रानभाजी १७) शेवग्याची फुले

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 February, 2011 - 04:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेवग्याची फुले
एक किंवा दोन कांदे चिरुन
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
३-४ हिरव्या मिरच्या
१ टोमॅटो
हिंग, हळद
मिठ
अगदी थोडा गुळ
तेल

क्रमवार पाककृती: 

शेवग्याची फुले धुवुन घ्यावीत. तेलावर लसुण पाकळ्या, मिरचीची फोडणी देउन त्यावर कांदा परता. कांदा जास्त शिजवण्याची गरज नसते. मग त्यात हिंग, हळद घालुन शेवग्याची फुले घाला. परतुन एक वाफ घ्या. मग त्यात चिरलेला टोमॅटो, मिठ, गुळ घाला. एक वाफ काढा आणि चांगले परतुन घ्या. झाली भाजी तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

शेवग्याच्या झाडाच्या फांद्या खुप ठिसुळ असतात. पावसाळ्यात बर्‍याचदा मोठ्या शेवग्याच्या फांद्या वार्‍याने पडतात. कधी कधी तर शेंगा काढतानाही फांदी तुटते. मग ह्याची फुले भाजीसाठी उपयोगात आणतात. परवा मी माहेरी गेले होते. तिथे शेंगा काढताना शेंवगेची फांदी खाली आली. मग आईने लगेच ह्या फुलांची भाजी करायचा मार्ग दाखवला.

माझ्या अपेक्षेप्रमाणे खुपच छान चव लागते फुलांच्या भाजीची. बुरजी आनी कालवांसारखीच सारखीच भाजी दिसते.
ही फुले कालवांमध्ये, सुकटीमध्येही घालतात.

रानभाज्या
१) कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
२) कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
३) टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
४) भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
५) कुलू - http://www.maayboli.com/node/9406
६) शेवळ - http://www.maayboli.com/node/16771
७) आंबट वेल - http://www.maayboli.com/node/16838
८) कोरल - http://www.maayboli.com/node/16860
९) कवळा - http://www.maayboli.com/node/17069
१०) वाघेटी - http://www.maayboli.com/node/17171
११) कोरांटी/कोलेट - http://www.maayboli.com/node/17448
१२) मायाळू - http://www.maayboli.com/node/17566
१३) सुरणाचे देठ - http://www.maayboli.com/node/17631
१४) दिंडा - http://www.maayboli.com/node/17948
१५) शेवग्याचा पाला - http://www.maayboli.com/node/18177
१६) रानभाजी टेरी (अळू) - http://www.maayboli.com/node/17006

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवग्याचे फुल डोळ्यात पडले की आंधळेपणा येतो का? मला खुप लहानपणी कोणीतरी असे सांगितले होते. तेच कायम मनात राहिलय.

हो का?? मी करते मग ती भाजी आत्ता. जागू इतक शिकवते आपल्याला थोडा प्रयत्न करायला हरकत नाही. वर्षे तू येतेस का खायला??

ही भाजी मस्त लागते असे आई सांगते, मी कधी खाल्ली नाही.

आई सांगायची की तिच्या माहेरी शेवग्याच्या झाडाखाली रात्रीच्या वेळी चादर अंथरुन ठेवायचे. सकाळी १० पर्यंत भरपुर फुले पडलेली असायची चादरीवर. ती गोळा करुन लगेच भाजी...

शेवग्याचे फुल डोळ्यात पडले की आंधळेपणा येतो का?
मी वाडीला असताना केवळ म्हाता-या बायांनाच शेवग्याचे रोप किवा बी लावायला परवानगी होती Happy शेवग्याचे बी पेरले की आपले आयुष्य त्याला जाते असा समज होता..... मी माझ्या घरी माझ्या हातानेच लावलेय.

रच्याकने, सध्या आजुबाजुला शेवगा अगदी मोडुन पडेल इतका बहरलाय. एकदा फुले गोळा करुन भाजी करुन पाहायला हवी.

जागू, मी वाचले होते त्याप्रमाणे हि फूले उकडून पाणी टाकावे लागते. हि फूले जरा कडसर असतात.
साधनाने लिहिलेय त्याप्रमाणेच फूले गोळा करत असत, आमच्याकडे.

मी आत्त्ताच आईकडुन कंफर्म केले. तिने कधी उकडली नाही पण जर फुल कडवट असेल तर फक्त गरम पाण्यात टाकायचे पाच मिनिटे आणि मग नेहमीसारखी भाजी करावी असे सुचवले.

शुभांगी भाजीवलीला सांगुन ठेव आणायला.

विजय आमच्याकडे कुडाची फुले नाही मिळत. तेही झाड असेल तर माझ्यासाठी ठेउन द्या. पण दिनेशदांनी एकदा फोटो दाखवला होता आणि मी सोलापुरात पाहीले हे कुडाचे फुल. पण तेंव्हा घेउन येणे शक्य नव्हते. आता परत कुठे मिळाली ही फुले की नक्की आणेन.

वर्षा भजी तर छानच होत असेल.

साधना हि फुले गोळा करण्याची आयडीया चांगली आहे. मी पण आता झाडाखाली चादर टाकुन ठेवेन. पण आमच्या कुत्रा त्या फुलांच्या गालीच्यावर जाऊन झोपेल रात्री.

दिनेशदा काल मी केली भाजी ती अजिबात कडसर नव्हती. पण तसे असेल म्हणून आईने मला त्यात किंचीत गुळ घालायला सांगितला असेल.

अरेरे.. सॉरी लोक्स... हे फोटु पाहिल्यावर मला चुक कळाली.... मी हतग्याच्या फुलांना चुकुन शेवग्याची फुले समजले... Sad

आईने अजुन एक पद्धत सांगितली. अंगणात शेवग्याचे झाड असेल तर (आणि गावी तसे असते ब-याच जणांच्या) संध्याकाळी झाडाखाली स्वच्छ झाडुन त्यावर शेणसडा टाकुन सारवतात. दुस-या दिवशी त्याच्यावर पडलेली फुले गोळा करायची. गावी तर फुलांना धुवायची ही गरज पडत नाही. इथे धूळ खुप असते म्हणुन धुवून घ्यावी लागतील.

जागुताई डोंबिवलीला बर्‍याच बायका विकायला घेवुन बसतात, पण केली नाहि कधी , आजच करुन बघेन.
भाजीतर मस्तच दिसतेय.

जागू,
मी थोड्यादिवसापूर्वीच कूड्याची झाडे डोन्गरावरून आणायला सान्गीतले आहे. पण आमच्या डोन्गरावर मीळतात कूड्याच्या शेन्गा.या शेन्गा मे महीन्याच्या शेवटि मिळतात्.आम्ही खूप वाट पहात असतो या शेन्गासाठी. मी एक झाड तुला नक्की देइन.

आज माझ्याकडे घरकामाला येणार्‍या बाईंनी केली ही भाजी. त्यांनी आधी ही फुलं पाण्यात उकळून घेतली आणि निथळून घेतली. मग तेलात हळद, हिंग, लसूण, कांदा-टोमॅटो आणि बटाटा परतून घेऊन त्यात की फुलं घातली आणि वरून लाल तिखट, मीठ, जिरे पूड घातली.

आधी उकळून घेतल्याने कडवटपणा कमी होते असे सांगितले.

जागू, माझी आवडती भाजी आणि सांबारमध्ये जास्त आवडते.

प्राची,थोडी फुल उरली असतील तर सांबार / आमटी मध्ये घाला. खूप टेस्टी सांबार होत.

हो का? पुढच्या वेळी करेन.
माझी आई थालिपीठं करायची. पण मला कृती माहिती नाही. विचारले पाहिजे.
या फुलांचे पकौडेपण करतात असे मेडने सांगितले.

प्राची थॅन्क्स हा धागा वर काढल्याबद्दल. मामींच्या फुलांच्या धाग्यावर मी याच भाजीबद्दल विचारले होते.
वाशी ला ही फुले ३० रुपये पाव किलो या दराने विकायला होती. या फुलांची भाजी करतात हे माहीत न्हवते.

जागू - ही फुलं साफ कशी करायची? म्हणजे ती फांद्यांपासून वेगळी केली की ती तशीच वापरायची का?