नमस्कार मि कविता नविन सभासद आहे.

Submitted by कवित on 3 March, 2011 - 00:58

मला तुमच्या सगल्याचि मदत हवि आहे. मि जे लेखन करनार आहे. ते माझ्या खाजगि जिवना बद्द्ल आहे. मला आशा आहे. कि तुम्हि सगले मला मद्त करतिल.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

काहीही काय! आजकालचा हा हिट फॉर्म्युला आहे.. हिट अँड रन... ! माहेरचा आधार कधीतरी संपणारच.. नवराही नाही. दुसरे लग्नही नाही. मग आयुष्यभर करणार काय? जवळचं असं कुणीच नको का?

अगदीच स्वतःला मूल होऊ द्यायला प्रॉब्लेम वाटत असतील, तर नंतर मूल दत्तक घेतले तरी चालेल.. पण त्याच्यापेक्षा 'हे' जास्त सोपे आहे! मुलाची जबाबदारी १२ की १४ पर्यंत बापाच्या गळ्यात घालता येते.. अगदी स्त्री स्वतः गडगंज आणि कमावती असली तरीही... आणि मुलाची कायदेशीर पोटगी गळ्यात पडली की नवरा झक मारत दुसरे लफडे विसरुन जाईल.. Proud बायकोही नाही, पोरही नाही, वर कायदेशीर लफडी.... बसेल बोंबलत! तुम्ही मात्र आनंदाने मूल वाढवा.

जामोप्या,मी सामान्यपणे मतप्रदर्शन करीत नाही ,नुसते वाचतो-पण तुम्ही जे लिहिले आहे ते किती विवेकपूर्ण आहे व भावनाशून्य आहे याचा पुनर्विचार कराल का? ही एक नम्र विनंति आहे.

जामोप्या:

वरकरणी विनोदी (उपहासात्मक) पोस्ट वाटली तरी अस वाटतय की तुम्ही स्वत: दुखावले गेला आहात (?) असो. तुमचा सल्ला कविता करता नाही हो बरोबर. कशाला एका निष्पाप जिवाला या जगात आणायला सांगत आहात? लग्नाच्या committment मध्ये असलेल्या आई-बाबांच्या बाळाचा जन्म प्रेम, आदर, committment या भावनेतून झाला पाहिजे सूडभावनेतून नाही. माफ करा पण तुमची पोस्ट नाही झेपली. Happy New Year.

खर तर हा धागा फेक वाटला सुरुवातीला. मायबोलीवर आपला प्रश्न टाकायची बुद्धी ज्या मुलीकडे आहे ती घरी हे सगळ सांगत नाही आणि ८ महिने गप्प बसते. बात कूच जम नाही रही..!
इतके दिवस तुम्ही हे सगळ कसा काय सहन करताय??? किती मानसिक त्रास आहे हा ? फसवणूक - कठीण आहे खूप.लग्न टिकायला हव या दडपणातून गप्प बसला असाल असं वाटतंय. dream girl चा म्हणन बरोबर आहे. तुमचे आई वडील गप्प का आहेत अजून???

मला वाटत तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा. आम्ही सगळे जण आम्ह्च्या दृष्टीने बरोबर ते तुम्हाला सांगू.पण अशी प्रकरण नाजूक असतात आणि त्यातील कायदेशीर गोष्टी तपासून बघायला हव्यात. माझ्या चुलत बहिणीचा घटस्फोट झालाय आणि हे सगळ किती कठीण आहे हे खूप जवळून बघितलाय. एकटीने राहाण आपल्या भारतीय समाजात कठीण आहे, त्यासाठीही तुम्हाला समुपदेशन लागेल. मुंबईमध्ये काही समाजसेवी संस्था आहेत का बघा, पुण्याला एंक संस्था आहे "साथ साथ".

http://www.saathsaath.com/contact.asp

लग्नानंतरच्या प्रश्नांसाठी हे सगळे जण समुपदेशन करतात किंवा मार्गदर्शन देतात. त्यांना फोन करून बघा काही मदत मिळेल का किंवा मुंबई मध्ये कोणी कोणी आहे का याची माहिती काढा. तुम्ही आत्ता ज्या मानसिक तणावाखाली असाल तो तरी नक्कीच कमी होईल. तुमचा प्रश्न लवकर सुटू दे, हि शुभेच्छा...!

मी त्यांच्या भल्यासाठीच सांगतोय.. नवरा नीट नाही म्हनून बाईने मुलाचा हट्ट धरु नये हे काही पटणारे नाही... संसार जर मोडला जाणार असेल आणि पुन्हा दुसरा होणार नसेल तर बाईने नेहमी एक मूल घेऊन मग निघावे, असे माझे मत आहे. यात सुडाचा वगैरे काही भाग नाही. ( स्त्री आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, हे इथे गृहीत धरले आहे.) नाहीतर आणखी ४० वर्षानी मला नवरा, माहेरचं कुणीच नाही, मी काय करु, म्हणून इथे आणखी एक धागा निघणार.. आणि त्या वेळी इथले लोक वेळच्या वेळी मूल का होऊ दिले नाही, म्हणून त्यानाच विचारतील Happy

जामोप्या, मूल हवे असेल तर जरुर मूल होऊ द्यावे किंवा दत्तक घ्यावे. पण आधीच नात्यात अस्थिरता असताना मूल होऊ देणे ना मुलाच्या हिताचे ना त्या स्त्रीच्या. सध्याच्या नवर्‍याबरोबरच्या नात्याचा गुंता सोडवल्यावर , सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मूल हवे असेल तर तसा निर्णय घेता येइलच. बाकी ४० वर्षांनी आधार व्हावा म्हणून मुलाचा विचर करणे तर अजिबातच पटले नाही.

मुल होऊ देणे हे कुठल्याही अंगाने व्यावहारिक नाही. आत्ताची परिस्थिती आणि कविताची शारिरीक, मानसिक स्थिती पाहता, यापुढे किमान काही वर्षे जरा त्रासातच जाणार आहेत हे निश्चित. कारण घटस्फोटाचा अर्ज देऊन, त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत बराच वेळ जाणार. त्या वेळेस कविताने काय करावे ? मुलाकडे लक्ष द्यावे का कोर्ट कचेर्‍यांच्या फेर्‍या कराव्यात ? का स्वतःची नोकरी संभाळावी ? उलट मुलांची जबाबदारी नसेल तर ह्या प्रकरणाचा पटकन आणि मनासारखा सोक्षमोक्ष लावत येईल. मुलांची अपेक्षा असल्यास दुसरे लग्नही करता येईल.

बाकी, का कोण जाणे मलाही हा धागा 'फेक'च वाटतोय. no hurt feelings !!! पण खरं असेल तर कविताची काळजी वाटते. आशा आहे की सगळे काही सुरळित होईल.

सुशिक्षित लोकान्नाही आजकाल असे प्रश्न पडतात... खेड्यातील अशिक्षित स्त्रीयांचे तर किती हाल होत असतील.

खरं तर मलाही हा धागा 'फेक' वाटतोय. आताच असाच एक धागा पाहीला
http://www.maayboli.com/node/32103
.. आणि तरीसुद्धा कविताची सद्यपरिथिती काय असावी याचा विचार करतोय..
कोणत्याही अंगाने जामोप्याचा मुल होऊ देण्याचा मार्ग पटत नाही. (कदाचित सदर घटनेचे मनात चित्र उभे केल्याने कल्पूने म्हटल्याप्रमाणे मनातुन ते दुखावले असतील..??) पण एकटे असतांना अन मुल असतांना लढणे यात जमिन-आसमान चा फरक वाटतो, मानसिक-शाररिक्-आर्थिक सर्वच बाजूने.

मूल हे त्रासावर उपाय, भविष्यनिर्वाह योजनेचा प्लान वगैरे नसून एक वेगळी व्यक्ती असते. त्यामुळे जामोप्यांचा उपाय पटत नाही.

मूल हे पी पी एफ नव्हे.. पण नवराच नसेल तर कुटुंबात राहिले तरी काय? म्हणून मूल. आई मुलाचे दोघांचे कुटुंब आणि आईने करियरही करणे, यातून आयुष्याला आकार नक्कीच मिळेल... कित्येक घटस्फोटितांची आयुष्ये अपत्यामुळे सुखावह होतात.

चंबूशी सहमत.
मला सुरूबातीलाच हा धागा फेक वाटला होता. मी त्यावर एक उपहासात्मक धागाही काढला होता. पण मायबोलीकरांचा सकारात्मक दृष्टीकोण पाहून बरंच शिकायला मिळालं. पेरूचं उदाहरण हे खूप बोलकं होतं. इथून पुढे फेक समजण्याच्या बाबतीत कानाला खडा. अगदी खरंच फेक असेल तरीही... !

आठ महीने झाल्याने कदाचित समस्या सुटली असेल, चिघळली असेल, इथे येता आले नसेल... गॉड नोज.

@कविता : भावनेपेक्षा व्यावहारिक पणे वागा. तुमच्या आयुष्यातली महत्वाची वर्षे वाया घालवू नका.
prafullashimpi यांच्या
मतावर नक्की विचार करा. लवकरात लवकर !

आणि पूर्ण इंग्रजी / पूर्ण मराठी मध्ये लिहा. वाचण्यास सोपे जाईल आम्हाला .

Pages