माझी पुणेरी पाटी...!!!

Submitted by MallinathK on 1 February, 2011 - 01:39

सोसायटीत ओनर पार्कींग नसल्याने कॉमन पार्कींग मध्ये गाडी पार्क करावी लागते. त्यामुळे गाडीवर नेहमी कोण न कोण बच्चे कंपणी बसलेली असतेच. खुप वेळा समजाउन सांगितले तरी ऐकत नाही. या रविवारीही असंच दोघे मुलं गाडीवर बसलेली, वर कहर म्हणजे आरसे हालव, गियर टाक वगैरे करत होती. तेव्हा मी त्या मुलांना खडसावलेले. वाटले प्रकरण तिथेच संपले असेल. पण काल सकाळी जेव्हा गाडी काढली तेव्हा जाणवले की गाडीच्या इग्निशन मध्ये काड्या खुपसुन ते बंद केलंय, त्यामुळे चावी इग्निशन मध्ये जात नव्हती. Sad मागील एक इंडीकेटर फोडलं गेलंय आणि कहर म्हणजे पेट्रोल टाकीवर तर 'YOU F**K' लिहीलंय. Angry तेव्हा गडबड होती म्हणुन संध्याकाळी त्या मुलाला शोधता येईल म्हणुन दिवस तसाच घालवला, पण मनात राग नि चिडचिड होतच होती.

रात्री जेव्हा त्या मुलाची माहीती काढली तेव्हा कळले की तो सोसायटीच्या चेअरमनचाच मुलगा आहे. तेव्हा तडख त्याच्या घरी गेलो नि त्यांच्या घरच्यांना सांगीतले. काल तुमच्या मुलाला मी गाडीवर बसुन उद्योग करण्या बद्दल रागवले तर माझ्या गाडीवर आज असे असे प्रकार आढळले. त्या मुलाला विचारायच्या ऐवजी तो माझ्यावरच ओरडायला लागला की कशावरुन त्याने केलंय. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहीलंय का वगैरे वगैरे.. मी म्हणालो की गेल्या दिड-दोन वर्षापासुन इथे राहतोय, पण गाडीला काही झाले नव्हते. पण काल तुमच्या मुलाला रागवले आणि आज असं झाले म्हंटल्यावर मला संशय तुमच्या मुलावर येणे सहजीकरच आहे. आणि म्हणुन मी विचारायला आलो. तर त्याची उलट माझ्यावरच आरडा-ओरडा चालु झाला. रागात मीही बोल्लो की 'ठिके तुमच्या मुलानं केलं नाहीतर सोडुन द्या, पण ज्या मुलानं केलंय त्याने त्यांच्या आई-वडीलांचे संस्कार दाखवले'. त्यावर तो आणखिनच चिडला म्हणे हे सगळं मला का सांगताय, याचा अर्थ माझ्या मुलाला बोल्यासारखे आहे. मी म्हंटले की जर तुमच्या मुलानं केलं नसेल तर सोडुन द्या ना.

घर मालक शेजारच्याच बिल्डींग मध्ये असल्याने त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली तर त्यांनी 'ठिके, मी बोलेन कोणाशीतरी. माझ्याही गाडीला खुप वेळा असं झालंय. प्रत्यक्ष पाहील्याशिवाय कोणी काहीच करु शकत नाही' एवढ्यावरच भागवलं.

माझ्या मनाची चिडचिड काही केल्या कमी होईना... Sad मनात विचार आला की च्यामारी इथे आपण नविन असल्याने, स्थाईक नसल्याने असं काही सहन करावं लागतंय. पुण्यात भाद्याने रहायचंच चुकतंय (कारण हा असा आलेला दुसरा अनुभव). तेव्हा मला पुणेरी पाट्याचं कनसेप्ट आठवली. सकाळी उठल्या उठल्या खाली लिहलेला मजकुर टाईप करुन प्रिंट काढली आणि त्याच्या ४-५ कॉपीज मी जिथे पार्क करतो तिथे आणि सोसाईटीच्या निटीस बोर्डवर लावुन आलोय.

==================================================================
|| सत्कार ||

खालील उद्योग केलेल्या पाल्याच्या आई-वडीलांचे जाहीर सत्कार करायचे योजीले आहे. त्यांनी आपल्या पाल्यावर केलेल्या संस्कार आणि पाल्याने ते संस्कार माझ्या वाहनावर दाखवल्याने भावनाविवश होऊन हा निर्णय घेतला आहे. तरी सदर पाल्याच्या पालकांनी संपर्क केल्यास पुढील गोष्टी संदर्भात विचार विनीमय करता येईल.

पाल्याने केलेले उद्योग :

१] वाहनाचे इग्निशन लॊक मध्ये काड्या घुसवुन तोडले.

Clipboard01.jpg

२] वाहनाच्या पेट्रोल टाकीवर ‘YOU FUCK’ लिहीले.

Clipboard02.jpg

३] वाहनाचे इंडिकेटर फोडले.

Clipboard03.jpg

त. टी. : मला सदर पाल्याची चिंता किंवा राग नाहीय. पण असे संस्कार करणा-या त्या पाल्याच्या मात्या-पित्यांना पाहण्याची उत्सुकता आहे.

आधीक माहीतीसाठी / मदतीसाठी : (इथे माझा नंबर दिलाय.)
==================================================================

असे केल्याने काही फायदा होनार नाही मलाही माहीत आहे, पण हे जर असले कृत्य करणार्‍याच्या वाचणात आल्यास कदाचीत त्याची त्याला तरी लाज वाटावी एवढंच. कारण मला ती शिवी रोज उठले की सकाळी सकाळी गाडी काढताना पहावी लागणार आहे. Angry

यातुन अजुन काही पुढं येउ शकते. पण अश्या परिस्थितीला कसे हाताळायचे हेच कळत नाही. Sad उठुन त्यांच्या सारखं कडा-कडा भांडायला जमत नाही. मग करावं तरी काय ? Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय वात्रट कार्ट असेल Angry
बरं केलंस मल्ल्या...अर्थात गाडीचं नुकसान झालं ते काही भरुन निघणार नाही यातुन..त्याची त्याला लाज वाटली तरी खुप झालं!

मल्ल्या, उपाय चान्गला हे, उपयोग झाला तर ठीकच आहे.
फक्त गेन्ड्याच्या कातडी असलेल्यान्ना याने फरक पडेल अशी अपेक्षा करू नकोस. (त्यातुन आपण म्हणजे [आपल्या फ्ल्यॅटनामक राज्ज्याचे] राजे, बायको पोरे म्हणजे अनुक्रमे राज्ञी, राजपुत्र/राजकन्या वगैरे अविर्भावात जगणार्‍यान्च्या लाडक्या राजपुत्रान्बाबतीत तर अवघडच अस्ते)
स्वगतः
(मात्र मी तुझ्या जागी अस्तो, ते उद्योग त्याच (वा अन्य कोणा) पोराचे याचे खात्री करुन त्या पोराची सायकल्/बाईक जे काय असेल ते शोधुन काढले अस्ते, अन निशाचर बनुन जशासतसे या न्यायाने परतफेड केली अस्ती! अस्ल्या लोकान्ना हीच भाषा कळते, अन कोणसेसे सन्त सान्गुन गेलेतच... नाठाळाचे माथी हाणा काठी! कलियुग हे, कलियुगात तुमच्यातही, प्रतिकारासाठी "उपद्रवमुल्य" अर्थात "न्युसन्सव्ह्याल्यु" असेल तरच टिकता येते म्हणलं!)
स्वगत समाप्तः

लिंबुभै... एवढं कुठं वेळ काढुन अस्ले उप्द्व्याप करायचे Sad घरी जाउन कधी एकदा अंग टाकतो असं झालेलं अस्तं कधी कधी.

माझ्या अ‍ॅक्टीव्हाची बॅटरी चोरीला गेलेली आहे, सीट कव्हर फाडलेलं मिळालं आहे. सद्ध्याच अचकट विचकट लिहून ठेवलेलं मिळालेलं आहे.. Sad

मघाशी घाई घाईत अर्धवट प्रतिसाद दिला.. Sad
प्रत्येक सोसायट्यांमध्ये असे एखादे तरी नतद्रष्ट कार्टे असतेच. Sad आम्ही सध्या राहतोय तिथे शिफ्ट झालो त्या दिवशी पासून सलग ३ दिवस रोज माझी गाडी पंक्चर करून ठेवली जायची.. पहिल्या दिवशी योगायोग वाटला, पण म्हणलं दोन्ही टायर एकदम कसे पंक्चर होतील? Uhoh मग नीटच लक्षात आलं की हे केलं गेलंय ते.. पण विचारणार कोणाला? Sad ओळख सुद्धा नव्हती कोणाशी. मग पंक्चर्/पेट्रोल चोरीचे बरेच अनुभव घेतले, आणि प्रत्येक वेळेला नविन कारण सापडले.. त्या कृत्याचे.. म्हणजे मुलांनी मजेत केलं, आम्ही लावतो त्याच ठिकाणी तुम्ही आज गाडी पार्क केली म्हणून तुम्हाला धडा शिकवण्यासाठी, मध्येच गाडी लावली म्हणून (मध्ये लावली नसली तरिही यांना ती मध्ये वाटणार) कारण ह्यांचे स्वतःचे फ्लॅट आणि आम्ही घरभाडेकरू म्हणून... Sad जवळ जवळ २ वर्षांनी हा त्रास थांबला.... आम्ही कधी भांडायला गेलो नाही खरंतर जाऊ शकलो नाही... कारण कोण करतंय ते शोधूच शकत नव्हतो ना... Sad

दक्शे, पंक्चर चे किस्से तर वेगळेच. चक्क चक्क टायर मध्ये विबिट घुसवुन ठेवलेले सापडलेत कित्तीतरी वेळा. पण मी नेहमीच दुरलक्ष करत आलोय. पार्कींग साठी असं एकदोनदा एका मुलीशीही बाचा बाची झाली. म्हणे गाडी दुसरी कडेलावा, मी आता गाडी घेतलीय आणी इथे लावणारे... Angry (*@#&*@#*) सरळ म्हंटले नाही लावणार जा. त्या नंतर ३-४ वेळा गाडीच्या टायर मध्ये कानातले असतात तसे/बोर्ड वर पेपर स्टीक साठी वापरतात तस्ले रिबिट्स सापडले. पण प्रत्यक्षदर्शी नसल्याने काही करता आले नाही. आज सकाळीही मला त्या मुलीची शंका आलेली, कारण ती नेहमीच माझ्याशी इंग्रजी झाडते. आणि कोण करतंय तेच माहीत नसल्याने मीही काही करु शकत नाही. Angry

मल्ल्या शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात पण काही लोक कोडगे असतात, त्यांच्या नादाला न लागणं हेच शहाणपणाचं ठरतं काही वेळेला..

मल्ल्या, जमल्यास एखाद्या रात्री जागुन फोटोच काढ....आणि मग जिकडेतिकडे कॉपीज डकव... पोलिसात पण दे .. व्हिडीओ करता आला तर आणखिनच उत्तम... सरेआम प्रोजेक्ट कर सोसायटीच्या भिंतीवर...

मल्ल्या हा त्रास बर्‍याच जणांना होतो. तु केलेला उपाय चांगला आहे. जर सोसायटीतील सगळ्यांनाच हा त्रास होत असेल तर सोसायटीवाल्यांना एकत्र करुन सिसी टिव्ही लावुन घ्या. म्हणजे चोरापासुनही सावधानता बाळगता येईल.

..

जागु, सीसी टीव्हीची आयडिया उत्तम.
परंतु त्यआचा मेंटेनन्सची जबाबदारी कोण घेणार? सोसायटीच्या चेअरमनचाच मुलगा जर नतद्रष्ट असेल तर तो नक्कीच तयार होणार नाही सीसी टीव्ही लावायला ...

लाजो... Lol

जागु, सीसी टीव्हीची आयडिया उत्तम.
परंतु त्यआचा मेंटेनन्सची जबाबदारी कोण घेणार

मग नाका पेक्षा मोतीच जड होईल. Proud

मल्ल्या शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात पण काही लोक कोडगे असतात, त्यांच्या नादाला न लागणं हेच शहाणपणाचं ठरतं काही वेळेला
असं म्हणुन कित्ती वेळा आणि कित्ती म्हणुन नुकसान सोसायचं ? Uhoh

मल्ली , खरच असल्या प्रसंगात काहीच करता येत नाही Sad पाण्यात रहायचं मग माश्याशी वैर नाही करता येत Sad

(अवांतर : माझा पुण्यातला एक मित्र असाच नतद्रष्ट होता ...पण इतकाही नाही ...तोडफोड करायचा नाही ...फक्त रोज रात्री पेट्रोल काढुन घ्यायचा Proud ).

मल्या, वर जशी पाटी लिहीलिस ना, तशीच "शिव्या नाहीत, पण शापाची" पाटी लिहून बघ
म्हणजे जस की, "गाडीची हवा सोडणार्‍याचे आठ दिवसात अमकेतमके होईल" वगैरे
कलियुगातली लोकं देखिल घाबरतातं हो अस्ल्या "शापान्ना" Proud करुन तर बघ!

काहि फायदा नाहि अशी पाटी लिहिण्याचा. निर्लज्ज लोक हसून पुढे जातील. उलट आणखी त्रास वाढू सुद्धा शकतो.
मला कारच्या बाबतीत असाच अनुभव आहे. स्वतःच्या जागेत प्लॅट असूनसुद्धा.
कारण इतरांची वात्रट कार्टी दिवसभर मैदानात क्रिकेट न खेळता बिल्डिंगच्या मधेच खेळत. पार्कींग असे दिल्या नसल्याने गाडी तिथे पार्क केली की कारचे आरसे फोड, कवर फाड, काचेवर काहितरी लिहून चिकटवून जाणे. एकदा तिथल्या दोन मुलांवर संशय घेतला म्हणून एका रात्रीत गाडीची समोरची काच फोडलेली. मला नक्की माहित होते की हे सोसायटीच्या त्याच चेअरमनच्याच दोन मुलांच्या नेतृत्वाखाली झाले म्हणून विचारयाला गेले तर घाण शिव्या देवून त्यांची आई आली. एवढेच नाही तर बाकीच्या लोकांनी सपोर्ट केला की मी हा आरोप कसा करते कारण त्यांची कारटी सुद्धा तिथेच क्रिकेट खेळत. जीव इतका चरफडला की देव ह्यांना मोठी शिक्षा देवो असे वाटले कारण त्रास उलट ज्यास्त वाढला त्यात मी एकटी बाई ना...
ती हल** कारटी आज मोठी झालीत व काहिच त्यांचे नुकसान नाही झाले आजवर... आजही जीव चरफडतो ती ८ वर्षे आठवली की... अश्याना शिक्षा कशी होत नाही असे वाटते.
इतका त्रास मला झाला पण आपण एकटे व आई वडिल म्हतारे एकटेच घरी म्हणून घाबरून गप्प बसले काहिच करु शकले नाही. हि पुण्यात असतानाची गोष्ट. लोक काय कुठेही सारखीच पण वर उल्लेख आहे शहराचा म्हणून...

शेवटी परदेशातली संधी मिळाली तशी गाडी विकली.

ध्वनी, वाचून वाईट वाटले!
स्वगतः
माझ्या गाडीची काच फोडली अस्ती तर?????
ती कार्टी जिथे क्रिकेट खेळायची तिथे मी जुने जळके इन्जिन ऑईल ओतुन ठेवले अस्ते (माझ्याकडे अस्ते भरपुर)
घरात खलबत्त्यात काच कुटून त्याची पावडर तिथे रोजच्या रोज टाकली अस्ती
ती पोरे जिथे जिथे टेकुन उभारतात तिथे तिथे खाजकुयली लावली अस्ती
माझ्या गाडीची काच फुटली रे फुटली की बाकी चार/पाच सोसायटी मेम्बरान्च्या काचा फोडल्या अस्त्या
फक्त हे अस वागायची "शिकवणच" आम्हाला नसल्याने, आमचे सुसन्स्कार आमच्या अस्तित्वालाच मारक ठरतात! असो
स्वगत समाप्त

ध्वनी, अगदी कै नै तरी "परिक्षेत कमी मार्क पडतील" हा शाप (अन आलेला कितीही मार्कान्चा रिझल्ट) त्या पोरान्च्या घरात रामायण-महाभारत युद्धकालिन परिस्थिती बनवायला पुरेसा ठरेल! Proud

ध्वनी Sad काही लोक निव्वळ विघ्नसंतोषी असतात.
दुसर्‍याचं नुकसान केलं की त्यांना आसुरी आनंद मिळतो, त्याला काहीही उपाय नाही Sad

Pages