नमस्कार मि कविता नविन सभासद आहे.

Submitted by कवित on 3 March, 2011 - 00:58

मला तुमच्या सगल्याचि मदत हवि आहे. मि जे लेखन करनार आहे. ते माझ्या खाजगि जिवना बद्द्ल आहे. मला आशा आहे. कि तुम्हि सगले मला मद्त करतिल.

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मला तुमच्या सगल्याचि मदत हवि आहे. मि जे लेखन करनार आहे. ते माझ्या खाजगि जिवना बद्द्ल आहे. मला आशा आहे. कि तुम्हि सगले मला मद्त करतिल.

कविता लिही आम्ही वाचतो.
फक्त लिहिल्यानंतर लेखन तपासा असा ऑप्शन आहे तिथे तुझं लिखाण व्यवस्थित आणि बिनचूक आहे की नाही ते बघून घे.
पूर्ण लिहून होईपर्यंत धागा अप्रकाशित ठेवता येतो.
पहिल्यांदाच लिहिल्यावर कदाचित प्रतिसाद कमी येतील तर नाऊमेद होऊ नकोस.
वरती एक मदत पुस्तिका म्हणून टॅब आहे तिथे जाऊन तुला पाहिजे ती मदत घे.
शुभेच्छा!

Mazya lagnasathi sthal baghat hote. Ani sachin che sthal sangul aale.baghnyacha program zala. Amhi Doghani pasanti dili. Lagna tharlya nantar jase laglya mulina anand vatato tasa mala hi zala. Ani 1 June 2010 la amche lagna zale. Ani 4 June la amhi firayala shimla-manali la gelo. Tithe tyane mala sanngitale ki maze 6 year pasun shubhangi navachya muli sobat affair chalu aahe. Ani me tila nahi sodu shakat. Me tyala vicharle tuze affair hote tar tu lagna ka keles? Tar tyane sangitale mazya gharcyani mala force kela? Pan lagnacha sagla decision tyacha hota.Ani ata amhi ekatra eka ghrat rahto pan to mazya shi ek word pan bolat nahi. Ani tyachya gharche mala force kartat ki to bolat nahi tar tu bol. Me tyachshi bolnayacha khup prayatna kela pan to kahich bolat nahi.to mhanto mala tuzyashi kahi dene ghene nahi. Ani to mala tras denyasathi kahi na kahi prayatna karat asto. Kadhi maze mobile kharab karto tar kadhi tychya gharchyana sangto hi office la na jata kuthe baher firat aste. Me tyala sangitale mala devorce de tar te hi to det nahi.
Me kai karu mala kahi kalat nahi?
Mala tychyasobat rahnyachi jarahi iccha nahi aahe.
Pls, mala help kara?

?

कविता, हे सगळे खरे आहे का?

खरे असल्यास तुम्ही तुमचे आई-वडील आणि माहेरघरचे जेष्ठ यांना सासरी बोलवा. सचिनही असुदे तेव्हा. सगळ्यांनासमोर याबद्दल बोला. सचिन टाळाटाळ करत असेल तर त्याला वेळ मिळेल तेव्हा करु या भ्रमात राहु नका. त्याला वेळ मिळणारच नाही. सासरच्यांना अर्थात सगळे माहित आहेच. पण जे काय होतेय ते दोन्ही पक्षांसमोर होऊदे. सचिनच्या एकुण वागण्यावरुन आणि सगळे माहित असुनही सासरच्या लोकांनी त्याच्याकडुन तुमच्या तक्रारी ऐकुन घेण्यावरुन फार लवकर तुम्हाला प्रचंड मनस्ताप आणि तोही तुमची काहीच चूक नसताना भोगावा लागणार यात शंका नाही. तेव्हा लवकर सगळ्यांसमोर सगळा खुलासा होऊदे. तुम्ही स्वतंत्रपणे स्वतःबद्दल काही विचार केला असल्यास उत्तम. तेवढी क्षमता नसल्यास माहेरच्यांना निर्णय घेऊ द्या. घटस्फोटाशिवाय मला तरी दुसरा पर्याय दिसत नाही Sad

तुमच्या सासरच्या लोकांना दंडवत. सगळे माहित असतानाही त्यांनी मुलाचे लग्न जबरदस्तीने लावले आणि आता तुमच्यावर दडपण आणताहेत रिलेशन बनवण्यासाठी. :रागः

सगळे ठिक होईल या भ्रमात घुसमटत राहात तर आयुष्य असेच जाईल आणि कालांतराने तेव्हाच का बोलले नाही याचा पश्चाताप होईल. माहेरच्यांना धक्का बसेल व.व. वाटत असेल तरी आज ना उद्या तो बसणारच आहे हे लक्षात घ्या.

साधनाला जोरदार अनुमोदन! कविता, १ जून २०१० ला लग्न झाले. त्यानंतर साधारणपणे चारच दिवसांत आपल्याला आपल्या नवर्‍याच्या अफेअबद्दल समजले. तेव्हपासून आत्तापर्यंत साधारण वर्ष होत आलं... आईवडीलांना याविषयी कल्पना दिली आहेत का? वर्षभर नवरा बोलूही शकत नाही तर वाट कसली बघताय? तुमच्यापुढे अख्खं आयुष्य आहे. जितका वेळ काढाल तितकं प्रकरण चिघळणार. आधीच खूप उशीर झालाय. घरचे समजावून सांगतील आणि मग घरच्यांच्या धाकाने तो कधीतरी त्याचं अफेअर विसरून तुम्हाला पत्नीचा मान देईल या भ्रमात राहण्यात काय अर्थ आहे? लवकरात लवकर घरच्यांच्या मध्यस्तीने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाका. सासरी माहेरी स्पष्ट सांगा ही माझी फसवणूक झालेली आहे, मी याच्याबरोबर आयुष्य वाया नाही घालवू इच्छित. नाहीतर घरच्यांकडून दोघांबर बर्डन येइल आणि हे महाशय तुम्हाला घरात राबायला ठेऊन स्वत: बाहेर गुण उधळत राहतील. असले पुरूष स्वतः बाहेर लफडी करून बायकोवर घाणेरडे आरोप करतात. तुमच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवून यातून अंग झटकायचा त्यांचा विचार आहे असेच तुमच्या वर दिलेल्या उदाहरणावरून दिसत आहे.

नंतर मुलं बाळं झाल्यावर ठीक होईल असले नेहमीचे मूर्खपणाचे सल्ले अजिबात ऐकू नका. तुमच्या संसारामध्ये मुलाबाळांची ससेहोलपट नको. तुम्ही सचिनला त्याचं बाहेर अफेअर आहे याची दोघांच्याही घरच्यांसमोर स्पष्ट कबूली द्यायला सांगा. जमल्यास आधी तुमच्या घरच्यांशी बोलून त्यांना शुभांगीविषयी माहीती काढायला सांगा. त्यांची खात्री पटल्यावर लगेच हा विषय सासरी काढा म्हणजे तुमच्या नवर्‍याने आयत्या वेळी पलटी मारायला नको.

आपण नोकरी करता का? आपल्या करियरकडे लक्ष द्या. स्वतःच्या पायावर उभ्या राहा. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

अवांतर: हा धागा कोणाशीतरी बोलायचं आहे किंवा शुभमंगल सावधान मध्ये लग्नातील फसवणूक इथे हलवा.

ho me job karte. mazya maheri sagle sangitale aahe me aata. ani te yenar aahe mazya sasari
sachin mazya gharchyanshi bolayeche talto ani me tyala adhich sangitale aahe ki tu mala divorce de pan te hi to yeat nahi aani.

कविता, तुम्ही योग्य तो मार्ग आधीच पकडला आहे असे वाटतेय. घटस्फोट देणे/घेणे एकट्याच्या हातात नाहीय. तो दुर्लक्ष करत असला तरी सगळ्यांसमोर हा प्रश्न मांडल्यावर त्याला फारसे काही करता येणार नाही. जॉब करताय तर आता तिथे लक्ष द्या आणि या संकटातुन शक्य तितक्या लवकर बाहेर पडा.

जे अफेअर ६ वर्षे चालले आणि लग्नानंतरही ८ महिने चालले ते आता अचानक तुमच्या माहेरच्यांनी दबाव घातल्याने संपेल असे वाटत नाही. त्यामुळे सासरहुन 'आजपर्यंत चूक झाली, पुढे सगळे नीट होईल' असे समजावण्याचा प्रयत्न झाला तर त्याला उगीच बळी पडु नका. सर्व परिस्थिती पाहुन योग्य तो निर्णय घ्या. तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

to sudharnar nahi aahe. he me saglyana sangitale aahe. tyachya gharche tar ase rahtat jase kahi zalech nahi aahe. me tychyakadun kaslich apesha thevat nahi aahe. he me tyala bharpur vela sangitale aahe. me mazi swatantra aahe tyachya gharchyan chya mhananya pramane me tyachya maghe maghe ka firu? tyachi aai ek ladies asun sudha mazya yatana nahi samju shakat. tyala hi bahini aahe tya hi asha kashya vagu shaktat hech mala kalat nahi

त्यामुळे सासरहुन 'आजपर्यंत चूक झाली, पुढे सगळे नीट होईल' असे समजावण्याचा प्रयत्न झाला तर त्याला उगीच बळी पडु नका.>>>साधनातै १०००००००००००००००००००००००००००००००००००००%मोदन.

<<तुमच्या सासरच्या लोकांना दंडवत. सगळे माहित असतानाही त्यांनी मुलाचे लग्न जबरदस्तीने लावले आणि आता तुमच्यावर दडपण आणताहेत रिलेशन बनवण्यासाठी>>

साधना धिस इज नॉट सो अनकॉमन. आणि असे फक्त चित्रपटांत्/मालिकांतच घडते असे नाही. याचा जास्त राग.

जास्तच स्पष्ट लिहितोय, पण मूल होणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर आणखी एक अवजड बेडी पायात.

साधना ला अनुमोदन.
शिवाय ओळखीत कोणी वकील असेल तर त्यांच्याबरोबर तुमची केस आधीच डिसकस करून घ्या. डीव्होर्स बरोबरच तुम्हाला जो मनस्ताप होतोय त्याची नुकसान भरपाई व त्याला शिक्षा कशी मिळू शकेल हे पण बघा.

भरत खरेच असे काही वाचले की भयानक राग येतो आणि वाईटही वाटते. अशा फसवणुकी दोन्ही बाजुने होतात असेच दिसतेय हल्ली आजुबाजुला. आता लोकांनी लग्न ठरवायच्या आधी डिटेक्टिव सोडायचे काय एकमेकांवर???

कविता, आपण ज्या रोलमध्ये असतो त्याप्रमाणे आपले विचार बदलतात. तुझ्या नणंदेला असा त्रास झाला असता तर सासरच्यांनी उलट विचार केला असता.

हे जे काही. मा.बो. सांगत आहेत ते अगदी बरोबर आहे. पण शेवटी निर्णय सर्वस्वी तुमचा असणार आहे. जर एकदा का अश्या लोकांना आपण मोकळ सोडल ना कि हि लांडगी अजुन कितीतरी मुलींचा असाच छळ करतील. त्यासाठी तुम्ही फक्त शांत राहुन घटस्फोट घेउ नका. तर त्याला आणि त्याच्या सर्व घरातल्याना चांगलीच अद्दल घडवा. तुम्हाला आज असेही वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी बोलताना चांगल्या वाटतात पण करताना फार त्रास होतो. आज तुम्ही जर पुढ्ची दोन पाउल जास्त उचललात ना तर तुमच्या सारख्या अजुन कितीतरी मुलीची आयुष्य बरबाद होण्यापासुन वाचवु शकता. काय गॅरेंटी आहे की त्यांनी जे तुमच्या सोबत केल आहे ते दुसर्‍यांसोबत करणार नाहीत.खुप खोल विचार करा ह्या गोष्टींचा. मुलगी जेव्हा लहान असते ना तेव्हा ती वडिल आणि भाउ या दोन जिवांवर स्वत:ला सुरक्षित मानते. नंतर ती जेव्हा कोजेला जाते तेव्हा तिचा मित्र परिवार तिची हिमत वाढवतो. जेव्हा ती लग्न करुन मुलगिची स्त्री बनते तेव्हा तिचा पती तिच स्वभिमान असतो आणि जेव्हा तोच पाठ फिरवतो ना तेव्हा ती एकटी पडते तेव्हा जोडिला कोणी नसते. स्त्री जेव्हा स्वतंत्र होते ना तेव्हा ती स्वत:ची स्वामिनी असते. तुमच्यातिल स्त्री ला जागवा. स्त्रीपणाला जागवा. आजच तुम्हि स्वतासाठी काहीतरी करु शकता. स्वतंत्र होउन तुमच विश्व बदलेल पण एक अपराधी जिवंत राहिल. एक किट किंव वाळवी म्हणा हव तर ती स्त्री जातिला पोखरत राहिल. जे काही करायच आहे ना ते स्वतःसाठी करा.
आज मी हे जे लिहित आहे न ते तुम्हाला एक भाषण वाटेल. तुम्हि ते विसरुनही जाल. पण लक्षात ठेवा जे करायच आहे ते तुम्हालाच करायच आहे. आज नाही तर कधीच नाहे. बाकि जे काय कराल त्यात देव तुम्हाला साथ देवो हिच प्रार्थना.
प्लिझ टेक केअर ओफ युर सेल्फ.............

साधना ड्रीमगर्ल ला अनुमोदन !
भरतचा सल्ला अत्यंत महत्वाचा ...अजुन एका बेडीत अडकलात तर प्रॉब्लेम अजुन कॉम्प्लिकेटेड होतील Sad
( शिवाय अजुन जन्मालाही न आलेल्या त्या निष्पाप जिवाला काबरे यात पाडायचे ?)

बाकी नवर्‍याची मानसिकता कळाली नाही ....पण काडीमोडाच्या टोकाच्या निर्णया आगोदर त्याला मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला लावावा असे वाटते !

कविताच्या बाबतीत जे घडलं, वाचून वाईट वाटले. आठ महिने त्या घरात कसे काय काढले? तो सुधारणार नाही हे तुला समजून चूकलं आहे. कुठल्याही मुलीला टोकाचा निर्णय घेणे जड जाणारच. पण तू त्याच्या गुंतली नाहीस आणि अपत्य जन्माला घालून गुंतवून घेऊ नकोस असा भरतने दिलेला सल्ला योग्यच वाटतो. काळजी घे

जामाताशी दया न ये कामा l क्रोध नये सोयर्याच्या धामा l
जेथ ज्याचाच महिमा l ते तेथेच योजावे ll

खळा जामातांचे ठाई l शांती धरता पडणे अपाई l
जैसे कंटक मर्दावे पायी l तेवी जामात दंडावे ll

kharech me manju shee sahmat aahe. pan mala ek kalat naahi tu evadhi shikleli asun he sarva sahan karat ka baslis. tu tujhe nuksan karun ghet aahes. tujhe prem vagaire nahi na jadle tyachyavar...asha manasavar prem karne murkhapana aahe..baaki tujhyabaddal aikun faar vait vatle ase kuna sobat ghadu naye hich ichha..

me tychyavar prem asel ase swpnat sudha honar nahi. me he itke diwas sahan kele te fakta mazya mummy -pappa aani mazya chotya bahini sathi karan tiche aata lagna tharat aahe. mazya mule ticya lagnat kahi complication yeu naye. mhanun me itke diwas gap hote. pan ata kahi diwasancha prashna aahe. tya nantar me sachin la ani tyacha gharchyana ashi addal ghadwanar aahe. ki te jeevan bhar lakshat thevtil ki ek mulliche jeevan barbad karnyachi kimmat kai aste tiiiiiii

tumhi saglyani dilelya pratisadabaddal khup khup Dnyawad...........

pudhe hi mala ashich madat kara.....

maze manobal khachu deu naka ani mala har manu deu naka nehami mazya pathishi rahaa hich tumha saglyana vinaati aahe......

Pages