मुलांच्या उच्चशिक्षणासाठी पैशाचे नियोजन

Submitted by स्वाती२ on 17 February, 2011 - 17:23

दिवसेंदिवस भारतात उच्चशिक्षणाचा खर्च वाढत चाललाय. अगदी मेरीटवर अ‍ॅडमिशन मिळाली तरी फी, होस्टेलचे राहाणे वगैरे धरुन बराच खर्च येतो. हा वाढता खर्च भागवण्यासाठी नियोजन आवश्यक. त्या दृष्टीने मला माझ्या नात्यातील मुलीसाठी पैसे गुंतवायचेत. खास शैक्षणीक खर्चासाठी म्हणुन भारतात काही स्किम्स वगैरे असतील तर मला माहिती हवी आहे. इथे मुद्दाम विचारतेय कारण मायबोलीकर पालकांचे अनुभवाचे बोल एजंटच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे. माझ्या नात्यातील मुलगी साडेतीन वर्षांची आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला धागा खुप माहिती मिळेल माबोकरांकडून अस वाटतय.
एल आय सी ची मुलांसाठी एक पॉलिसी आहे. कितपत उपयोगी पडेल माहित नाही. पण त्यात मुलांच्या १०वी, १२वी आणि नंतर २-२ वर्षानी अशी रक्कम मिळणार आहे.(२-२ वर्षानी किती वेळा ते नक्की माहित नाहिये)मुलांच्या महत्वाच्या वर्षात तो पैसा हातात मिळेल अशी व्यवस्था आहे. अर्थात किती रकमेची पॉलिसी आहे त्यावर मिळणारी रक्कम अवलंबून आहे. त्यामुळे मुल मोठी होतिल तेव्हा (आजकाल वाढत जाणारा खर्च बघता) ती मिळणारी रक्कम होणार्‍या खर्चाला हातभार म्हणुन नक्कीच उपयोगीहोईल.

मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून इंश्युरंस कंपन्या आणु म्युच्यल फंडांच्या ज्या योजना आहेत, त्या मला किचकट वाटतात. तुम्हाला कधी नेमके किती पैसे मिळणार आहेत, हे कळत नाही. त्यात लवचिकता आहे का याबद्दलही शंका आहे. पुन्हा या योजना युलिपसारख्या असतील तर त्यांच्या कॉस्ट्स जास्त असणार, आणि दीर्घ मुदतीच्या योजनांत अशा आरंभी कापल्या गेलेल्या खर्चाने परताव्यात चांगलाच फरक पडतो.
यापेक्षा सरळ एखाद्या डायव्हर्सिफाइड म्युच्यल फंडात sip स्वतः(पालक)च्या नावाने सुरू करावी. (मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्यात वेगळ्या कटकटी आहेत). आपल्याला किती वर्षांनी किती किती पैसे लागतील याचा आढावा सतत घेत रहावा.
शिक्षणाचा खर्च अन्य खर्चांपेक्षा अधिक वेगात वाढतो. तेव्हा जर आज एखादा कोर्स करायला एकूण ३ लाख खर्च येत असेल, आणि प्रत्यक्षात तो कोर्स करायला अजून १० वर्षे असतील , तर दरसाल १० टक्के चक्रवाढदराने तेव्हा अंदाजे ८ लाख लागतील.
अशा प्रकारे लक्ष्य रक्कम ठरवून सिप करावे. जसजसे मूल मोठे होत जाईल(म्हणजे खर्चाची वेळ जवळ येत जाईल), तसतशी डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडातली रक्कम प्रथम बॅलन्स्ड फंडात मग एमाआयपी फंडात आणि शेवटी डेब्ट योजनेत गरजेनुसार
ट्रान्सफर करीत जावे.
जेवढ्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल तेवढे चांगले.
वर्षातून एकदा गुंतवणुकीचा आणि अपेक्षित खर्चाचा आढावा घ्यावा.
प्रत्येक मुलासाठी वेगळा अकाउंट ठरवून घ्यावा. आणि यातले पैसे अन्य कारणासाठी उचलण्याचा मोह कटाक्षाने टाळावा.

भरत मयेकर यांना पुर्ण अनुमोदन.

बाय द वे:
जर मुले एन आर आय /ओ सी आय्/पी आय ओ असतील तर त्याना भारतीय नागरीक मुलांपेक्षा जास्त खर्च येतो. उदा. सी ओ ई पी मधे भारतीय नागरिक असेल तर वर्षाचा खर्च ४१,००० रु. आहे आणि एन आर आय असेल तर खर्च $५५०० रु. म्हणजे जवळपास ५ पट येतो. त्यामुळे ज्यांची मुले या कॅटेगरीत येतात आणि ज्याना भारतात शिक्षण घ्यायचे आहे त्यानी वेगळे गणित करायची गरज आहे.

मुलाच्या/मुलीच्या नावाने पीपीएफ अकाउंट उघडा. त्यात दर वर्षी ७०,००० पर्यंत रक्कम गुंतवता येते, व्याज दर (मला वाटतं) ८% आहे आणि शिवाय व्याज टॅक्स फ्री असते.

धन्यवाद मंडळी. मला या छोटीसाठी one time gift म्हणून पैसे गुंतवायचेत. दरवर्षी इथून पैसे पाठवणे किंवा दर महिन्याला थोडे थोडे गुंतवणे व्यावहारीक दृष्ट्या जमणार नाहिये. आमची भारतवारी ५-६ वर्षांनी होते. तेव्हा मुली साठी गुंतवणुक करुन कागदपत्रे तिच्या आईकडे सुपुर्द करता येतील असे काही असेल तर बरे पडेल. गिफ्टचा हेतू शैक्षणिक खर्चाला हातभार हा असल्याने , आई-वडिलांना या रकमेतून इतर कशासाठी उचल करता येऊ नये हेही महत्वाचे आहे.

जर मुले एन आर आय /ओ सी आय्/पी आय ओ असतील तर त्याना भारतीय नागरीक मुलांपेक्षा जास्त खर्च येतो. >>>>>>>>मनस्मी, जर मुलगा परदेशात जन्मला असेल आणि त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल किंवा भारतीय आणि परदेशी पासपोर्ट असेल तर तो एन.आर.आय. ठरतो का?
आणि ओ सी आय, पी आय ओ म्हणजे काय?

लहान मुलांसाठी वन टाईम गुंतवण्यासाठी एल आय सी ची सिंगल प्रिमीयम पॉलिसी मिळते.शिवाय जवळचे नातेवाइक ती भेट म्हणुन देवू शकतात. मुले सद्यान झाल्यावर पालकांच्या संमतीने तिचे हस्तांतरण मुलाच्या नावे होते. सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून पहावी.
शिवाय एखाद्या म्युच्वल फंडात देखील गुंतवता येतील फक्त तो डायव्हर्सिफाईड असावा.

one time gift म्हणून पैसे गुंतवायचेत. दरवर्षी इथून पैसे पाठवणे किंवा दर महिन्याला थोडे थोडे गुंतवणे व्यावहारीक दृष्ट्या जमणार नाहिये. आमची भारतवारी ५-६ वर्षांनी होते. तेव्हा मुली साठी गुंतवणुक करुन कागदपत्रे तिच्या आईकडे सुपुर्द करता येतील असे काही असेल तर बरे पडेल. गिफ्टचा हेतू शैक्षणिक खर्चाला हातभार हा असल्याने , आई-वडिलांना या रकमेतून इतर कशासाठी उचल करता येऊ नये हेही महत्वाचे आहे.
>>>>>>>>>>>>

स्वाती२, स्टेट बँकेच्या ह्या बॉण्ड योजनेचा तुम्ही विचार करू शकता, फायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणूक आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7505506.cms

या एसबीआय बाँड्स मध्ये NRI ना गुंतवणूक करता येणार नाही. व्याज दरसाल घ्यावे लागेल, चक्रवाढ व्याजाची सोय नाही. डीमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.

NRI ना गुंतवणूक करता येणार नाही>>>> मुलीच्या नावावर गुंतवणूक करून पालक म्हणून तिच्या आई-वडिलांचे नाव घालता येईल का?

व्याज दरसाल घ्यावे लागेल>>> ते बँकेत जमा करून त्याचा रीकरींग अकाऊंट उघडता येऊ शकेल.

चक्रवाढ व्याजाची सोय नाही. डीमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. >>> ह्म्म Sad डिमॅट अकाऊन्ट 'मायनरचा' उघडू शकतो का आपण?

मुलीच्या नावावर गुंतवणूक करून पालक म्हणून तिच्या आई-वडिलांचे नाव घालता येईल का?
हे शक्य आहे.
या बाँड्सचे पैसे मुदतीपूर्वी परत करायचा ऑप्शन एसबीआयने ठेवला आहे.
नात्यातल्या मुलाला गिफ्ट करायची असेल तर म्युच्यल फंड्/इंशुरंस कंपन्यांच्या योजनांत गुंतवायला हरकत नाही. (माहिती शोधून नंतर पोस्ट करेन).
मी पहिल्या प्रतिसादात दिलेली माहिती, स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतुदीबाबत आहे.

मुलाच्या/मुलीच्या नावाने पीपीएफ अकाउंट उघडा. त्यात दर वर्षी ७०,००० पर्यंत रक्कम गुंतवता येते, व्याज दर (मला वाटतं) ८% आहे आणि शिवाय व्याज टॅक्स फ्री असते.>>>

पण १८ वर्षाच्या आधी ppf उघडता येते का ?

आप्ण दिलेल्या माहितीनुसार मुलीचे वय साडेतीन वर्ष आहे. अन्दाजे अठराव्या वर्षापासून उच्च शिक्षणास सुरुवात होते. म्हणजे १४ १/२ ते १५ वर्षाचा कालावधि आपल्याकडे आहे हे लक्षात घेतल्यास समजा रु. ५००००/- एकरकमी गुन्तवल्यास खाली दिल्या प्रमाणे रक्कम जमा होउ शकेल. ८% व्याज दराने १५८६०८, १२ %ने २७३६७८ व १५% ने ४०६८५३. काही माबोकरांनी विम्याचा पर्याय सुचविला आहे पण त्यामधे ६ ते ८% पेक्षा जास्त परतावा मिळत नाही. तसेच पीपीएफ अकाउंट मधे दर वर्षी कमीत कमी रु पाचशे जमा करणे बंधनकारक आहे. जरी मिळणारा व्याज दर ८.५% असला तरी भारतात महागाई वाढीचा दर ६ ते ८% दरम्यान असतो हे लक्षात घेतल्यास निव्वळ परतावा १-२% पेक्षा जास्त असणार नाही. आपल्याकडे १४ ते १५ वर्षाचा कालावधि असल्यामुळे डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड हाच उत्तम पर्याय असेल. यामधे १५ ते १८% परतावा अपेक्षित करता येईल.

स्वाती२, तुम्ही ज्या (पर्)देशात असाल तिथेच एक रिकरींग काढून वार्षिक रक्कम जमा झाल्यावर भारतातील योजनेत (पीपीएफ, इ.) ट्रान्सफर करू शकता. तुम्ही HSBC सारख्या बँकेत आंतरराष्ट्रिय पालका/पाल्याबरोबर जोडखाते काढून Saving accountslaपैसे घालू शकता आणि तिथे ECS देऊन SIP/DMIF मध्ये गुंतवणूक करू शकता.. मात्र ही गुंतवणूक पालकाला अथवा सज्ञान पाल्याला काढता येईल.

स्वतःच्या पाल्यासाठी मला अशी सोय करायची आहे. सध्या आम्ही SIP/Funds/LIC ह्या तिन्ही प्रकारात थोडी थोडी इन्वेस्टमेंट केली आहे.

दुर्दैवाने आम्हाला केवळ अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वास्तुविशारद ह्या ३ क्षेत्रातील खर्चांचीच कल्पना आहे. आणखीन काही भयंकर महाग शिक्षण संधी असतात का? आणि असल्यास कोणत्या व साधारण किती खर्च आज येतो हे कोणी सांगेल काय? म्हणजे त्यानुसार विचार करता येईल आणि गुंतवणूक करता येईल. कोणी वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात महागड्या शिक्षणखर्चाची कल्पना देऊ शकेल काय?

हा प्रश्ण इथे अस्थानी असेल तर इतर कुठे ह्यावर चर्चा झालीये का? कृपया मला लिंक द्या.

>> पण १८ वर्षाच्या आधी ppf उघडता येते का ?

@मनीशा हो. मी उघडले आहे.

>> आणखीन काही भयंकर महाग शिक्षण संधी असतात का?
@जाईजुई, हो. परदेशात पाठवायचं ठरवलस तर कितीही खर्च येऊ शकतो. उदा. इंग्लंडमधे अभियांत्रिकीचं शिक्षण (४ वर्षांची फी + रहाण्याखाण्याचा खर्च) एक कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतं.

चिमण पण इथे म्हणजे इंग्लंडात पोरे शिकतानाच नोकरी करून स्वतःची थोडी फार सोय करतात ना?

मला केवळ शिक्षण खर्च म्हणजे फी.. निदान एवढी तरी पालकांनी द्यावी असे वाटते. Sad

कोणी वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात महागड्या शिक्षणखर्चाची कल्पना देऊ शकेल काय?>>
तुम्हाला परदेशातला हवाय का भारतातला?

भारतातले एक उदाहरणः
काशीबाई नवले मेडीकल कॉलेज पुणे यांची पेड सीटची फक्त कॉलेज फी आहे ४,६०,०००/- प्रतिवर्ष..(फक्त फी डोनेशन नाही) जर ५ वर्षे शिक्षण धरले तर फी होते २३,००,००० रु. ही झाली आताची फी..
महागाई धरुन १५ वर्षानंतरची फी धरली तर ती होइल किमान ५०,००,०००.
आणि जर मुल भारताचे नागरीक नसेल तर याला ५ ने गुणा..
अर्थात हे मी सगळ्यात महागडे माझ्या माहितीतले सांगितले. याहुनही कमी फीची कॉलेजेस आहेत पण तरीही ३५,००,००० कुठे गेले नाही आहेत.

मला वाटते तुमचे मुलगा/मुलगी भारतात शिकणार असेल (आणि भारतीय नागरीक असतील तर) वैद्यकीय साठी ५०,००,००० रु. ची तरतुद केलीत तर ती इतर कुठ्ल्याही अभ्यासक्रमासाठी पुरेशी होइल. जर त्याना शासकीय वैद्यकीय कॉलेजात मिळाले तर काही प्रॉब्लेमच नाही. एन आर आय मुलाना मात्र तो मार्ग बंद आहे कारण शासकीय वैद्यकीय कॉलेजात "फक्त भारतीय नागरीकानाच" प्रवेश आहे. असो.

>> इंग्लंडात पोरे शिकतानाच नोकरी करून स्वतःची थोडी फार सोय करतात ना?
हो. इंग्लंडात परदेशी पोरांना आठवड्यात २० तास (सुट्टीत ४० तास) काम करता येते. तासाला फार फार तर ५/६ पौंड मिळतात. रहाण्या-खाण्याचा खर्च प्रतिवर्षी तुम्ही कुठे रहाता आहात त्यानुसार ६००० ते ९००० पौंडा पर्यंत काहीही येऊ शकतो. विद्यापीठाची फी प्रतिवर्षी १०००० पौंडापासून २५००० पौंडापर्यंत आहेत (मेडिकलच्या फिया जास्त आहेत).

असे ऐकले आहे कि अमेरिकेत higher education घ्यायचे असेल तर मुलान्च्या नावावर पैसे ठेवु नये कारण त्या मुळे त्याना scholarship / assistance मिळायला त्रास होतो.

सुयोग,
need based scholarship/ fin aid साठी विचार करताना पालकांचे उत्पन्न विचारात घेतले जाते. 401k वगैरे रिटायरमेंट्चे सेविंग वगळता बाकी सेविंग विचारात घेतात. त्यामुळे 529 मधे सेविंग नाहिये पण पालकांचे टॅक्सेबल सेविंग असेल तर ते विचारात घेतले जाईल. शिवाय हे सेविंग tax advantaged नसेल.

१. मुलांच्या नावावर पैसे असतील तर ते १००% विचारात घेतले जातात.
२. पालकांच्या नावावर असतील तर ते काहीच प्रमाणात विचारात घेतले जातात. जर पालकांना १ पेक्षा जास्त मुले असतील तर ते प्रमाण अजून कमी होते. ५२९ मुलांच्या नावावर धरत नाही.
३. प्रत्येक कॉलेजमधे need based scholarship/ fin aid साठी किती प्रमाणात पालकांचे उत्पन्न विचारात घ्यायचे याचे नियम वेगळे असतात. काही कॉलेजात तुमच्या घराची किंमतही विचारात घेतात.
४. सहसा सॉफ्टवेअर व्यवसायात असलेल्या (आणि मूल जन्माला यायच्या वेळेस म्हणजे १३-१५ वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेल्या) भारतीय व्यक्तींचे उत्पन्न आणि बचत ही need based scholarship/ fin aid मिळण्याच्या पलिकडे असते त्या मुळे क्वचितच need based scholarship/ fin aid मिळते. दुर्देवाची गोष्ट म्हणजे अजिबात बचत न करणार्‍या , पैसे उधळून टाकणार्‍या पालकांच्या मुलांना मात्र need based scholarship/ fin aid मिळते.
५. पूर्णपणे Merit based scholarship असतात आणि मिळतात.

अमेरिकेतल्या शिक्षणाचा खर्च सध्या दरवर्षी ६% वाढतो आहे.

सुयोग, बरोबर. पालकांचे उत्पन्न काही प्रमाणातच विचारात घेतात. पण बहुतेक भारतीय वंशाचे लोकं त्या फॉर्मुल्यात बसत नाहीत. आमच्या स्टेट्चा 21st century scholar म्हणुन उपक्रम आहे, त्यात माझ्या मुलाच्या वर्गातील कुणीच योग्य ठरले नाही. अगदी चार-पाच भावंडे असुनही. आणि जे योग्य ठरु शकतील ते पुढे शिकायला उत्सुक नाहियेत. :(. मेरीट स्कॉलरशिप+ ग्रांट्स+ ५२९ असे करुन मात्र खर्चाचा ताळमेळ जमवता येतो. दिवसेंदिवस शिक्षण इतके महाग होत चाललेय की ५२९ मधे पैसे गुंतवणे शहाणपणाचे. मात्र आधी स्वतःच्या रिटायरमेंटसाठीची सेविंग्जची सगळी खाती मॅक्स आउट करावी, घराचे कर्ज लवकरात लवकर फेडून टाकावे. शेवटी शिक्षणासाठी मुलाला कर्ज काढता येइल, पार्ट टाइम जॉब करता येइल पण उतारवयात जगण्याची तरतुद आपली आपणच केली पाहिजे.

prosperityplanner, आपल्याकडे १४ ते १५ वर्षाचा कालावधि असल्यामुळे डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड हाच उत्तम पर्याय असेल. यामधे १५ ते १८% परतावा अपेक्षित करता येईल.>> डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड कुठले आहेत ते जरा सविस्तर सांगता का? मलाहि माझ्या मुलीसाठि काहितरी गुंतवणुक दर वर्षी करायची आहे. सध्या ती पावणे तीन वर्षाची आहे. मी PPF मधे टाकायचा विचार करतेय पण तुमच्या पोस्टप्रमाणे ते जास्त फायदेशीर नाहि म्हणुन जरा डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडाची नावे सांगणार का?

स्वाती२ तुम्ही युटीआयच्या सीसीपी योजनेचा विचार करू शकता.
http://utimf.com/ccp/features.aspx

मी_सखी, तुम्हाला हवी असलेली माहिती
http://www.maayboli.com/node/2029

http://www.valueresearchonline.com/funds/h2_typecomp.asp?type=1&objective=8
इथे मिळेल.

EDUCATION PLANNER
Prepaired for MrAnant Muley Childs Name :Sampada Muley
A Age of your Child 10
Data B Age at which higher Education will start 25
C No.of years left ( B-A ) 15
Assumption D Expected Inflation in Education Cost 8%
E Expected returns on investment ( 6%,8%,10% ) 10%
Your Goal F Total cost of desired Education today 200000
Current Savings G Total savings accumulatedas of date for
childs Education 0
Gap H Shortfall that you might have if you do not start
saving more ( F - G ) 200000
I Inflation factor which corresponds to C & D
Future value ( Refer table Below ) 3.2
of the Gap J Actual Gap when higher Education will start as
Education costs keep rising ( J = H * I ) 640000
K Gap factor which corresponds to C & E
Saving ( Refer table Below ) 2.90%
Required L Annual amount you need to save to bridge 18560
the gap ( L = J * K )
M Monthly savings required ( L / 12 ) 1547
Your Budget N I agree to commit for my childs Education
( Amount P.A. )

Multiple Factor Table

No. of yrs for Inflation /Intrest Factor Gap Factor ( In % )
higher Edu.to 6% 8% 10% 6% 8% 10%
start
5 1.3 1.5 1.6 16.70% 15.8 14.9
6 1.4 1.6 1.8 13.5 12.6 11.8
7 1.5 1.7 1.9 11.2 10.4 9.6
8 1.6 1.9 2.1 9.5 8.7 7.9
9 1.7 2 2.4 8.2 7.4 6.7
10 1.8 2.2 2.6 7.2 6.4 5.7
11 1.9 2.3 2.9 6.3 5.6 4.9
12 2 2.5 3.1 5.6 4.9 4.3
13 2.1 2.7 3.5 5 4.3 3.7
14 2.3 2.9 3.8 4.5 3.8 3.20%
15 2.4 3.2 4.2 4.1 3.4 2.90%
16 2.5 3.4 4.6 3.7 3.1 2.5
17 2.7 3.7 5.1 3.3 2.7 2.2
18 2.9 4 5.6 3.1 2.5 2
19 3 4.3 6.1 2.8 2.2 1.80%
20 3.2 4.7 6.7 2.6 2 1.6
21 3.4 5 7.4 2.4 1.80% 1.4
22 3.6 5.4 8.1 2.2 1.7 1.3
23 3.8 5.9 9 2 1.50% 1.1
24 4 6.3 9.8 1.9 1.4 1
25 4.3 6.8 10.8 1.7 1.3 0.9

Pages