पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by स्वाती on 2 February, 2011 - 07:52

येथे पुण्यात होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती लिहूयात.

कार्यक्रमाचे नाव
तारीख
ठिकाण
फोन नंबर ( असल्यास)
किंवा वेब साईट माहित असल्यास

अशा साधारण स्वरूपात माहिती लिहूयात
हा धागा रैना ने काढलेल्या "मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम" या धाग्यावरुन काढला आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयसीएसआरआयतर्फे गुरुवारपासून 'काॅईनेक्स पुणे 2015' चे आयोजन
पुणेकरांना अनुभवता येणार दुर्मिळ नाण्यांचा खजिना
पुणे:- येथील इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही 'काॅईनेक्स पुणे 2015' या राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 10, 11 आणि 12 डिसेंबर 2015 या कालावधीत हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन प्रदीप सोहोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र शहा, सचिव शरद बोरा, खजिनदार आणि प्रदर्शनाचे समन्वयक नितीन मेहता, बस्ती सोळंकी, सल्लागार सुनील जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदीप सोहोनी म्हणाले की, इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् तर्फे गेल्या 19 वर्षांपासून नाण्यांचे हे राष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यंदा या प्रदर्शनाचे 20 वे वर्ष आहे. या प्रदर्शनात प्राचीन, मुघल, नजराणा, एरर अशा दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांची वैविध्यता पुणेकरांना बघायला मिळणार आहे. दिनांक 10, 11 आणि 12 डिसेंबर 2015 या कालावधीत सोनल हाॅल, कर्वे रोड, पुणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 10.00 (दहा) वाजता होणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून मुंबई येथील तोडीवाला ऑक्शनचे मालक आणि प्रसिद्ध नाणक संग्राहक फारूकभाई तोडीवाला उपस्थित राहणार आहेत. फारूकभाई तोडीवाला हे भारतातील नाणक लिलावाचे उद्गाते मानले जातात. यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून सोसायटीचे दिवंगत सदस्य आणि माजी चेअरमन काशिनाथ पंडित यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंडित यांचा खूप मोठा संग्रह
होता आणि या क्षेत्रात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात होते. तसेच यावेळी नाणकशास्त्रातील पितामह मुंबईचे पुखराजभाई सुराणा यांनाही जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच नव्याने गिनीज रेकॉर्ड होल्डर झालेले सोसायटीचे सदस्य त्रिवेंद्रमचे डॅनियल मोन्टॅरिओ यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. मोन्टॅरिओ यांच्या पक्ष्यांच्या स्टॅम्प कलेक्शनला गिनीज रेकॉर्डने मान्यता दिली आहे. यावेळी 'काॅईनेक्स पुणे 2015' या प्रदर्शनावर आधारित एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या स्मरणिकेमध्ये भारतातील 14 तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश आहे.
भारताचा इतिहास पाहता सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासून भारतात नाणी प्रचलित आहेत. अशी सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीपासूनची म्हणजे इ.स. पूर्व पाचशे वर्षांची नाणी या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात 75 फ्रेम्स लावण्यात येणार आहेत. अतिशय दुर्मिळ अशा प्रकारचे संग्रह पुणेकरांना बघायला मिळणार आहेत. भारतातल्या विविध ठिकाणांहून हे संग्राहक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. तसेच यानिमित्ताने प्रदर्शनात सहभागी होणार्‍या 75 संग्राहकांची स्पर्धा होणार असून त्यासाठी नागपूर, पुणे, मुंबई, मेरठ अशा विविध ठिकाणचे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी दुपारी 4.00 (चार) वाजता कलेक्टर्स सोसायटीतर्फे पुणेरी पगडीच्या स्पेशल कव्हरचे उद्घाटन पुण्याचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावलेश्वरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्त त्या दिवशी सकाळपासून पोस्ट विभागाचा विशेष स्टाॅल प्रदर्शनाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यामध्ये पोस्टाची विविध तिकिटे आणि पाकिटे बघायला मिळणार असून त्यांची खरेदी देखील करता येणार आहे.
तसेच आजपर्यंत भारतातही झाला नाही, असा सगळ्यात मोठा लिलाव ज्यात बाराशेहून अधिक आयटम्सचा लिलाव या प्रदर्शनाच्या निमित्ताने होणार आहे. शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सोनल हाॅल येथे हा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, राजकोट, बडोदा, बंगळुरू, चेन्नई अशा विविध शहरांमधील लोक उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त दुर्मिळ नाण्यांची खरेदी आणि विक्रीची संधी पुणेकरांना मिळणार आहे. तुमच्याकडे उपलब्ध नाण्यांची ओळख करुन, त्याची अंदाजे किंमत, त्याचे वर्ष, इतिहास, त्यावरील अक्षरे, चित्र, ठसे याविषयीची माहिती नाणकशास्त्रातील तज्ज्ञांकडून जाणून घेता येणार आहे.
अतिशय दुर्मिळ आणि भव्य अशा या प्रदर्शनासाठी 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी संग्राहक स्पर्धकांचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी आणखी एक लिलाव आयोजित करण्यात आला आहे. विनामूल्य खुले असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र टोळे आणि चेअरमन प्रदीप सोहोनी यांनी केले आहे.

फेसबूक वरून साभार

ज्यांना कुणाला आपल्या अ-मराठी भाषिक मित्रमंडळींना खरा बाजीराव कोण आणि काय होता हे कळावे असे वाटत असेल तर त्यांना उपयुक्त ठरू शकेल असा इंग्रजी भाषेत असलेला भाषण आणि प्रश्नोत्तरांचा हा कार्यक्रम रास्ते वाड्यात होत आहे.

THE REAL BAJIRAO: AN INTERACTIVE TALK
Conducted By: Dr. Uday .S. Kulkarni

८ मे २०१६, रविवार, संध्याकाळी ६ वाजता
तिकीट १०० रुपये.

http://intachpune.org/index.php/about-us/our-events-calendar/explore-pun...

कार्यक्रमाचे नाव - लोकबिरादरी मित्र मंडळ तर्फे आयोजित आठवणीतले पुणे सायक्लोथॉन
तारीख - ७ ऑक्टोबर २०१८
ठिकाण - स. प. महाविद्यालय
फोन नंबर ( असल्यास) शिल्पा तांबे - ९२२६९५८८८८, योगेश कुलकर्णी९८२२२७३४५४५४५
वेब साईट - www.lokbiradari.deazzle.in
नोंदणी फी - विद्यार्थ्यांना मोफत आणि इतरांकरता १०० रुपये

क्रोशे, निटिंग आणि टेटिंग च्या वस्तूंचेअनोखे प्रदर्शन
कधी—— १७,१८,१९ फेब्रुवारी २०२४
कुठे— ११३३, सदाशिव पेठ, निंबाळकर तालीम जवळ,
टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर,
पुणे ४११०३०
वेळ——-सकाळी १० ते संध्या ७
कलोपासक ( अलका सुरेश गुडधे)

Pages