सात खून माफ!!!

Submitted by चिनूक्स on 20 February, 2011 - 01:08

'सात खून माफ' अफाट आहे. लेखन, दिग्दर्शन, छायालेखन, रंगभूषा, अभिनय सगळंच अफाट. सुसाना आणि तिच्या आयुष्यातील सात पुरुषांची ही कथा. या सातही पुरुषांवर ती प्रेम करते. मात्र त्यांच्याकडून तिच्या वाट्याला अपमान, विश्वासघात आल्यावर त्यांचा ती काटाही काढते. हे काटा काढणं शेवटच्या पुरुषाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने दाखवलं आहे. सातवा नवरा आणि या सातव्या नवर्‍याचा खून..ही कल्पनाच लाजवाब आहे.

प्रत्येक नवर्‍याच्या विशिष्ट लकबी, त्यांचे स्वभाव अगदी थोड्या वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्र उभं राहण्यात अजिबात वेळ जात नाही. या पात्रांच्या तोंडी असलेले संवाद उत्कृष्ट. सुसानाच्या आयुष्यात हे पुरुष कधी आले, ते दाखवण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या काही घटनांचा आधार घेतला आहे. मात्र या घटना केवळ संदर्भ म्हणून वापरलेल्या नाहीत. या घटना आणि सुसाना व तिचा तेव्हाचा नवरा यांचा संबंध सहज जुळतो. या घटना काही सेकंदांच्या अवधीत बरंच मोठं भाष्य करून जातात. पटकथेतील या हुशारीसाठी विशाल भारद्वाजला सलाम.

सर्वांचे अभिनय उत्तम. नील नितीन मुकेश, जॉन अब्राहम आपल्या नेहमीच्या पठडीपेक्षा, अभिनय आणि शरीरयष्टी या दोन्ही बाबतींत, वेगळे वावरतात. इरफान मस्त. त्याचे किंचित बायकी हातवारे, त्याचं रात्री वेगळं वागणं त्यानं सही दाखवलं आहे. नसिरुद्दीन शाह नखशिखांत बंगाली, आणि काही प्रसंगांमधले त्यांच्या चेहर्‍यावरचे सरसर बदलणारे भाव थोर आहेत. उषा उत्थुप पूर्ण चित्रपटभर असल्या तरी त्यांना फार संवाद नाहीत, तरी त्यांची देहबोली अफाट आहे.

गाणीही मस्त. विक्रम गायकवाडांचं रंगभूषासंयोजन विलक्षण आहे. वयानुसार सुटलेलं शरीर, सुरकुत्या, तुटलेला पाय हे सगळं त्यांनी फार सुरेख दाखवलं आहे.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विशाल भारद्वाजचं दिग्दर्शन. हा चित्रपट त्याच्या थोरपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो अरुण हिला शोधून कसा काढतो काही कळले नाही. असो, मेक अप बद्दल स्वातीला अनुमोदन. अरुणचा मेक अप पहिल्याच सीनमध्ये दिसतो. शिवाय मोठा दिसण्यासाठी त्याला ढंगळंग-मचळंग बिझिनेस सूट घातलाय का ?

तरी प्रियांका चोप्रामध्ये बरीच सुधारणा आहे. फॅशनमध्ये फारच भंपक अभिनय (?) होता तिचा.

*** सर मला माफ करा Proud

विशाल भारद्वाजचा आत्ता पर्यंतचा सर्वात बकवास मुव्ही.. घोर निराशा केली. एका सिन मधुन दुसर्‍या सिन मध्ये जाताना काही लिंक लागत नाही. फक्त जॉन आणि किमत ह्य दोन लिंक लागतात बाकी बघणार्‍याने गाळलेल्या जागा भरुन घ्याव्यात...टोटल फेल्यूअर आहे... थिएटर मध्ये जाउन पैसे मोजुन पहाण्यात उपयोग नाही... विशाल भाईने पोपट कर दिया....

प्रियांकाचा मख्ख अभिनय आणि सहन न होण्यापलि़कडचा मेकअप ही चित्रपट आपटण्याचे प्रमुख कारणं. टिव्हीवर बघितला असता तर आवडला असता कदाचित.... कारण मेकअप चे बारकावे झाकले जातात..

ह्या रोल साठी शबाना हवी होती असे राहून राहून वाट्ते.

<< शबाना.. अगदी १०० % सहमत :).

शबाना नाही तर मधल्या काळातली उर्मिला मातोंडकर.. तिला चांगले जमतात असे रोल्स ( आठवा 'कौन', 'एक हसीना थी', ' प्यार तूने क्या किया', 'भूत').

अगदीच अत्ताची महंटलं तर मग कंगना राणावत :), सायको वाटते आणि चांगलं अ‍ॅक्टिंग करते.. आधी मला आवडायची नाही पण फॅशन मधे जबरी आवडला तिचा रोल ( मुख्य म्हणजे कंगना टिपिकल बॉलिवुड मसाला मटेरिअल अ‍ॅक्ट्रेसेस सारखी ढिग भर मुव्हिज करत नाही त्यामुळे रिअल वाटते.)

हे काटा काढणं शेवटच्या पुरुषाच्या बाबतीत अतिशय अफलातून पद्धतीने दाखवलं आहे. सातवा नवरा आणि या सातव्या नवर्‍याचा खून..ही कल्पनाच लाजवाब आहे.

<< याचा काय अर्थ , मला खरच नाही कळला Uhoh
नन बनणे म्हणाजे सातवा खून ??? Uhoh
चिनुक्स किंवा इतर कोणी प्लिज क्लिअर करा, मला वेगळाच अर्थ लागला कारण सातव्या खुनाचा !
उषा उत्थुप मरते( ज्यातून अ‍ॅक्चुअली सुझॅना स्वतःला मारते तो खून असा मी अर्थ लावला, सातव्या खुनाचा.)

असो, तर सिनेमा विषयी..
वर स्वाती, आरती सगळ्यांनी लिहिल्या प्रमाणे अजिबात नाही आवडला !
१) पटकथा अगदीच सुमार !
नुसतेच खून होत जातात, पुढे काय ?
' सुझॅना अ‍ॅन्ड हर सेव्हन हजबन्ड्स' असं नाव असतं तर एक वेळे ठिक होतं पण इथे एक तर दिग्दर्शकानी ' सत खून माफ' नावच देऊन टाकलय ( जसे सूरज बडजात्याने प्रामाणिक पणे 'विवाह', रजनीने प्रामाणिक पणे 'रोबो' नाव देऊन टाकलय जिथे आपल्याला तसही माहित असतं काय असणार सिनेमात Proud ) ..
सात खून होणार हे आपल्याला माहितच आहे.. २-३ खून झाल्यावर तेच तेच बघून कंटाळा येतो !.. फक्त पर्यंत खून होण्याची वाट पहायची.. त्यातून खास विशाल स्टाअल कथा काही तरी वेगळं वळण घेइल असं वाटतं पण पटकथा फारच फसलीये. !
२) खूनां विषयी:
बर, ते खून एक तर सगळे अंधारात, धड दिसतही नाहीत आणि ते करताना सुझॅनाची मानसिकता , तिच्या चेहेर्‍यावरचे भाव वगैरे काहीच दाखवले नाहीये !
रा.गो व चा जंगल, रात बघताना हे असे थंड पणानी केलेले खून बघताना अंगावर काटा येतो, तसा हे पहाताना अज्जिबात येत अनही .. दिसते नुसतीच नुसतीच अंधारातली हालचाल !
त्यातले ३ खून करण्याची पध्दत पण अतिशय प्रेडिक्टेबल.. निल नितिन मुकेश, जॉन , नासिरुध्दिन यांचे खून कशा प्रकारे करणार हे सुध्दा आपण ओळखु शकतो !
प्रियांकाला उगीच अ‍ॅक्टिंग ला कष्ट वगैरे पडु नयेत म्हणून अंधार दाखवण्याची युक्ति का ही ?

३) प्रियांकाचं कॅरॅक्टरः
सुझॅना चं कॅरॅक्टर च गंडलय !
एक नवरा नाही आवडला कि कापा आणि गाडून , खून पचवून पुढचा शोधा .. डिव्होर्स वगैरे भानगड नाही.. असं कॅरॅक्टर थोडं सायको, निदान वागण्यात थोडी सणकी झाक दिसली पाहिजे पण प्रियांकान जे काही कॅरॅक्टर केलय त्यात ती तशी मुळीच दिसत नाही.. जनरल च बाई वाटते.. टोटल मिसफिट फॉर धिस रोल !
खरच शबाना, उर्मिला, तब्बु , विद्या बालन किंवा कंगना हवी होती
४) रंगभूषा :
विक्रम गायकवाडां करून घोर निराशा.. स्वाति, सिंडरेला, पराग अव्गैरेंनी लिहिलय तसं अतिशय भडक, लेयर दिसणारा विचित्र मेक अप.. खोट्या सुरकुत्या, विग !
५) डार्लिंग सोडून इतर गाणी पण नाही आवडली.. अजुन एक निराशा !

केवळ विशाल चा मुव्ही म्हणून शेवट पर्यंत पाहिला..पण जाम कंटाळवाणा !
ओव्हरऑल विशाल भारद्वाज चा अत्त पर्यंतचा एकमेव गंडलेला मुव्ही !
नील नितिन मुकेश चा रोल मात्रं मस्तं , हा माणुस पाहिल्यांदाच आवडला !
नासिरुद्दीन, इरफान यांना वाया घालवल्या बद्दल विशाल ला माफ करावं का ??
hmmm करून टाकते.. मक्बुल, ओमकारा, इष्किया , कमीने साठी भारद्वाज मामु ला एक मुव्ही माफ !

दीपांजली,
उषा उत्थुपचा मृत्यू म्हणजे सातवा खून नव्हे. त्याचा संबंध येशूशी आहे. 'I am going to drink his blood' याचा संबंध तिचं नन होण्याशी आहे. 'माफ' या शब्दालाही अर्थ आहे. जो बराचसा शेवटच्या गाण्यात येतो.
ती घटस्फोट न घेता लग्न का करते, हे सांगणारा एक अख्खा प्रसंग आहे.
<<विक्रम गायकवाडां करून घोर निराशा.. स्वाति, सिंडरेला, पराग अव्गैरेंनी लिहिलय तसं अतिशय भडक, लेयर दिसणारा विचित्र मेक अप.. खोट्या सुरकुत्या, विग !>

रंगभूषासंयोजन फक्त विक्रम गायकवाडांचं आहे. रंगभूषा The curious case of Benjamin Button या चित्रपटात रंगभूषा करणार्‍या हॉलिवूडच्या रंगभूषाकारांनी केली आहे.

मला तर वाटतय ती त्या कथा सांगणार्याचाच शेवटी काटा काढते. कारण असं कुथे म्हटलय की ती सात नवर्यांचेच खून करते. शेवटला ती फक्त सात खून माफ कर असे काहीतरी म्हणते.

मला तर वाटतय ती त्या कथा सांगणार्याचाच शेवटी काटा काढते.

<< मलाही आधी वाटलं पण नंतर कोंकोणाला सापडतो कि तो , त्याला नाही मारत ती !
चिनुक्स,
शेवटचा सीन ( गाणं) पहायला पाहिजे परत पण ' आय वाँट टु ड्रिक हिज ब्लड' वरून मला काही अर्थ लागला नाही.

नवनवीन नवरे मारणे हेच सकारात्मक आहे असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल >>> Lol

अन्नु कपूरला मारण्यासाठी त्याच्याशी लग्न करण्याची काय गरज होती? तो कमिना आहे हे तिला लग्नापुर्वी माहितच होतं. बाकिच्यांच्या बाबतीत तिला हे नंतर कळलं.

अन्नु कपुर ला हिने खून केलेत माहित असतं , त्याला नाखुष करून चालणार नसतं म्हणून मजबुरीनी लग्न करते बहुदा :). ( असा मी अर्थ घेतला.)

The curious case of Benjamin Button >>>
हा मात्र भारीच चित्रपट होता. जबरी मेकअप. Happy

आणि तो मूर्ख अन्नु कपूर ही नवर्यांचे खून करते हे माहित असताना पण तिच्याशी लग्न करतो.
सिनेमा मलाही फारसा रुचला नाही. डिजेनी लिहिलेली कारणं अगदी अगदी.

यानुसार सुटलेलं शरीर, सुरकुत्या, तुटलेला पाय हे सगळं त्यांनी फार सुरेख दाखवलं आहे. >>>>> चिन्मय, मग ह्याचं श्रेय कोणाला ?? Happy "दाखवलं" म्हणून गायवाडांना की "केलं" म्हणून हॉलीवूडवाल्याला की "दाखवण्याचं संयोजन केलं" म्हणून चांगलं ते गायकवाडांना ? मग संयोजन केलं होतं तर त्याप्रमाणेच दिसतय की नाही हे पहाण्याची जबाबदारी कोणाची असते दिग्दर्शकाची की रंगभुषासंयोजकाची की आणखी कोणाची ?? जे काय थोडंफार चांगलं झालय ते गायकवाडांमुळे आणि वाईट ते सगळं हॉलीवूडवाल्यामुळे हे काय पटलं नाही..
मी वर लिहिलय तेच परत लिहितो... गायकवाडांच्या कामाबद्दल प्रश्नच नाही पण त्यांच्याकडूनही काहितरी राहून जाऊ शकतं.. असो..

पराग,

मी कोणी काय केलं हे फक्त स्पष्ट केलं आहे. चांगलं, वाईट असं काहीही म्हटलेलं नाही.

शेवटचा सीन ( गाणं) पहायला पाहिजे परत पण ' आय वाँट टु ड्रिक हिज ब्लड' वरून मला काही अर्थ लागला नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
चर्च मधे जी वाईन देतात ती येशुच्या रक्ताचे प्रतीक आहे,
http://en.wikipedia.org/wiki/Blood_of_Christ
कम्युनियन घेताना ती पीतात.

मला तर तिचे नन होणे पाहताना "नौ सो चुहे खाके बिल्ली हज को चली" याची आठवण येत होती. तिला खरच पश्चात्ताप झालेला असता तर पोलिसांच्या स्वाधीन होउन प्रायश्चित्त घेताना दाखवायला हवी होती. असो.

अजिबात आवडला नाही. दीपांजलीने छान लिहिलेय.

<तिला खरच पश्चात्ताप झालेला असता तर पोलिसांच्या स्वाधीन होउन प्रायश्चित्त घेताना दाखवायला हवी होती.>

हे केलं की तिने. ती पोलिसांच्या स्वाधीन झाली.

हे केलं की तिने. ती पोलिसांच्या स्वाधीन झाली.
>>>>>>>>>>>><< कधी? मला असं काहि बघितल्याचं नाहि आठवत?

मला तर तिचे नन होणे पाहताना "नौ सो चुहे खाके बिल्ली हज को चली" याची आठवण येत होती.

<<
अगदी.. तेच लिहिणार होते मी... !!!
थँक्स मनस्मि आणि स्वाती,
' ब्लड' आणि वाइन चा संदर्भ सांगितल्या बद्दल.
शेवट तर अजिबातच नाही आवडला .. सहा खून करून मग नन होणे.. काय उपयोग, तशीही ती जख्खड म्हातारी झालेली असते, सगळं आयुष्य हवं तसं घालवून झालय .. सहा खून आणि वय ६० + झाल्यावर मग येशुला शरण जाणे म्हणाजे खरच ' सौ चुहे खाके ' Proud
पण पोलिसां कडे कधी शरण जाते ती ?
फादर कडे कनफेशन ला येते असं दाखवलय.

मलाही पोलिसांच्या स्वाधीन झाल्याचं पाहिल्याचं आठवत नाहीये.
(तो व्हर्लिंग डर्व्हिशसारख्या गिरक्या घेणारा पोलिस होता की काय? मला वाटलं जीझस! :P)

नवनवीन नवरे मारणे हेच सकारात्मक आहे असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल >>>:आगाऊ

Lol

रामकुमार

<तिला खरच पश्चात्ताप झालेला असता तर पोलिसांच्या स्वाधीन होउन प्रायश्चित्त घेताना दाखवायला हवी होती.>

हे केलं की तिने. ती पोलिसांच्या स्वाधीन झाली.

<< चिनुक्स्,
शेवटी ' अ फिल्म बाय विशाल भारद्वाज' आल्यावर (द एन्ड झाल्यावर) एंडिंग क्रेडिट चालु असताना छोट्या खडकीत चित्रपट कंटिन्यु होतो, त्या वेळी शेवटी पोलिस येतात त्या गाडीत कोंकणा असते ( नवर्‍याला शोधायला आलेली) , बरोबर काळा सलवार कमीझ घातलेली अजुन एक बाई असते पण ती प्रियांका नसते.

पोलिस बघून कोंकोणाला विवन विचारतो , ' तुमने क्या बताया पुलोस को'
ती म्हणते ' कुछ भी नही वरना तुम्हे सालो जेल हो जाती., फिर तुम मुझे छोडकर उसके पास कभी नही जाओगे, असाच काही तरी डॉयलॉग..
तो म्हणातो ' नो, शि इज डेड , फॉरएव्हर'
ती फक्त फादर कडे कनफेशन करते एवढच दाखवलय, बाकी खुनाचं कनफेशन करणार्‍यावर फादर नी काय अ‍ॅक्शन घ्यावी या बद्दल ख्रिश्चॅनिटी मधे काय रुल आहे माहित नाही, सहज शोधलं तर या बद्दल निरनिराळी मतं सपाडली नेट वर Happy
इथे बघा इंटरेस्टिंग आहे..
http://uk.answers.yahoo.com/question/index?qid=20081029140648AANqj7t

कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय, पटकथा सगळं मस्त पण प्रचंड patchy वाटते. कधी तरी अतिशय brilliant तर कधी तुकडे जोडल्यासारखे वाटत राहते. विशालचा नेहमीचा फ्लो आणि ग्रिप जाणवत नाहि. ह्यात मूळ कथेचा पण दोष असावा. ज्या character वर सगळी कथा बेतली आहे ते character नीट define वाटत नाही. तिच्या नवर्‍यांच्या characterizations मधे एव्हढा जमीन अस्मानाएव्हढा फरक आहे (जरी मधला बदलता काळ नि तिचे वय लक्षात घेतले तरी) कि असे वाटतेय She is just looking for someone to cling on to. Father figure concept मान्य केला तर तो कुठेही स्पष्ट होत नाही (एक बंदूकीचा भाग सोडला तर). हा झाला कि तो ह्या क्रमाने प्रेमात पडल्यासारखी स्थिती का होतेय हे कुठेही justify होत नाही. संपूर्ण कालखंड वीस-पंचवीस एक वर्षांचा आहे हे धरले तर तिची बदलती मनस्थिती अजिबात स्पष्ट होत नाहि (In spite of brilliant references to ongoing events) नंतरचा सायको मान्य केल्यावर शेवटचे भाग पटतो.

टोटल मिसफिट फॉर धिस रोल ! >> हा प्रियांकाचा दोष नाहि वाटत तर विशाल नि Ruskin Bond चा आहे, मूळात ते character नीट define नसल्यामूळे येतय असे मला वाटते.

शेवटचा नवरा नि त्याचा खून mystic आहे. त्याबद्दल चिनूक्षला अनुमोदन.

प्रियांकाचा अभिनय जर सायको दाखवला असता तर मला पटला नसता.. कारण Black Widow killers तसेही psychopath नसतातच. (Criminology ).
नुसत्या दार्शनिक वागण्यावरून जर खुनी कळले असते तर criminology ची कायच गरज होती !

बेस गन्डल्यासारखा वाटला ... कारण Black Widow killers प्रेमाच्या वैगेरे शोधात खून करत नाहीत. मेनली इन्शुरन्स साठी करतात.
प्रियांका सोबतच्या लोकांनी तिला खुनांमध्ये एवढी मदत का केली ते कळले नाही.

ह्याची कथा कुठल्या पुस्तकावरुन घेतली आहे. प्रतिसादात कोणीतरी म्हटले आहे की पुस्तक वाचले पाहिजे. कृपया पुस्तकाचे नाव सांगणार का?

मला ठिक वाटला हा चित्रपट.
भारद्वाज इव्हन मेक्स इट बिलीव्हेबल.
पण असाम्याला अनुमोदन. (भारद्वाज यांचे अगदी संस्मरणीय काम आहे असे नाही वाटले.)

Pages