्न विचारणारी मुले ज्यांना आहेत ते भाग्यवान.>>> हे त्याच्या बाबतीत तरी खरच असावं . कारण हे सगळ्यान मध्ये येत नाही. मला comparative analysis घरातच करायला मिळतं बाकी दोघांमुळे..
पण रोजच्या धबडग्यात तुम्ही म्हणता तसे उत्तर सुचत नाही.. थोडा वेळ दे मला नंतर सांगते किवा आपण पुस्तक शोधू यात. कारण मला खोटं सांगयचा नसतं किवा चुकीचं सांगायचं नसतं.... पण तो कधी तरी frustrate होतो हे उत्तर ऐकून.. आता नक्की विचार करेल.. सोदाहरण देण्यासाठी आभार..!

हा संवाद जो साधला जातोय तो मला खूप महत्वाचा वाटतोय. (आठवून सांगा, जे आज ३५ च्या पुढच्या वयाचे आहेत, त्यांनी. की त्या काळात आईला, बाबांना असे प्रश्न आपण विचारत होतो का ?)>>>दिनेशदा.. हा असा संवाद साधायला मी तरसून तरसून गेलेलं आठवतंय.. वडिलांना काही विचारायची टापच नव्हती.. आता माझ्या मुलांना खूप गोष्टी सांगतात.. स्वतःच बालपणाच्या गोष्टी सांगतात.. तेव्हा जिभेच्या टोकावर आलेलं असतं वाक्य.. मग आम्हाला का नाही सांगितलं.. कारण ते खरच कधी नव्हतेच लहानपणी आजू बाजूला.. आम्ही थोडे मोठे झाल्यावर त्यांना वेळ मिळाला तेव्हा माहिती नाही काय झालं Sad
आई नि बाकी बरंच शिकवलं पण असं चर्चा केलेली आठवत नाही.. आता मात्र होते.. Happy कारण जागा बदलल्या आहेत .. तिला वेळ आहे आणि मी आता बिझी झालेय..

मला वाटतं आजकालची मुलं जरा जास्तच हुशार आहेत, मी लहानपणी भंडावून सोडणारे प्रश्न अजिबात विचारायचे नाही. (असं आईवडीलही म्हणतात. ) मला मुळी असे प्रश्न पडायचेच नाहीत Proud
मी साधारण ४-५ वर्षाची असताना वडिलांच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्यांना तेव्हा बाळ नव्हते पण (बहुतेक प्रयत्नात होते) त्या इच्छेने घरात बरीच खेळणी आणुन ठेवलेली होती. काही खेळणी मला खेळायला दिली तेव्हा मी आपले विचारले ,'बाळ नाहीये का?' हे विचारल्यावर जे काही ओरडा खाल्ला होता Uhoh 'एवढा एकच प्रश्न सुचला का? गपचूप खेळणी खेळायला काय झाले' वगैरे वगैरे.

सोनू वय ३
आजोबांचे मित्र आले होते घरी. त्यांना पाणी दिलं. पाणी प्यायच्या आधी त्यांनी खिडकीतून चूळ टाकली बाहेर बागेत
अस्सा राग आला ना ! पण घरी आलेल्या पाहुण्याला बोलता येईना !

सोनू :ए वेडा, असं थुंकतात का? बेसिन आहे ना घरात.

मी जर सोनू असते तर आजोबांना वेडा म्हट्ल्याबद्दल एक इन्स्टंट धपाटा मिळाला असता. आणि असं थुंकणं चूक का बरोबर हा संभ्रम मनात तसाच राहीला असता.

मी सोनूला काहीच बोलले नाही ....विचार केला की दुसर्‍याला असं वेडा म्हणू नये हे सोनू शिकेलच हळू हळू पण चांगल्या सवयींबद्द्ल तिच्या मनात गोंधळ नको

मी जर सोनू असते तर आजोबांना वेडा म्हट्ल्याबद्दल एक इन्स्टंट धपाटा मिळाला असता. आणि असं थुंकणं चूक का बरोबर हा संभ्रम मनात तसाच राहीला असता.
विचार केला की दुसर्‍याला असं वेडा म्हणू नये हे सोनू शिकेलच हळू हळू पण चांगल्या सवयींबद्द्ल तिच्या मनात गोंधळ नको<<<<<<<<<<<<<अवनी अगदी अगदी

मी सोनूला काहीच बोलले नाही <<<<अगदी बरोबर केलस. मोठ्यांना कळत नसेल आणि लहानगे निरागसपणे बोलले तर लगेच त्यांना गप्प करायची काहीच गरज नसते. उलट कदाचित ते आजोबा त्यातुन काही बोध घेतीलही

अवनी, मलाही वाटतं तू बरोबर केलंस. Happy
कालची ताजी प्रश्नोत्तरे-----
रात्री झोपतानाची स्तोत्रं वगैरे म्हणून झाल्यावर लेकाला काल गाणी ऐकायची लहर आली.
त्याच्या फोल्डरमधून त्याने " शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती " लावलं.
दिवसभराच्या दगदगीने मी अर्थातच पेंगत होते. मध्येच लेकाने विचारलं " मरून जगावं म्हणजे काय गं ?"
मी झोप बाजूला सारून त्याला सांगितलं, शिवाजीराजे देवाघरी गेले तरी लोक अजून त्यांची आठवण ठेवतात. ते होते तसे शूरवीर व्हायचा प्रयत्न करतात. म्हणजेच ते अजून आपल्यातच आहेत. मरावे परी किर्तीरूपी उरावे, वगैरे वगैरे.
"हं. ओक्के."
मी पुन्हा पेंगूशेठ.
बराच वेळाने जाग आली तेव्हा तो अजूनही जागा होता. चुळबुळ चालली होती.
" काय रे, काय झालं ? झोप लागत नाहीये का ?"
"आई, पण लोक एक्स्पायर का होतात गं ?"
(घ्या....मी मारे देवाघरी वगैरे बोलतेय आणि हे महाशय सरळसरळ एक्स्पायर Lol )
आता कसोटी होती. मी निम्मी झोपेत आणि हा इतक्या गहन चर्चेत.
"अरे, आपण आधी बाळ असतो, मग तुझ्याएवढं मोठे होतो, मग मी आणि पपा आहोत तितके, मग आज्जीइतके. आणि मग आणखी काही वर्षे झाली की मग जातो आपण देवाघरी. सगळे जातात."
( अजूनही मी देवाघरीतच अडकलेली !)
एकदम कुशीत घुसला. "आई, तू नको ना एक्स्पायर होऊस प्लीज."
अच्छा...अस्सा मामला होता तर.
"मग तू सांग देवाला तसं."
लगेच हात-बित जोडून " देवा, माझ्या आई आणि पपांना कध्धीच स्वर्गात पाठवू नकोस."
दोन मिनिटांनी तोच परत...."अरेच्चा,नरकात पण पाठवू नकोस असं सांगायला पाहिजे होतं"
मग माझ्या सजेशनवरून " देवा, आई आणि पपांना काय्य्यम पृथ्वीवर ठेव " ही विनंती झाली.
पुढच्या पाचव्या मिनिटाला महाशय गुडुप्प ! Proud

माझी लेक २२ महिन्यांची आहे. पण ती बरीच लवकर बोलायला लागली.तिच्या वयाच्या मानाने तिचे प्रश्न सुरू असतात. कित्येकदा एकच प्रश्ण अनेकवेळा विचारते. आम्ही न थकता उत्तरेही देतो. मग रात्री झोपायच्या आधी अगदी हळू आवाजात सेल्फ डायलॉग सुरू असतो. सगळी उजळणी सुरू असते.
आपल्या पोराला उत्तरं देताना आपण जाणीवपूर्वक जितका पेशन्स बाळगतो तितका बाकीची लोकं आपल्या पोराच्या बाबतीत वापरतीलच असं नाही.ह्यात ईतरांचा काही दोष आहे असं नाही पण लहान मुलं खरंच टीप कागदा सारखी सर्व काही टिपत असतात.
दोन तीन महिन्यांपूर्वीचा हा आमचा संवाद.आर्या जरा हेवी ब्रीदींग करतेय असं वाटलं म्हणून मी तिला विचारलं "तुला काही होतंय का आर्या? बरं वाटतंय का?"
आर्या : " सालखं सालखं विचारू नकोस आय्याला"
मी: "काय विचारू नकोस आय्याला?"
आर्या : "सालखे प्लश्ण विचारू नकोस आय्याला."
मी आणी नवरा आवाक झालो जेमतेम १८-१९ महिन्याच्या पोरीच्या ह्या वाक्याने. दुसर्‍या दिवशी सहज मैत्रिणीला सांगितलं पोरीने कशी विकेट काढली ते.आणी हे ऐकून माझी मैत्रीणच ओशाळवाणी झाली व सगळा उलगडा झाला. आदल्या दिवशी मी ,आर्या आणी माझी हीच मैत्रीण भाजी आणायला गेलो होतो. गर्दी बरीच होती म्हणून मी रांगेत उभी होते आणी माझी मैत्रीण आर्याला फिरवत होती. दुकानात एक चित्र होतं ज्यात आई तिच्या मुलाला पाटावर बसवून जेऊ घालतेय असं चित्रण होतं. आणी आमच्या लेकीने मावशीला गिर्‍हाईक केलं. ते चित्र, त्यातली आई, दादा, मग तो कुठे बसलाय? काय खातोय?कोण भरवतंय्?काय भरवतंय्?कशाला?का?एक ना अनेक प्रश्ण आले. शेवटी मावशीने एका क्षणी सांगितलं "सारखे सारखे तेच प्रश्ण विचारायचे नाहीत आर्या. विचार करायचा थोडा एकदा माहिती मिळाली की." आणी झालं रात्री हेच डायलॉग पोरीने आम्हाला ऐकवले.
ह्या आठवड्यात तिला डेकेअर सुरू केलंय. तिच्याशी आम्ही घरी मराठीतच बोलतो त्यामुळे डेकेअर मधे आमचं कोकरू अजून तरी जरा बावचळलेल्या अवस्थेतच फिरत असतं. काही जुजबी तयारी करून घेतली होती. त्यात डेकेअर मधे गुड गर्ल सारखं वागायचं असं बाबाने सांगितलं होतं मग पहिल्या दिवशीचा रिपोर्ट असा."डेकेअर मधली मावशी गुड गर्ल होती. तिने मला शहाण्या सारखं झोपवलं दुपारी."

प्रॅडी, खरंच आपल्याही नकळत आपण मुलांना शिकवत असतो. तुझ्या मैत्रिणीला काय माहिती की तिचंच वाक्य असं बॅकफायर होईल म्हणून.

."डेकेअर मधली मावशी गुड गर्ल होती. तिने मला शहाण्या सारखं झोपवलं दुपारी." >>> Rofl

रुणुझुणु,
तुमचा मुलगा कित्ती गोड आहे. Happy

माझी मुलगी - मम्मा, डास का असतात ?
मी - आपण रस्ते / इतर जागा अश्या ठीकाणी घाण अस्वच्छता करतो म्हणून ते येतात.
ती - पण मी तर कधीच घाण नाही करत कुठे.
मी - आपण नाही करत पण काही लोक करतात.
ती - मग जे लोक घाण करतात त्यांनाच डास का नाही चावत ? आपल्याला का चावतात ?
मी - डासांना कळत नाही कोणी घाण केली आहे ते. म्हणून ते सगळ्यांना चावतात. त्यांना ब्रेन नसतो, ते विचार करु शकत नाहीत.
ती - का नसतो ब्रेन ?
मी - नाही, बाकीच्या कुठल्याच अ‍ॅनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स ना नसतो, फक्त माणसांना असतो.
ती - का ?
मी - कारण आपण चांगला विचार करावा, चांगली कामं करावी, नवीन गोष्टी शिकाव्या, अभ्यास करावा म्हणून.
ती - मग ब्रेन असेल तर ते पण असं सगळं करु शकतील ना ? ते सगळे बोलू पण का शकत नाही ?
मी - कारण नेचर ने तसंच केलंय. नेचर ने ज्याला जे करायची शक्ती दिलीय तेच सगळे करु शकतात.
ती - मग नेचर ने त्यांना सगळ्यांना पण का नाही दिली शक्ती ?
मी - आपल्याला पण नाही माहीत नेचर ने असं का केलंय, पण आपल्याला ब्रेन दिलाय तर आपण विचार करायचा.
ती - पण मम्मा, मग बॅड पीपल / थीवज का असतात ?
मी - कारण ते त्यांचा ब्रेन यूज नाही करत. ते टीचर / मम्मा / डॅडी कोणाचं ऐकत नाहीत. गुड हॅबिट्स शिकत नाहीत.
ती - मग गॉड त्यांना का नाही शिकवत ?
मी - गॉड फक्त आपल्याला ब्रेन देतो, आपण आपलं ठरवायचं असतं कसं थिंक करायचं ते. जसं मी तुला फक्त आणी रुषु ला पेन्सिल आणि पेपर देते, पण तुम्हीच आपलं आपलं त्याच्यावर वेगवेगळं पाहीजे ते ड्रॉ करता ना तसं.
ती - मग मी त्या बॅड पीपल ला सांगू का गुड हॅबिट्स ?
मी - हो चालेल.
ती - मग मी थीवज ला कसं गुड बनवू ?
मी - त्यासाठी तू स्ट्राँग हो, मग त्यांना समजावून सांग, तरीही नाही ऐकलं तर त्यांना पनिश कर.
-
-
------------------------------------------------------------------------------

हा उदाहरणादाखल आमच्यातला एक संवाद. यात कुठे कुठे माझं समजावायला चुकलं/ कमी पडलं/ बरोबर सांगितलं, काही सजेशन्स ? म्हणजे पुढे असे प्रश्न आले तर समजावायला उपयोगी पडेल, कारण आता असे 'हे असं का असतं?' टाईप चे प्रश्न खूपच वाढले आहेत. आणि मला ते दुर्लक्शित करायचे नाहीयेत.

त्यांना ब्रेन नसतो, ते विचार करु शकत नाहीत.
ती - का नसतो ब्रेन ?
मी - नाही, बाकीच्या कुठल्याच अ‍ॅनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स ना नसतो, फक्त माणसांना असतो.>>
मवा, सॉरी मला आत्ता काय सांग हे सांगता नाही येत आहे पण फॅक्ट्स नक्की सांग.
अ‍ॅनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स ना ब्रेन असतो.
मग जे लोक घाण करतात त्यांनाच डास का नाही चावत ? आपल्याला का चावतात ?>> इथे मी कदाचित डास माणसांना का चावतात याचे शास्त्रीय उत्तर दिले असते.

मला मवा ची उत्तर पटली, ५ वर्षापर्यन्तच्या मुलान्च्या मानसिकतेला समजता ही योग्य वाटतात. या वयात फार खोलात शिरल की की त्यातून नवे प्रश्ण तयार होतात असे की काही वेळा त्याची खरी खरी उत्तरे लहान मुलाना झेपत नाहीत.

धन्यवाद स्वाती, तोषवी. Happy
मला हेच हवे आहे की आपला अ‍ॅप्रोच बरोबर आहे की चुकीचा याचा विचार. कदाचित मी तिच्या आकलनशक्तीला अंडरएस्टिमेट केले असावे. जेव्हा मुले प्रश्न विचारतात तेव्हा आपण सुचतील तशी उत्तरे देतो, पण जर सतत डोक्यात ठेवले की त्यांना शास्त्रीय तेच सांगायचे, तेही योग्य शब्द वापरुन तर ते करता येईल. करुन बघेन तिला शास्त्रीय उत्तरे देण्याचे प्रयत्न. जर तिने ते एंजॉय केले तर नथिंग लाईक इट. फक्त बर्‍याचदा हे प्रश्न बाहेर, काम चालू असताना वगैरे विचारले जातात तेव्हा अनुत्तरीत राहण्याऐवजी तेव्हाच काहीतरी उत्तर दिले जाते. कदाचित तेव्हाही सुचेल ते उत्तर देऊन नंतर परत पुस्तक, काँप्युटर च्या सहाय्याने नीट उत्तर देण्याचा प्रयत्न करायला हवा.
मितान या धाग्यावर तुझे मार्गदर्शन नक्कीच उपयोगी ठरेल सगळ्यांना. Happy

मी - त्यासाठी तू स्ट्राँग हो, मग त्यांना समजावून सांग, तरीही नाही ऐकलं तर त्यांना पनिश कर.>>> हे जरा डेंजर वाटलं.

डास का असतात?
पाणी साचलेलं असेल तर डास होतात. पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचत ना त्यामुळे जास्त डास असतात.
डास का चावतात?
डास सगळ्यांनाच चावतात. आपलं ब्लड त्यांचं फूड आहे म्हणून ते फूडसाठी चावतात.
बरेचदा एवढ्याने समाधान होते. त्यापुढे तक्रार आलीच तर आपण जास्त डास होऊ नयेत म्हणून पाणी साचू द्यायचे नाही/ खिडक्यांना जाळी लावलेय/ बाहेर जाताना रिपेलंट लावू म्हणजे डास चावणार नाहीत वगैरे पुरेसे होते.

वय वर्षे दोन कडून नवा प्रश्ण :
ईथे डायनासोर ट्रेन म्हणून लहान मुलांचा प्रोग्राम लागतो. टेरॅनोडॉन फॅमिलीतील डायनासोरच्या घरी एग्स हॅच होतात आणी पिल्लं जन्माला येतात अशी सुरवात आहे. आणी हा सीन टायटल साँग मधे नेहेमी असतो. ते पाहून..आर्याने मला विचारलं "मम्मा तू पण एग मधून आलीस का?" सध्या तरी ह्युमन बेबीज हॉस्पिटल मधून येतात असं सांगितलं आहे. बर्डीचे आणी डायनासोरचे एग मधून... वय वर्षे दोन साठी तेच उत्तर संयुक्तिक वाटलं.

>> ह्युमन बेबीज हॉस्पिटल मधून येतात
इथे (फ्रांसमधे) राहाणार्‍या भारतीय जोडप्याच्या २ नंबरच्या (४ वर्ष) मुलीचे यावर समाधान झाले नाही. ती हॉस्पिटलमधे जाउन एक बेबी आणायच्या मागे लागली (दुकानात जाऊ, सारखं) मग तिला सांगावं लागलं की इंडिअन्सना दोनच मुलं मिळतात (दोनहून जास्त मुलं असलेली फ्रेंच कुटुंब तिला माहिती आहेत, म्हणुन इंडिअन्स!!)

माझ्या भाची (७ वर्ष) बरोबर एकदा असचं पृथ्वी, चंद्र, चंद्राच्या कला वै बद्दल बोललो होतो. म्हणजे विषय तिनीच सुरू केला (त्यांच्या वर्गात चंद्राचा फोटो आहे) मग मी ग्रह, उपग्रह काय असतात, कला कशा दिसतात हे (बॉल आणि टेबल लँप वापरून) दाखवलं, अर्थातच तिला सगळं लक्षात राहिलं नाही तरिही तेवढ्यापुरतं समजलं. तिला समजलं हे तिच्या चेहेर्‍यावरून स्पष्ट दिसत होतं!!!

माझ्या मुलाने असाच एक प्रश्न विचारला होता. आई, सगले भटजी नेहमी टकलु च का असतात? ह्या प्रश्नाच उत्तर मला तरी कहि सुचल नाही. कोणाला माहीत असेल तर नक्की सान्गा.

माझ्या बहिणीच्या मुलाचा प्रोब्लेम : सारखे नको ते शब्द नको त्या लोकान समोर बोलतो काय करावे शब्द आसे आहेत की इथे लिहु वाटत नाही Sad

ते शब्द त्याच्या कानावर पडणार नाहीत असं काहीतरी करायला हवं ना गं नाहीतर त्याला काय कळतय तो कुठेही बोलणार.

आता पडले .............. कसे ते माहित नाही

पण नको बोलण्यासाठी आता काय केले पाहिजे??

Pages