Submitted by पाषाणभेद on 5 April, 2011 - 14:26
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना
मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||
कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||
आता सगळं कसं सांगू तुमाला
मोबाईलचा हायटेक जमाना आला
तिला सारं काही समजते
रोजरोज एसऐमएस पाठवते
पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२||
मी म्हनलं आपण एकदा भेटूका?
मोबाईलचं टेकनीक समजून देवूका?
तुझ्या हातात माझा मोबाईल देतो
एकएक मेनूचा डेमो देतो
पन असली चेष्टा बरी नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०४/२०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हे वाचता वाचता माझा साडेसहावा
हे वाचता वाचता माझा साडेसहावा पेग सांडला आणी सोळावी उडनगरम विझली.
पाषाणभेद, असे भेदत नका जाऊ ओ.
ते मध्यंतरी " मी बाबूराव
ते मध्यंतरी " मी बाबूराव बोलतोय" गाणं आलं होतं तेच आठवलं.
(No subject)
फकीर गुडँगगरम हो. येवढे पेग
फकीर गुडँगगरम हो. येवढे पेग प्यायले की सिगरेटचं नाव ही लिहीता येत नाही का काय?
तेच ना! माझं तर ते सगळं झालं
तेच ना! माझं तर ते सगळं झालं तरी लिहितोय! गुडान्ग गरम! गु'डॅ'न्ग नाही.
(न्यू जर्सीला पोचलेले काय म्हणतात ते माहीत नाही. भारताची सीमा - ही सीमा म्हणजे भौगोलिक मर्यादा - हल्ली काही प्रतिसादांमुळे हे सांगावे लागत आहे - ओलांडलेली नाही. )
इन्डोनेशियाला बनते. लवंगेची असते. निकोटिनचे प्रमाणे कमी आणि उद्धटपणाचे अधिक! (जे दिसतच असेल म्हणा!)
व्हायब्रेटर रिंगटोनचे काही फायदे असतात. त्यातला एकच या कवितेत दिसला.
-'बेफिकीर'!
मी इथे अमेरिकेत राहतो सध्या
मी इथे अमेरिकेत राहतो सध्या तरी, त्यामुळे मी उच्चार गुडँगगरमच करेन.
द एक्स्ट्रा मॅरिटल च्या पुढे अफेअर किंवा ह्या सारखं कुठलंही कॉमन नाऊनच वापरेन. एक्स्ट्रा मॅरिटलच्या पुढे प्रेमा कतलानी सारखं प्रॉपर नाऊन वापरणार नाही.
ज ह ब ह रा
ज ह ब ह रा
काय जबरा चर्चा चालू आहे.
काय जबरा चर्चा चालू आहे.
चालूद्या!