व्यथा सासुची

Submitted by वर्षा_म on 14 December, 2010 - 03:57

मुक्तेश्वर यांची माफी मागुन Happy
http://www.maayboli.com/node/21876

==============================

लाडक्या लेकाच्या संसाराला
आणली घरा सून, आणली घरा सून
शिकली सवरली आणली शोधुन शोधुन,
पण तिने काढले मलाच घरातुन...

आल्या आल्या धरला लेकाशी अबोला
होता तिचा फक्त पैशावर डोळा
कमवायच्या नावानी होती भोपळा
लेकाला आता दिसती माझेच अवगुण...
दिसती माझेच अवगुण...
संसाराला सुरुवात ...

सुनेने रचला हाकलायचा कट
लेकाला घातलीय अवघड अट
म्हणे आता संपवा ही कटकट
आहे बिचारा आता तिला भिउन..
तिला भिउन..
संसाराला सुरुवात ...

लेकाने आणली मला नवी साडी
कधी नव्हे ती माझ्यासाठी गाडी
पाहिली खिडकीतुन वृद्धाश्रमाची वाडी
गेला निघुन मला तिथेच ठेउन....
तिथेच ठेउन....
संसाराला सुरुवात ...

गुलमोहर: 

हसता हसता शेवटाला चटका लावणारी. Happy

कधी नव्हे ती माझ्यासाठी गाडी
पाहिली खिडकीतुन अनाथ आश्रमाची वाडी
गेला निघुन मला तिथेच ठेउन....

Happy

वर्षे...ह्याला विडंबन न म्हणता एक अतिशय भयाण वास्तवदर्शी स्वतंत्र स्पष्ट कविता म्हणता येईल.
खुप छान लिहीलंय्स.