पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by स्वाती on 2 February, 2011 - 07:52

येथे पुण्यात होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती लिहूयात.

कार्यक्रमाचे नाव
तारीख
ठिकाण
फोन नंबर ( असल्यास)
किंवा वेब साईट माहित असल्यास

अशा साधारण स्वरूपात माहिती लिहूयात
हा धागा रैना ने काढलेल्या "मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम" या धाग्यावरुन काढला आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"द्रोण"
अरुण कोलटकर ह्यांच्या दीर्घ कवितेची अभिवाचन
सुदर्शन रंगमंच, ३/२/२०११ सायंकाळी ६.३० वाजता
देणगी प्रवेशिका आहे.

सुदर्शन रंगमंच... आप्पा बळवंत चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना पहिली उजवी गल्ली.. कॉर्नरला मंदार लॉज आहे.. तिथे उजवीकडे वळायला बंदी आहे.. रिक्षावाले लक्ष न देता तशीच रिक्षा दामटवतात.. पण स्वतः गाडीने जाणार असल्यास त्याच्या पुढच्या गल्लीत उजवीकडे वळून गल्लीच्या शेवट पर्यंत जावे. समोर सुयोग मंगल कार्यालय आहे.. परत एकदा उजवीकडे वळावे.. उजव्या हातास आहिल्यादेवी मुलींचे हायस्कूल आहे.. ते संपल्यावर परत उजवीकडे वळावे.. डाव्याहाताची साधारण ४थी किंवा ५वी बिल्डींग... खाली बँक पण आहे.. बहुतेक कॉसमॉस..

४,५,६ फेब्रुवारी.. इशान्य मॉल मध्ये विविध प्रकारच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि लोकसंगीतावर आधारित कार्यक्रम आहेत.. आनिश प्रधान, शोभा मुद्गल आणि गाजा-बाजा ने आयोजित केलेले कार्यक्रम आहेत.. बराच मोठा कार्यक्रम आहे.. बाकीचे डिटेल्स टाकतो लवकरच..

हिरकु च्या पत्त्याच्या परिच्छेदाने फारच नॉस्टॅल्जिक झाले ब्वा. :(.
असो. सगळ्या पुणेकरांना शुभेच्छा मस्त मस्त कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायला. Happy

कार्यक्रमाचे नाव: विमेन लीडरशिप समिट

*REGISTER NOW* *FOR PUNE :*
http://www.siliconindia.com/events/siliconindia_events/index.php?eid=Wom...

DATE: Feb 25th, 2011 Friday
TIME: 9.00 AM to 5.00 PM
VENUE:Will be announced shortly !

After the successful earlier editions, Siliconindia is back with the ‘Women
Leadership Summit 2011’ this year at 7 cities(Bangalore, Chennai,
Hyderabad, Mumbai, New Delhi, Pune, Kolkata) all across India on Feb 25th,
2010 (Friday). Nearly 300 women technology professionals come together,
highly successful professional women from the technology industry will share
their knowledge, experiences and insights to help empower more women to
achieve their goals.

This event will feature panels of highly successful professional women from
the technology industry who will share their insights and the value and
impact women leaders contribute to business, families and our communities.
_Our goal is simple: to share experiences, connect people and increase
awareness of your company's women's initiatives_.

This one-day Summit across seven cities sees 300 corporate delegates—mid
and senior level women executives working in technology companies (in each
city)—come together to celebrate the great strides women are making in
their companies and in the business world.
*
NOMINATE:*We would like the women in your organization to benefit from
attending this event. We request you to nominate delegates from your company
You can send your nominations by responding to this mail or directly
register.

कार्यक्रमाचे नाव (बहुतेक) "सहेला रे"...च्या निमित्ताने स्वराभिषेक सोहळा
किशोरीताईंच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त

१२ आणि १३ फेब्रुवारी
स्थळः गणेश कला क्रीडा मंच
संयोजन : संध्या गोखले, अमोल पालेकर
सहभाग : किशोरीताई, उ. अमजद अली खान, नंदिनी बेडेकर, कलापिनी कोमकली, कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी, रघुनंदन पणशीकर,उस्ताद राशीद खाँचे शिष्य प्रसाद खापर्डे, मंजू मेहता, सतीश व्यास, राकेश चौरासिया, टी. एम. कृष्णा आणि श्रीरामकुमार, पद्मविभूषण विकू विनायकराम, सेल्वा गणेश, महेश विनायक, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित भवानीशंकर, सुलतान खाँ साहेबांचे चिरंजीव आणि शिष्य साबीर खाँ!
ही सर्व माहिती सदर लेखात आहे, पण काही कारणामुळे लेख वाचता आला नाही तरी कलावंत कोण आहेत हे लगेच समजावं म्हणून थोडं सविस्तर लिहिलंय.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=134000:...

रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाऊंडेशन आयोजित निमंत्रितांचे कविसंमेलन
दि. ८ फेब्रु. २०११, मंगळवार
स्थळ - महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे
वेळ सायं ६ वाजता.

सहभाग: उद्धव कानडे, मीनल बाठे, अंजली महागांवकर, मृण्मयी भजक, डॉ. संगीता बर्वे, प्रांजल धडफळे, रूपाली अवसरे, आश्लेषा महाजन, मृणालिनी कानिटकर-जोशी, नचिकेत जोशी, प्रमोद खराडे, शिवाजी चाळक, गणेश बोडस, सुजित कदम.
(प्रवेश विनामूल्य)
(संदर्भ - सकाळ(पुणे टुडे) पान ८ वर आज(८/२/२०११) प्रसिद्ध झालेली जाहिरात)

रंगोत्सव २०११ (पर्व पहिले) कुसुमांजली

२०११-१२ हे कुसुमाग्रज ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष !

२६ फेब्रु. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, २७ फेब्रू कुसुमाग्रजांचा जन्मदिवस व आपला सर्वांचा लाडका मराठी भाषा दिन !

ह्या दोन्ही सुवर्णदिनांचे औचित्य साधून " थर्ड बेल एंन्टरटेनमेंट " (Third Bell Entertainment) सादर करीत आहे " रंगोत्सव " (पर्व पहिले) - कविवर्य कुसुमाग्रजांवर आधारित साहित्य, काव्य, नाट्य, कला, चित्र, संगित, नृत्य यांचा संमिश्र आविष्कार " कुसुमांजली " - २ दिवसांचा आनंदोत्सव !!!

प्रदर्शनाचे ठिकाण :
दि. २६ फेब्रु., दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर , पुणे

महोत्सवाचे ठिकाण :
दि. २६ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर , पुणे
दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर , पुणे , टिळक स्मारक मंदिर, पुणे

महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रू २०११ रोजी, स. ११ वाजता.

(हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे)

- महोत्सवातील ठळक वैशिष्ट्ये -

1) कुसुमाग्रजांच्या १०० कवितांवर आधारित पेंटिंग, कॅलिग्राफी ह्यांची स्पर्धा व त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन.

2) प्रेम, मायमराठी, क्रांती, सामाजिक टीका ह्या विषयांवर आधारित काव्य स्पर्धा.

3) पेंटिंग, कॅलिग्राफी, फाँट, स्कल्पचर, काव्यवाचन यांवर आधारित डेमो प्रेझेंटेशन/वर्कशॉप्स.

पेंटिंग: श्री. रवी परांजपे.
कॅलिग्राफी: श्री. अच्युत पालव.
फाँट: सौ. अर्चना लोथे
काव्यवाचन: सौ. मंजिरी जोशी.

4) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या कवितांवर/ साहित्यावर आधारित काव्यवाचन व अभिवाचनाचा कार्यक्रम.

5) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या गाण्यांवर आधारित सांगितीक कार्यक्रम.

6) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील निवडक प्रसंगांचे सादरीकरण.

7) मराठी भाषा विषयावर परिसंवाद व चर्चासत्र.

8) पारितोषिक वितरण समारंभ.

महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रू २०११ रोजी, स. ११ वाजता.
(हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे)

चित्रकला , सुलेखन व कविता स्पर्धा ह्यांचे फॉर्म्स व अटी मिळविण्यासाठी खालील ई-मेल वर ई-मेल पाठवावा ! आम्ही आपणांस लगेचच फॉर्म पाठवू.

tberangotsav@gmail.com

(Kindly circulate this email to your groups / communities / friends etc. who really have the same interest in this)

धन्यवाद्,

Swapnil Raste
Third Bell Entertainment
www.thirdbellentertainment.com

Form is attached below.
For multiple entries , there is different entry fee per entry.

Regards,

Swapnil Raste
Third Bell Entertainment
www.thirdbellentertainment.com

Face book page of Rangotsav
http://www.facebook.com/pages/Rangotsav-by-Third-Bell-Entertainment/1804...

Face book group of Third Bell Entertainment
http://www.facebook.com/group.php?gid=104690680602

समु,
रजिस्ट्रेशन चार्ज रु. ५०० आहे. त्यात अ‍ॅक्सेस टु सेशन, चहा-कॉफी रिफ्रेशमेन्ट्स आणि लन्च आहे. Happy

बालगंधर्वला डॉ. जोशी ह्यांच्या ओरिगामी कलाकृतींचे प्रदर्शन -
१३ ते १६ एप्रिल
वेळ - सकाळी ९ ते ८

(इथे योग्य नसेल तर उडवेन)

एस. एस. फाऊंडेशन संचालित, मानिनी अ‍ॅक्टिविटी ग्रुप व 'जिव्हाळा' आयोजित
'मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम'

गायकः रविंद्र साठे, प्रशांत नासेरी, अश्विनी कुरपे, दिग्विजय जोशी
निवेदनः नचिकेत जोशी (आनंदयात्री)

दि: मंग़ळवार २६ एप्रिल २०११
@बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
वेळ - सायं ५ ते ८

देवेंद्र गावंडे लिखित 'नक्षलवादाचे आव्हान' या पुस्तकाचे प्रकाशनः

हस्ते: आर. आर. पाटील (गृहमंत्री)
प्रमुख पाहुणे: गिरीश कुबेर (कार्यकारी संपादक, लोकसत्ता)

वेळः शुक्रवार ८ जुलै २०११ सायं. ६ वा.
स्थळः एस. एम.जोशी सभागृह, पत्रकार भवनाजवळ, नवी पेठ.

पुस्तकाविषयी:
'साधना' साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेल्या 'दंडकारण्यातून' या लेखमालेतील २७ लेख.
सुहास पळशीकर (प्राध्यापक, राज्यशास्त्र, पुणे विद्यापीठ) यांची विवेचक प्रस्तावना
तीन लेखांचा विशेष विभागः

  1. नक्षलवादाशी लढण्याचा फॉर्म्युला - महेश भागवत
  2. सशस्त्र प्रतिकारः तीन दृष्टिकोनांतून - बेला भाटिया
  3. माओवाद्यांवरील टीकेचा सर्वांगीण परामर्श - चेराकुरी राजकुमार उर्फ आझाद

' ओळख पुणे आणि परिसराची...'

पुणे व परिसराची पाषाणयुग ते आय टी युगापर्यंतची ओळख करून देणारे ४ दिवसांचे वर्कशॉप / कार्यशाळा

आयोजक : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व Samvidya Institute of Cultural Studies.

तारीख : १६, १७ जुलै व २३, २४ जुलै, २०११.

वेळ : स. १० ते सायं. ५,

संपर्क दूरध्वनी : ०२० - २४३३३२९०, ०२० - २४४५४८६६ (१० ते ५)

नोंदणी शुल्क - २०००/- रु.

पुणे व परिसराची भौगोलिक माहिती, जैववैविध्य, पुरातत्त्व, मध्ययुगीन इतिहास, कला परंपरा, स्थापत्य, संस्कृत अभ्यास, साहित्य परंपरा, संगीत, नाट्य, नृत्य, चित्रपट, १९ व्या शतकातील पुणे, स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्योत्तर पुणे इत्यादी विषयांचा ह्या कार्यशाळेत समावेश आहे.

मार्गदर्शन करणारे व या विषयांवर लेक्चर्स देणारे सर्वजण त्यांच्या क्षेत्रातील अभ्यासक व संशोधक मंडळी आहेत.

डॉ. शरद राजगुरु, डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ राजा दिक्षित, डॉ संजीव नलावडे, डॉ विद्यागौरी टिळक, डॉ मंजिरी भालेराव, डॉ श्रीनंद बापट, पांडुरंग बलकवडे, वरदा खळदकर, डॉ अंबरीश खरे, विजय परांजपे, प्रसाद वनारसे, सायली पाळंदे -दातार, आनंद कानिटकर, परिमल फडके आदी मंडळींचा त्यांत समावेश आहे.

अरु,
धन्यवाद ग!
मी आत्ता या वर्कशॉपची माहिती टाकायलाच माबोवर आले होते. कुठे टाकायची ते शोधत शोधत इकडे आले तर तू आधीच ते काम पार पाडलेलं दिसलं. Happy
तू येणारेस का?

वरदा, १६ - १७ जुलै नाही जमणार...इतर काही कमिटमेंट्स घेतल्या आहेत गं! मला यायचे होते, पण आधी हातात घेतलेल्या कमिटमेंट्स टाळता येणार नाहीत.

पुण्यातल्या मैत्रिणींनो, आजच्या सकाळमधली "सेकंड इनिंग " बद्दल वाचलत का ? १६ जुलै, शनिवारी ११ ते २ , हॉटेल ताज ब्लू डायमंड इथे सेमिनार आहे. "पुणे शहर " पान ७ वर आहे बघा. मी विचार करतेय, जावं म्हणून . कोण येतय ?

सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या सन्मती बालनिकेतन संस्थेच्या मदतनिधीसाठी चौरस मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि. आयोजित प्रकट मुलाखत आणि गप्पांचा कार्यक्रम 'ग्रीष्मानंतरचा गुलमोहर'.
शनिवार दि. ३० जुलै २०११
स्थळ : सिद्धी गार्डन, म्हात्रे पुलाजवळ, पुणे
वेळ : सं. ६ वाजता.

कार्यक्रमात सिंधुताईंच्या आयुष्याशी निगडित 'अंतरंग' हा संगीत-नृत्यकलाविष्कार सादर केला जाईल. माई, त्यांची कन्या ममता, आणि दिपक सपकाळ मुलाखतीत सहभागी होतील. सूत्र संचालन करतील अभिनेते जितेंद्र जोशी.

देणगी प्रवेशिका यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. २८ जुलै २०११ पासून उपलब्ध आहेत. वेळ स. ९ ते १२ सं. ५ ते ८.

"माईंची झोळी भरा, तिच्या लेकरांसाठी सढळ हस्ते मदत करा".

संपर्क : ७३५०००४३३४

Pages