किन्वाची साबुदाणा खिचडी

Submitted by कल्पु on 20 March, 2011 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप किन्वा (मी कॉस्को मधून 2 lb च पाकिट आणल)
१ १/२ कप उकळत पाणी
३/४ टे-स्पून खमंग जीरा पावडर (आवश्यक)
३/४ टे-स्पून अख्खे जीरे (फोडणीसाठी)
३ हिरव्या मिरच्या आणी ३/४ कप शेंगदाणे (भरड कूट करून)
२ टे-स्पून शेंगदाण्याच तेल
१ टे-स्पून साजुक तूप
१ टे-स्पून सा़खर
१ १/२ स्पून लिंबाचा रस
१/२ कप ओल खोबर
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

कृती किन्वा फुलवण्याची
१ १/२ कप पाणी उकळवत ठेवा आणि त्यात १ कप किन्वा टाका. मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर, झाकण ठेउन शिजत ठेवा. साधारण १० मिनिटात किन्वा शिजतो आणि फुलायला लागतो. त्यानंतर गॅस बंद करून, झाकण ठेउन किन्वाला सावकाश फुलू द्यात. ज्वारी सारख टणक texture असलेला किन्वा मऊ होतो. २० मिनिटानी झाकण काढा आणि गार होउ द्यात. मधे मधे काट्याने मोकळा करून घ्या. १ कप कच्चा किन्वा शिजून आणि फुलून २ कप होतो. मोकळा होण्याकरता फक्त दिडपट पाणी लागत.

कृती खिचडीची:
गार झालेल्या अणि फुललेल्या किन्वा मधे मीठ, साखर, जीरा पावडर, दाण्या-मिर्चीच कूट टाकून मिक्स करून घ्या.
किन्वाला, तिळासारखा एक मंद वास असतो जो खंमग भाजून केलेल्या जिरेपूडामुळे mask होतो. मी regular साबुदाण्याच्या खिचडीत सुद्धा जिरेपूड घालते.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल्-तुपात जिरे घालून फोडणी करा
जिर्‍यांचा रंग बदलला की वर तयार केलेल किन्वाच मिश्रण घालून परतून घ्या.
झाकण ठेउन दणदणीत वाफ येउ द्यात.
लिंबाचा रस घाला, परतून घ्या. अजून एक वाफ येउ द्यात.
खोबर-कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
४-५ पाच माणसांना पुरते.
अधिक टिपा: 

किन्वा अमेरिकेच्या बाहेर कुठे मिळतो हे माहिती नाही पण हा pseudo grain अमेरिकेत खूप पॉप्युलर होतो आहे. भरपूर प्रोटिन्स असलेला किन्वा खूप भारतीय पदार्थात पर्याय म्हणून वापरू शकतो. उदा. उपमा, सांजा, पुलाव. मायबिलीवरच्या सुगरणी तर अजून टिप्स देतील. हि खिचडी इतकी साबुदाण्याच्या खिचडी सारखी लागते कि.....माझ ऐकू नका..करूनच बघा. फोटो आहेत पण jpeg images कश्या टाकायच्या हे महिती नाहित.

माहितीचा स्रोत: 
राधिका चेंबूरकर्-मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी . किन्वा ट्रेडर जोज मध्ये पण मिळतो.

मि किन्वाला भाताच्या एवजी पण वापरते. जिरा राईस/ मसाला किंवा साधी खिचडी पण मस्त लागतो.

शुम्पी , स्प्राउट मध्ये मिळत. बल्क सेक्शन मध्ये. व्होल फुड मध्ये पण बल्क सेक्शन मधुन पाहिजे तितके घेता येत. तसच क्रोगर मध्ये पण मिळत.
कल्पु चांगली आणि वेगळी रेसीपी आहे एकदम.

@आश,

मि किन्वाला भाताच्या एवजी पण वापरते. जिरा राईस/ मसाला किंवा साधी खिचडी पण मस्त लागतो.

माझी मैत्रिण राधिका चेंबुरकर, जिने मला ह्या रेसिपीची आयडिया दिली ती मुळची तामीळ आहे. तीने "किन्वाचा लेमन राइस" पण जाम पॉप्युलर केलाय. आमच्या घरी जीरा राईस जाम आवडतो तेव्हा तुझ्या पोष्टीतून स्फुर्ती घेउन आज रात्रौ.."किन्वाचा जीरा राईस, कॉलिफ्लॉवर भाजी आणि सार"

राधिकाच्या सांगण्याप्रमाणे किन्वामधे उगाच चिकन, कोलंबी वगैरे घालू नये. त्याने प्रोटिन ओव्हरलोड होत जे आपल्या किडनीला अपायकारक आहे.

कल्पु, मी आज किन्वा खिचडी करुन खाल्ली. अळूवडी खाल्य्यावर कधीकधी घशात खाज येते तसं ही खिचडी खाऊन झालं. काय कारण असावं?

खवचट पोस्टींचं माहित नाही पण खाजर्‍या पडल्या असण्याची शक्यता आहे Wink
किन्वाशिवाय मी दुसरं काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे बाकी कशाने असायची शक्यताच नाही.

सायो, इथे बघ.

Many if not most of these problems are probably caused by improper preparation of the quinoa. See cooking quinoa to learn the right way to make quinoa and avoid these problems. If you haven’t been preparing your quinoa correctly, then you may develop a sensitivity to it. Try cutting it out of your diet for a few weeks or months, then bring it back in, but be sure to wash it properly.

असं म्हटलंय.

@सायो,

अगबाई! हे माहित नव्हत. काळजी घे.

खरतर किन्वा हे धान्य नाहीच आहे. त्या द. अमिरिकेत उगवणार्‍या एका तृणाच्या बिया आहेत.

@सायो,
मी पण किन्वा न धुताच घेते. I guess ज्यांना अ‍ॅलर्जी आहे त्यांच्या करता किन्वा धुऊन घेण अत्यावश्यक असेल.
@डेलिया--अनुमोदन. एकेकाने सॉलिड अनुभव टाकलेत.

thank you very much!!
ऑस्सम प्रकार आहे हा! आज केली. खूप सोप्पी झटपट होणारी, जवळजवळ म्हणजे ९९% तशीच टेस्ट आणि हेल्दीअर दॅन साबुदाणा!! व्हॉट एल्स डु वी नीड?
परत एकदा आभार!IMG_00861.jpg

बस्के, फोटो मस्त आलाय! (तेव्हढं ताजं खोवलेलं खोबरं असतं तर आणखी चारचाँद लागले असते, हो की नाही सायो?)

साबुदाण्याऐवजी किन्वा ही मस्त आयडीया आहे .. मी करुन बघेन .. Happy

यप्पी....मी पण आणणार आता...गेला महिनाभर मेला एक साबुदाणा नाही पोटात गेलाय...जगायचं कसं माणसानं...

अत्ताच केली ही खिचडी. अप्रतिम!!!! हूबेहुब सा. खि.
धन्यवाद !! ही माहिती शेअर केल्याबद्दल.

काल रात्री केली. चव वेगळी अर्थातच आहे पण आवड्ली. नेक्स्ट टाईम भाज्या घालून कीन्वाचा पुलाव करण्यात येइल Wink
पोषण मूल्यावर मात्र मी खुश.

कल्पू, आज ही खिचडी केली. साबुदाणाखिचडीच्या बरीच जवळ जाणारी चव आहे. घरात सगळ्यांना फारच आवडली. तुमची 'खमंग जीरा पावडर्'ची टिप एकदम सही आहे. खूप धन्यवाद!

ही खिचडी खाऊन आता 'साबुदाणावडे करतो तसे याचे करून बघू' अशी टूम निघाली आहे. Proud

वड्याची आयडिया भारीच. आप्पेपात्रात केले तर कमी तेलात हेल्दी साबुदाणा वडे होतील.

कल्पू ,
आज आणला किन्वा आता करुन बघेन. मी आणलेला किन्वा तिळा एवढा बारीक आहे तो तसाच असतो का?
मृण्मयी तुझी सा. वड्याची कल्पना भारी आहे, करुन बघायला हवेत हे वडे (सिंडरेला आप्पेपात्र आहेच गं Wink त्यामुळे तो ही प्रयोग करुन बघण्यात येईल. )

Pages