राणीच्या बागेत एक फेरफटका

Submitted by जिप्सी on 7 April, 2011 - 01:39

पूर्वी एकेकाळी नव्याने मुंबई बघायला येणार्‍यांच्या लिस्टमध्ये हमखास असलेले एक ठिकाण म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग. आजसुद्धा आबालवृद्धांना तितकेच आकर्षित करणारे आणि कमी खर्चात सहज बघता येण्यासारखे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण. "राणीची बाग" नावाने प्रसिद्ध असलेली हि बाग १८६२ साली राणी व्हिक्टोरीया यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या नागरिकांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने त्यात प्राणिसंग्रहालयाची स्थापना झाली. पिंजर्यातील प्राण्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक (?) वातावरण मिळावे म्हणुन येथे वेगवेगळ्या वनस्पतींची (आतापर्यंत मायबोलीकरांच्या नजरेतुन तुम्ही येथील विविध आणि दुर्मिळ वनस्पतींची ओळख करून घेतली असेलच) लागवड करण्यात आले आहे. सध्या जरी येथे प्राण्यांची अवस्था दयनीय असली तरी आजही हे मुंबईतील नागरीकांचे सुट्टीत फिरण्याचे हक्काचे आणि आवडते ठिकाण.

चला तर याच मग राणीची बागेत एक फेरफटका मारूया आणि जे काही उरलेसुरले प्राणी/पक्षी आहेत ते पाहुया. कुणास ठाऊक भविष्यात रिकामेच पिंजरे पहावे लागतील. Happy

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि २४

गुलमोहर: 

सही रे... जुन्या आठवणींना उजाळा करून दिल्याबद्दल धन्यवाद... फार लहानपणी गेलो होतो तिथे...

सर्वच फोटो नेहेमीप्रमाणे अप्रतिम! राणीची बाग अगदी डोळ्यांसमोर उभी केलीत. आणि जागू म्हणाल्या तशी नावे दिलीत तर बरे होईल. मला त्या प्रचि १४ मधला नाही ओळखता आला.

जिप्स्या... मस्तच रे...
ढोलीतल्या पोपटाचा फोटो मस्तच... मेहनतीचे (खुप वाट बघितल्या चे) फळ मिळाले... Happy
कधि नाहि ते तुझ्या बरोबर बाग बघितली आणि एकदम मस्तच वाटल... आता परत कधी जाणार तेवढ सांग... Happy

सुंदर फोटो. या प्राणीपक्ष्यांकडे माझे दुर्लक्षच होते. पण तेही साहजिकच आहे, त्यांचे एकेकाळचे वैभव मी बघितले आहे. हत्तीवरुन फेरफटका मारला आहे. त्या तळ्यात (?) लाँचमधून फेरी मारलेली आहे.

पावसाळ्यात गेलास तर तूला तिथले मोर, पिसारा फूलवून नाचतानाही दिसतील.

फोटो खूपच छान आले आहेत्.प्राण्यांच्या डोळ्यातील भावही स्पष्ट आले आहेत्.मिठ्ठुमियांचे बाहेर डोकावणे फारच मस्त.

योगी, मस्त फोटो... Happy
त्यानिमित्ताने राणिच्या बागेत एक फेरफटका झाला (व्हर्च्यूअल) Happy
२१ नं चा फोटो एकदम भयानक वाटला, तु कसा काढलास?
आणि तो झाडाच्या ढोलितून डोकावून बघणारा पोपट... मज्जेशिर.. Lol
पाण्यात डुंबणारा बदक पाहून डोळे एकदम थंड झाले.... Happy

या बागेचे सध्याचें अपडेट कुणी देउ शकेल का?हल्लीच कुणी जाऊन आलंय का?मे च्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जायचा विचार आहे

हल्लीच कुणी जाऊन आलंय का?
>>>
म्हाळसा जाऊन आल्यात.
भारी झालीय बाग.
युट्यूबवर विडीओ चेक करू शकता

फोटो जबर्रदस्त आलेत जिप्सी..
तुझे कधी येत नाही म्हणा Happy
पण हे बघून कोणालाही चटकन जायचा प्लान बनवावासा वाटेल

या बागेचे सध्याचें अपडेट कुणी देउ शकेल का?>>बाग सध्या खूप छान केली आहे,आम्ही आजच जाऊन आलो
वाघ,बिबटे हरणं,हत्ती, हिप्पो,माकडं, तरस, कोल्हे लांडगे,साप ,पेंग्विन, पोपट,कासव आणि पाण पक्षी सुद्धा अप्रतिम होते पण मला जास्त नाही ओळखू आले ते, कारंजे तसेच छोट्या मुलांसाठी गार्डन,चुटकी,छोटा भीम,चाचा चौधरी यांचे छोटे पुतळे सुद्धा आहेत
मला आणि मुलांना फार आवडली

वाह आदू छान फोटो..

जिप्सी पुन्हा एक चक्कर टाक राणीबागेत.. आता भारी झालीय.. छान वाघाच्या डरकाळीचा फोटो आण

फोटो नुसत्या प्राण्यांचे नाहीयेत,मुलं आहेत सोबत त्यामुळे चुकून 2 3 आलेले आहेत पण ते सुद्धा ब्लर आहेत