विश्वकरंडक मायबोली विशेषांक

Submitted by हर्ट on 4 April, 2011 - 13:33

समस्त मायबोलीकरांनो, इथे एक न एक मायबोलीकर भारताला विश्वकरंडक प्राप्त झाला म्हणून भारावून गेला आहे. म्हणून आपण सर्वजण मिळून एक विशेषांक काढायचा का? कशी वाटली ही कल्पना? छान ना... मग झटपट कामाला लागा. इतका जबरी होईल ना हा अंक!!!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कल्पना!
पण सगळेच माबोकर भारावुन गेले असले तरी सगळेच क्रिकेट बद्दल खुप माहीती असलेले असतील असे नाही. काही माझ्यासारखेही असतील - निवडक मॅचेस बघणारे उदा. भारत-पाक्/भारत - ऑस्ट्रेलिया आणि अर्थातच फायनल.
तर अशा मंडळींसाठी टीव्हीवर मॅच बघताना घडलेले किस्से किंवा एकंदरीतच क्रिकेटशी संब्म्धित किस्से असा विभागही ठेवावा म्हणजे अंक खुसखुशीत होईल.

ही नावे चालतील का पहा बरं!

चेन्डुफळी
चषक चेन्डुफळीचा
चेन्डुफळी विश्वचषक विशेषान्क
विश्वचषक - साहेबी खेळाचा
विश्वचषक आणि मायबोली
जीतेगा भै जीतेगा
चषक कुण्णाचा?
३०० चेन्डू (तिनशे चेन्डू)
प्रतिक्षा स्वप्नान्ची - विश्वचषकाची
विश्वचषकाची स्वप्नपूर्ति

वत्सलाला अनुमोदन
मागे महागुरु कि कोणश्याश्या आयडीने काही विनोदी फोटो विनोदी मजकुरासहीत टाकले होते अस पुसटस आठवतय, त्या धर्तीवर काही करता येईल का?

सर्वांनी आपल्या कल्पना इथे लिहा. त्यातून काही कल्पना अमलात आणता येतील. जुन्या गाठोड्यातून थोडे नक्की घेऊ पण नाविन्यपुर्ण लिखाणावर जास्त जोर दिला जाईल.

बी,
खालचे लेखन मी मायबोली वर केले आहे.

बारामती गावठी चॅलेंझर्स

उपांत्या पुर्व फेरी हरल्यानंतर रिकी समोर सर्वात मोठा गहन प्रश्न होता आता पुढे माझे कसे होणार, मायदेशात जाणार तर लोकं हसतील माझ्यावर, ईथे तर आपण कुप्रसिध्द आहोत काय करावं म्हणुन रिकी अहमदबादेच्या एक चहाच्या टपरी वर चहा पित ऊभा होता. आपल्याला दुसरं काहीही येत नाही, चहा वाला बरोबर रिकी च्या मनातलं ओळखला कि ह्याच्या मनात काय चाललंय, त्यांनी म्हटलं साहब, स्टेडियम के बगल मे चाय कि टपरी डालो, आप को तो सभी बडे बडे लोग पहचानते है, स्टेडियम मे चाय सप्लाय का कॉन्ट्रॅक्ट ले लो खुब धंदा चलेगा आपका, साथ मे ब्रेट भाई को भी धंदे मे ले लो, वह आपको चाय लेके जाने आने का काम करेगा और कप बसी धोने का काम भी करेगा. रिकी मना मध्ये चरफडला, त्याने थेट बारामती गाठली आणि साहेबांचे पाय धरले आणि क्षमा याचना केली, Sir we behaved like dogs with you, pls apologise, pls do something for me. साहेब फार मृतसद्दी, म्हणाले रिक्या असं कसं झालं रे, बोल तुला दुसरं काय येतं, त्यावर रिक्या म्हणतो Sir, I can only play cricket. साहेब विचार करु लागले, तिथेच त्यांना काही पोरं विटी दांडु खेळताना पाहिले आणि लगेच साहेबांच्या डोक्यात एक कल्पना आली व ते म्हणाले ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म रिक्या, माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आहे, आमच्या ईकडे विटी दांडु म्हणुन एक खेळ आहे, तुमच्या क्रिकेट सारखेच आहे बघतो लल्या ला विचारुन काही जमवता येतं का. त्यावर रिक्या म्हणाला सर आय नो विटी दांडु , त्यावर साहेब म्हणाले भले शब्बास लेका, पण त्यात रडी चा डाव खेळायचं नाही बरं का, नाही तर ईथली लोकं दांडु घेऊन भलतंच काही तरी करतील, रिक्या म्हणाला नो सर, नो रडीचा डाव अगेन, आय स्वेर बाय दि विटी. साहेबांना हसुच आवरेना, ते हसायला लागले, रिक्या ला काही कळेना साहेब का हसत्यात ते. साहेबांनी सांगितले बेट्या रिक्या बारामती गावठी चॅलेंझर्स चा तु कर्णधार झालायस, जा बिगी बिगी, संघ बांधणी ची तयारी कर, रिक्या ने साहेबांचे आदेश लगेच अंमलबजावणी सुरुवात केली आणि आपल्या सहकार्‍यांना फोन लावायला सुरुवात ही केली.

तर मित्रहो, भविष्यात तुम्हाला असे काही दिसलं तर आश्चर्यचकित होऊ नका.

Everything is possible.

- म्हमईकर (संजीव रा. बुलबुले)
२५.०३.२०११

बी,

अरे सर्वांनी ईथे कथा/कल्पना लिहीत बसले तर अंक व्हायला पुढचा विश्चषक ऊजाडेल. Happy
लवकरात लवकर प्रसिध्ध करायचा असेल तर सजावट वगैरे पेक्षा "कंटेंट" वर भर दिला तर लवकर काम होईल. मला वाटतं त्या अनुशंगाने क्रिकेट च्या बा.फ. वर जे जे लोक मालिके दरम्यान सतत लिहीत होते त्यांना सरळ वि.पु. मध्ये किंवा ईथे मेसेज टाकलास तर पटकन काम होईल. लिहीणार्‍यांपैकी हे लोकं असू शकतील असे वाटते:
मुकुंद, महागुरू, केदार, हिरकू, मास्तुरे, भाऊ (व्यंगचित्रे हवीतच!), असामी, विक्रम३११, दिपांजली..
(ईतर नावे असू शकतात... मला ही नावे प्रामुख्ख्याने आढळली!)
मी एक लेख लिहून देवू शकेन.

विजय एक धाव धावुन घेणे आणि षटकाराने साजरा करणे मधे फरक आहे जे धोनीने दाखवले. मला त्याचा शेवटचा षटकार खुप आवडला....

विजयी षटकार किंवा अविस्मरणिय षटकार हे शिर्षक साजेसे वाटते.

क्रिकेट मधे अनेक षटकार बघायला मिळतील... माझ्या दोन षटकार चांगलेच लक्षात रहातील. ८६ मधे ऑस्ट्रेलेशिया साठी मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर मारलेला आणि २०११ च्या विश्वचषक जिंकण्यासाठी कर्णधार धोनीचा...

मला लेखकीय* व्हायला आवडेल.

*(वर काही लोक 'संपादकीय' होणार आहेत, त्या धर्तीवर.)

कल्पना मलाही आवडली. एखादा लेख लिहायचा विचार करेन. कधी पर्यंत द्यायचा आहे?

दे घुमाके हे नावच जास्त चांगल आहे कारण ह्यावेळी आपले ऑफिशियल गाणे 'दे घुमाके' हे होते. आणि ज्या रितीने अफ्रिकेविरुद्ध सेहवाग - सचिन, इंग्लंड विरुद्ध सच्याचे सिक्सेस, पाकड्यांविरुद्ध सेहवाग, नेदरलँड विरुद्ध पठाण आणि लंके विरुद्ध इतर मॅच मध्ये बेडुक डान्स करणारा ( Happy ) धोणी खेळला ते पाहून ' दे घुमाके' हे नाव अतिशय फिट बसते.

बाकी षटकार नाव घेतले तर प्रताधिकाराचा नक्की भंग होणार. Happy

म्हमईकर मस्त लिहिले आहे, थोडे अजुन पाणी घाला, वाढवा व अंकात प्रसिद्ध करा. Happy

मला लेखकीय* व्हायला आवडेल.
*(वर काही लोक 'संपादकीय' होणार आहेत, त्या धर्तीवर.)
------ तुम्हा लेखक, संपादकांनी घेतलेले कष्ट वाया जायला नको म्हणुन मला वाचकाची भुमिका घ्यायला आवडेल. Happy

भावी संपादकांना विनंती - गणू यांना विशेष आमंत्रीत करावे. त्यांचा मुद्दा थोडा वेगळा असला तरी २०११ मधे क्रिकेट आणि मॅच फिक्सींग या दोन गोष्टी वेगळ्या करता येणार नाही.

मला संपादकांची गरज आहे त्याशिवाय माझे पाऊल पुढे पडणे अवघड दिसत आहे. खूप काही लिहिता येईल असा हा विषय आहे. मंडळी आपणहून पुढे या.

बी छानच आहे कल्पना. पण ते जाहीरात वगैरेची गरज नाही आहे अस वाटत. एक बाफ तयार करुन लेख या इमेल आयडीवर पाठवुन द्या असे संपादक मंडळातर्फे जाहीर केले तर भरपुर जण लिहायला पुढे येतील.

सीमा, ते मी करणारचं आहे पण अजून संपादक मंडळ स्थापन कुठे झाले आहे. मला संपादक मंडळात काम करण्यासाठी सभासदांची गरज आहे. तेथून पुढे मग अंकाविषयी बोलता येईल.

चांगली आयडीया.
यात बित्तुबंगा, पाटील यांची चित्रं/फोटो हवेतच.

बी , (फु.स. आहे पण तरीही लिहितेच. इतकी चांगली कल्पना वाया जावू नये अस वाटत म्हणुन.)
वैद्यबुवा
मास्तुरे
दोस्ती यानी संपादकिय मध्ये काम करण्याची तयारी आहे म्हणुन सांगितलय ना वरती. त्यांना घेवून सुरु तरी कर काम. इतर क्रिकेट प्रेमी लोकांना पण विचार.
मी तुला मजकुर टाईप वगैरे करण्यासाठी हेल्प करीन.

एक शंका. या विशेषांकात फक्त २०११ मधल्या विश्वचषकावरचे लेख असतील की पूर्वीच्या एखाद्या विश्वचषक स्पर्धेवर सुध्दा लेख लिहिता येतील?

लेखात जुन्या सामन्यांचे संदर्भ दिले तर चालतील पण जुन्या विश्वचषकातील सामन्यांचे वर्णन नसावे. व लेखन २०११ चषकासाठी (ह्यात २००७ ते २०११ ची वाटचाल अपेक्षित) मर्यादित ठेवावे.

बी म्हणतो मला संपादक हवेत.एक प्रश्न ह्यावर - हे असे आहे का? की बी ने मांडलेल्या कल्पनेला पुढे नेऊन मायबोलीच्या विषेशांकाला संपादक हवेत. (माझेच कन्फुझन आहे असे म्हणा हवं तर)

केदार, जसे दिवाळी अंक वगैरे आपण काढतो आणि त्याला एक समिती हवी असती तशीचं ही कल्पना आहे. इथे साहित्य प्रकाशित न करता अंकात द्यायचे. मग त्यात वेगवेगळे विभाग असतील. वेगवेगळ्या कल्पना असतील. ही कल्पना माझी नाही. बहुतेक दोस्ती आणि अजून कुणीतरी आहे त्यांची ही कल्पना आहे.

धन्यवाद केदार.

डॉक, शुभस्य शिग्रम Happy

लवकर अमलात/आमलांत आणा! नाहीतर शिळ्या कढीला ऊत सारखं व्हायच!<<< वत्सला यांना अनुमोदन.

मला कुणाचाही उत्साह मोडायचा नाहीये. पण काही व्यावहारिक गोष्टी नजरेला आणून द्याव्याश्या वाटल्या/

मायबोली दिवाळी अंकाचं काम दिवाळीअगोदर २-३ महिने तरी चालते. तेव्हडा वेळ तुमच्याकडे आहे का आणि असला तर २ महिन्यांनी हा अंक प्रकाशित झाल्यावर वाचला जाईल का? तसेच अंकाची टेम्प्लेट बनवणे हे एक वेळखाऊ काम असते त्यात वेळ घालवायचा आहे का?
कदाचित एक वेगळा ग्रूप करून त्यात सरसकट लेखन करायला सुरुवात करणे हा साधा उपाय त्यावर करता येईल. तो अंकासारखा दिसणार नाही पण लगेच वाचायला मिळेल.

वेबमास्तरांशी सहमत.. दिवाळी अंकाच्या धर्तीवर हे करण्यापेक्षा गणेशोत्सव किंवा मराठी भाषा दिनासारखे काही केल्यास ते लवकर होईल.. साधारण एक ते दिड आठवडा एवढ्याच कालावधीत प्रकाशित झाले तर त्यात मजा येईल.. खूप उशिर झाला तर एक साधारण अंक आहे असे वाटू शकते..

Pages