पाणीपुरी , भेळपुरी, रगडा पॅटीस , वडापाव इत्यादीच्या चटण्या

Submitted by मेधा on 7 April, 2011 - 20:51

पाणीपुरी, भेळेच्या चटण्या, दाबेलीचा मसाला , वडापावची चटणी यांच्या कृतींसाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेरूपेस्टीची चटणी ही फारच मस्त आयडिया आहे. धन्यवाद प्राडे!

अ‍ॅपलसॉसची पण झकास चटणी होते.

ठाण्याला कुठून भजी आणली होती माहिती नाही, पण त्याबरोबरची चटणी अफाट होती. भज्याची पिल्लं, लाल मिरच्या आणि लिंबाचा रस अगदी बारिक वाटून केलेली असते अशी माहिती मिळाली. (तिखट लागली तर त्यात दही घालून पण छान लागते.)

मैत्रिणीकडून अ‍ॅपलसॉस वापरून केलेल्या चटणीची रेसिपी आली.

आयतं अ‍ॅपलसॉस- १ वाटी, वाटलेलं आलं-चमचाभर, तिखट-लागेल तसं, भाजलेल्या जिर्‍यांची पूड- एक लहान चमचा, काळं मीठ-चिमूटभर आणि चमचाभर चाट मसाला एकत्रं करून लागेल तसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं. चव घेऊन लागलं तर नेहमीचं मीठ घालायचं. दहीपुरीवर तिच्याकडे ही चटणी खाल्ली तेव्हा अ‍ॅपलसॉस घालून केली आहे हे जाणवलं नाही.

अ‍ॅपलसॉस्-पुदिना-हिरव्या मिर्च्या एकत्र वाटून भेळेकरता चांगली चटणी होते असं लिहिलंय.

पाणीपुरीचे पाणी हे 'दीप ग्रीन मँगो पन्हा' वापरुन करता येते. झटपट व मस्त. त्यात थोडे पाणी, गूळ घाला आणि जिरे-बडीशेप भाजून पूड करुन.

वर लोला म्हणाली तसं दीपचं आंबा पन्हं वापरुन झटपट पाणीपुरीचं पाणी केलं. माझं अ‍ॅडिशनः नुसतं गूळ वापरुन पाणी गोडसरच होतं त्यामुळे हिरव्या मिरचीचा ठेचा असल्यास तिखटपणाकरता घालावा.़माझ्याकडे भेळेची तिखट चटणी होती तीच घातली.
टिपेकरता धन्यवाद लोला.

मेधा, धाग्याबद्दल आणि सायो, मृ, रेस्प्यांबद्दल धन्यवाद.
(उद्या मुलीच्या शाळेत म्हणे भेळपार्टी आहे. बाई भेळ बनवणार. आम्हाला हिरवी चटणी करून न्यायची आहे. या धाग्यानं नेमकं काम केलं.)

गजानन, माझ्या पहिल्याच पोस्टप्रमाणे हिरवी चटणी करणार असशील तर एकदम ताजी कर. मस्त पोपटी हिरवी दिसते. दुसर्‍या दिवशी डार्क हिरवी होते. लहान मुलींना द्यायची असल्याने कैरीचं प्रमाण वाढवून मिरच्या कमी करता येतील.

धागा एकदम मस्त!! तोन्डाला पानी सुटले. सध्या diet वर असल्याने नुसते वाचुनच समाधान मानायचे Sad
चाट नाही तरी नुसत्या भड्न्ग वर कान्दा, टोमॅटो, कोथिम्बिर, आणि एखादी चट्णी घालुन खायला काय हरकत आहे...

सायो, अर्रर्र.. उद्या सकाळी लवकर द्यायची म्हणून आता करून ठेवलीय. आणि हो, मिरची नुसती नावाला घातलीय. कैरीचे प्रमाण जास्त ठेवलेय.

मी पुदिन्याच्या चटणीत थोडी आमचूर पावडर किंवा चाट मसाला नाहितर ती ज़लज़ीरा पावडर मिळते ना ती १-२ चमचे घालते, छान चव येते.
आजचं हा धागा पुर्ण वाचला, सगळ्यांच्या tips खूप मस्त आज काहितरी chat special करणारचं.

मृ च्या, प्रॅडीची, लोलाची ह्या सगळ्या रेसिप्या ट्राय करून बघायला हव्यात ..

सायोची कैरी वापरण्याची कल्पना आधी ट्राय करून झाली आहे .. मस्त चव येते चटणी ला ..

आज जेवायला मनसोक्त पापु आणि शेव-बटाटा-दहीपुरी हा मेनू! Happy

हिरवी चटणी- वर मृण्मयीने दिलंय तसं बारीक चिरून कोथिंबीर २ वाट्या. त्याच्या १/३ पुदिना बारीक चिरून, लसूण १०-१२ पाकळ्या, पेरभर आलं, २ हिरव्या मिरच्या, २ छोटे चमचे किसलेली कच्ची कैरी घरात होती म्हणून. कैरी, आलं, लसूण, मिरच्या एकत्र वाटल्या. मग को-पु एकत्र वाटले. मग ते एकत्र करून पाणी घालून पापुच्या पाण्याची कन्सिस्टन्सी आणली. मग चवीला मीठ आणि एव्हरेस्टचा पापु मसाला १ चमचा घातला. अफाट चव Happy

गोड चटणी- १०-१२ खजूर उकळ्त्या पाण्यात भिजवून बिया काढून, त्याच्या निम्मी चिंच उकळत्या पाण्यात भिजवून कोळून घेऊन. गोड हवं असल्यामुळे पुन्हा गूळ चवीप्रमाणे, प्रत्येकी १ चमचा भाजलेल्या धण्याची आणि जिर्‍याची पूड, किंचित लाल तिखट, चवीला मीठ. चिंच-खजूर कोळ आणि गूळ पुन्हा उकळून घेतले. त्यात चवीचे पदार्थ घालून थंड केली. हीपण छान!

जोडीला हिरवे भिजवलेले मूग उकडून, बटाटा उकडून. बटाट्यात चाट मसाला-मीठ-तिखट घालून. शिवाय हेच चा.म.-मी.ति मिश्रण शेवपुरीवर भुरभुरवायला हवं तर ऑप्शनल. आणि दही किंचित साखर घालून फेटून.

सगळ्यात गोडाचं काही ना काही आहे जरा, पण प्रत्येक चव आमच्याकडे अशी गोडावर असेल तर आवडीने खातात मंडळी.

हे झाल्यावर मँगो मिल्क शेक! Proud

इथे नीरव ब्रँडची स्वीट पानीपुरी चटणी म्हणून मिळते. त्यात दीपची खजूर्+चिंच चटणी घालून मस्त गोड्+तिखट पाणी तयार होतं. तिखटाकरता नेहमी करतो तशीच चटणी करुन ती ह्यात मिसळली की भारी पाणीपुरीचं पाणी तयार.

अंकु, कोथिंबीर, पुदिना- चटणी करण्यापूर्वीच धुतलेला असावा, खूप आधीपासून नको. हिरवी मिरची, आलं. सगळं एकत्र करुण अजिबात पाणी न घालता मिक्सरला फिरवावं. बाहेरच्या चटणीत नक्की काय काय घालतात हे माहित नाही पण फार वेगळं नसावं.

अरे वा! कालच विचार करत होते की हा प्रश्न कुठे विचारावा आणि आत्ता हा धागा दिसला. अमेरिकेत इंडिअन स्टोर मध्ये हिरवी चटणी कोणत्या ब्रँडची चांगली असते? मी लक्ष्मीची आणली आहे आणि ती बरीच आंबट आहे Sad

जिज्ञासा, फ्रोजन सेक्शनमध्ये दीपची coriander chutney असते बघ. बेस्ट आहे ती सँडविचेसकरता किंवा अगदी रसभाज्यांना लावायलाही. मी उसळींकरता वगैरेही घालते.

दीपच्या फ्रोझन चटण्या चांगल्या असतात.

मी गेल्याच आठवड्यात पापुचं तिखट पाणी घरी केलं कोणताही विकतचा मसाला न वापरता आणी ते पाणी अगदीच मस्त जमलं होतं Happy
त्याची रेसिपी

पुदीना भरपूर
कोथिंबीर पुदिन्यापेक्षा कमी निम्मी साधारण
हिरव्या मिरच्या
आलं
लिंबू रस
गुलाबीसर रंगाचं असतं ते काळं मीठ Happy

सगळं अंदाजाने आपल्या आवडीनुसार...
लाडाचा (vitamix or blendtech) ब्लेंडर असेल तर गाळायची अजिबातच गरज नाही पडत.

सायो, पण पाणी न घालता एकजीव वाटलं जाईल का?

शूम्पी, सहीच .. मला तिखट चटणी कॉम्प्लेक्स् च आहे .. सायो च्या आयडिया प्रमाणे कैरी घालून केली तर छान होते माझ्या मताप्रमाणे पण घरी आंबट चवीची आवडत नाही .. :|

( ऑन अ डिफरन्ट नोट .. सध्या नेहेमीचे पोहे करण्याकरताही चॅलेन्ज्ड् आहे .. एकतर कोरडे जरासे टसटशीत राहिले असा फीडबॅक दिला गेला म्हणून मग ह्यावेळी जरा जास्त वेळ भिजवले गेले तर गचक गोळा .. Uhoh मला कुकींग पासून सन्यास घ्यावा असं वाटायला लागलेलं आहे ..)

सशल, म्हणूनच कोथिंबीर, पुदिना आयत्यावेळी धुवायचा. त्या ओलेपणात वाटलं जातं व्यवस्थित.
कैरी आंबटपणा येण्याएवढी घालू नकोसच. दोन चार फोडी रंग आणि टेक्शरकरता घाल.
पोह्यांवर लिहायलाच हवं. फोडणीचे पोहे चांगले होत नाही म्हणतेस? का? सगळे जिन्नस फोडणीत घालून झाकण घालून शिजवतेस ना, शिजायला आले आहेत असं दिसेल तेव्हाच जाडे पोहे धुवून तयार ठेवायचे आणि एखाद दोन मिनिटांतच टाकायचे फोडणीवर. बारीक गॅस चांगली वाफ आली की नाही रहाणार टसटशीत. फोडणीत थोडा कोबी घातल्यानेही मऊ होतात पोहे.

मी हल्ली पाणीपुरीचं पाणी लालूने सांगितलं त्याप्रमाणे दीपचं कैरी पन्हं वापरून करते. त्यात भाजलेली जिरं-बडीशेपेची पूड घालायची. तिखटपणासाठी हिरवी मिरची-कोथिंबीर्-पुदीना पेस्ट घालते. एकदम ऑस्सम चव येते.

Pages