नैनिताल, राणीखेत, कौसानी, अलमोरा (उत्तरांचल) पर्यटनस्थळाविषयी अधिक माहिती हवी आहे.

Submitted by जिप्सी on 11 April, 2011 - 00:05

आम्ही काही मित्र ४ मे ते १५ मे (११ दिवस) पर्यंत उत्तरांचल फिरायला जाणार आहोत. उत्तरांचलमध्येच मित्राचे घर असल्याने ३ दिवस तेथे मुक्काम व नंतर नैनिताल, राणीखेत, कौसानी, अलमोरा इ. फिरण्याचा मानस आहे.
साधारण बेत असा आहे.
३ मे रोजी रात्रौ ९:३०च्या फ्लाईटने दिल्ली आणि तेथुन प्रायव्हेट गाडीने उत्तरांचल. ४ मे ते ६ मे मित्राच्या गावी. ७ पासुन पुढे भटकंती. अजुन फायनल प्लान केला नाही. तरी या परीसरात न चुकता पहावी अशी अशी काही ठिकाणे असतील तर जरूर सांगा. तसेच या ट्रिपचा रफ प्लान दिला तरी चालेल Happy (म्हणजे कुठले ठिकाण पहिले करायचे ते. मित्राचे घर नैनितालहुन साधारण २ तासावर आहे. जरी तो उत्तरांचलचा असला तरी त्याला जास्त काही माहित नाही. :-).) जर १४-१५ तारखेला वेळ मिळाला तर (१५ तारखेला दुपारी १२ वाजताची रीटर्न फ्लाईट असल्याने) दिल्ली परिसर फिरण्याचा विचार आहे. तर एका दिवसात सहज पाहुन होतील अशी दिल्लीतील जवळची ठिकाणे प्लीज सुचवा. मायबोलीकर चंदन आणि आडोने काहि ठिकाणे सांगितली आहे.
तसेच प्रथमच डोमेस्टिक एअरलाईन्सने प्रवास करणार असल्याने काहि अधिकच्या टिप्स असतील तर जरूर सांगा. Happy (इंटरनॅशनल एअरलाईन्सने काहिहि त्रास न होता प्रवास झाला आहे. ;-)).

(आंतरजालावर पाहत आहे, पण कुणी आधी जाऊन आले असल्यास ठिकाण/अनुभव सांगा) Happy

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार उदय,

मायबोलीवर तुमचे स्वागत Happy

जर शक्य असेल तर तुमचे हिमालय ट्रेकचे लेख मायबोलीकरांसोबत शेअर करा ना. Happy

तुमचे सर्व लेख नक्कीच मेजवानी असेल माबोकरांसाठी. Happy

उत्तरांचलची सफर थोडासा प्रवासाचा त्रास वगळता (कौसानी ते हलद्वानी) उत्तम झाली Happy
नैनिताल आणि कौसानी खुपच आवडले. सोबत नेपाळची (महेन्द्रनगर) एक बोनस ट्रिपही झाली Happy (खटिमापासुन नेपाळ अंदाजे ३०-३५ किमी अंतरावर होते. :-))

माहितीबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!!! Happy

ज्यांनी आपल्या सह्याद्रीतले धबधबे बघितलेत त्यांच्यासाठी केम्टी फॉल काही मोठं नाहीये.
>>> खरय... ज्यांनी रंधा पाहिला असेल त्यांना तर बाकी सर्व खुजेच वाटेल... Happy

जाऊन आलास काय रे.. बिनसर आणि नवकुचीयाताल पाहिलेस का?

अरे जिप्सी, अल्मोराला एक मिठाई मिळते (नाव नंतर आठवुन लिहीते) ती खाल्लीस का? आम्ही गेल्या जुनमध्ये बिन्सरला गेलो होतो तेव्हा आणली होती.. ती बाकी कुठे मिळत नाही.. फारच मस्त चव होती.. बाकी कुणी तिकडे गेले तर नक्की खाउन बघा.

आठवलं नाव.. बालमिठाई

अरे जिप्सी, अल्मोराला एक मिठाई मिळते (नाव नंतर आठवुन लिहीते) ती खाल्लीस का?>>>>येस्स्स, बालमिठाईच ती. अल्मोराची प्रसिद्ध बालमिठाई. अजुन एक मस्त मिठाई होती. एका विशिष्ठ पानात गुंडाळलेला पेढा. अप्रतिम चव होती. Happy

जिम कॉर्बेट केले की नाही, मी ही १मे ते ८मे जाऊन आले.

कौसानीचा अनासक्ती आश्रम आणि सूर्यास्त आवडले, नैनितालही आवड्ले. बैजनाथाचे मंदीर अप्रतिम.

जिम कॉर्बेटला जंगली हत्ती जीप समोरच आला. ... निशःब्द झालो होतो, तेथेच थोडे पुढे गेल्यावर लांडग्याला हरणाची शिकार करताना पाहिले... ते पाहुनच वाघ शिकार करताना बघण्याचे धाडसच होईना

भयंकर वाटते....

असे काही अनुभव नाही आले?

जिम कॉर्बेट केले की नाही>>>>नाही जिम कॉर्बेट नाही केले.
उत्तरांचल ट्रिपमध्ये नैनिताल, राणीखेत, कौसानी आणि अल्मोरा इतकीच ठिकाणे केली. Happy
कौसानी अनसक्ती आश्रम आणी बैजनाथ, टी इस्टेट पाहुन झाले.
येताना भारत-नेपाळ बॉर्डर (बनबसा — महेन्द्रनगर), दिल्ली आणि आग्रा असा प्लान होता.

नैनिताल, राणीखेत, कौसानी, अलमोरा (उत्तरांचल) -

--एप्रिल अखेरीस हवामान कसं असेल? थंडी खूप असेल का?

--या व्य्तिरिक्त अजून काही ठिकाणं आहेत का बघण्यासाठी:
*कसौनी: Pant Museum, Anasakti Ahsram, Laxmi Ahsram, Bageshwar , Baijnath
*नैनितालःNaini Peak, Snow View, Tiffin Top & Dorothy Seat, Lands End, Hanumangarhi, Kilbury, Sarital, Ghorekhal Mandir.

दिल्लीवरुन मसुरी(लॅन्डोर) -नैनिताल-रानीखेत-कौसानी-अल्मोरा असा रुट प्लॅन करायचा आहे. मसुरी येता जाता कधीही चालेल, पण तिथे तीन दिवसांकरता जाणे मस्ट आहे. नैनितालजवळ शितळा नावाचे छान गाव आहे. तिथे कोणी गेलं आहे का? प्रवास जून-जुलै महिन्यात करायचा आहे.

नैनीताल - G B Pant High Altitude Zoo, Mukteshwar (about 50 KM from Nainital) हे तुम्हाला सांगावे लागेल ड्रायव्हरला कारण सगळे जण इथे जात नाहीत. मी स्वतः गाडी चालवत गेलो होतो त्यामुळे पाहिजे ते बघु शकलो. बाकी इतर तलाव पण बघा. एप्रिलमधे थोडी थंडी असेल. स्वेटर, कानटोपी ठेवा जवळ.

@ शर्मिला:
Day 1 Morning flight to Delhi. 7-8 hrs drive from Delhi to Mussourie. Night stay at Mussourie.

Day 2 Local sight seeing at Mussourie. Gun Hill, Kempt falls, Camel back road etc.

Day 3 Morning leave from Mussourie. On the way some additional spots near mussourie like lal tibba, Sr. Geoorge everest house, Bhata falls etc. and proceed to Jib corbett. 5 hrs drive to corbett.
Night stay at Corbett

Day 4 Visit to Jim corbett national park. Night stay at Corbett

Day 5 Morning depart to Kasauni 4 hrs drive. On the way visit to Ranikhet. Local spots at Ranikhet like golf course, sun templte, garden. Reach to Kasauni. Night stay at Kasauni.

Day 6 Morning visit to chaukori ( around 80 km from Kasauni. ) while returning back visit to spots on the way like Bageshwar. Baijnath.

Day 7 Visit to near by spots at Kasauni like Anasakti Ashram, Laxmi Ashram, Pant Museum.
Lunch at Kasauni. Rest and leisure at Kasauni.

Day 8 Leave Kasauni. Proceed to Nainital. On the way visit to Almora. 3 hrs drive to Nainital. Stay at Nainital.

Day 9 After breakfast sight seeining at Nainital. Visit to Naini Peak, Snow View, Tiffin Top & Dorothy Seat, Lands End, Hanumangarhi, Kilbury, Sarital, Ghorekhal Mandir

Day 10 Early morning depart to Delhi. 8 hrs drive from Nainital. Night flight from Delhi to destinatin

G B Pant High Altitude Zoo हे नैनी तलाव परिसरापासुन किती जवळ आहे...?

G B Pant High Altitude Zoo हे नैनी तलाव परिसरापासुन किती जवळ आहे...?
>> एकदम जवळ आहे.

ओके..
हे सगळे एका दिवसात बघून होतं का : Visit to Naini Peak, Snow View, Tiffin Top & Dorothy Seat, Lands End, Hanumangarhi, Kilbury, Sarital, Ghorekhal Mandir

आणि कसौ नी चे एका दिवसात होतंका: Anasakti Ashram, Laxmi Ashram, Pant Museum.

गीता, धन्यवाद!

दिल्लीहून मसुरीला जाताना हेअरपीन बेन्डचा बराच त्रास होतो. ७-८ तासांचा ड्राइव्हही जास्त आहे. मधे अजून कुठे मुक्कामाकरता ठिकाण आहे का?

खादाडी चे काय विशेष?>>>>वर लिहिल्याप्रमाणे "बालमिठाई" अवश्य खावी/घ्यावी (६-७ दिवस टिकते). Happy आणि तो एका विशिष्ट पानात गुंडाळलेला पेढा (नाव माहित नाही). आम्ही दोन्हीही मिठाया अल्मोराला घेतल्या होत्या. Happy

दिल्लीहून मसुरीला जाताना हेअरपीन बेन्डचा बराच त्रास होतो. ७-८ तासांचा ड्राइव्हही जास्त आहे. मधे अजून कुठे मुक्कामाकरता ठिकाण आहे का?
>> मुक्काम रुरकीला करु शकता. तेवठे एकच बरे शहर आहे. पण दिल्ली - मसुरी मुक्कामाची गरज वाटत नाही. वाटेत cheetal grand आहे. जेवायला मस्त तेथे पण रहायची सोय आहे बहुधा. ह्या शनिवारी जावे का जेवायला cheetal grand ला असा विचार चालु आहे Happy

नैनीताल ला कधी जावे? आम्ही 9 जन आहोत. तिथे पाहन्यालायक अजून काय काय आहे? कुथुन कुथे जावे? proper planning कोनि देवु शकेल काय? Please HELP

Pages