'पुरुष’मय स्वप्न च्या निमित्ताने

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

निमित्त आहे मणिकर्णिका यांचं ’पुरुष’मय स्वप्न हे विनोदी लेखन !

सगळ्यात महत्वाचं. हा लेख मायबोलीवर आहे यात काहीच वावगं नाही. हा लेख इतर अनेक वाचकांना आवडला तसा मलाही आवडला.

हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय.

माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल.

किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.

हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?

स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध करणारे अनेक प्रतिसाद आले असते.

विनोदी लेखन या नावाखाली काय वाटेल ते खपवता का असं त्या लेखकाला झोडपलं गेलं असतं.

"या पानावर जाऊन पहा. किती ओंगळ आणि गलिच्छ लिहिलंय. अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना" असे संदेश विचारपुशीत दिले-घेतले असते.

"हा लेख विनोदी लेखन नावाखाली सरळ सरळ वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारा आहे. तेंव्हा तो काढून टाका आणि तो लिहणार्‍या व्यक्तीलाही मायबोलीवरून हाकलून द्या" असे संदेश अ‍ॅडमीनला गेले असते.

मायबोलीवरचं लेखन स्वातंत्र्य आणि लेखकाच्या मताशी प्रशासन सहमत असेलच असे नाही , हे लक्षात असतांनाही "मायबोलीसारख्या जाहीर संकेतस्थळावर असे विचार लिहूच कसे दिले" या वरून गदारोळ झाला असता.

एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं. ही साधी सोपी गोष्ट विसरली गेली असती.

मानववंशाच्या सुरुवातीपासून, जगाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात, स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील ही जीवशास्त्रीय/मानसशास्त्रीय गोष्ट बाजूला पडली असती.

खरंच असं झालं असतं? तुम्हाला काय वाटतं?

विषय: 
प्रकार: 

इथे काही जणा/णींनी अजय यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे लिहिलेय. मग ज्यांच्याकडून उच्च अपेक्षा केल्यात ते जर काही लिहिताएत तर त्यात काही तथ्य असले पाहिजे असे नाही का वाटत ?

<<< छे.. अजिबात नाही वाटत , उच्च आपेक्षा ज्यांच्या कडून असते त्यांच्याशी वाद होउ नयेत असं थोडीच आहे.. जे नाही पटत ते नाही म्हणजे नाहीच पटत, केवळ समोर आयडिअल व्यक्ती आहे म्हणून त्याच्या बोलण्यात तथ्य असलं पाहिजे असं मला नाही वाटत !
ज्याला मानतो त्या व्यक्तीच्या सगळ्याच विचारांना अनुमोदन देणे किंवा मतभेद झाले तर मी माझी मतं तपासून बघायची गरज नाही, जे माझं प्रामाणिक मत आहे ते तसच रहाणार, समोर आई बाबा जरी असले तरी वाद घालतोच कि आपण( मी तरी) एखादी गोष्टं नाही पटलं तर :).
असो.. बाकी कंपुबाजी मी करत नाही त्यामुळे मी फक्त स्वःत बद्दल लिहिलं.
'संयुक्ता' गृप ला कंपु म्हणत असाल तर तिथे सुध्दा माझं प्रत्येक व्यक्तीशी मतं जुळतील असं नाहीच, त्यामुळे मी माझ्या मतां बद्दल लिहु शकते.

> आता हाही मुद्दा नसेलच तर माझ्यासारख्या लोकांना समजेल असे सोप्या शब्दात या लेखाचा नेमका पॉइन्ट काय आहे ते सांगाल का Happy

हो, अजयचा पवीत्रा थोडाफार ambiguous आहे. त्यामुळे असा गोंधळ होणे स्वाभावीक आहे.

कुणाकडुन अपेक्षा असणे आणि त्याचा भंग झाला असे वाटल्याने तसे बोलुन दाखवणे याला (नेहमीच अथवा सरसकटपणे) असहिष्णुता म्हणता नाही येणार (मला तरी). खास करुन जर त्या अपेक्षा brand वर (साच्यावर) आधारीत नसतील तर.

मायबोलीवरचे प्रतिसाद आणि सहिष्णूता हा लेखाचा विषय आहे.

हा कुठल्याही प्रयोगाचा/प्रकल्पाचा/अभ्यासाचा भाग नाही. एक वेगळा विषय, वेगळ्या पद्धतीने सुरु करून त्यावर चर्चा व्हावी हा उद्देश होता. पण हा घ्या विषय आणि आता चर्चा करूया म्हणून चर्चा सुरु झाली नसती. म्हणून एक वादाचा मुद्दा घेऊन त्याला आलेले प्रतिसादच त्या चर्चेसाठी, उदाहरणासाठी वापरले गेले आहेत.

एका लेखनाला आलेल्या प्रतिसादातून दिसणारी सहिष्णूता आणि जर विषय बदलला (म्हणजे पूर्ण बदलला नाही तर पुरुषांच्या ऐवजी स्त्रीया) तर त्या प्रतिसादांमधे काय बदल होऊ शकेल या बद्दल कल्पना करून ही चर्चा सुरु केली.

विषय प्रतिसादांबद्दल आहे (मूळ लेखाबद्दल नाही) हे पहिल्या पानावर अगदी स्प्ष्ट केले आहे
>माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल. किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.

म्हणजे मी आधी भलते सांगितले आणि नंतर गाडी रूळ बदलत गेली असे केलेले/झालेले नाही. इतर मायबोलीकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ते तसे वाटू शकते.

मूळातला विषयच प्रतिसादांबद्दल आहे. त्यामुळे जसे प्रतिसाद येत गेले आणि त्यातले विषयाला अनूसरून होते त्याला जसे जमले तसे उत्तर देत गेलो.

मायबोलीवरचे प्रतिसाद आणि सहिष्णूता
- विषयाप्रमाणे सहिष्णूततेत, प्रतिसादात दिसणारे बदल
- लेखकाप्रमाणे सहिष्णूततेत, प्रतिसादात दिसणारे बदल
- आपल्या मित्राच्या/मैत्रीणीच्या समर्थनासाठी दिसणारे बदल
- वाचकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे प्रतिसादात दिसणारे बदल
- प्रतिसाद देताना, कुठल्याही प्रकारचे उत्तरदायित्व (Accountability) नसल्यामुळे दिसणारे बदल
- या चर्चेतून मला जे कळतंय तेच इतरांनाही जाणवतंय का माझं Interpretation चुकतंय
- या बदलातून आपण काय शिकू शकतो (शिकलेच पाहिजे असे नाही)

आतातरी या सगळ्या चर्चा-उपचर्चा विषयाशी निगडित आहेत असं दिसतंय का अजूनही गोंधळ आहे माझ्या लेखनात?

>>>आतातरी या सगळ्या चर्चा-उपचर्चा विषयाशी निगडित आहेत असं दिसतंय का अजूनही गोंधळ आहे माझ्या लेखनात? <<<
अजिबात नाही. पहिल्यापासुनच याबद्दल मला शन्का नव्हती (जी आयडी पक्षी माझ्या नजरेसमोरील व्यक्तिबद्दल होती ती आधीच मान्डली आहे)
वरील मुद्दे दिल्याने मात्र अधिकच स्पष्टता आली आहे, विषय समजण्यास (व खरे तर विषय व एकुणच मायबोलिवरील स्वतःच्या वावराचे [ज्याने त्याने] आत्मपरिक्षण करण्यास) ते सहाय्यभुत ठरत आहेत.

बापरे! केवढी चर्चा!
वाचुनच काही समजेनासे झालेय मला!
असो. चालु द्या!
मला पुरुषमय स्वप्न फार पटले असे नाहे पण ठीक वाटले आणि एखाद्याने 'स्त्रीमय स्वप्न' लिहीले असते तरी फारसा फरक पडला नसता कारण वाचायचे की नाही हे माझ्या 'क्लिक' वर अवलंबुन आहे!

अजय , हो आता हे पोस्ट पुरेसे स्पष्ट आहे Happy
पण हा घ्या विषय आणि आता चर्चा करूया म्हणून चर्चा सुरु झाली नसती >>>>> उलट मला वाटते की पहिल्याच पोस्ट मधे हा शेवटचा पॅरा लिहिला असता तर (माझ्यासारख्यांना ) बेष्ट झाले असते !! चर्चेने इतका ट्रॅक सोडला नसता आणि उलट जास्त चांगली पॉझिटिव्ह चर्चा झाली असती - हे माझे मत. असो .

अजय... नाही पटले..
इथे मायबोलीवर अनेक पुरुष आयडीनी आपल्या लेखात/कवितेत स्रि किंवा बायको या विषयावर अनेक विनोद केले आहेत आणी सर्वानीच ते खेळकरपणे घेतले आहेत.. माझ्यामते एखाद्या लेखात काय लिहले आहे याच्याबरोबरच ते लिहण्याचा त्या व्यक्तीचा उद्देश काय आहे हे महत्वाचे आहे.. निखळ विनोदाला इथे भरभरुन प्रतिसाद मिळतात पण काही आयडींचे स्रिविषयक लिखाण हे पुर्वग्रहदुषीत पुरुशी अहंकार किंवा पुरुशीवर्चस्वभारीत असते... या असल्या लिखाणावर टोकाचे प्रतीसाद किंवा टीका होणे साहजीकच आहे...
म्हणुन लेख कोणी आणी कोणत्या उद्देशाने लिहला आहे यावरच माबोवर प्रतिक्रिया मिळतात.... Happy

निखळ विनोदाला इथे भरभरुन प्रतिसाद मिळतात पण काही आयडींचे स्रिविषयक लिखाण हे पुर्वग्रहदुषीत पुरुशी अहंकार किंवा पुरुशीवर्चस्वभारीत असते... या असल्या लिखाणावर टोकाचे प्रतीसाद किंवा टीका होणे साहजीकच आहे...
>>
राम
पण विषय तोच चालु आहे की "intentions" महत्वाचे का "effect" महत्वाचा कारण
१) विचारस्वातंत्र्य हा प्रत्येक स्त्री-पुरुषाचा मुलभुत अधिकार आहे.
२) विचारांवर कोणाचा ताबा नसतो पण क्रूतीवर असतो.
अजय इथे विचारतात आहेत की त्यांनी अ‍ॅडमिनचे काम कसे करावे आणि हे करताना आपल्यावर स्त्रियांच्या भावनांची मुस्कटदाबी करणारा म्हणुन प्रदुषित नजरेने पाहिले जाणार नाही ना या बद्दल शंका विचारताहेत (असे मला जाणवले )?

प्रतिसादातील सहिष्णुतेबद्दल त्यांनी वर लिहिलेच आहे. "admin" ला प्रतिसादात असहिष्णुता वरील कारणांसाठी आढळली.
मायबोलीवरचे प्रतिसाद आणि सहिष्णूता
- विषयाप्रमाणे सहिष्णूततेत, प्रतिसादात दिसणारे बदल
- लेखकाप्रमाणे सहिष्णूततेत, प्रतिसादात दिसणारे बदल

- आपल्या मित्राच्या/मैत्रीणीच्या समर्थनासाठी दिसणारे बदल

- वाचकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे प्रतिसादात दिसणारे बदल
- प्रतिसाद देताना, कुठल्याही प्रकारचे उत्तरदायित्व (Accountability) नसल्यामुळे दिसणारे बदल

यात मला वाटले वर दिलेले ३ जे मी ठळक केले आहेत ते "allowed" आहेत पण योग्य असतीलच असे नाही.

>>
मणिकर्णिके
तुझा लेख छान होता यात शंका नाही पण हे सर्व चालले आहे ते बर्याच इतिहासावरुन चालले आहे तुमच्या लेखावरुन नाही.
तुमच्या लेखात खालील काही वाक्ये आहेत की तिचा अर्थ स्पष्ट नाही.
>>
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
>>
हे तुम्ही साधेपणाने लिहिले आहे पण अर्थ हा काढ्ण्यावर असतो. तुमच्या कंपुतील माणसे हे साधे पणाचे म्हणतील विरोधी ह्याला अयोग्य लेखन म्हणतील आणि दोघेही बरोबर आहेत.
जर एखाद्या पुरुषाने इथे असा महाल बान्धला असता आणि तुम्हाला जसे मिशावाले स्टड आवडतात तसे त्याने फिगर सांगुन दास्या ठेवल्या असत्या. तुम्ही डेनीम चेक्सचा शर्ट घातलेला पट्टदास ठेवला तसा लाल मिनी स्कर्र्ट ब्लाउज घालणारी पट्टदासी ठेवली असती तर मायबोलीवर नक्केच गदारोळ उडला असता हे अजय यांचे म्हणणे सत्य आहे.
प्रश्ण असा आहे की अशा wide range च्या वाचकवर्गाला सांभाळताना सहिश्णुता किती ठेवायची.
"intentions" कसे जज करायचे?

निलिमा, मनातलं लिहीलत. Well explained too!
पुरुषांबद्दल माणिकर्णिकांनी ज्या आशयाचा लेख लिहीला, तसाच जर निलीमा म्हणतायत तसा बायकांवर आला तर काय असा प्रश्न आहे.

अजय, वर कोणीतरी लिहीलय (मैत्रेयी बहुतेक) की पुरुषांबद्दल आणि बायकांबद्द्ल असे लेख हे अ‍ॅपल्स टु ऑरेंजेस कंपॅरिजन केल्यासारखं आहे, जे बरोबर आहे. पुरुषानी इनोसंटली जरी असं काही लिहीलं, तरी ते झोडपले जातील, पण मग कोणाचं चुकलं, त्या पुरुषाचे की त्याला झोडपणार्‍यांचे?

मी माझ्या पोस्टीत आधी लिहीलय की तुमचा प्रश्न रास्त आहे पण लिहीणारा पुरुष (माझ्या उदाहरणातला) जर झोडपला गेला तर त्याला झोडपणार्‍यांनी असहिष्णुता दाखवली असं नाही म्हणता येणार. सहसा लोकं त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवरुन त्यांचे विचार साकारुन मग इथे पोस्टतात, त्यामुळे तुमचे लिखाण (ह्या उदाहरणात स्त्रीयांविषयी) प्रत्येक वेगळ्या स्वभावाच्या, वैचारीक पातळीच्या स्त्रीला डोक्यात ठेवून लिहीले गेले आहेत का हे तपासायला नको का? की तुमची अपेक्षा इथे वाचत असलेल्या स्त्रीयांकडून सहिष्णुता दाखवत "बापडया अगदीच अनजान आहे" असं समजून सोडून द्यायचा असा आहे?
बाकी कुठल्याही बाबतीत हे होऊ शकेल पण स्त्रीयांबाबत विचारांच्या किंवा लिखाणाच्या बाबतीत ते व्हायला अजून खूप काळ जावा लागेल.

मणिकर्णिका आणि त्या निमित्ताने लिहिले गेलेले विनोदी लेख, कविता आणि अजय यांचा लेख आणि दोन्हींवरचे प्रतिसाद पहिल्यापासून वाचते आहेच... फक्त काही विशेष लिहिले मात्र नव्हते... निलिमाचा प्रतिसाद अतिशय आवडला. इतका वेळ लिहिण्याच्या बाबतीत टाळाटाळ केलेले माझे मत आता मांडावेच, असे वाटले म्हणून लिहिते आहे.

अजय यांचे प्रश्न अतिशय योग्य आहेत. अशी पुरुषमय स्वप्ने खेळकरपणे घेतांनाच स्त्रीमय स्वप्ने मात्र टीकात्मकपणे घेतली जातात हा रडीचा डाव आहे असे मलाही वाटते. तसेच कोणाच्याही लेखनाचा त्या व्यक्तीच्या मायबोलीवरील प्रतिमेवरुन निवाडा करणे हे अतिशय दुखावणारे आहे, हे कोणीही मान्य करेलच... कंपूबाजीचा उपयोग फक्त आपल्या कंपूतील व्यक्तीला मानसिक बळ देण्यासाठी व्हावा असे वाटते. दुसर्‍यावर ताशेरे ओढण्यासाठी कंपूने चाल करणे भ्याडपणाचे आणि वाईटच... पण ते बदलणे आपल्या हातात नाही, तेंव्हा त्यावर अजून काय बोलायचे?

पण एका बाबतीत दृष्टीकोन बदलता आला, तर सर्वांसाठीच हितावह होईल... ती गोष्ट प्रतिसादांविषयीची नसून स्त्रीमय आणि पुरुषमय स्वप्नांविषयी आहे. सहचारिणी स्त्री कडे घरकाम करणारी एक व्यक्ती म्हणून पाहून स्वप्नरंजन करणे आणि पुरुषाकडे एक अंगरक्षक म्हणून पाहून त्यापद्धतीने त्याच्या पुरुषी व्यक्तीमत्वावरुन स्वप्नरंजन करणे ह्या दोन्हींमध्ये फक्त उथळ, वरवरचा विनोद आहे. दोन्हीही समर्थनीय नाहीच... तसेच पुरुषांनी आणि स्त्रीयांनी भारतीय संस्कृतीनुसार त्यांना मिळालेल्या, पूर्वापार भूमिकांना इन्टरचेंज करुन विनोदनिर्मितीचा प्रयत्न केला, तर तोही बालिशच... त्यामुळे अशा विषयांवरील चांगल्या आणि वाईट- दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांना फारसे महत्व देण्याचे काहीही कारण नाही.

अजय, वर कोणीतरी लिहीलय (मैत्रेयी बहुतेक) की पुरुषांबद्दल आणि बायकांबद्द्ल असे लेख हे अ‍ॅपल्स टु ऑरेंजेस कंपॅरिजन केल्यासारखं आहे, जे बरोबर आहे. पुरुषानी इनोसंटली जरी असं काही लिहीलं, तरी ते झोडपले जातील>>मला नाहि वाटत सरसकत धोपटणे होईल. इथे biased prejudice (wrong or right is different matter) येईल. लिहिणारा कोण आहे नि त्याचा काय उद्देश आहे ह्यावर प्रतिक्रिया ठरेल (इथे मी सर्वसामान्य प्रतिक्रिया म्हणतोय. मुद्दामहून खोचक, जाचक, instigate करणार्‍या प्रतिक्रियांबाबत म्हणत नाहिये)

निलीमा... छान पोस्ट... आणी वैद्यबुव्वा म्हणतात तसे वेल एक्सप्लेन्ड.. Happy
इथेच असे नाही पण विचारस्वातंत्र्य हा भारतात सर्वत्र मुलभुत अधीकार आहे, पण या अधीकाराचे आणी अधीकाराबरोबर येणार्‍या जबाबदारीचे भान प्रत्येक स्रि पुरुशाला असलेच पाहीजे... Happy
मला इथे इंटेंशन्स जास्त महत्वाची वाटतात... काही काही विषयांवर इथे काही आयडी जाणीवपुर्वक म्हणजे वाद घालण्यासाठी काही काही सेंसीटीव्ह विषयांवर मतप्रदर्शनाच्या नावाखाली पिंका टाकत असतात... मग तो स्रि,पुरुश, रुढी अंधश्रद्धा, ब्राम्हण ब्राम्हणेतर, हिंदु मुसलमान वगैरे कुठलाही विषय असुदे..
एखादा आयडी विचारस्वातंत्र्याचा गैरफायदा घेउन काहीही उथळ, अश्लील, पोस्ट लिहीत असेल तर त्याला होणारा विरोध हा असहीष्णु आहे का सहीष्णु हा मुद्दाच होउ शकत नाही... यात आता परत या पोस्ट चांगल्या का वाईट हे व्यक्तीसापेक्ष असते असा एक भाबडा युक्तीवाद कायम केला जातो..

इथे अजय यांचा मुद्दा असा आहे की असे लिखाण एखाद्या पुरुश आयडीने केले असते तर कशा प्रकारच्या प्रतिक्रीया आल्या असत्या म्हणजे त्याना असे म्हणायचे आहे की मणीकर्णीका या स्रि आयडीने असे लिखाण केले म्हणुन सहिष्णु प्रतिक्रीया आल्या किंवा काहीनी प्रतिक्रीया आल्याच नाहीत... जे मला पटले नाही...

मला वाटते अजयला ज्या विशयावर चर्चा करायची होती, प्रतिसादातील सहिष्णुता, त्या विशयाकरता मणिकर्णिकाचा लेख वानगीदाखल घेणे दिशाभुल करणारे व काही अंशी चुकीचे होते.

स्त्रीयांचे स्वातंत्र्य हा विषय लाईटली ग्यायचा होउ शकत नाही. मणिकर्णिकेचा लेख मला विनोदी पेक्षा करूण वाटला. अन्यायाचा सुड घेणे ही मानवी भावना त्यामगे कुठेतरी खोल (तिच्याही नकळत असावी)असावी निदान त्या लेखात तरी मला पुरुषाचे ओब्जेक्टीफिकेशन हे केवळ उपभोगासाठी असे वाटले नाही. म्हणुन मला तो लेख खटकला नाही.
स्त्री स्वतंत्र होताना समाजात रुजलेले / असलेले अन्याय पुढे चालवणार नाही ह्याची खात्री नाही इतकेच मला माझ्या अभिप्रायातून निर्दशवायचे होते.

हाच लेख पुरुषाने लिहिला असता तर ते स्त्रीचे ओब्जेक्टिफिकेशन केवळ भोगवस्तू म्हणुन झाले असते. त्याला कुठलाही रेडिमिंग पैलु सामाजीक स्तरावर नसता म्हणुनच ते जास्त घातक व निशेढाला (असहिश्णु प्रतिसादाला ) पात्र ठरले असते. (असहिश्णु प्रतिसाद लेखाला लिहिणार्याला वैयक्तीक नाही). अशा प्रकारचा निशेध मागे एका कवितेला सुधा मी केला होता (देहाचि दालचिनि वैगेरे). त्याच कवितेवरील चर्चेत बर्याच स्त्रियांना तो उल्लेख खटकलेला नव्हता हे सुधा नमुद केले पाहिजे.

सहिश्णु असहिश्णु प्रतिसाद हे पब्लिक फोरम्वर गृहितच आहेत. कुठल्याही गोश्टित / घटनेत / घतना क्रमात पॅटर्न शोधणे हे नैसर्गीक आहे असे वाटते. जेंव्हा 'अजय तुझ्या कदून ही अपेक्षा नवती' असे वाक्य उचारले (लिहिले) जाते तेंव्हा वाचकाला अभिप्रेत पॅटर्न मोडलेला असतो इतकेच. ह्यात जबाबदारी लेखकाची नसुन वाचकाची असते इतकेच. ह्यात मला काहीच घातक वैगेरे वाटत नाही. त्यातुनही हा लेख अ‍ॅडमिन अजय ने लिहिलेला आहे तेंव्हा तो वेगळ्या कोंटेक्ट मधे वाचला जाणारच कारण तुझ्या विचारांचा/लेखाच्या काही इंप्लिकेशन्स असु शकतात.

ह्या ठिकाणि मला अस्चिगचा मुद्दा पटतो. अभिप्राय पुर्वग्रह दुशीत असु नयेत असे वाटत असेल तर लेख काही दिवस निनावी पणे प्रसिद्ध करण्याचि लेखकाला सोय असावी.

वाद , संवाद आणि वितंडवाद यातला फरक कुणी मला सांगेल का ?

>>
१) जो आपल्या कंपुच्या आतमध्ये होतो तो संवाद .
२) जो आपल्या कंपु आणि विरोधी कंपुमध्ये होतो तो वाद.
३) जो आपल्या विरोधी कंपुच्या आतमध्ये होतो तो वितंडवाद .

दिवे घ्या!
वैद्यबुवा, सानी, राम, पेशवा सर्वांना धन्यवाद!

nilima_v ,

बरोब्बर! वेल एक्प्लेन्ड!

प्रसादपंत ,

>>इथे लोक साहित्याला प्रतिसाद देत्तात की साहित्यिकाला ?
Happy साहित्यिकाला असेही म्हणू शकतो बहुधा .

>मला वाटते अजयला ज्या विशयावर चर्चा करायची होती, प्रतिसादातील सहिष्णुता, त्या विशयाकरता मणिकर्णिकाचा लेख वानगीदाखल घेणे दिशाभुल करणारे व काही अंशी चुकीचे होते.

पेशवा , थोडं स्पष्ट करून सांगणार का कारण त्यामुळे कशी दिशाभुल झाली आणि चूक झाली? मला ख्ररच समजत नाहीये.

>जेंव्हा 'अजय तुझ्या कदून ही अपेक्षा नवती' असे वाक्य उचारले (लिहिले) जाते तेंव्हा वाचकाला अभिप्रेत पॅटर्न मोडलेला असतो इतकेच.

पण वाचकाला नेमका कोणता पॅटर्न अभिप्रेत आहे आणि तो कसा मोडलाय हे कसे कळणार. कमीत कमी आता तो मोडल्यावर तरी कळू शकेल का? मला खरोखर जाणून घ्यायची इच्छा आहे. नाहीतर मला माझी चूक (असली तर) कशी सुधारता येणार? "तुझे म्हणणे पटले नाही" हा प्रतिसाद मी समजून घेऊ शकतो. पण "अपेक्षा नव्हती" म्हटल्यावर काय अपेक्षा होती ते कळत नाहीये अजूनही.

मी एकदा कुठली तरी बाजू घेतली की कुणाचा तरी अपेक्षाभंग होणारच. मग मी कुठल्याच वादग्रस्त मुद्यावर मला मनापासून लिहावं वाटलं तरी, मायबोलीवर लिहू नये असे अपेक्षित आहे का?

>मी एकदा कुठली तरी बाजू घेतली की कुणाचा तरी अपेक्षाभंग होणारच. मग मी कुठल्याच वादग्रस्त मुद्यावर मायबोलीवर लिहू नये असे अपेक्षित आहे का?

असं अजिबात नाही. मी बरेचदा विचार केला, की अ‍ॅडमिन फक्त बीबी बंद करायलाच का येतात? त्यांचं मत का व्यक्त करत नाहीत?? Happy तुमची मतं तुम्हीही दिलीच पाहिजेत. नाहीतर उपयोग काय?

>मी एकदा कुठली तरी बाजू घेतली की कुणाचा तरी अपेक्षाभंग होणारच
बरोबर! तुम्ही लिहा राव मतं तुमची. (आम्ही ही लिहूच Proud सहमती/असहमती )

आधीच्या बर्‍याचशा पोस्ट्स पाहुन मला नाही वाटत, अजय तुम्हाला जे सांगायचं आहे ते अजुन तरी लोकांपर्यंत पोहोचलयं किंवा पोहोचलं असलं तरी त्यांनी ते अ‍ॅक्सेप्ट केलयं.
कुणास ठाऊक कदाचीत हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल ?

अहो पेशवे,
"त्या लेखात तरी मला पुरुषाचे ओब्जेक्टीफिकेशन हे केवळ उपभोगासाठी असे वाटले नाही. "
त्यांना दारू प्यायल्यावर त्यांची फर्माईश पुरी करणारा जास्तीचे पैसे देऊन ठेवायचाय. यात ओब्जेक्टीफिकेशन नाही येत?

बाकी तुमचं चालू द्या.

खरे तर हा लेख(मणिकर्णिका ह्यांचा) मी इथली चर्चा वाचून प्रथमच वाचला तेव्हा मला तरी आवडला नाही.
ह्यात वर वर ऑबजेक्टीफिकेशन (काय कठिण आहे हे मराठीत लिहिणे) आहेच व तसे दाखवले गेलं तरी मला सुद्धा पेशवा ह्यांनी म्हटल्याप्रमाणेच जाणवले होते. विनोदी तर बिलकूल नाही आहे मूळ लेख. मत तिथे दिले नाही कारण द्यावेसे वाटले नाही. पण इथे चर्चा चालली म्हणून लिहिले.
लेखात वाईट काहिच न्हवते. पण अशी निव्वळ कल्पना करणे म्हणजे, बदल्याची भावना(बदले की आग टाईप) असेच मलासुद्धा वाटले. तसे लेखिकेला नसेल हि वाटले व ते कारण/उद्देशाने नसेलही लिहिले पण जसे प्रत्येकाचा नजरिया/सोच असते तसेच हे.
विचार करा ना, आपण कोणाही माणसाला आपल्या हाताखाली असे वागवायची स्वप्ने का बघतो? रोजच्या आयुष्यातले एक गमतीदार उदाहरण द्यायचेच झाले तर, कधी कधी एखाद्याला स्वतःच्या अतिशय जुलमी अश्या बॉसचा राग येतो.. मग आपल्या मनात येते.. *ला, हा मला काय नोकर समजतो काय.. मग उगाच मनात येते माझी पत असती तर मी ह्याला नोकरीला ठेवेन.. तसेच मला मणिकर्णिका ह्यांचे लिखाण वाटले.

जर पुरुषाने असाच लेख लिहिला असता तर प्रतिक्रिया ह्या खालील तत्वावर ह्याच क्रमाने येतील माझ्यामते,

१) लिहिणारा पुरुष कोण?
( समजा आधीच ह्या पुरुष आयडीने आपली मुक्ताफळं(खास करून वाईट) झाडली असतील त्याच्या लेखाद्वारे तर इतर जणं अगदी युद्ध पातळीवर उतरतात, त्यात विशेष म्हणजे अश्या लेखकाने(इथे पुरुषाने असे लिखाण केले असते तर आहे म्हणून .. लेखक) जर स्त्री विषयी तीव्र मतं जाहिर केली असतील तर होतेच. एक दोन ओळी वाचूनच हमरीतुमरी होतेच/होइल.(असे निरिक्षणात दिसलेय). पण पुन्हा हि हमरातुमरीची जबाबदारी काहि "विशिष्ट" आयडीच घेतात कारण त्यांच्या मते ते समाजसुधारक असतात व त्यांनी हि जबाबदारी 'घेतलेली' असते. मान्य आहे, मुद्दे/लेखाचा सुर चुकीचा असतो तसा पण प्रत्येक जण(लेखक) आपल्या आकलनशक्ती/ज्ञानाप्रमाणे लिहिणार हे विसरले जाते. आकलनशक्ती ला पर्यायी शब्द 'अक्कल' आहे हे इथेच शिकले मी. Wink तेव्हा अक्कल काढली जाते लेखकाची पण काहि स्त्रि-आयडी मात्र पालथा घडाटाईपचे लिखाण म्हणा वा तीव्र स्त्रीविरोधी लिखाण्-लेखकाचे मुद्दे शेवटपर्यंत समंजसपणे समजवून घेवून उत्तर हि देतात ते हि दिसते. तेव्हा हे व्यक्ती तितक्या प्रव्रूती असेच आहे.

'पालथा घडा क्लब' खूपच असहिष्णु नाव वाटते म्हणून इथून पुढे 'तीस्त्रीविलिले' असे म्हणूया. Wink जोक्स अपार्ट, लिहायला सोपे म्हणून असे म्हणूया.

२ a)उद्देश
पुरुष लेखक जर "तीस्त्रीविलिले" असेल तर इतर आयडी/कंपू चाकू सुरे आधीच काढून मगच अश्या लेखकाचे लेख/पान उघडून वाचले जाण्याची शक्यता ज्यास्त असते कारण एकच, "पुर्वानुग्रह". मग उद्देश वगैरे लक्षात कमीच घेतला जातो. कारण आयडी बघून डो़क्यात तशीही आधीच कळ गेलीय तर उद्देश बघून काय फायदा. ;)(असे सर्वजण करत नाहीत. (This is one of the highest probability)

2 b) लेखक व उद्देश
नवीन लेखक असेल तर कुतुहलाने लेख वाचले जातात. कमीत कमी , ह्या लेखकाने काय तारे तोडलेत म्हणून लेख पुर्ण(जमल्यास पुर्ण) वाचून बर्‍यापैकी उद्देश समजवून घ्यायचा एक निष्फळ प्रयत्न केला जातो. समजले नसले तरी, समजले आहे असे दाखवून काहितरी मताची पिंक टाकली जाते. Wink
मग त्यात, बराय लेख, पु.ले.शु असे प्रतिसाद तरी येतात. कधी कधी फालतु आहे असे सुद्धा येते. कधी कधी तर, खूप मनातले लिहिले तरी नक्की काय कळले नाही असाही प्रतिसाद येतो. डोके फिरले का?, बरळू नकोस वा मुर्खपणा आहे अश्या प्रतिक्रिया येत असतील तर मला माहिती नाही. मी काहि लेखन/कविता विभागात जात नाही. Wink
हां, एकदा दालचिनी-चहा वर 'हकला रे याला' अशी एका पुरुष आयडीची त्या कवीला(पुरुष आयडीला) दिलेला प्रतिसाद वाचलेला आठवतोय. पण आपल्याला काहिच कळले नाही की आपण प्रतिसाद देत नाही. Happy
ह्यात कोणाही आयडीची वाईट/चांगली प्रतिक्रिया असे नमूद नाहि करायचेय हे लक्षात घ्या.

त. टि: हे निरिक्षण आहे. कोणावरही शेरे नाही मारलेत.

प्रश्ण जर हाच असेल की , असे वादंग करणारे लेख उडवायचे/नाही उडवायचे असतील तर त्यांनी फक्त "लेखाचा उद्देश" फक्त बघावा , लेखक कोण आहे, आयडींची प्रतिक्रिया/प्रतिसाद काय आहे हे दुय्यम असावेत व सुज्ञ तो निर्णय स्वतः घ्यावा. अबक आयडीने/कंपूने तक्रार केली अ‍ॅडमिन विपूत म्हणून उडवायचा नाही. Wink

शेवटी काय अ‍ॅडमिनला पॉवर हाय, आमाला पॉवर नाय. Happy

हो, आणि सध्याचे वारे बघता तरी कोणाही पुरुष आयडीने 'स्त्री' वर लिहिण्याच्या आधी दहादा विचार करावा. Wink

शेवटी काय अ‍ॅडमिनला पॉवर हाय, आमाला पॉवर नाय.

>>> पालथा घडा क्लबचा वारंवार उल्लेख येतोय म्हणुन , आणि वरील वाक्याच्या संदर्भाने एक गोष्ट आठवली .
.
मागे एका लेखावर "एक ज्येष्ठ व्यक्ती" पालथा घडा क्लबची सदस्य आहे , किमान त्या व्यक्तीने तशी कॉमेन्ट दिली आहे हे मी दाखवले होते ..
.
तो प्रतिसाद अ‍ॅडमीनने/ वेबमास्तरांनी डीलीटला होता ...ते का कळेल का ?
( अर्थात "काही ज्येष्ठ व्यक्तींना" आपल्या वादात ओढायची मनाई आहे असे मी तेव्हा गृहीत धरुन तो विषय सोडुन दिला होता ....तेच उत्तर परत स्विकारायला माझी हरकत नाही )

प्रगो, ते वाक्य लिहून मला इतकेच म्हणायचे की, अ‍ॅडमिनचा हक्क 'अ‍ॅडमिन' म्हणून
मान्य केलेलं बरे असे मला वाटते. बाकी कुठलाही अर्थ अपेक्षित मला न्हवता. नाहितर उगाच त्याच्यावर वाद.

ध्वनी कोणताही वाद नाही ! दुसरा अर्थ काढला नाहीये !
अ‍ॅडमिनचा हक्क 'अ‍ॅडमिन' म्हणून मान्य केलेलं बरे >>> मान्यच आहे ! न मानणार कोण आहे इथे ?

( हे असं असतं ...एकदा कानफाट्या नावपडलं की कानफाट्याच म्हणतात सगळे . सरळ साधा प्रस्नं विचारला तरी त्यातुन भलते वाद निर्माण व्ह्यायची भिती वाटते ! हाच प्रश्ण मी माझ्या " सोज्वळ " डु आय ने व्हिचारला असता तर हा गैरसमज कदाचित झाला नसता )

Pages