विश्वकरंडक मायबोली विशेषांक

Submitted by हर्ट on 4 April, 2011 - 13:33

समस्त मायबोलीकरांनो, इथे एक न एक मायबोलीकर भारताला विश्वकरंडक प्राप्त झाला म्हणून भारावून गेला आहे. म्हणून आपण सर्वजण मिळून एक विशेषांक काढायचा का? कशी वाटली ही कल्पना? छान ना... मग झटपट कामाला लागा. इतका जबरी होईल ना हा अंक!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात सध्या क्रिकेटबद्दल लेखांचा आणि चर्चेचा इतका ओव्हरडोस झालाय की परत तेच तेच वाचायचा कंटाळा येइल... खरच आपण काहीतरी वेगळे (वर्तमानपत्रे आणि खास पुरवण्यांमध्ये आलेल्या माहीतीपेक्षा वेगळे) देउ शकतो का याचाही विचार व्हायला हवा!

बुमरँगला १००००% अनुमोदन! मला तरी वाटत नाही की माबोवरचे कुणीही आत्तापर्यंत आलेल्या माहिती शिवाय काही वेगळं लिहू शकेल. क्रिकेट मधले बारकावे (इतर क्रिकेटपटूंनी न लिहीलेले) लिहीण्या इतपत क्रिकेटही कुणी खेळलं असेल असं वाटत नाही. त्यामुळे मला तरी नक्कीच कंटाळा येईल. माफ करा पण राहवलं नाही म्हणून लिहीलं.

धन्यवाद सर्वांचे. सर्वांच्या कल्पना आणि सुचना लक्षात घेवूनचं हा विशेषांक काढणार आहोत. तेंव्हा आशावाद बाळगा.

वरील सर्वांचे मजकुर वाचून कळते की खालिल सभासदांनी समितीत भाग घेण्याची पसंती दर्शवली आहे. ह्यातील सर्व सभासद भाग घेतील अशी आशा आहे:
१) वैद्यबुवा
२) मास्तुरे
३) दोस्ती
४) लालू
५) प्रज्ञा९
६) बी

लेखन करण्यास खालिल सभासदांनी तयारी दाखवली आहे. आणखी लेखक लिहितीलचं:
१) भाऊ नमसकर
२) मंदार जोशी
३) योग
४) केदार
५) डॉ. कैलाश गायकवाड
६) ज्ञानेश

सध्या मी ऑफीसमधे प्रशिक्षण घेत आहे. तेंव्हा रात्री जो वेळ मिळतो तो घरचे कामे आटोपूनचं. आता समिती तयार झाली आहे तेंव्हा काम वेगानी पुढे जाईल अशी अपेक्षा. लेखक मंडळींनी आपणहून पुढे या आणि साहित्य लिहायला सुरवात करा. नंतर वेगवेगळे विभाग कळवूचं. पण तोवर थांबून न राहता विश्वकरंडक क्रिकेट सामन्याशी निगडीत, खेळाडूंशी निगडीत साहित्य लिहायला सुरवात करा. लवकरचं पुन्हा भेटू. धन्यवाद.

बी, मी टाईप करायला आणि प्रूफ रीडिन्गला मदत करेन म्हटले आहे.

वेळ जाऊ नये म्हणून नुसताच एक ग्रूप/धागा काढण्यापेक्षा मला हिरकूचे म्हणणे पटले. 'गणेशोत्सव', 'मभादि' सारखे. तसे केल्यास निवडक लेखन टाकता येईल. आणि जरी उशीर लागला तरी लागूदे ना. लोक २ महिन्यांनी नाही वाचणार कदाचित. पण २ वर्षांनी, २० वर्षांनी वाचतील. Happy

देशी, सगळं काही लिहिणार आहोत. एक दोन दिवसात सगळी माहिती देणार आहोत. अंकासाठी तू लिहिणार आहेस हे वाचून खूप हुरुप आला आहे. लेखकांचे सहकार्य हवेचं आहे. धन्यवाद, देशी.

विश्वचषकातले काही खास क्षण टिपणारे फोटो (कॉपीराईट सांभाळून) घेउन त्याखाली खास मायबोली इश्टायल कॅचलाइन देता आल्या तर बघा!

Pages