सोसायटीत ओनर पार्कींग नसल्याने कॉमन पार्कींग मध्ये गाडी पार्क करावी लागते. त्यामुळे गाडीवर नेहमी कोण न कोण बच्चे कंपणी बसलेली असतेच. खुप वेळा समजाउन सांगितले तरी ऐकत नाही. या रविवारीही असंच दोघे मुलं गाडीवर बसलेली, वर कहर म्हणजे आरसे हालव, गियर टाक वगैरे करत होती. तेव्हा मी त्या मुलांना खडसावलेले. वाटले प्रकरण तिथेच संपले असेल. पण काल सकाळी जेव्हा गाडी काढली तेव्हा जाणवले की गाडीच्या इग्निशन मध्ये काड्या खुपसुन ते बंद केलंय, त्यामुळे चावी इग्निशन मध्ये जात नव्हती.
मागील एक इंडीकेटर फोडलं गेलंय आणि कहर म्हणजे पेट्रोल टाकीवर तर 'YOU F**K' लिहीलंय.
तेव्हा गडबड होती म्हणुन संध्याकाळी त्या मुलाला शोधता येईल म्हणुन दिवस तसाच घालवला, पण मनात राग नि चिडचिड होतच होती.
रात्री जेव्हा त्या मुलाची माहीती काढली तेव्हा कळले की तो सोसायटीच्या चेअरमनचाच मुलगा आहे. तेव्हा तडख त्याच्या घरी गेलो नि त्यांच्या घरच्यांना सांगीतले. काल तुमच्या मुलाला मी गाडीवर बसुन उद्योग करण्या बद्दल रागवले तर माझ्या गाडीवर आज असे असे प्रकार आढळले. त्या मुलाला विचारायच्या ऐवजी तो माझ्यावरच ओरडायला लागला की कशावरुन त्याने केलंय. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहीलंय का वगैरे वगैरे.. मी म्हणालो की गेल्या दिड-दोन वर्षापासुन इथे राहतोय, पण गाडीला काही झाले नव्हते. पण काल तुमच्या मुलाला रागवले आणि आज असं झाले म्हंटल्यावर मला संशय तुमच्या मुलावर येणे सहजीकरच आहे. आणि म्हणुन मी विचारायला आलो. तर त्याची उलट माझ्यावरच आरडा-ओरडा चालु झाला. रागात मीही बोल्लो की 'ठिके तुमच्या मुलानं केलं नाहीतर सोडुन द्या, पण ज्या मुलानं केलंय त्याने त्यांच्या आई-वडीलांचे संस्कार दाखवले'. त्यावर तो आणखिनच चिडला म्हणे हे सगळं मला का सांगताय, याचा अर्थ माझ्या मुलाला बोल्यासारखे आहे. मी म्हंटले की जर तुमच्या मुलानं केलं नसेल तर सोडुन द्या ना.
घर मालक शेजारच्याच बिल्डींग मध्ये असल्याने त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली तर त्यांनी 'ठिके, मी बोलेन कोणाशीतरी. माझ्याही गाडीला खुप वेळा असं झालंय. प्रत्यक्ष पाहील्याशिवाय कोणी काहीच करु शकत नाही' एवढ्यावरच भागवलं.
माझ्या मनाची चिडचिड काही केल्या कमी होईना...
मनात विचार आला की च्यामारी इथे आपण नविन असल्याने, स्थाईक नसल्याने असं काही सहन करावं लागतंय. पुण्यात भाद्याने रहायचंच चुकतंय (कारण हा असा आलेला दुसरा अनुभव). तेव्हा मला पुणेरी पाट्याचं कनसेप्ट आठवली. सकाळी उठल्या उठल्या खाली लिहलेला मजकुर टाईप करुन प्रिंट काढली आणि त्याच्या ४-५ कॉपीज मी जिथे पार्क करतो तिथे आणि सोसाईटीच्या निटीस बोर्डवर लावुन आलोय.
==================================================================
|| सत्कार ||
खालील उद्योग केलेल्या पाल्याच्या आई-वडीलांचे जाहीर सत्कार करायचे योजीले आहे. त्यांनी आपल्या पाल्यावर केलेल्या संस्कार आणि पाल्याने ते संस्कार माझ्या वाहनावर दाखवल्याने भावनाविवश होऊन हा निर्णय घेतला आहे. तरी सदर पाल्याच्या पालकांनी संपर्क केल्यास पुढील गोष्टी संदर्भात विचार विनीमय करता येईल.
पाल्याने केलेले उद्योग :
१] वाहनाचे इग्निशन लॊक मध्ये काड्या घुसवुन तोडले.

२] वाहनाच्या पेट्रोल टाकीवर ‘YOU FUCK’ लिहीले.

३] वाहनाचे इंडिकेटर फोडले.

त. टी. : मला सदर पाल्याची चिंता किंवा राग नाहीय. पण असे संस्कार करणा-या त्या पाल्याच्या मात्या-पित्यांना पाहण्याची उत्सुकता आहे.
आधीक माहीतीसाठी / मदतीसाठी : (इथे माझा नंबर दिलाय.)
==================================================================
असे केल्याने काही फायदा होनार नाही मलाही माहीत आहे, पण हे जर असले कृत्य करणार्याच्या वाचणात आल्यास कदाचीत त्याची त्याला तरी लाज वाटावी एवढंच. कारण मला ती शिवी रोज उठले की सकाळी सकाळी गाडी काढताना पहावी लागणार आहे. 
यातुन अजुन काही पुढं येउ शकते. पण अश्या परिस्थितीला कसे हाताळायचे हेच कळत नाही.
उठुन त्यांच्या सारखं कडा-कडा भांडायला जमत नाही. मग करावं तरी काय ? 
लिंबूजी, अहो कूठले काय, मी
लिंबूजी,
अहो कूठले काय, मी एकटीच आईवडिलांची. म्हतारे आई-वडील. मी शिक्षणाकरता बाहेर.. शनिवारी-रविवारी पुण्यात यायची. बाबांनी आवडीने गाडी घेतलेली मला.. पण ती तशी पडूनच असे आठवडाभर. मग त्या लोकांच्या नजरेत ...
आजही आठवले की वाटते बदडून काढावे. हात्-पाय तोडावे त्यांचे कारण खरोखर इतका त्रास दिला. हिच कारटी ह्या प्रकारानंतर माझ्या आई वडिलांना घाबरवत रात्रीची. लेटरींग पट्टीतून बघणे, शिट्या मारून पळणे. इतके नीच लोक...
शेवटी तो फ्लॅटच विकला आम्ही.
म्हणून उगाच कोणाच्या खोड्या काढणारी लोक पाहिली ना (माबोवर आहेत अशी नमुने) की .. एकदम काठी काढावीशी वाटते.
ध्वनी अरेरे काही लोक निव्वळ
ध्वनी अरेरे काही लोक निव्वळ विघ्नसंतोषी असतात.
दुसर्याचं नुकसान केलं की त्यांना आसुरी आनंद मिळतो, त्याला काहीही उपाय नाही
अनुमोदन दक्श...
मल्ल्या हा बघ पुरावा... <<<<<
मल्ल्या हा बघ पुरावा... <<<<< नतद्रष्ट | 1 February, 2011 - 13:23
I FUCK THEN YOU BORN....WRITE
I FUCK THEN YOU BORN....WRITE THIS ON HIS VEHICLE
पाण्यात रहायचं मग माश्याशी
पाण्यात रहायचं मग माश्याशी वैर नाही करता येत >> अशा वेळी माश्याशी मैत्री करावी. फायदा होतो.
पुण्याला एका सोसायटीमध्ये थोड्याफार प्रमाणात असाच त्रास होता. आम्ही हीच strategy वापरली.
गणेशोत्सवात जरा जास्तच वर्गणी दिली. मग काय सगळी मुलं आमच्याशी चांगली वागायला लागली.
अशा वेळी माश्याशी मैत्री
अशा वेळी माश्याशी मैत्री करावी.
>>> यॅक्झअॅक्टली हीच स्ट्रेटेजी आम्हीही वापरतो ...शिवाय वॉचमनला ३१ डेसें पार्टीही देतो
पण मल्ली वॉचमन नाही का तुमचा अपार्ट्मेन्टला
एकदम काठी काढावीशी वाटणारा एखादा वॉचमन ठेवा की सोसातटीने मिळुन
अजयने सुचवलेला उपाय देखिल
अजयने सुचवलेला उपाय देखिल करता येतो
काना खाली एक मस्त पैकी जाळ
काना खाली एक मस्त पैकी जाळ काढा.................
होतील सरळ..........>>
मल्लीनाथ, पाटी वगैरे पुणेरी प्रकार म्हणजे " ए...ए... खडा मारु का?..." अशातली गत. आपल्यासारख्या सोलापुरींनी फक्त वरील उपाय."फड्ड्ल्ल दिशिल कानपट्टीखाली"
आपल्यासारख्या सोलापुरींनी
आपल्यासारख्या सोलापुरींनी फक्त वरील उपाय."फड्ड्ल्ल दिशिल कानपट्टीखाली"
आता वाटते खरच "फड्ड्ल्ल दिशिल कानपट्टीखाली" सोलापुरी दिली अस्ती तर बरं झालं असतं. पुढच्या वेळेस मात्र दिसला की सगळाच वचपा निघेल.
जेव्हा त्या मुलाला माझ्या गाडीवर उद्योग करताना पाहीलेले, तेव्हा पहीला विचार हाच आलेला. आणि तावा तावाणे त्याच्या जवळ गेलेलो, पण परत विचार केला की च्यामारी मी नसताना किडे करेल म्हणुन दम देउन सोडुन दिला. आज वर निट समजाउन सांगत होतो, पण पहील्यांदाच राग दाखवुन हात आवरुन दम दिला त्याचाच बदला घेतला त्याने.
keep it up. That's the
keep it up. That's the spirit.
keep it up. That's the
keep it up. That's the spirit.
नक्की मारा हं थोबाडीत
नक्की मारा हं थोबाडीत
आपल्यासारख्या सोलापुरींनी
आपल्यासारख्या सोलापुरींनी फक्त वरील उपाय."फड्ड्ल्ल दिशिल कानपट्टीखाली"<< किंवा त्या चेयर्मनच्या घरी जाऊन काय फर्निचर नवीनच केलाव वाटतं?"अशी धमकी देऊन ये ..नाहितर एक दोन सोलापूरी मित्र आणून सरळ गच्ची पकड एकेकाची..
मी येउ
मी येउ का....................????????????????????????
तुम्ही फक्त पुढे हो म्हणा.........................
मला नाही वाटत की हे जास्त
मला नाही वाटत की हे जास्त ताणून काही फायदा आहे. शिकण्याची गोष्ट काय की आपण सुद्धा अशी मस्ती केलेली असते लहान असताना. तेव्हा लहान मुलान्शी भाण्डण करण्या पेक्षा त्यान्च्याशी प्रेमाने घेतल अणी मैत्री केली तर अशा गोष्टी टाळता येतील. -- These are my two cents.
अरेरे मल्ली , त्यांच्या
अरेरे मल्ली , त्यांच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे त्यांच्यावर वॉच ठेव एक ना एक दिवस नक्की रंगे हाथ सापड्तील , तेव्हा चांगला सोलपटुन काढ त्यांना.
अरेरे मल्ली , त्यांच्या
अरेरे मल्ली , त्यांच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे त्यांच्यावर वॉच ठेव एक ना एक दिवस नक्की रंगे हाथ सापड्तील , तेव्हा चांगला सोलपटुन काढ त्यांना.
हम्म्म... पाहु काय होतंय ते..
मल्ल्या, सकाळी लोडेड नाष्टा,
मल्ल्या,
सकाळी लोडेड नाष्टा, रोज दोन-चार अंडी, भरपेट जेवण, झोपताना एक ग्लास दूध. रोज एक तास व्यायाम्/कमित कमि ५० सुर्यनमस्कार.
एका महिन्यानी त्या चेरमनला भेटायला जा.
सकाळी लोडेड नाष्टा, रोज
सकाळी लोडेड नाष्टा, रोज दोन-चार अंडी, भरपेट जेवण, झोपताना एक ग्लास दूध.<<<<< ह बा..... हा तर मल्ल्याचा महिन्याचा खुराक असेल
जस्ट डायल वर कॉल
जस्ट डायल वर कॉल करा...................
ह.बा. ....
ह.बा. ....

हा तर मल्ल्याचा महिन्याचा
हा तर मल्ल्याचा महिन्याचा खुराक असेल >>>
हि फोटोजची आयडिया आवडली. पण
हि फोटोजची आयडिया आवडली.
पण त्रास कमी होइलच असे नव्हे तर वाढूही शकतो.
हातघाईवर येण्याआधी रितसर पोलिसांत तक्रार करा. मग रंगेहात भेटलंच कोणी तर धरून तुडवणं सोप्पं जाईल.
ह्या अशा धेंडाच्या ओळखी-पाळखीही बर्याच असतात. नाहक त्रास वाढू शकतो.
आणि तु एकटाच असा नसशील त्या सोसायटीत, अजून बर्याच जणांना थोडा-अधिक त्रास असेलच. सावधपणे सगळ्यांना हेरून, एकत्र करून असल्यांना धडा शिकवता येईलच की.
चाणक्यनिती वापरा
स्वप्ने, मेले तुझी पोस्ट
स्वप्ने, मेले तुझी पोस्ट वाचुन, त्या सुरात म्हणुन पाहुन ऑफिसमधे लै हासत सुटले ना.
सकाळी लोडेड नाष्टा, रोज
सकाळी लोडेड नाष्टा, रोज दोन-चार अंडी, भरपेट जेवण, झोपताना एक ग्लास दूध. रोज एक तास व्यायाम्/कमित कमि ५० सुर्यनमस्कार.
एका महिन्यानी त्या चेरमनला भेटायला जा.>>>
प्रचंड अनुमोदन.
हंसा.. अनुमोदन. हा त्रास
हंसा.. अनुमोदन.
हा त्रास वाढुही शकतो म्हणुनच शांत बसावं लागतंय.
मुग्धानंद..
Pages