मायबोलीसोबतच्या एका वर्षाच्या निमित्ताने!!!

Submitted by सानी on 8 April, 2011 - 10:53

नमस्कार मायबोलीकर!!!!

मी मायबोलीचे सभासदत्व घेऊन आज बरोब्बर एक वर्ष पूर्ण झाले! गंमत म्हणजे मी आत्ताच विचार करत होते, की मला मायबोलीवर येऊन जवळपास एक वर्ष होत आलं असेल ना? हा विचार मनात आल्याबरोबर एका वर्षाचे किती आठवडे होतात हे मोजायला लागले, आणि सहज म्हणून पाहिले, तर काय आश्चर्य!!! मला मायबोली 'जॉईन' करुन बरोब्बर १ वर्षे आणि ८ मिनिटे झालेली होती!!! माझा हा आनंद कोणासोबत शेअर करु मी? हा प्रश्न पडला होता...आणि एकदम जाणवले, हा आनंद शेअर करण्यासाठी मायबोलीशिवाय योग्य जागा दुसरी कोणती असणार? तडक लिहायला घेतले... Happy

मायबोली हे एक विस्तृत असे मोठ्ठे झाड आहे, त्यावरचे धागे म्हणजेच त्याच्या पारंब्या, आपण सगळे त्या झाडावरचे पक्षी आणि या पारंबीवरुन त्या पारंबीवर उडतांना दम लागला, ऊन्हाचे चटके बसले, किंवा कंटाळा आला आणि विरंगुळा हवा असेल, तर गप्पांच्या पानांचे उबदार घरटे आपल्या मित्रमंडळींनी आपल्यासाठी बांधून ठेवलेले आहेच... तिथे समविचारी पक्ष्यांसोबत गप्पा मारत चार विसाव्याचे क्षण घालवले, ताजेतवाने वाटले, की आपापल्या 'खर्‍याखुर्‍या' जगात नव्या दमाने जगायला आपण मोकळे, नाही का? Happy

मला माबोवरच्या ह्या एका वर्षाने काय दिले? मागे वळून पाहिले, तर खुप खुप गोष्टी आठवल्या.... मराठी सोडून सर्व भाषिक मित्र-मैत्रिणी मिळालेल्या देशात मी माझ्या भाषेला प्रचंड 'मिस' करत असतांनाच मायबोलीचा हा विशाल वृक्ष मला मिळाला आणि अत्यानंद झाला. Happy

काही वर्षांपूर्वी एकदा मायबोलीवर आले होते, पण तेंव्हाचे गुलमोहर वगैरे काहीच समजले नव्हते... एखादी कथा नंतर वाचायची तर कशी शोधायची, हेही तेंव्हा समजले नव्हते... टाईप केलेले आत्ता दिसते, तितके चांगलेही तेंव्हा दिसत नव्हते, थोडक्यात तेंव्हा मला मायबोली फारशी 'युजर फ्रेंडली' वाटली नव्हती, म्हणून मी नुसतीच चक्कर मारुन गेले. सभासदत्व घेण्याच्या टप्प्यापर्यंत गेलेच नाही. नंतर मी मायबोलीला विसरले सुद्धा! अचानक एक दिवस एका मैत्रिणीने मराठी साहित्यवाचनासाठीचे एक संकेतस्थळ म्हणून मायबोलीची लिंक दिली. ती मैत्रिण मायबोलीवर कधी येतही नाही. तिच्या लिंकमुळे मी मायबोलीवर पुन्हा एकदा आले. तेंव्हा नेमकी बेफिकीरजींची पहिली कादंबरी वाचनात आली. त्यांनी सलग पाच/ सहा भाग एकत्र जोडून प्रकाशित केलेले होते, म्हणून एका दमात ती लांबलचक कथा वाचून काढली. खुप आवडली. क्रमशः असल्याने, पुन्हा मायबोलीवर आले. अशाप्रकारे मग इकडे येतच राहिले...

त्याच दरम्यान डि.सी. गटगचे प्लॅनिंग सुरु होते. तो धागा जोरदार वहात होता... मायबोलीवर इतके लोक आहेत आणि ते असे गटग वगैरे आयोजित करतात हे पाहून फार मज्जा वाटली.

अनेक कथा, कविता, ललिते, लेख वाचण्यात आले. स्वतः लिहिणे, प्रतिसाद देणे याची गंमत अनुभवायला मिळाली... मायबोलीवरचे कडू-गोड प्रतिसाद यांचाही अनुभव मिळाला. हुकुमी, वादग्रस्त धागे, लेखक, प्रतिसादक या सगळ्याचा परिचय झाला. तसेच भरपूर मित्र-मैत्रिणीही मिळाले. कधी डिस्टर्ब असेन तर ते माझ्या लेखनातून, प्रतिसादातून ओळखून प्रेमाने विचारपूस करणारे असे प्रेमळ स्नेही सुद्धा लाभले आणि मायबोलीसोबत प्रचंड मानसिक गुंतवणूक निर्माण झाली. रोज मायबोलीवर चक्कर टाकणे हे एकप्रकारचे व्यसनच लागले आणि ते आजतागायत आहे.

ह्या सुंदर व्यसनासाठी मायबोलीचे आणि सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार!!! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला माबोवरच्या ह्या एका वर्षाने काय दिले? मागे वळून पाहिले, तर खुप खुप गोष्टी आठवल्या.... मराठी सोडून सर्व भाषिक मित्र-मैत्रिणी मिळालेल्या देशात मी माझ्या भाषेला प्रचंड 'मिस' करत असतांनाच मायबोलीचा हा विशाल वृक्ष मला मिळाला आणि अत्यानंद झाला. ..... किति मनापासुन लिहले आहे.

या विशाल वृक्ष छायेत आपणास नव कल्पना सुचु देत याच या निमित्ताने शुभ कामना !!!!!!!!!!

छान ललित! (माझा उल्लेख काही मुठी मांस चढवून व क्रमशः या शब्दाची इतरांपेक्षा'ही' अधिक भीती दाखवून गेला याबद्दल विशेष आभार!)

सर्वच मुद्दे चांगले आहेतच सानी!

चांगले / वाईट (हेही सापेक्ष) हे प्रतिसाद येतच असतात.

माझे एक मत लिहीतो.

असे 'स्वातंत्र्ययुक्त पॉलिसी' असलेले फोरम्स मिळतात तेव्हा माणसाने स्वतःचे मन व्यक्त करायला हवे. अधिकाधिक!

लोक येथे पाककृती, कुठलेही अन कसलेही फोटो, स्वतःच्या क्षेत्राची माहिती, प्रवासवर्णने, बाळबोध लळिते अन वाफाळते बाफ (करंट अफेअर्सवरचे) असल्या गोष्टी रटाळ पद्धतीने वर्षानुवर्षे देत असतात. 'रटाळ' हा शब्दही सापेक्षच ! तरीही 'रटाळ' मध्ये एक 'अ‍ॅबसोल्यूटनेस' आहेच!

अशा फोरम्सवर आपण आपले फिक्शन, कल्पनाविलासाचा शक्य तितका विस्तार हे लिहायला हवे व अत्यंत वारंवारतेने लिहायला हवे.

हे असे व इतक्या वारंवारतेने यासाठी लिहायला हवे कारण जे मुळात लिहीले जात आहे ते अत्यंत दुय्यम दर्जाचे, रटाळ व स्वानुभवातील लेखन आहे. त्यात लेखकाचा कल्पनाविलास दुर्मीळ आहे.

सानी, आपण आता 'लिहायला' लागा असा माझा मित्रत्वाचा सल्ला आहे. आपण माझ्यावर दोन कविता केल्यात त्या माझ्यासाठी कितीही आनंददायी असल्या तरी सानी या आयडीबाबतचा दृष्टिकोन प्रभावित करणार्‍या होत्या. आपण एक धागा काढला होतात जो प्रचंड गाजला. मला आता शीर्षक आठवत नाही. पण असे धागे जरूर काढावेत. त्याचवेळी स्वतःचे काही लेखन करावेत अशी विनंती!

या निमित्ताने,

माझ्या प्रत्येक धाग्यावर अत्यंत रिझनेबल, त्याचवेळेस सपोर्टिव्ह व मित्रत्वाच्या प्रतिक्रिया देण्याचे आपले कंट्रिब्युशन मी आयुष्यात विसरणार नाही.

आपल्या आंतरजालीय वागणुकीचा चाहता!

-'बेफिकीर'!

सानी, अभिनंदन !
मला पण जेव्हा माझे सदस्यत्व १० वर्षे आणि काही दिवस झाल्याचे दिसले तेव्हा असेच छान वाटले होते.

या एका वर्षात तुम्ही मायबोलीला किंवा मायबोलीकरांना काय दिले ? त्यात दीर्घजीवी काही होते का ?

आईशप्पथ ...सानी आज माझाही पहिला माबो वाढदिवस आहे !!

सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
52 आठवडे 18 तास

मी तुमच्याहून २ आठवडे ज्युनिअर आहे.

>>> मग तुम्ही मला दादा ...आणि सानीला ताई म्हणायचं ...काकु म्हणालात तरी हरकत नाही Biggrin

.

सानी...गुड

सगळ्यानांच मायबोलीवर एक वर्ष झाल्यावर असे लिहावेसे वाटेल का असा प्रश्न मनात तरळून गेला...

तुझा वावर अत्यंत प्लेझंट असतो मायबोलीवर ह्या बेफिकीरांच्या मताशी सहमत.

मायबोलीवर आणि व्यक्तिगतरीत्याही "आयुष्यमान भव"

सानी, शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी!
मायबोली वर येऊन मला काही महिनेच झाले आहेत, पण बर्‍याचदा मनमोकळ्या प्रतिक्रिया (हेही सापेक्ष असावं) वाचायला मिळतात आणि बरं वाटतं.

-चैतन्य.

मलाही एक वर्ष आणि सात आठवडे झाले कि माबोवर येऊन. सात आठवड्यांपूर्वी डोक्यात यायला पाहीजे होतं असं काही..

माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल आणि शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार!!! Happy

बेफिकीरजी, मी लिहावं हा तुमचा सल्ला शक्य होईल तसा आचरणात आणण्याचा प्रयत्न करेनच... असे 'स्वातंत्र्ययुक्त पॉलिसी' असलेले फोरम्स मिळतात तेव्हा माणसाने स्वतःचे मन व्यक्त करायला हवे.>>> हे एकदम मान्य. पण इतरांशी कुठल्याही प्रकारची तुलना करु नये असे वाटते... मला व्यक्तिशः विचाराल, तर तुमचे लेखन जास्त आवडते, पण याचा अर्थ असा नाही की माबोवरील बाकी लोकांचे लेखन चांगले नसते. माबोवर कितीतरी चांगले चांगले लेखन आलेले आहे, जे मी एंजॉय केले आहे! तसेच पाककृती वगैरेंचे बाफही आवश्यकच आहेत ना! आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे... त्याला रटाळ म्हणून कसे चालेल?
असो, मी ही लिहायला घेतले, की स्वानुभवच लिहिते. मला कल्पनाविलास जमत नाही, म्हणून तर तुमच्या कल्पनांच्या उंच उंच भरार्‍यांचे मला कौतुक वाटत असते! Happy
कृपया वाईट वाटून घेऊ नका... पण बेफिकीरजी, तुम्ही इतके चांगले लिहिता आणि विनाकारण अशी काही विधाने करुन बर्‍याच लोकांना दुखावता...आणि त्यांचे शत्रुत्व ओढावून घेता, हे जरा टाळता आले तर बघा प्लिज...

महेश, तुम्ही मायबोलीचे इतके जुने सभासद आहात??? सहीच.... Happy कोणीतरी जुन्या सभासदांपैकी मायबोलीत इतक्या वर्षात झालेले सकारात्मक/ नकारात्मक बदल, याविषयी लिहावे असे वाटते... खुप उत्सुकता आहे पूर्वीची मायबोली कशी होती, हे जाणून घेण्याची....

प्रगो Proud डॉक आपल्याला ज्युनिअर आहेत... खरंच एकदम मोठं झाल्यासारखं वाटायला लागलंय... Biggrin आणि हो! तुला तुझ्या पहिल्या माबो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

मंदार, लेख छोटा झालाय खरा... जमल्यास विस्तार करेन किंवा नंतर दुसरा लेख लिहिन... बघू... Happy

अरेच्या..! सहजच मी माझं प्रोफाइल पाहीलं तर, मला पण मायबोलीवर येवून नुकतेच 1 वर्ष 23 मिनिटे झाली, असं लक्षात आलं. Happy

धन्स दक्षे, अमित Happy

अमित, तुझेही पहिल्या माबो वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन!!! Happy उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असलेला आणि एकदम सॉलिड पंचेस मारणारा एक मित्र आम्हाला तुझ्या रुपाने लाभला... Happy
रच्याकने, तू पण मला ताई आणि प्रगोला दादा म्हणायचं बरं का!!! Proud

Pages