नमस्कार मायबोलीकर!!!!
मी मायबोलीचे सभासदत्व घेऊन आज बरोब्बर एक वर्ष पूर्ण झाले! गंमत म्हणजे मी आत्ताच विचार करत होते, की मला मायबोलीवर येऊन जवळपास एक वर्ष होत आलं असेल ना? हा विचार मनात आल्याबरोबर एका वर्षाचे किती आठवडे होतात हे मोजायला लागले, आणि सहज म्हणून पाहिले, तर काय आश्चर्य!!! मला मायबोली 'जॉईन' करुन बरोब्बर १ वर्षे आणि ८ मिनिटे झालेली होती!!! माझा हा आनंद कोणासोबत शेअर करु मी? हा प्रश्न पडला होता...आणि एकदम जाणवले, हा आनंद शेअर करण्यासाठी मायबोलीशिवाय योग्य जागा दुसरी कोणती असणार? तडक लिहायला घेतले... 
मायबोली हे एक विस्तृत असे मोठ्ठे झाड आहे, त्यावरचे धागे म्हणजेच त्याच्या पारंब्या, आपण सगळे त्या झाडावरचे पक्षी आणि या पारंबीवरुन त्या पारंबीवर उडतांना दम लागला, ऊन्हाचे चटके बसले, किंवा कंटाळा आला आणि विरंगुळा हवा असेल, तर गप्पांच्या पानांचे उबदार घरटे आपल्या मित्रमंडळींनी आपल्यासाठी बांधून ठेवलेले आहेच... तिथे समविचारी पक्ष्यांसोबत गप्पा मारत चार विसाव्याचे क्षण घालवले, ताजेतवाने वाटले, की आपापल्या 'खर्याखुर्या' जगात नव्या दमाने जगायला आपण मोकळे, नाही का? 
मला माबोवरच्या ह्या एका वर्षाने काय दिले? मागे वळून पाहिले, तर खुप खुप गोष्टी आठवल्या.... मराठी सोडून सर्व भाषिक मित्र-मैत्रिणी मिळालेल्या देशात मी माझ्या भाषेला प्रचंड 'मिस' करत असतांनाच मायबोलीचा हा विशाल वृक्ष मला मिळाला आणि अत्यानंद झाला. 
काही वर्षांपूर्वी एकदा मायबोलीवर आले होते, पण तेंव्हाचे गुलमोहर वगैरे काहीच समजले नव्हते... एखादी कथा नंतर वाचायची तर कशी शोधायची, हेही तेंव्हा समजले नव्हते... टाईप केलेले आत्ता दिसते, तितके चांगलेही तेंव्हा दिसत नव्हते, थोडक्यात तेंव्हा मला मायबोली फारशी 'युजर फ्रेंडली' वाटली नव्हती, म्हणून मी नुसतीच चक्कर मारुन गेले. सभासदत्व घेण्याच्या टप्प्यापर्यंत गेलेच नाही. नंतर मी मायबोलीला विसरले सुद्धा! अचानक एक दिवस एका मैत्रिणीने मराठी साहित्यवाचनासाठीचे एक संकेतस्थळ म्हणून मायबोलीची लिंक दिली. ती मैत्रिण मायबोलीवर कधी येतही नाही. तिच्या लिंकमुळे मी मायबोलीवर पुन्हा एकदा आले. तेंव्हा नेमकी बेफिकीरजींची पहिली कादंबरी वाचनात आली. त्यांनी सलग पाच/ सहा भाग एकत्र जोडून प्रकाशित केलेले होते, म्हणून एका दमात ती लांबलचक कथा वाचून काढली. खुप आवडली. क्रमशः असल्याने, पुन्हा मायबोलीवर आले. अशाप्रकारे मग इकडे येतच राहिले...
त्याच दरम्यान डि.सी. गटगचे प्लॅनिंग सुरु होते. तो धागा जोरदार वहात होता... मायबोलीवर इतके लोक आहेत आणि ते असे गटग वगैरे आयोजित करतात हे पाहून फार मज्जा वाटली.
अनेक कथा, कविता, ललिते, लेख वाचण्यात आले. स्वतः लिहिणे, प्रतिसाद देणे याची गंमत अनुभवायला मिळाली... मायबोलीवरचे कडू-गोड प्रतिसाद यांचाही अनुभव मिळाला. हुकुमी, वादग्रस्त धागे, लेखक, प्रतिसादक या सगळ्याचा परिचय झाला. तसेच भरपूर मित्र-मैत्रिणीही मिळाले. कधी डिस्टर्ब असेन तर ते माझ्या लेखनातून, प्रतिसादातून ओळखून प्रेमाने विचारपूस करणारे असे प्रेमळ स्नेही सुद्धा लाभले आणि मायबोलीसोबत प्रचंड मानसिक गुंतवणूक निर्माण झाली. रोज मायबोलीवर चक्कर टाकणे हे एकप्रकारचे व्यसनच लागले आणि ते आजतागायत आहे.
ह्या सुंदर व्यसनासाठी मायबोलीचे आणि सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार!!! 
धन्स स्मिहा!
धन्स स्मिहा!
ए सानी, मस्तच खुप खुप
ए सानी, मस्तच खुप खुप शुभेच्छा.....
माझा पण सदस्य झाल्यापासूनचा कालावधी 52 आठवडे 23 तास
श्वे, धन्स आणि तुझं हार्दिक
श्वे, धन्स आणि तुझं हार्दिक अभिनंदन!!!
तुला मायबोलीकरीण होऊन बरोब्बर १ वर्ष आणि १ तास झालाय...आत्ताच!!!!
सानी उशीराच का
सानी
उशीराच का होईना-वाढदिवसाच्या शुभेच्छा,अनेक वर्षे इतके छान योगदान द्याल अन इतरांना प्रोत्साहनपर लिहाल यात शंकाच नाही.
>>लोक येथे पाककृती, कुठलेही अन कसलेही फोटो, स्वतःच्या क्षेत्राची माहिती, प्रवासवर्णने, बाळबोध लळिते अन वाफाळते बाफ (करंट अफेअर्सवरचे) असल्या गोष्टी रटाळ पद्धतीने वर्षानुवर्षे देत असतात. 'रटाळ' हा शब्दही सापेक्षच ! तरीही 'रटाळ' मध्ये एक 'अॅबसोल्यूटनेस' आहेच!
अशा फोरम्सवर आपण आपले फिक्शन, कल्पनाविलासाचा शक्य तितका विस्तार हे लिहायला हवे व अत्यंत वारंवारतेने लिहायला हवे.
हे असे व इतक्या वारंवारतेने यासाठी लिहायला हवे कारण जे मुळात लिहीले जात आहे ते अत्यंत दुय्यम दर्जाचे, रटाळ व स्वानुभवातील लेखन आहे. त्यात लेखकाचा कल्पनाविलास दुर्मीळ आहे.>>
इतरांना हिणवणारा असा हा शेरा आहे. त्यात जनरलयझेशन केलय.
इतरांना हिणवणारा असा हा शेरा
इतरांना हिणवणारा असा हा शेरा आहे. त्यात जनरलयझेशन केलय.>> हेतूच तो आहे.
सानी, पहिल्या वाढादिवसाच्या
सानी,
पहिल्या वाढादिवसाच्या शुभेच्छा !
हा लेख लिहिलास यावरूनच मा.बो. विषयी तुला वाटणारी आत्मीयता स्पष्ट होते आहे.
लेखात त्याबद्दल नेटक्या शब्दांत उल्लेख केला आहेसच.
पुढील लेखनासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात तू योजलेल्या कार्यांसाठी अनेक शुभेच्छा.
इतरांना हिणवणे हा हेतु कितपत
इतरांना हिणवणे हा हेतु कितपत योग्य आहे ,सद्सद्विवेकास धरून आहे यावर विचार व्हावा
मायबोलीवरच्या पुढच्या
मायबोलीवरच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!
रेव्युजी, उल्हासकाका आणि
रेव्युजी, उल्हासकाका आणि प्रज्ञा... तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून आभारी आहे!
छान:)
छान:)
सानी, अभिनंदन !
सानी,

अभिनंदन !
खुप खुप धन्यवाद सुजा, अनिल
खुप खुप धन्यवाद सुजा, अनिल
मला आज तिसरे लागले.
मला आज तिसरे लागले.
>>>> मला आज तिसरे लागले
>>>> मला आज तिसरे लागले <<<
गुड.. पण "तिसरं अन विसरं" असही म्हणतात बर का!
मला, आयमीन माझ्या या आयडीला
बघु बर किती दिवस झालेत? .....
व्वा, चक्क 8 वर्ष 47 आठवडे
सानी, चांगले लिहीलय.
अभिनंदन बेफी. लिंबुटिंबु
अभिनंदन बेफी. लिंबुटिंबु म्हणताहेत तेच लिहीले होते मी पण!
मनोरंजक
मनोरंजक
मला १ वर्ष ४८ आठवडे..
मला १ वर्ष ४८ आठवडे.. अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. मला ४८ आठवडे उशीर झाला.
>>>>
>>>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. मला ४८ आठवडे उशीर झाला. <<<

गुममोहरात वर्षपूर्ती लेख असा
गुममोहरात वर्षपूर्ती लेख असा एक स्वतंत्र विभाग सुरू करावा लागेल.
फारच छान लिहीले आहे. मला १३
फारच छान लिहीले आहे. मला १३ वर्षे होऊन गेली पण असे लिहीणे जमले नाही, पण माझ्याहि भावना तशाच आहेत. मला तर मायबोलीत काहीच वाईट दिसत नाही, पण कुणाला दिसत असेल तरी त्या सर्व गुणदोषांसकट मला मायबोली आवडते.
धन्यवाद.
झक्की आजोबा, यू सेड इट!
झक्की आजोबा, यू सेड इट!
मला 2 वर्ष 9 आठवडे!
मला 2 वर्ष 9 आठवडे!
मला सध्या तरी १ वर्ष १५
मला सध्या तरी १ वर्ष १५ आठवडे झालेत.
सानी छान लिहीलयं. काय आहे ना, इथे भली बुरी अशी सगळी मंडळी असली तरी माबोचे व्यसन ते माबोचेच. सहन होईना आणी सांगता येईना. धरलयं तर चावतयं आणी सोडलं तर पळतयं.:फिदी:
छान लिहिलयसं, मायबोलीवरच्या
छान लिहिलयसं,
मायबोलीवरच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !
Pages