एक पसाभर 'तू'

Submitted by आनंदनंदिनी on 6 April, 2011 - 09:29

सोनेरी कणांचा भार..
माझ्या मिटल्या पापण्यांवर..
किलकिलत्या डोळ्यांत
दिसलास फक्त तू..
मग तोच खुळा प्रयत्न..
तुला एक स्पर्श करण्याचा..
तुझ्या एक स्पर्शानं
सोनं होण्याचा..
तुझाही तोच खेळ
माझ्याशी..
माझ्या वेड्या मनाशी..
तुझ्या अभासांपाठी धावणारी मी..
अन मला बघून हसणारी तुझी सावली..
बेचैन होणं ही नेहमीचंच माझं..
आज मात्र थांबले क्षणभर..
वेडावणाऱ्या तुझ्या सावलीकडेच उत्तर मागितलं मी..

अन बघता बघता उमगलं,
माझ्या झोळीत मावणारा नाहीचेस तू..
मग तुझ्या त्या सोनसळी कणांना
एक एक करत वेचायचा
पुन्हा एक जीवघेणा खेळ..
ध्यास एकच..
एक पसाभर 'तू' मिळावास
मनभर व्यापून राहिलेलास..
पण हाती आलाच नाहीस कधी..
ह्या पसाभर कणांमध्ये
आज पुन्हा शोधतेय तुला..
होशील माझा?
पसाभरच फक्त..

गुलमोहर: 

नाही.....ज्जा...!
.
.
.
.
सॉरी, इतकी हळहळ पाहुन रहावलं नाही... खरंच छान आहे मुक्तक..!