Submitted by कवित on 3 March, 2011 - 00:58
मला तुमच्या सगल्याचि मदत हवि आहे. मि जे लेखन करनार आहे. ते माझ्या खाजगि जिवना बद्द्ल आहे. मला आशा आहे. कि तुम्हि सगले मला मद्त करतिल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
सामोपचाराने घटस्फोट घ्या आणि
सामोपचाराने घटस्फोट घ्या आणि शांतपणे आपापल्या मार्गाला लागा.
कविता,घटस्फोटाची कारवाई सुरु
कविता,घटस्फोटाची कारवाई सुरु करण्याआधी एक चांगला डिटेक्टिव्ह शोध. तुझ्या नवर्या विरुद्ध पुरावा गोळा करायला. कोर्टात भरभक्कम पुरावे हवेत. फसवणूक आणि झालेला मानसिक त्रास याची भरपायी मिळवण्यासाठी उपयोग होईल. तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!
कविता अन्याय सहन करू नको.
कविता अन्याय सहन करू नको. वकिलाचा सल्ला घे. आई वडिलांची मदत घे. आणि लवकरात लवकर निर्णय घे. स्वता:ची काळजी घे.
मानुषी आणि बाकी सर्वांना
मानुषी आणि बाकी सर्वांना अनुमोदन. ही तर शुद्ध फसवणूक आहे. अजिबात न खचता कठोर निर्णय घेवून get on with your life ASAP. ALL THE VERY BEST.
मानुषी आणि बाकी सर्वांना
मानुषी आणि बाकी सर्वांना अनुमोदन. खरच तुम्ही धीट पणे निर्णय घ्या आणि स्वःताची ही काळजी घ्या.
पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!
तुम्ही तुमच्या नवर्याला रेड
तुम्ही तुमच्या नवर्याला रेड हँडेड पकडा. ( स्वतः, भाऊ, वडील किंवा गरज पडली तर प्रायव्हेट डिटेक्टीव व. च्या सहाय्याने ) फोटो काढा. त्याच्या कॉपीज काढा. सासर माहेरच्या मोठ्या लोकांसमोर त्याला तो पुरावा दाखवा. घटस्फोट मुकाट्यानी दिला नाही तर फसवणुकीच्या आरोपाखाली त्याच्यावर आणि सासरच्या लोकांवर खटला दाखल करणार असल्याची धमकी द्या. त्याच्या आईवडीलांना सुध्धा त्रास सहन करावा लागेल याची जेव्हा त्याला कल्पना येईल तेव्हा तो आणि घरचे सगळे सरळ होण्याची शक्यता खूप वाढेल. नवर्याची कोण "ती " आहे तिला भेटा. तिच्या घरच्यांना पण भेटा. पुरावा दाखवा. खटला वगैरेचा प्लॅन त्यांना पण सांगा. थोडक्यात त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघू शकतील याची त्यांना चांगलीच कल्पना येवू द्या. प्रत्येक वेळी घरातील जबाबदार मोठ्या व्यक्तीला बरोबर घेऊन जा. कुठेही एकट्याने जाऊ नका. माझं मत सर्वात प्रथम सासरचं घर सोडा. माहेरी किंवा लेडीज होस्टेल वर रहा.
खंबीर व्हा. सतर्क रहा.
tya mulila (shubhangi) la hi
tya mulila (shubhangi) la hi mahit aahe ki yache lagna zale aahe. ani me swataha tila phone kela tar me ulat mala ch bolte tu tyla divorce de me tyla nahi sodu shakat. tu jar divorce denar nasel tar to me ani sachin kontyani prakare tuzyakadun milun gheu. me tyla sodnar nahi tulach tyla sodave lagel.......
कविता,सावधान राहा,आशा आहे तू
कविता,सावधान राहा,आशा आहे तू आत्तापर्यंत तुझ्या आईवडिलांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या असशील. तू जवळच्या पोलिसचौकीत त्याच्याविरुद्ध F I R पण रजिस्टर करून ठेव. जी काही धमकी द्यायची असेल ती कायद्याद्वारेच दे,असं मला वाटतं.
कविता, शुभांगी थर्ड पर्सन
कविता, शुभांगी थर्ड पर्सन आहे. तिला वाटणारच ज्याचं तिच्यावर प्रेम आहे, त्याच्याबरोबर आयुष्य काढावं. मी तिच्या वागण्याचं उदात्तीकरण मुळीच करत नाहीये. पण तुम्ही ज्याच्याशी लग्न केलं, ज्याच्या भरवशावर, जबाबदारीवर आलात त्यालाच इंटरेस्ट नाहीय तर मग तिला फोन करून सामोपचाराचा प्रश्नच येत नाहीये. नवरा बायकोच्या नात्यातील विश्वास या मूलभूत पायालाच तुमच्या नवर्याने तडाखा दिल्यावर पुढचे आयुष्य कोणाच्या विश्वासावर काढणार आहात?
बहीणीच्या लग्नासाठी थांबलात, ठीक आहे. लवकरात लवकर तिचे लग्न ठरले तर उत्तमच! पण ज्या कारणासाठी थांबला आहात, त्यामध्ये जर या विघ्नसंतोषी लोकांनी मोडता घातला तर? सचिन किंवा शुभांगी ने तिच्या होणार्या सासरी काही खोटं नाटं पसरवलं तर? मी फक्त शक्यता वर्तवतेय.
सांगण्याचा मुद्दा हा की कायदेशीर सल्ला घेणे उत्तम. मग सगळ्याच गोष्टी सुरळीत होतील. सावध राहा, काळजी घ्या. आणि सर्व माबोकर आहेतच तुमच्या सोबत. काहीही अडचण असेल तर सांगा... कोणी ना कोणी तरी योग्य सल्ला देइलच! शुभेच्छा!
कविता, शुभांगीशी संपर्क ठेवू
कविता, शुभांगीशी संपर्क ठेवू नका. तुम्ही चांगला वकिल शोधा. अशा प्रकारच्या फसवणूकीच्या केसेस हाताळायचा अनुभव असलेला वकिल हवा.
me mazya ghari saglyana
me mazya ghari saglyana paristitichi mahiti karun dili aahe. ani te ata lavkarat lavkar mazya sasri yet aahe. sachin tar ghabrun mazya maherchya lokanche phone receive karat nahi aahe. to atta khup ghabrala aahe........
Thanks all of you............
Thanks a lot
चांगलं ट्रक भरून टोळकं घेवून
चांगलं ट्रक भरून टोळकं घेवून जा सचिनला धरायला. तुमच्या माहेरच्या टोळक्याना खडसावून विचारायला म्हणून सांगा सचिनला. घरी नाही मिळाला तर ऑफीसला शोधा.
नाहीतरी नात्यात तसे काही राहिले नाहीच आहे भविष्य व उगाच पुढे चांगले होइल किंवा कशाला बोला असा विचार करण्यापेक्षा शब्दाने ठोकून काढा असल्या पळपुटेरावास. सासरच्यांना पण जरा धमकवाच की ह्यापुढे कसलेही त्रास दिलेत किंवा प्रयत्न केलात तर गाठ आहे. आधी चांगल्या वकिलाशी बोलून स्वतःची मालमत्ता(आई बाबाने दिलेले दागिने वगैरे) गाठीशी घ्या.
आधी चांगल्या वकिलाशी बोलून
आधी चांगल्या वकिलाशी बोलून स्वतःची मालमत्ता(आई बाबाने दिलेले दागिने वगैरे) गाठीशी घ्या.>> हा हे अतिमहत्वाचे!!!
ध्वनी आणि ड्रिमगर्लशी सहमत!
ध्वनी आणि ड्रिमगर्लशी सहमत!
saral ek police station
saral ek police station madhe...hundya sathi chhalavanuk...chi complent dyaa...
pudhe surkshit rahal ..aani tyanna addal ghadel
कवित, इथे सर्वांनी जे सूचवले
कवित,
इथे सर्वांनी जे सूचवले आहे, त्याबद्दल दुमत नाही.
पण जर पुरावे गोळा करायचे असतील, तर कोर्टाच्या निकषावर उतरतील असेच पुरावे गोळा करा. अशा पुराव्यांशिवाय ना घटस्फोटाची केस चालेल ना ४९८ अ ची.
यासाठी तूम्हाला लिखित पुरावेच लागतील. (माहेरी, मित्रमैत्रीणींना पोस्टाने पत्र पाठवा. त्यात हे सर्व लिहा. घरच्यांना ही पत्रे, त्यातील पोस्टाच्या शिक्क्यासकट जपून ठेवायला सांगा. त्यांनाही तूम्हाला पत्रे पाठवायला सांगा. त्याची कॉपी स्वतःजवळ ठेवायला सांगा, तसेच स्पिड पोस्टाने ती पाठवून, त्याच्या पावत्या जपून ठेवायला सांगा.)
व्याभिचाराचा आरोप सिद्ध करणे फार अवघड असते. डिटेक्टिव्ह्ज ची फी लाखाच्या घरात असते. वकिल देखील, फि मिळाल्याशिवाय तूमची केस लढवणार नाही.
तसेच या व्यापात, तुम्हाला मनस्पात होईलच. शिवाय वेळ आणि पैसा खर्च होईल तो वेगळाच.
तूम्ही आर्थिक रित्या, स्वतःचा भार स्वतः संभाळू शकता का ? तर स्वतंत्र रहा. हॉस्टेल मधे वगैरे राहता येईल. शक्य असेल तर दुसर्या ठिकाणी ट्रान्स्फर घ्या / जॉब शोधा. तिथे, तसेच तूमच्या ऑफिसमधे मोकळेपणी तूमच्या प्रश्नांबद्दल विश्वासू सहकार्यांकडे बोला.
नवर्याला धरणे / सोडणे / त्याला अद्दल घडवणे हे तूमच्या आयूष्याचे धेय न ठेवता, स्वतः आर्थिकरित्या स्वावलंबी बनून, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. व त्या निर्णयांचे भलेबुरे परिणाम भोगता येतील, अशी क्षमता मिळवा.
लग्न, संसार हे म्हणजे सर्व काही नसते. त्याचा फार विचार करु नका.
शुभांगी (खरे नाव नसावे ) प्रियकराला तूमच्याकडून सोडवायचेय ना ? त्याची भरभक्कम किंमत वसूल करुन घ्या. आणि हि किंमत तूम्ही अगदी फॅमिली कोर्टातही मिळवू शकता.
पण त्याआधी लग्न रजिष्टर्ड केल्याचे सर्टीफिकेट, लग्नाची पत्रिका, लग्नातले फोटो (सप्तपदी. होम) सिडी जपून ठेवा.
दिनेशदांशी सहमत.
दिनेशदांशी सहमत.
वरती अनेकजणांनी पोलिसात
वरती अनेकजणांनी पोलिसात हुंड्यासाठी केलेल्या छळाची तक्रार करा असे लिहिले आहे.
त्याबद्दल सद्यपरिस्थिती काय आहे ते बघू या.
या कलमाचे खटले आता फॅमिली कोर्टातच चालणार आहेत.
याबाबतीत ९६ % केसेस कोर्टात टिकू न शकल्याने, सरकारला आणि पर्यायाने पोलिसांना अनेक कानपिचक्या कोर्टाकडून मिळाल्या आहेत. त्यामूळे आता पोलिस सहजासहजी अशा केसेस नोंदवत नाहीत, नोंदवण्यासाठी तूम्हाला दबावतंत्राचा वापर करावा लागेल. तसेच जर पुरावे नसतील, तर त्या केसचाही काही फायदा होणार नाही.
ज्या अर्थी शुभांगी इतक्या आत्मविश्वासाने बोलते आहे त्या अर्थी त्या दोघांनी लग्न केले असण्याची शक्यता आहे. त्यांनी अगदी चोरुन लग्न केले असेल आणि ते नोंदवून घेतले असेल, तर तूमचे लग्न कायदेशीर ठरत नाही.
तूम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तूम्ही डोके शांत ठेवून सर्व शक्यतांचा विचार करावा, म्हणुन लिहित आहे.
हे सगळं कथानक खरं असावं या
हे सगळं कथानक खरं असावं या समजुतीतून सर्वांनी पोटतिडीकेने सल्ले दिले आहेत त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. हे कथानक खरं नसेल तर सदस्यांच्या भावनेशी खेळ होतोय इतका सौम्य इशारा पुरेसा ठरावा. कदाचित कथानकही खरं असावं पण नावानिशी देण्यात शहाणपण नसल्याने दुस-या नावाने दिले असेल तर समजू शकतं...असो.
घटस्फोटाची केस नेटाने चालवावी लागते. समुपदेशनाच्या वेळीच खरा प्रकार लक्षात येईल तेव्हां समुपदेशनाचे सेशन्स टाळू नका. तसंच शेजारीपाजारी समवयस्क मुली / नवविवाहिता यांच्याशी मोकळेपणाने बोला. कदाचित, यांची मदत कामाला येऊ शकेल.. खात्री नाही. पण हा फसवणुकीचा प्रकार शेजारी पाजारी समजणे हेच या लोकांना पुरेसं आहे. रजिस्टर लग्न झालं असेल तर ते शोधून काढता येऊ शकेल. त्यासाठी मित्रांची मदत घ्या. मित्र नसतील तर इतर कुणी.. पण मदत घ्याच.
तुम्हाला कोर्टात जाण्यावाचून पर्याय नाही. घटस्फोट न घेता वेगळं राहून आयुष्य जगण्यात काही मजा नाही. टोचा मारायला येणारे खूप जण भेटतील. तेव्हा पुन्हा एकदा मनासारखा जोडीदार शोधून त्याच्याबरोबर आयुष्य काढणे हाच एक उत्तम पर्याय दिसतो.
mazya gharchyani sachin la
mazya gharchyani sachin la phone kela ani tyala bhetala sangitale aahe... ani tychya gharchyana hi sangitale aahe.
कविता, अजून तुम्ही सासरीच
कविता, अजून तुम्ही सासरीच राहता ना? मग तुमचे आईवडील प्रत्यक्ष का नाही जाऊन भेटत?? जवळचे काका-मामा आणि आईवडील, लग्न जमवणारे मध्यस्थी असे चौघं पाचजण एकत्र गेले तर सोक्षमोक्ष लावता येइल. प्रूफसाठीही बरं! फक्त आईवडील गेले किंवा हे लोक तुमच्याकडे आले, तर उद्या हे लोक तुमच्याबद्दलच काहीही उठवण्याची शक्यता आहे... शक्यतो स्वतःच्या साईडची चूक कोणी मान्य करीत नाही. फोनवर निमंत्रण द्यायला हे दिवाळसणाचं निमंत्रण नाहीय. माफ करा स्पष्ट बोलतेय. पण मला वाटतेय, तुमच्या वडीलांच्या किंवा आईच्या संबंधातली अगदी जवळची २-४ व आईवडील असे त्यांच्या घरी जाऊन बैठक घेऊन सचिनला व त्याच्या घरच्यांना जाब विचारा आणि निर्णय घेऊन टाका.
अवघड आहे ... जसजसे
अवघड आहे ... जसजसे व्यावहारिक तोडगे दिले जाताहेत तसतशी केस अवघड होतेय
तुझे घरचे, स्वतः तू यांना काहीच काळजी नाही का ? किंवा त्यांच्याशी तुझं बोलणं संपलंय का ? तुम्ही आपसात चर्चा करायला, मार्ग काढायला असमर्थ असाल तर मग हा मार्ग योग्य वाटतोय... अशा केसेसमधे बारीकसारीक तपशील आणि होणारे संभाव्य परिणाम, स्वभावविशेष, आपल्या चुका यांचं ज्ञान त्रयस्थापेक्षा संबंधितांनाच जास्त असतं. तेव्हा साधकबाधक विचार करून मग त्यावर मत मागवणं जास्त चांगलं ठरलं असतं असं मला वाटतं..
सांजसंध्या अनुमोदन! आईवडील
सांजसंध्या अनुमोदन! आईवडील अजून फोनवरून का भेटायला बोलावत आहेत किंवा या प्रकरणासाठी एवढे दिवस का वाट बघितली जातेय मला समजत नाहीय्ये. नातेवाईकांना घेऊन जात का नाहीयेत घरचे? वर्ष वर्षभर वाट का बघितली जातेय??? पुढच्या आयुष्याचा काही विचार केलाय का???
नवर्याला धरणे / सोडणे /
नवर्याला धरणे / सोडणे / त्याला अद्दल घडवणे हे तूमच्या आयूष्याचे धेय न ठेवता, स्वतः आर्थिकरित्या स्वावलंबी बनून, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. व त्या निर्णयांचे भलेबुरे परिणाम भोगता येतील, अशी क्षमता मिळवा.
लग्न, संसार हे म्हणजे सर्व काही नसते. त्याचा फार विचार करु नका.<< दिनेशदा १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००% अनुमोदन
कविता काहिही कर पण नोकरी सोडू नकोस हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. सासरी राहा/ माहेरी राहा...घटस्फोट घे अथवा न घे पण नोकरी अजिबात सोडू नकोस आणि भरतने म्हटल्या प्रमाणे मूल न होण्याची खबरदारी घे..
तुम्हा सगळ्याचे मनापासुन
तुम्हा सगळ्याचे मनापासुन आभार.........
तुह्मि सगळ्यानि केलेल्या मदतिमुळे आम्हि सुरवात केलि आहे....
खुप आभार.......
धन्यवाद........
नवर्याला धरणे / सोडणे /
नवर्याला धरणे / सोडणे / त्याला अद्दल घडवणे हे तूमच्या आयूष्याचे धेय न ठेवता, स्वतः आर्थिकरित्या स्वावलंबी बनून, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. व त्या निर्णयांचे भलेबुरे परिणाम भोगता येतील, अशी क्षमता मिळवा.
लग्न, संसार हे म्हणजे सर्व काही नसते. त्याचा फार विचार करु नका. >>>
फार मोलाचा सल्ला आहे!
लग्न, संसार हे आहेच . कोणाला चुकले आहे ? पण तुम्हाला जो अनुभव आला त्यामुळे या गोष्टिंच्या पलिकडे जाउन काहि उत्तम करण्याचे संधी मिळाली आहे असे समजा.
अग प्रश्न सुटला की नाही
अग प्रश्न सुटला की नाही तुझा???
दिनेशदांशी सहमत.... ताबडतोब
दिनेशदांशी सहमत....
ताबडतोब घटस्फोटाला आर्ज कर, अजीबात कोणाची हयगय करु नकोस
निषपापी मुलीच्या वाट्याला गेल्या ची चांगलीच अद्दल घडव
मी आहे पाठीशी तुझ्या
जेवढा खर्च झालाय सगळा वसुल करुन घे मानहानी चा दावा ठोकता आला तरी चालेल
उलट मूल होऊ देणं चांगलं...
उलट मूल होऊ देणं चांगलं... मूल होईपर्यंत गोड बोलून रहा.. मूल झाले की पळ काढा. नवरा तर नाहीच. निदान आपले हक्काचे असे मूल तर राहील.. नाहीतरी मुल वेगळे झाल्यावर आईकडेच कायद्यानुसार रहाते. फक्त मुलगा झाला आणि सासरच्यानी वारस म्हणून ठेऊन तुम्हालाच डच्चू दिला, असे होऊ देऊ नका.... मूल माहेरी ठेऊ शकाल.. ३-४ वर्षे त्रास होईल. पण पुढच्या भविष्याचा विचार केला तर मूल असणे चांगले.. अर्थात तुमच्या मागे भरपूर आर्थिक पाठबळ असेल तर हा निर्णय घ्या. दुसर्या लग्नाचे काही चान्सेस आहेत का? नसतील तर मूल पदरात पाडून घ्या आणि मग संसार मोडा...
जामोप्या, काहीही!
जामोप्या, काहीही!
Pages