'पुरुष’मय स्वप्न च्या निमित्ताने

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

निमित्त आहे मणिकर्णिका यांचं ’पुरुष’मय स्वप्न हे विनोदी लेखन !

सगळ्यात महत्वाचं. हा लेख मायबोलीवर आहे यात काहीच वावगं नाही. हा लेख इतर अनेक वाचकांना आवडला तसा मलाही आवडला.

हा लेख विनोदी नसता तरी तितकाच योग्य आहे. एका व्यक्तीला वाटलेलं स्वप्न, विचार तिने हवे तसे मांडले. आणि माझ्यासकट अनेक वाचकांना ते तितकेच आवडल्याचंही दिसतंय.

माझा मुद्दा आहे त्यावर आलेल्या प्रतिसादांबद्दल.

किंवा त्यापेक्षाही त्यावर न आलेल्या प्रतिसादांबद्दल.

हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर काय झालं असतं?

स्त्रीला एक भोग्य वस्तू म्हणून समजलं जातंय याचा निषेध करणारे अनेक प्रतिसाद आले असते.

विनोदी लेखन या नावाखाली काय वाटेल ते खपवता का असं त्या लेखकाला झोडपलं गेलं असतं.

"या पानावर जाऊन पहा. किती ओंगळ आणि गलिच्छ लिहिलंय. अजूनही स्त्रीयांकडे घाणेरडं बघण्याची दृष्टी जात नाही. चपलेंनं फटके मारले पाहिजे अशा लोकांना" असे संदेश विचारपुशीत दिले-घेतले असते.

"हा लेख विनोदी लेखन नावाखाली सरळ सरळ वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारा आहे. तेंव्हा तो काढून टाका आणि तो लिहणार्‍या व्यक्तीलाही मायबोलीवरून हाकलून द्या" असे संदेश अ‍ॅडमीनला गेले असते.

मायबोलीवरचं लेखन स्वातंत्र्य आणि लेखकाच्या मताशी प्रशासन सहमत असेलच असे नाही , हे लक्षात असतांनाही "मायबोलीसारख्या जाहीर संकेतस्थळावर असे विचार लिहूच कसे दिले" या वरून गदारोळ झाला असता.

एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले आहेत आणि त्याची किंमत तेवढ्यापुरती. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, इतरांनी दूर्लक्ष करावं. ही साधी सोपी गोष्ट विसरली गेली असती.

मानववंशाच्या सुरुवातीपासून, जगाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात, स्त्री पुरुषांबद्दल आणि पुरुष स्त्रियांबद्दल वेगवेगळ्या पातळीवर फॅन्टसाई़झ करत आले आहेत, करत राहतील ही जीवशास्त्रीय/मानसशास्त्रीय गोष्ट बाजूला पडली असती.

खरंच असं झालं असतं? तुम्हाला काय वाटतं?

विषय: 
प्रकार: 

होतं काय की ऑनलाईन लिहताना नुसती लेबलंच नाही तर त्याही पलिकडे जाऊन कृती करणं आणि त्याच्या परीणामांबद्दल काहीही देणंघेणं नसणं हे इतकं सोपं आहे की माणसातला खलनायक त्याचा नकळत जागा होतो. उद्या जर अशी टेक्नॉलॉजी निघाली घर बसल्या काही पुतळ्यांना डांबर फासायचं आणि नंतर होणार्‍या दंगलीचं काही देणंघेणं नाही तसं काहीस ऑनलाईन आयडीना करण सहज शक्य आहे.<<<
हे १००% मान्य.
मग उपाय काय आणि कसा?

नेमकं काय करावं? याचा 'पेच' कायम राहणार.
कारण डाव हाणून पाडून जिंकणारेही 'आपले'च आणि हारणारेही 'आपले'च.
घरबसल्या पुतळ्यांना डांबर फासणारी टेक्नॉलॉजी निघाली तर आपण पण व्हर्चुअल का होईना पण स्ट्राँग कव्हर शिल्ड टेक्नॉलॉजी शोधायला हवी ना.

एक ओव्हर खेळतो प्लीज

आपण ऑनलाईन कशासाठी येतो हा प्रश्न स्वतःला विचारून पहावा. विरंगुळा म्हणून यायचं कि गंभीर आणि वादग्रस्त विषयांवर रमायचं हे ज्याचं त्याचं ठरलेलं असतं. वादग्रस्त विषयांवर रमायचं म्हटल्यावर तीव्र / संयत/ आक्रस्ताळी प्रतिक्रियांना तोंड देणं आलंच. ऑनलाईन भल्या बु-या गोष्टी आल्याच. याची कल्पना नव्हती असं कसं म्हणता येईल ?

विरंगुळा कॅटॅगरीला असले प्रश्न पडण्याचं कारण नाही. लोक्स लेख, कविता लिहीत असतातच.. फुकट वाचण्याची सोय आहे तेव्हा चांगले वाटतील तिथं पाट्या टाकल्या तरी वेळ मजेत जातो असा अनुभव आहे. अधूनमधून टोप्या उडवायच्या. कुणाला नाही आवडलं तर त्याच्या वाट्याला पुन्हा जाणे नाही..

आपले आपले नियम ठरवले कि कोण काय करतं याला फारसा अर्थ रहात नाही.

हाच लेख एका पुरुष मायबोलीकराने 'स्त्री' मय स्वप्न असा लिहला असता तर <<< जर लिहिला असता तर काय झालं असतं हे नेमकं कसं सांगणार ? लेख कोण लिहितो ह्यावरही ते अवलंबून असतंच की.

पण मूळ लेखाप्रमाणेच एका पुरुष मायबोलीकराने असा लेख लिहिला [ (जे कठिण आहे!) बाकी मणिकर्णिकेचं 09:31 चं पोस्ट क्लिअर आहे!] असता तर त्या लेखकाला झोडपणं कठिण झालं असतं.

आगाऊस अनुमोदन Happy एक 'स्त्रीस्वप्न' लेख होउन जाउद्या.

>>त्यामूळे "तूझे चुकते आहे", "मूर्खासारखे बरळू नकोस" या प्रतिसादापेक्षा " तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" हा प्रतिसाद जास्त असहिष्णू आहे.

धन्यवाद धन्यवाद! या वाक्याबद्दल हवेत तेवढे बटाटेवडे. Happy

मी इथून 'हेमाशेपो' म्हणून गेले होते पण यासाठी परत आले. पहिल्या दोन वाक्यातल्या प्रतिक्रिया या उस्फूर्त आहेत. एखाद्याच्या ज्या त्या वेळच्या वक्तव्य, कृतीच्या अनुषंगाने त्या आल्या आहेत. त्या समोरची व्यक्ती कोण आहे हे अजिबात विचारात घेत नाहीत. त्यात "मूर्ख" इ. शब्द वेगळे काढले तर ऑफेन्डिन्ग आहेत, पण पूर्ण प्रतिक्रिया नाही. तिसरी प्रतिक्रिया अगदी उलट आहे. त्यात ती व्यक्ती कोण आहे, त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह, मते हे सगळे विचारात घेऊन ती केली आहे. इथे कोणी कोणाला इतके ओळखते असे मला वाटत नाही, मग हा प्रतिसाद कश्याच्या जोरावर? स्फोटक शब्द नसले म्हणजे प्रतिक्रिया सभ्य असते असे काही नाही. एक उदाहरण म्हणजे, " देवाने मला तुमच्यासारखे बनवायला नको". हे वाक्य मला अतिशय अपमानास्पद वाटते.

पण हे टाळता येण्यासारखे आहे का? माबोवर वा एकुणात? तर नाही. मला नाही वाटत पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहे..

याबद्दल नीधपला अनुमोदन. ज्यांना जाणीव होते ते टाळतील/टाळतातच. सर्वांकडून होईलच असे सांगता येत नाही. ते जाणूनबुजून करत असतील असेही नाही. कुठे आढळल्यास या लेखाची/चर्चेची लिंक देता येईल.

पण हे टाळता येण्यासारखे आहे का? माबोवर वा एकुणात? तर नाही. मला नाही वाटत पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहे..
याबद्दल नीधपला अनुमोदन. ज्यांना जाणीव होते ते टाळतील/टाळतातच. सर्वांकडून होईलच असे सांगता येत नाही. ते जाणूनबुजून करत असतील असेही नाही. >>>>> म्हणजे हे होतं किंवा होऊ शकतं हे तरी मान्य आहे ना ? Happy

अजय, नीधप, लालू ह्यांचे प्रतिसाद आवडले....

फार चर्चा करता तुम्ही सगळे, एवढे काय काय लिहून ठेवले आहे त्यातले बरेचसे झेपतच नाहीये.
मला आपला एक साधासा विनोद माहिती आहे तो लिहितो.
एकाला त्याचा जुना मित्र खुप काळाने भेटतो, गप्पा सुरू होतात, विषय लग्नाकडे वळतो.
मित्र याला विचारतो की, काय रे तू एकदम आदर्श मुलीशी लग्न करणार होतास ना ? मिळाली का कोणी ?
हा म्हणतो, हो एक सापडली होती, पण जमल नाही, मित्र विचारतो का ?
हा म्हणतो, अरे ती एकदम आदर्श मुलाच्या शोधात होती ! Happy

आज हे नीट वाचायला वेळ मिळाला.
आधी ह्या बाफचं प्रयोजन काय असेल असा विचार करत होते. मंजूडी इत्यादींनी लिहिल्याप्रमाणे मणिकर्णिकेचं लिखाण हे 'फॅन्टसी' आहे म्हणून मजेशीर वाटलं. याच्या उलट परिस्थिती पिढ्यान्पिढ्या वास्तवात आहे म्हणून ती मजेशीर न वाटता संतापजनक वाटते.

पेशव्याचं निरीक्षणही पटलं.

पण आत्ता अजयच्या
>> >>त्यामुळे "तूझे चुकते आहे", "मूर्खासारखे बरळू नकोस" या प्रतिसादापेक्षा " तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" हा प्रतिसाद जास्त असहिष्णू आहे.

या विधानाने मात्र खरंच विचारांत पडले. माझं या विधानाला पूर्ण विचारांती २००% अनुमोदन! Happy
आणि असा अन्याय आपण अजाणता कोणावर करत नाही ना याची यापुढे नक्की जाणीव राहील.

'मूर्खासारखे बोलू नकोस' ही लालू म्हणाली तशी तात्कालिक आणि तेव्हाच्या कृतीबाबतची प्रतिक्रिया असते, आणि त्यात प्रत्येकाने कधी ना कधी मूर्खपणा करण्याची शक्यता आणि त्याहीपेक्षा अधिकार गृहित धरलेला असतो.
'तुझ्याकडून अपेक्षा' हा भयंकर प्रकार आहे. आणि याला कमकुवत माणसं बळी पडलेली प्रत्यक्ष पाहिली आहेत. आपल्या बर्‍यावाईट/चूक-बरोबर पण स्वतंत्र विचारांशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आपली 'इमेज' महत्त्वाची वाटायला लागते ती अशाच विधानांमुळे.

बाकी आत्मपरीक्षण करायचं सोडून कंपूबिंपू विषय इथेही घुसडलेले बघून मजा वाटली. Proud

खरे आहे महेश!!! आणि हाच जोक पुरुषांनाही लागू पडतो... Happy

बर्‍याच पूर्वी असेच एक फॉरवर्ड आले होते.... फार धमाल होते.... २१ व्या वर्षी एका मुलाच्या आणि मुलीच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा फार असतात म्हणून ते एकमेकांना नकार देतात आणि त्यामुळे लग्न न जुळल्याने वयं वाढत जातात तसतशा या अपेक्षाही कमी कमी व्हायला लागतात आणि ३५ व्या वर्षी जेंव्हा त्यांची अपेक्षा फक्त जोडीदार यावर येऊन थांबते तेंव्हा हेच जोडपे एकमेकांना वरमाला घालते. Proud

आपले पोस्ट्स इथे जरा अवांतर वाटू शकतात... पण हरकत नसावी. Happy

पूर्वग्रह असणे टाळता येण्यासारखे नाही. का टाळावे तेही समजले नाही.

उदा. रामदेवबाबा व नरेन्द्र दाभोळकर एखाद्या मुद्द्यावर काय म्हणतील याविषयी आपल्या काहीएक अपेक्षा असतात. केवळ ते दोघे एक व्यक्ती आहेत म्हणून त्यांचे प्रत्येक वेळचे म्हणणे सुटे सुटे बघता येईल का?

एखादी नवी व्यक्ती मायबोलीसारख्या सार्वजनिक संस्थळावर लिहू लागते, तेव्हा अर्थातच काही पूर्वग्रह नसतात. पण थोड्याच दिवसात एकेका सदस्य नावाला व्यक्तिमत्व मिळत जाते. आणि इतरांच्या अपेक्षा तद्वत ठोस होत जातात. हे नैसर्गिक आहे. त्यात चुकीचे काय आहे?

थोड्याच दिवसात एकेका सदस्य नावाला व्यक्तिमत्व मिळत जाते. आणि इतरांच्या अपेक्षा तद्वत ठोस होत जातात. हे नैसर्गिक आहे. त्यात चुकीचे काय आहे?

हे नैसर्गिक आहे अगदी अगदी मान्य...
एखाद्या चेंडूवर अत्यंत खराब फटका मारून नेहरा आउट झाला तर आपण म्हणतो काय मूर्खासारखा फटका मारून आउट झालाय. पण हाच फटका सचिनचा असेल तर...
अरेरे सचिनकडून अशा फटक्याची अपेक्षा नव्हती...हेच उद्गार येतात ना.
मला वाटते की तुमच्या पोस्टमधुन, तुमच्या लिखाणातून तुमची एक व्हर्च्युअल इमेज तयार होत जाते. तुमची वाचली जाणारी प्रत्येक प्रतिक्रीया, लिखाण हे त्या इमेजला अधिक स्पष्ट करत जाते. त्यामुळे त्या इमेजशी विसंगत काही आले की ते लगेच खटकणारच. इथे अनेकजण असे आहेत की जे प्रत्यक्षात एकदाही भेटलेले नाहीत पण इथल्या त्यांच्या व्हर्च्युअल इमेज या त्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि ठराविक विषयावर ती इमेज काय करेल याचा अचून नसला तरी पुरेसा अंदाज त्याच्या मित्र-मैत्रिणींना, वाचकांना येतोच येतो. त्यात इतके खटकण्यासारखे काय आहे.

>> >>त्यामुळे "तूझे चुकते आहे", "मूर्खासारखे बरळू नकोस" या प्रतिसादापेक्षा " तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती" हा प्रतिसाद जास्त असहिष्णू आहे.

कंटेक्स्ट शिवाय वरच्या वाक्याला अर्थ नाही.
सविस्तर नंतर लिहावे लागणार.

मृदुला / आशुचँप/ नीधप- अनुमोदन.
परागने 'फक्त स्त्रियाच असे करतात असे म्हणायचे नव्हते' असा खुलासा केल्यानंतर त्यालाही अनुमोदन.
आशिष- सर्वात पहिल्या पोस्टला अनुमोदन. स्वाती२- पूर्ण अनुमोदन. तुमचे म्हणणे पटले.

अजय- Happy to every action there is an equal and opposite criticism हे मस्तय. Happy

भिब्रा- तुम्ही म्हणताय ती फेज १. आणि हो सुरवातीचे एखाद वर्ष तरी तो अप्रोच वर्क करतो. नंतर भासमान जग आणि आयडीमागील व्यक्ती यांच्याशी परिचय वाढल्यावर .. interaction हळुहळु बदलत जाते. त्यावेळेस, वावर आणि भावनिक गुंतवणूक वाढल्यामुळे म्हणा... गोष्टी खटकु शकतात. अती झाले आणि त्रास व्हायला लागला की यावर उपाय मायबोली व्यसन तात्पुरते तरी पूर्णतया बंद करणे हे कदाचीत लागू पडु शकते.

आता ...
'तुम्ही मूर्ख आहात' 'तुम्ही xxxxx' वगैरे हे प्रचंड आक्षेपार्ह आणि condescending वाटते. त्यात स्वतःला कुठे गोवलेलेच नसते. इतरांवर उठसुठ ताशेरे ओढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि तो फक्त सिलेक्टीव्हली (म्हणजेच केवळ दुसर्‍यांच्याच दिशेने) का वापरल्या जातो? सतत स्वर दुसर्‍याला झापल्यासारखा कशाला? तुमचे कधी काही चुकत नाहीच का?

तुम्हाला इतरांच्या अपेक्षांचे ओझे होते (कळत नकळत) तसे इतरांनाही तुमचे सो कॉल्ड कॅज्युअल ताशेरे वर्मी लागू शकतात हे लक्षात घेणे म्हणजे सहिष्णुता. म्हणजेच 'मला आवडेल असेच तुम्ही तुमचे वर्तन (प्रतिक्रिया) ठेवा. आणि नेहमी नाही कायमच.' याला सहिष्णुता म्हणत नाही.
I would like you to criticize only in a way that I like to hear.. v. funny. Touching too.
आणि कोणी काही म्हणायचा अवकाश, की त्या आयडीचा दीर्घकाल द्वेष करणे हे तर केवळ हास्यास्पद. Proud

भारतीय संस्कृतीमध्ये उपदेश (वयाने मोठे असणार्‍यांनी लहान असणार्‍यांना) वगैरे फार सहज केला जातो. याउलट सल्ला विचारल्यावरही पाश्चात्यांमध्ये I would do it this way... असे म्हणले जाते. यात 'मी असे करतो, तुम्ही तुमचे ठरवा' हे अध्याहृत असते. हे व्यक्तिश: मला आवडते.

त्यावेळेस, वावर आणि भावनिक गुंतवणूक वाढल्यामुळे म्हणा... गोष्टी खटकु शकतात.

मान्य आहे.. ( नेटजीवनात आपण सीनियर असल्याने )

भिब्ररा | 5 April, 2011 - 09:29 नवीन
गुडी गुडी इमेज वाल्यांबद्दल काय वाटतं ?

>>
"काही लोकांना मी आवडत नाही आणि मला टीकाकार आहेत हे ठीक आहे. याचा अर्थ मी
थोडा तरी तत्वनिश्ठ होतो.. चर्चिल."
" its ok that I have enemies it means I stood up for something in life"

काल मी कोणत्यातरी धाग्यावर लिहिले होते की आजकाल लेख वाचावेच लागत नाहित. प्रतिक्रिया वाचण्यातच जास्त मजा येते.
पण आता असे दिसते की लोक सर्व प्रतिक्रिया ही वाचत नाहित. वरच्या २/३ प्रतिक्रिया पेकि एक घ्यायची, एखादे वाक्य घ्यायचे आणी त्यावर आपली प्रतिक्रिया टाकायची. मग मुळ विषय कुठल्याकुठे वहात जातो. शेवटी काय चालले आहे ते , आपण कशावर लिहित आहोत हे देखील प्रतिक्रिया लिहिणार्याला समजते का नाहि काय माहिती!

आधी ह्या बाफचं प्रयोजन काय असेल असा विचार करत होते.>> अनुमोदन. अजयच्या एखाद्या मॅनेजमेंट प्रयोगाचा हा भाग असेल का ? असेल तर हि प्रतिक्रिया "Conspiracy Theory" ह्या गटात खुशाल टाकून द्या. Wink

पण हे टाळता येण्यासारखे आहे का? माबोवर वा एकुणात? तर नाही. मला नाही वाटत पूर्णपणे टाळता येण्यासारखे आहे..याबद्दल नीधपला अनुमोदन. ज्यांना जाणीव होते ते टाळतील/टाळतातच. सर्वांकडून होईलच असे सांगता येत नाही. ते जाणूनबुजून करत असतील असेही नाही. >> ह्याला अनुमोदन. टाळण्याची(हि) गरज आहे का ? समोरचा त्याच्या वागण्यावरून (किंवा पोस्टवरून) त्याला हवे ते perception तयार करतो आहे. तो facade आहे कि नाहि हा निर्माण करणार्‍याचा प्रश्न आहे. समोरच्याचे perception काय होते आहे हे शोधण्याची जबाबदारी निर्माण करणार्‍यावर(च) आहे, असे मला वाटते.

इथे काही जणा/णींनी अजय यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे लिहिलेय. मग ज्यांच्याकडून उच्च अपेक्षा केल्यात ते जर काही लिहिताएत तर त्यात काही तथ्य असले पाहिजे असे नाही का वाटत ? अरेच्चा माझं/माझ्या कंपुचं (:अओ:) काही तरी चुकतय का असा विचार कुणीच केलेला दिसत नाहीये.

असो, ह्या निमित्ताने जुनी देणी-उणी-दुणी काढण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आला नाहीये असं दिसतय.

या लेखावर आलेले प्रतिसाद लेखाचे समर्थन करायला पुरेसे आहेत असे मला वाटते. >>>> हे एकदम मार्मिक Happy

आता मी एक गेंड्याच्या कातडीचा आहे (१० वर्षे अ‍ॅडमीनगीरी केल्यावर ती होते !). पण कल्पना करा उद्या एखाद्या विषयावर वाद चालू असेल आणि "नेहमीच्या यशस्वींच्या" ऐवजी नवीन विचार असणारा कुणी भाग घेऊ इच्छीत असेल आणि "तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती" असा प्रतिसाद आला तर तो कायमचा पळून जाईल आणि मग तो वाद पुन्हा नेहमीच्या यशस्वींमधे घोळत राहील.

<<< अजय ,
'नवीन विचार असणारा कोणी" म्हणजे नव्यानेच V & C मधे भाग घेणारा कि नवीन आयडी ??
कि "नवीन = क्रांतिकारी" विचार, जे आधी कोणी मांडले नाहीत असे नवीन विचार ?"

तुम्ही तुमच्या दहा वर्षांचं उदाहरण दिलय तर 'नवीन आयडी' किंवा " V & C मधे नव्यानी भाग घेणारा आयडी" असा अर्थ मी घेतेय (करेक्ट मी इफ अ‍ॅम राँग)
तर माझं म्हणणं एवढच कि मुळात ज्या व्यक्तीविषायी (आयडी विषायी) काही माहितच नाही, ज्या व्यक्तीचे (आयडीचे) विचार पहिल्यांदाच वाचतोय त्यांना कोणी 'तुमच्या कडून आपेक्षा नव्हती' असं म्हणेलच कशाला ?? Happy
हे अशा व्यक्तीला म्हंटलं जाईल ज्या व्यक्तीचे विचार, किंवा व्यक्ती विषायी आपल्याला काहीतरी माहित आहे, ती व्यक्ती नेहेमी मायबोलीवर कसे विचार मांडते, कशी वागते या बद्दल आपल्याला माहित आहे :)...
बाकी 'आपेक्षा असणे' हे जास्त दडपण आणणारं किंवा जास्तं अधःपातन होणारं कायमच असेल असं नाही, संदर्भ काय आहे ते मह्त्त्वाच आहे.
उदाहरण देते ( ज्या आय्डींचे विचार मला माहित आहेत अशा आयडीज चं):
असे होणार नाही पण नीरजा नी जर 'पालथा घडा क्लब' मेंबर ला एखाद्या बीबी वर अनुमोदन दिलं किंवा मैत्रेयीने काही अंधविश्वासु पोस्ट्स लिहिल्या तर मी गमतीने / आश्चर्यानी नक्कीच म्हणेन " यु टु?? किंवा ' तुझ्या कडून नव्हती ही आपेक्षा याच अर्थाचं काही तरी ! पण अशा ठिकाणी "काय मूर्ख आहेस कि काय " नाही म्हणाणार !
( थोडक्यात इथे या २ आयडीज चे विचार मला बरेचसे माहित आहे त्यामुळे त्यांना मी " आपेक्षा नवह्ती" हे वाक्य म्हणु शकते पण जिल्लेइलाही वगैरे नव्याने निर्माण होणार्‍या आयडीला किंवा प्रचंड काही तरी "नवीन विचार(!)" मांडाणार्‍या आयडीला कशाला मी किंवा अजुन कोण म्हणेल "तुझ्या कडून ही आपेक्षा नव्हती " असं ?? उलट त्या व्यक्तीला मूर्ख किंवा अजुन काही अपशब्द लिहावेसे वाटतील, पण माबो चा भान ठेऊन थांबेन लिहिताना :फिदी:)
असो....सहिष्णु असहिष्णु विषयावर इतक्या पोस्ट्स येतायेत म्हणून हे लिहिलं :).

खुपच गंभीर प्रतिक्रिया दिसत आहेत :अओ:..
मला वाटले परत विनोदी लेखन वाचायला मिळेल पण अपेक्षाभंग झाला Proud

बादवे(हलकेच घ्यावे Happy ): बायकोच्या ताटा खालचे मांजर असणारे पण पुरूष असतातच की.. मग ज्यांना पुरुषमय स्वप्न ई. पाहिजे त्यानी वाद घालत बसण्यापेक्षा अश्या पुरुषांचा भावी नवरा म्हणुन शोध घेतला तर प्रॉब्लेम सॉल्व होईल का?
Rofl

>>>अरेच्चा माझं/माझ्या कंपुचं () काही तरी चुकतय का असा विचार कुणीच केलेला दिसत नाहीये. <<<

तुम्ही स्वतः (आता तरी)केलात आहे का?

>>कंपू

कंपू प्रकरण पुष्कळ धाग्यांवर वाचले आहे. पुन्हा यातही काय वेगळे / चुकीचे आहे ते कळले नाही. थोडीफार ओळख, मैत्री झाली की काही सदस्यांबद्दल उरलेल्यांपेक्षा जास्त आपलेपणा वाटणे साहजिक आहे. हा मनुष्यस्वभाव आहे.

खरेतर सध्याच्या फ्रॅगमेन्टेड (मराठी?) आयुष्यात आपल्यासारख्या विचारांच्या लोकांचा कंपू करायला मिळणे ही मायबोलीसारख्या संस्थळांमुळे झालेली मोठीच सोय आहे.

श्री यांचा प्रश्न
>>एका बीबीवर एकाने (पुरुष आयडी) रेसिपी विचारली आणि मी मजेत म्हणुन कॉमेंट टाकली की, " वेळीच लग्न केलं असतसं तर ही वेळ नसती आली." आणि बरोबर स्मायली पण दिली होती.
>>तुमची ह्या माझ्या वाक्यावर काय प्रतिक्रिया असती ?

यावर माझी प्रतिक्रिया आली असती की बायको म्हणजे स्वयंपाकीण आहे का? स्वयंपाकीण हवी म्हणून लग्न करतात का? (वगैरे)

तसेच जर कोणी असे लिहिले असते की "अमक्या ठिकाणाहून तमक्या ठिकाणी जायचा सोपा रस्ता कोणता? मी नेहमी रस्ता चुकते." आणि त्यावर प्रतिक्रिया आली असती की वेळीच लग्न केले असते तर ही वेळ आली नसती. तर मी म्हटलेच असते की नवरा हवा आहे की ड्रायव्हर? पण मुळात 'सोपा रस्ता कोणता' अश्या प्रश्नांना 'लग्न करा' असला सल्ला मिळत नाही (जे योग्य आहे). पण स्वयंपाक, घर आवरण्याच्या प्रश्नांना नेमका मिळतो. जे चुकीचे आहे असे मला मनापासून वाटते. आणि म्हणून स्वयंपाकीण हवी आहे का अशी प्रतिक्रिया.

श्री,
>>" वेळीच लग्न केलं असतसं तर ही वेळ नसती आली.>><<
तुम्ही जेव्हा हे मस्करीत म्हटलेले तेव्हा नक्की काय म्हणायचे ते ही स्पष्ट करा. तेव्हाचा अर्थ सांगा, आता बदलून सांगू नका.

बहुधा म्रुदुला म्हणते तेच अर्थ होते ना? मग साहजिकच काही प्रतिक्रिया तिखट असणारच कारण बायकोनेच स्वंयपाक करून वाढले असते आयते असे ग्रुहित होते ना?

आता मला असहिष्णु म्हणा नाहीतर पालथा घडा Happy पण खरच मला या लेखात आणि त्यावरच्या नंतरच्या स्पष्टीकरणाच्या पोस्टीत पण काहीच पॉइन्ट दिसत नाहिये अजूनही ! (लोक का तुम्हाला २०० बटाटेवडे देतायत तेही कळेना मला !! Lol )

जर फक्त " माबोवर प्रतिक्रिया सभ्य अन सहिष्णु असाव्यात पण त्या नेहमी तश्या नसतात असे दिसून आले आहे" एवढाच पॉइन्ट असेल तर तसा म्हणायचा की. "पुरुषमय स्वप्न च्या निमित्ताने " या टायटल पासून पुढे आधीचे ते पोस्ट लिहिले त्यातून काय साधायचे होते?

बर नंतरच्या स्पष्टीकरणात "मूर्ख , फडतूस लिखाण " अशा प्रतिक्रियेपेक्षा "तुझ्याकडून अपेक्षा" नव्हती ही प्रतिक्रिया चांगली की वाईट हे अ‍ॅपल्स आणि ऑरेन्जेस कंपेअर केल्यासारखे वाटत आहे. लालू म्हणाली तसे ओळख नसताना आपण म्हणू शकतो " मूर्ख विचार " किंवा " फडतूस लिखाण" आणि माझ्य्या मते ते बोलणे नविन माणसाला पळवून लावू शकते ,
"तुझ्याकडून अपेक्षा नव्हती" या वाक्याचा का इतका बाऊ केला गेलाय तेच कळले नाही मला. हे वाक्य ओळखीतून, मैत्रीतून झालेल्या अपेक्षाभंगातून येऊ शकते आणि ते जर मैत्रीतल्या व्यक्तीला ती भावना कळवण्यासाठी बोलून दाखवले तर ते हेल्दी संभाषणाचे लक्षण मानेन मी तरी. नविन माणसाला पळवून लावण्यासाठी हे वाक्य बोलले कसे जाईल ??
मला जर कुणीतरी ओळखीतली व्यक्ती हेच वाक्य म्हणाली तर मला त्यात असहिष्णु तर वाटणार नाहीच उलट वाटेल की, समोरच्या व्यक्तीच्या मनात काहीतरी केअर /रिस्पेक्ट आहे म्हणूनच हे वाक्य तिने बोलले असेल की नाही ?
एकूण ओळखीतल्या व्यक्तीशी कोणते वाक्य कसा परिणाम करेल हे त्या त्या नात्यावर अन त्या व्यक्तींवर पण अवलंबून असणार ना? असा असहिष्णुतेचा सरसकट नियम कसा लावणार ?
सगळे अ‍ॅडल्ट्स आहेत , ज्याने त्याने आपापली प्रेम द्वेष वगैरे सांभाळावे ! इथे मात्र सभ्यतेचे नियम पाळून लिहावं असा मुद्दा असेल तर ठीक.

आता हाही मुद्दा नसेलच तर माझ्यासारख्या लोकांना समजेल असे सोप्या शब्दात या लेखाचा नेमका पॉइन्ट काय आहे ते सांगाल का Happy Happy

मै ला अनुमोदन !!
अजय यांनी सुरवात एक केलीये ( दुसर्‍या लेखाच्या निमित्ताने), मधल्या काही पोस्टस अजुन दुसर्‍याच ट्रॅक वर आणि हाइट म्हणजे त्यातून अजय यांच्या उत्तर दिलेल्या पोस्ट मधे अजुअन्च भलतच काही तरी..अगदी मुद्दे तिसरेच , त्याचा या बा फ च्या पहिल्या पोस्ट शी काही एक संबंध नाही !!
सहुष्णुता- असहिष्णुता-आपेक्षा असणे-नसणे, प्रतिसाद कसे असावेत-असु नयेत वगैरे सगळ्या गोष्टींचा ओरिजनल पोस्ट शी काही एक संबंध नाहीये, हे फक्त एक्स्परिमेन्टींग केलय कोणाला कसे प्रतिसाद बघून कसं वाटेल याचं !
बाकी एक कळलं, मूर्ख-फडतुस शब्द सर्रास वापरायला सुरवात करावीच अता इथे Proud

Pages