मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन

Submitted by स्वाती२ on 17 February, 2011 - 17:23

दिवसेंदिवस भारतात उच्चशिक्षणाचा खर्च वाढत चाललाय. अगदी मेरीटवर अ‍ॅडमिशन मिळाली तरी फी, होस्टेलचे राहाणे वगैरे धरुन बराच खर्च येतो. हा वाढता खर्च भागवण्यासाठी नियोजन आवश्यक. त्या दृष्टीने मला माझ्या नात्यातील मुलीसाठी पैसे गुंतवायचेत. खास शैक्षणीक खर्चासाठी म्हणुन भारतात काही स्किम्स वगैरे असतील तर मला माहिती हवी आहे. इथे मुद्दाम विचारतेय कारण मायबोलीकर पालकांचे अनुभवाचे बोल एजंटच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे. माझ्या नात्यातील मुलगी साडेतीन वर्षांची आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५२९ मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर स्टेट बदललं तर ५२९ प्लान पण ट्रांसफर होऊ शकत का ?

५२९ मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर स्टेट बदललं तर ५२९ प्लान पण ट्रांसफर होऊ शकत का ?

मी अत्ता HDFC CREST योजनेत माझ्या नावावर पण मुलीसाठी म्हणुन पैसे गुंतवायला सुरवात केली आहे. मी मिळवलेल्या माहितीनुसार long term साठी म्हण्जे ७ -१० वर्षांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर ही योजना चांगली आहे.

मी सखी

डायव्हर्सीफाईड म्युच्युअल फन्ड्स: Reliance Growth, DSPBR Top 100 Equity, HDFC Growth, HDFC Top 200, HDFC Equity, Birla Top 100, Reliance Equity Opportunities, Templeton India Growth, IDFC Premier Equity etc.

श्री, तुम्ही अकाउंट रोल ओव्हर करु शकता तसेच तुम्ही ज्या स्टेट मधे रहाता त्या स्टेट ऐवजी दुसर्‍या स्टेटच्या प्लॅन मधेही गुंतवणूक करु शकता. फक्त दुसर्‍या स्टेट मधे गुंतवल्यास स्टेट्चा टॅक्स बेनिफिट जातो. माझा मुलगा लहान होता तेव्हा आमच्या स्टेटचा प्लॅन काही चांगला नव्हता त्यामुळे मी दुसर्‍या स्टेटचा प्लॅन निवडला. मी ५२९, कवरडेल अकाउंट आणि आय बॉन्ड(तेव्हा याचा परतावा चांगला होता) अशी गुंतवणूक केली.

माझ्या माहितीप्रमाणे यु. एस. सिटिझन किंवा ग्रीन कार्ड होल्डर असल्यास ५२९ मधे गुंतवणूक करता येते. पण असे करता येइल. सध्या पैसे सेव करायचे आणि कार्ड आले की एकदम गुंतवायचे. मॅरिड फायलिंग जॉईंटली असेल तर २६००० दर वर्षी गिफ्ट टॅक्स न लागता देता येतात.५ वर्षांचे अ‍ॅडव्हान्स मधे - १३००००. (सिंगल असाल तर १३००० प्रमाणे ६५०००)

वेका, स्वाती, धन्यवाद.

स्वाती, असे आपण एकदम किती वर्षांचे भरू शकतो? आणि असे सेव्ह करायला ऑप्शन्स कोणते चांगले राहतील्?म्हणजे रिटर्न्स चांगले आणि काढताना त्रास होणार नाही असे?( ह्याच्यानंतर मी बहुतेक आखूडशिंगी, बहुगुणी असे विचारायला लागेन बहुधा Happy

मी जर आता २५००० गुंतवले तर १० वर्षाने त्याचा चांगला परतावा कोणत्या स्कीममध्ये मिळेल. मलापण नात्यातल्या मुलाच्या शिक्षणासाटी वन टाईम गिफ्ट गुंतवणुक करायची आहे. कोणि मार्गदर्शन करेल का?

३-४ दिवसांपूर्वी हा धागा वाचनात आला. तेंव्हापासून विचार करतोय कि माझ्या मनातली गोष्ट तुम्हा पटेल कि नाही.
असो. आता सांगतोच.....

२००२ साली मी पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. चार वर्षांचा सगळा खर्च (कॉलेज फी+ परीक्षा फी + पुस्तके ) अंदाजे रु.६०,०००/- झाला होता ( ओपन आणि मेरीट कॅटेगरीसाठी ).
तुमचा प्रश्न वाचल्यानंतर पुण्यातल्या काही अभियांत्रिकी कॉलेजची फी मी ऑनलाइन शोधली तर ती वार्षिक रु. ९०,०००/- च्या आसपास आहे. म्हणजे चार वर्षांची फी अंदाजे ३,६०,०००/- पर्यंत जाते.
ह्या सगळ्यात होस्टेल चा खर्च धरलेला नाही.
२००२ साली सोने रु. ५०००/- होते म्हणजे माझ्या शिक्षणासाठी अंदाजे १२ तोळे इतके सोने लागले असे समजू . आज २०१२ साली सोन्याचा भाव रु. ३०,०००/- आहे आणि त्याच शिक्षणासाठी साधारणपणे १२ तोळे सोन्यायेवढा खर्च आजपण येतोय.

तुमची मुलांसाठी दरवर्षी थोडे सोने (२-३तोळे ) खरेदी करत राहिल्यास , जेंव्हा मुले कॉलेजपर्यंत पोहोचतील तेंव्हा तुमच्याकडे त्यावेळची फी भागवण्याएवढे सोने तर नक्कीच साठले असेल.
ज्या प्रकारच्या शिक्षणाकडे मुलांचा कल आहे त्या शिक्षणासाठीचा असा अनालिसिस करून गुंतवणुकीची मर्यादा ठरवण्यास हरकत नाही.
जर हि योजना पटत नसेल तर काही प्रमाणात सोने आणि काही प्रमाणात इतर गुंतवणूक करण्यास हरकत नाही.
पण एक सल्ला द्यावासा वाटतोय कि "सगळी गुंतवणूक" पोलिसी, फंड, गोल्ड इ. टी. एफ. आणि बॉन्ड यात करू नका. कारण हि सगळी 'पेपर गुंतवणूक' आहे आणि मलातरी त्याचा काही भरवसा वाटत नाही.

<कारण हि सगळी 'पेपर गुंतवणूक' आहे आणि मलातरी त्याचा काही भरवसा वाटत नाही> आँ? का बरे?
तोळा तोळा सोन्यापेक्षा गोल्ड फंड केव्हाही बिनधोक (चोरीचा, शुद्धतेचा प्रश्न नाही).
गोल्ड इटीएफमध्ये तसेच काही फंडांच्या ओपन एण्ड गोल्ड फंडमध्येही सिप करता येते.

निरजा, तुम्हाला हव्या असलेल्या प्रश्नाची उत्तरे याच धाग्याच्या आधीच्या पानांवर मिळतील. अनेक इन्शुरन्स कंपन्यांच्याही मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी योजना असतात. ज्यात लाइफ कव्हर नाही अशी पूर्णपणे गुंतवणुकीला वाहिलेली योजना निवडा. किंवा म्युचअल फंडांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या योजना निवडा.

मुलांना अशा प्रकारे गिफ्ट दिले(त्यांच्या नावावर गुंतवणूक करून) की ते पैसे बहुतेक वेळाअ मूल सज्ञान(१८ वर्षे) झाल्यावरच काढता येतात.दहावी-बारावीनंतर हे पैसे हाती येतीलच असे नाही.

वरील काही प्रतिसादात मुलांच्या "शिक्षणा" चे जे विचार प्रकट होत आहेत ते समाधान देणारे आहेत. निदान या संदर्भात पालकवर्ग चांगलाच जागृत होत आहे हे लक्षण दिसत आहे.

माझ्या नातीच्या (वय ६ महिने) पुढील शिक्षणाच्या दृष्टीने मी विचार करीत असतानाच आमच्या एल.आय.सी. एजन्टने अशा तरतुदीसाठी 'जीवनछाया' नामक ५ लाखाची पॉलिसी घ्यायला लावली. वार्षिक हप्ता २५,९३२/- पडतो. एलआयसीने परतावा कोष्टक खालीलप्रमाणे दिले आहे :

१. नातीला तिच्या १६ वर्षी : रु.१,२५,०००/- तिला मिळतील.
२. १७ वर्षी : रु.१,२५,०००/-
३. १८ वर्षी : रु.१,२५,०००/-
४. १९ वर्षी : रु.१,२५,०००/-
५. २० वर्षी : बोनस

~ हा दर [वा परतावा] सध्याच्या रेटप्रमाणे असून मुलीच्या वयाच्या १६ वर्षी रेटची जी स्थिती असेल त्यानुसार रकमेचे कॅलक्युलेशन होईल.

वार्षिक हप्ता किती बसणार हे माहीत झाल्यामुळे त्यानुसारे दरमहा स्वतंत्र बचत करणे {साधारणतः रुपये दोन हजार} मलाही सोयीचे झाले आहे.

अशोक पाटील

पाटील सर,
कुणीही एल आयसी ला श्रीमंत करू जातो ते पाहून रहावत नाही:
...
Sample illustration of LIC Jeevan Chhaya Plan

Premium = Rs.4653/-, Age = 35 years
Policy Term = 25 years, Premium Paying Term = Regular Pay
Sum Assured = Rs 1,00,000
Total Investment = Rs 4653 x 25 = Rs 116325
-----
Guaranteed Return is

Year 22 = Rs 25000/-

Year 23 = Rs 25000/-

Year 24 = Rs 25000/-

Year 25 = Rs 25000/- + Bonus (Variable)
****

१ लाखावर १ लाख बोनस दिला तरी २५ वर्षांत रक्कम फक्त दुप्पट?? आपल्याला एल आयसी मूर्खात काढते आहे. वरून २५ वर्षांत रुपयाची जी किम्मत घटते, ती पाहून रडू येते. त्यावेळी २ लाख तुम्हाला २०,००० रुपयांसारखे वाटतील Happy

डॉक्टर....

तुमचा मुद्दा मला पटत नाही असे मी मुळीच म्हणणार नाही. पण नातीसाठी सोनेनाणे असे काही करण्याचा माझ्या मनी विचार आला नाही....कारण पुढेमागे या ना त्या कारणास्तव त्या सोन्याला दाही दिशा फुटू शकतात. पण एलआयसी पॉलिसीचे तसे नसते. एकदा गुंतविले की आपण विसरून जावे हा मध्यममार्ग मला {म्हणजे माझ्यासारख्या शांत स्वभावाच्या व्यक्तीला} ठीक वाटला. रुपयाचे होऊ श़कणारे अवमूल्यन ही बाब माझ्या मनालाही पॉलिसीसमयी स्पर्शून गेली होतीच.

शाल्मली {नातीचे नाव} साठी मी....आजोबाने....काही केलेच पाहिजे अशी सुदैवाने काही परिस्थिती नाही, तरीदेखील पुढेमागे ज्यावेळी तिच्या हाती पहिला चेक पडेल त्यावेळी मी जरी हयात नसलो तरी ती कृतज्ञतेने माझी आठवण तरी काढेल....

एवढीच अपेक्षा.

Always keep your Insurance and Investments separate. Insurance is NOT investment. It is a cost paid to secure the future of your dependants in an unfortunate event.

मला पीपीएफ सगळ्यात छान इन्व्हेस्टमेंट वाटते. पोस्टाचा दुसरा नंबर.
मग सोने नंतर रियल इस्टेट.

आपल्या इच्छेनुसार व मुलांच्या वयानुसार 'रोज' थोडे पैसे बाजूला काढावेत. उदा. १०० रु. वा ५० वा ५००;) रुपये रोज. १०० चा हिशोब केला, तर दर महा सुमारे ३ हजार जमतात. ७ वर्षांत पोस्ट दुप्पट देते. (साधी एफ.डी.) सात वर्षांनी पैसे घालणे बंद केलेत तरी परत गुंतवून : २१ व्या वर्षीपासून पुढली ७ वर्षे दर महा १२ हजार मिळू लागतात.
एकूण गुंतवले ३ ह. * १२ * ७ = २ लाख ५२ हजार
परत मिळतात १२ ह. * १२ * ७ = १० लाख ८ हजार. तेही फक्त ७ वर्षे गुंतवणुक करून.

बघा एलायसीशी तुलना करून

एक्झॅक्टली @ मयेकरजी.
दर वर्षी काढायचा जीवन विमा फाऽर स्वस्त पडतो..
(वरचा प्रतिसाद टंकताना चहा घेत होतो, तोच पाटील सरांचे उत्तर ही आले अन मयेकरांचेही)

श्री.मयेकर यानी 'इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेन्ट" यांच्यातील सीमारेषा अधोरेखीत केली आहे. पैकी 'इन्व्हेस्टमेन्ट' संदर्भात बोलायचे झाल्यास माझे {माझ्याच गाढवपणामुळे म्हणतो मी...} हात बर्‍यापैकी पोळून गेल्यामुळे गेल्या काही वर्षापासून मी ताकही फुंकून पीत आहे असे म्हटले तरी चालेल, भरतजी.

त्यामुळे राष्ट्रीकृत बॅन्क्स आणि एलआयसी असे दोनच पर्याय माझ्यासारख्या सशाच्या हृदयाच्या व्यक्तीसाठी राखीव आहेत असेच मी मानले असल्याने नातीसाठी तो 'जीवनछाया' चा प्लॅन स्वीकारला.

[....आणि डॉक्टर...सांगू नये, पण सांगतोच की, पोस्टानेदेखील मला चटका दिला आहे. थेट पोस्टाने नव्हे पण एजंटाने....ती रामकहाणी इथे सांगणे म्हणजे कायद्याच्या विरूध्दच होईल. पण असो, वर म्हटल्याप्रमाणे माझीच अक्कल त्या काळात अडगळीला पडली होती असे म्हणतो.]

अशोक पाटील

इब्लिस, इक्विटी शेयर्स मध्ये किंवा इक्विटी म्युचल फंडातही गुंतवणूक करा की! भारताच्या आर्थिक प्रगतीत सहभागी व्हा आणि त्याची फळेही चाखा. जेव्हा सर्वसामान्य भारतीय मोठ्या संख्येने इक्विटी मार्केटमध्ये उतरतील तेव्हाच भारताच्या अर्थव्यवस्थेचे परदेशी गुंतवणूकदार संस्थांवरचे अवलंबन कमी होईल.

भारतीयांचा बचतीचा सरासरी दर चांगला असतो पण गुंतवणुकीचा मात्र नगण्य.

पीपीएफ, पोस्ट ऑफिस यात रियल रेट ऑफ रिटर्न (मिळणारे व्याज - इन्फ्लेशनचा दर) किती पडते? सरकारी रोख्यांमध्ये रिस्क सगळ्यात कमी (शून्य) म्हणुन व्याजदरही कमी. म्युचल फंडांच्या डेब्ट योजनांत किंवा FMP मध्ये थोडे रिस्क घेऊन थोडा जास्त परतावा मिळेल.
तुमच्या एकंदरित गुंतवणुकीमुळे(पोर्टफोलियो) स्थैर्य(सरकारी रोखे), तरलता/लिक्विडिटी(डेब्ट फंड्स), परतावा/नफा(इक्विटी) या तीनही गोष्टी लाभल्या पाहिजेत.

मयेकरजी,
मार्केट खेळायचं तर थोडा तरी वेळ त्याला द्यायला हवा. तो दिला तर माबोवर यायला वेळ उरणार नाही. Wink तेव्हा अगदीच नावापुरते ब्लूचिप सोडलेत तर शेअर्स फारसे नाहित. म्युचुअल फंडस, सिप आहेत, कारण तिथे मला फार डोके घालावे लागत नाही.
पण कशानेच अजून तरी सोन्याइतका रिटर्न दिलेला नाही. ७-९ हजारा दरम्यान असताना थोडे घेऊन ठेवले होते, Wink

इथे मुलांच्या शिक्षणासाठीची तरतूद याबद्दल बोलत आहोत. ती इन्व्हेस्टमेंट रिस्क-फ्री असावी असेच वाटत असते, म्हणून पोस्ट, इंदिरा विकास/किसान विकास पत्रे इ. सुचवले. परतावा कमी असला तरी पक्का आहे.

पाटिल सर,
एजंट हा प्रकार खरेच बोगस असतो.
विम्याच्या चांगल्या स्कीम्स कुणीच सांगत नाही. त्याला ज्यात जास्त कमिशन मिळते ती पॉलिसी आपल्या गळ्यात मारतात. आपल्यासाठी चांगली कोणती ती नाही Sad

जमिन , सोने, पीपीएफ मार्केट अशी उतरत्या क्रमाने पसंती आहे.
आमच्या इथे ठराविक भागात गेल्यावर्षी ६२ लाख प्रतिएकर किंमत होती. आज ९० लाख आहे.
चं ग ळ !
सोन्यानेही एका वर्षात इतका परतावा दिलेला नाही.

"....त्याला ज्यात जास्त कमिशन मिळते ती पॉलिसी आपल्या गळ्यात मारतात...."

~ साधू साधू....बिल्कुल सही बात, डॉक्टर.

पण झाले आहे असे की 'गवत कमी गोचिड्या जास्त' या न्यायाप्रमाणे त्यातल्या त्यात कमी रक्तपिपासू एजंटकडूनच अशी पॉलिसीची कामे करून घ्यावी लागतात [असे माझ्यापुरते तरी मी म्हणतो, कारण तसा मी थेट एलआयसी ऑफिसमध्ये कधीच गेलेलो नाही]. पॉलिसी त्याच्याकडून घेताना 'तू इथे माझ्या घरी स्वतः येऊन हप्त्याचे पैसे नेले पाहिजेस....मी त्या ऑफिसमध्ये भरण्यासाठी जाणार नाही...' अशी स्पष्ट आणि रोखठोक ताकीद त्याच्या बायकोच्यासमोरच दिली असल्याने आजपर्यंत तरी आमच्यात सौहार्दाचे नाते आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

अशोक पाटील

साती,
मी ८५ रुपयाने घेतलेला एक प्लॉट ९५० झाला आहे ४ वर्षांत. अन दुसरा डोक्यावर घेऊन विकत फिरले तरी विकला जात नाहीये Wink जमीन नक्की नसते असे अनुभवाने झालेले मत.

मला पीपीएफ सगळ्यात छान इन्व्हेस्टमेंट वाटते.>>> अगदी हेच लिहायला अलो होतो. दरवर्षी वेवढे भरतो त्याच्या ३१ पट १५ वर्षानंतर मिळतात. टॅक्स फ्री . आणि अगदी जन्मलेल्या मुलाच्या नावे देखिल हे काढता येते. आणि त्याचे १ लाखाचे वेगळे लिमिट आहे. ( आमच्या गावातल्या पोष्टात ही माहित नव्हते. Uhoh त्यांना जिल्हयाच्या पोष्टातुन फोन वर बोलुन खात्री करुन द्यावी लागली.)

Pages